उबंटु अनुभव

मी सॉफ्टवेअर इंजिनियर नसल्याने माझा संगणकीय संबंध हा ऑफिस ऍप्लिकेशन्स, जीआयएस्, थोडेफार (उगाचच) वेब ऍप्लिकेशन्स इत्यादी पुरता मर्यादीत असतो. थोडक्यात मायक्रोसॉफ्ट जी कुठली खिडकी उघडेल त्यातून माहीती तंत्रज्ञानाचा प्रकाश पाडून घेयचा हेच सोयीस्कर. तरी देखील काहीतरी नवीन प्रकार करायला आवडत असल्याने ८-१० वर्षांपुर्वी तत्कालीन जुन्या झालेल्या अडगळीतील संगणकात रेडहॅट लिनक्स घालून पाहीली. जमले देखील मात्र इंटरनेटला जोडता न आल्याने तसेच राहून गेले... शिवाय सिस्टीम हळू वाटली हे पण कारण होतेच. नंतर तो विचार परत डोक्यात आला नाही. मात्र मधे परत येथे चर्चा वाचल्यावर मोह झाला पण टाळला. मग परत काही दिवसांनी वाचले आणि म्हणले बघूया तरी...

शोध घेतल्यानंतर् वुबी हा विन्डोजवाल्यांसाठीचा इन्स्टॉलर मिळाला जो बाकी लिनक्स कमांड न वापरता उबंटू इन्स्टॉल करतो. मग एक जुना लॅपटॉप धूळ फुंकरून बाहेर काढला आणि चढवायचा प्रयत्न केला. हे वुबी प्रकरण अपेक्षेपेक्षा फारच सोपे निघाले! आणि साधारण अर्ध्यापाऊण तासात उंबटू सिस्टीम चालू झाली. लगेच त्यात वायरलेस कनेक्शन्स कुठे आहेत ते दाखवले आणि काही कीस्ट्रोक्स मधे आंतर्जालावर होतो. आश्चर्य म्हणजे मराठीपण सहज दिसत होते. थोडे ब्लर्ड. अजानुकर्णाने माहीती दिली त्याचा फायदा झाला. (माझ्या खरडवहीत पहा).

गेले दोन दिवस घरात मी फक्त उबंटूच वापरत आहे. कारण अगदी साधे (नव्याच्या नवलाई व्यतिरीक्त!) - विंडोज् शी तुलना करता येत नाही इतके गतिमान! आता जरा खेळायला येऊ लागल्याने कॉन्फिडन्स वाढला आणि मग म्हणले कॅमेराचे एसडी कार्ड घालून पाहू. लगेच ओळखले. त्यात एफ-स्पॉट म्हणून एक सॉफ्टवेअर आधीच होते. पण ते तितकेसे आवडले नाही म्हणून जरा शोधले. मग ल्क्षात आले की कदाचीत डिजीकॅम म्हणून एक सॉफ्टवेअर चांगले असावे...

मग सिस्टीम मधे जाऊन सिनॅप्टीक पॅकेज मॅनेजर मधे ते शोधले. आणि काही टिचक्यात ते इन्स्टॉल केले.

हे डिजीकॅम बर्‍यापैकी प्रोफेशनल फोटो एडीटींग सॉफ्टवेअर आहे. ज्यांनी वापरले नसेल त्यांनी अवश्य वापरून पहा:

बाकी अजून ओपन ऑफिसपेक्षा ऑफिस २००७ आवडते त्यातील सोयींमुळे ही वस्तुस्थिती आहे. पण ओपन ऑफिस येथे गतिमान असल्याने चांगले वाटत आहे हे देखील तितकेच सत्य आहे. (विंडोज मधे खूप रिसोअर्सेस ते घेते...)

Comments

अरे वा

आपल अनुभव उत्साहवर्धक आहे.

नेहमीच्या विंडोजपेक्षा संगणक आधीक गतिमान वाटतो का? विशेषता आंतरजालावर फाईल चढवताना, उतरवताना? कुठले संकेतस्थळ न्याहळका उबंटूमधे लवकर दिसु लागते का? विंडोजपेक्षा?

सध्या तुम्ही विंडोज, उबंटू असे दोन्ही वापरत आहात का? उबंटू डिफॉल्ट प्रणाली का?

विंडोज पेक्षा

नेहमीच्या विंडोजपेक्षा संगणक आधीक गतिमान वाटतो का? विशेषता आंतरजालावर फाईल चढवताना, उतरवताना? कुठले संकेतस्थळ न्याहळका उबंटूमधे लवकर दिसु लागते का? विंडोजपेक्षा?

मी ज्या संगणकावर उबंटू चढवला आहे तो विंडोज म्हणून प्रचंड स्लो चालला होता. शेवटी तो न वापरता चालू शकत होते म्हणून बाजूस ठेवून दिला. त्याचे एक कारण जसे विंंडोज् आहे तसे दुसरे कारण मला वाटते नॉर्ट्नपण होते. मात्र आता सुरवातीस विंडॉज् च्या ऐवजी उबंटू सिलेक्ट करून चालू केला (ही स्टेप तातडीने करावी लागते नाहीतर डीफॉल्ट विंडोज् चालू होते!) की सर्व काही त्याच संगणकावर गतिमान!

जर एखादा संगणक आपण फक्त आंतर्जालासाठी म्हणून विशेषकरून वापरत असाल तर अवश्य उबंटू घालून पहा. मात्र एक गोष्ट् नेहमीप्रमाणे लक्षात ठेवा - सर्वाचा बॅकप आधी करून ठेवा. विशेष करून तुमच्या व्यक्तिगत फाइल्सचा.

विंडोज व उबुंटूचा पर्याय

विंडॉज् च्या ऐवजी उबंटू सिलेक्ट करून चालू केला (ही स्टेप तातडीने करावी लागते नाहीतर डीफॉल्ट विंडोज् चालू होते!)

आधीच विंडोज असलेल्या संगणकावर उबुंटू टाकले की उबुंटूचे बूटलोडर वापरले जाते. ऑपरेटिंग सिस्टमचा पर्याय निवडण्यासाठीचा वेळ तुम्हाला हवा तितका बदलता येतो. त्यासाठी सोपा उपाय म्हणजे /boot/grub/menu.lst मध्ये बदल करणे. मात्र हे बदल फार काळजीपूर्वक करावे लागतील. नवशिक्यांनी ते करु नयेत. एक ग्राफिकल टूलही उपलब्ध आहे मात्र ते इन्स्टॉल करावे लागेल. त्याची माहिती देतो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मस्तच

मस्तच लिहिला आहे अनुभव. एकदम माहितीपुर्ण. चित्रे सुद्धा माहितीपुर्ण आहेत.
स्वानुभव असा आहे की जर जागा भरपुर असेल तर उबुंटु १५ जीबी जागा राखुन ठेवु शकते. तज्ञांनी माहितीमध्ये भर घालावी.


हेहे विरह.. !

काही महीन्यांपूर्वी मी उबंटू वापरत् होते. काही कारणाने परत एक्स्पीला आले.
तुमचा लेख वाचून उबंटू विरह् दाटून आला.. व आत्ता लगेच इन्स्टॉल केले. विंडोज अंतर्गत चालणारी प्रणाली.
बरं वाटतंय ! :)

उबंटु कुठे मिळेल्

हे उबंटु कुठे मिळेल. आंतरजालावर काही दुवा आहे का? आणि इन्स्टॉल करणे (पार्टीशनिंग) वगैरे सोपे आहे का?

वुबी

गणा मास्तर,
वुबी इथुन उतरवुन् घ्या. आणि त्यानंतर काहीही (पार्टिशनिंग वगैरे) करावे लागत नाही. वुबी इन्स्टॉलर सगळे करतो. :)

उबुंटु..

उबुंटुची डाउनलोड करुन लाईव्ह सिडी केली आहे. परंतु ते इंस्टॉल करताना विंडोज विस्टा सुद्धा ठेवायचे असेल तर काय करावे लागेल? आणि पार्टीशन करावे लागेल का?

गणा मास्तर, उबुंटु www.ubuntu.com येथुन उतरवुन घेता येईल किंवा लाईव्ह सिडी सुद्धा मागवता येईल.

- सूर्य.

मस्त!

वा नविन समुदायाची सुरुवात विकास रावांनी मस्त केली. :)

मी सुद्धा वुबी वापरुनच उबुंटू टाकले आणि माझा अनुभव अगदी विकासरावांसारखाच आहे. फारच सोपे संस्करण. काहीही अडचण आली नाही. पार्टीशनींग वगैरे क्लिष्ट प्रकरांची गरज नाही. ड्युअल बूट आपोआप बनले जाते विनासायास. संगणकाचा वेग जाणवण्याइतपत वाढला आहे. आंतरजालाचा वेग तर खूपच वाढला आहे. वरचेवर संगणक 'हँग' होण्याचे प्रकार बंद झाले. संगणक रिस्टार्ट आतापर्यंत फक्त एकदा करावा लागला आहे (काही महत्वाच्या ड्रायव्हर आणि अपडेट्ससाठी). नियमीत विंडोज वापरणार्‍या माझ्या सारख्या वापरकर्त्याला हा बदल म्हणजे रिक्षातुन उतरुन आलिशान मोटारीत बसण्यासारखेच आहे :)

विकासरावांनी वर उल्लेख केलेली अक्षरे अस्पष्ट दिसण्याची समस्या मला तरी आलेली नाही. ही काहीतरी डिस्प्ले ड्रायव्हरची भानगड असावी असे वाटते. (चित्रांमध्ये अक्षरे खूपच गिचमीड दिसत आहेत ही समस्या आता दूर झाली आहे का?)

अक्षरे

धन्यवाद... :-)

आता मला देखील अक्षरे स्पष्ट दिसताहेत. चित्रांमधे गिचमिड वगैरे काही दिसली नाही. मात्र एक मजेशीर अनुभव येत आहे: संगणक थोडावेळ जरी आयडल राहीला आणि नंतर वापरायला लागलो तरी त्याची स्क्रीन थोडी डिम राहते. मग मॅन्युअली त्याचा ब्राईटनेस वाढवावा लागतो. पण ती काही तरी सेटींग मधील गडबड असेल असे समजून मी अजून लक्ष घातलेले नाही पण लवकरच बघेन.

कुठली नवीन सॉफ्टवेअर्स जर कोणी वापरून पाहीली तर येथे अनुभव लिहा! (उ.दा. वरील डिजीकॅम)

धन्यवाद

मी वापरलेली पद्धत . . .

देवनागरी अक्षरे सुबक दिसण्यासाठी मी वापरलेली पद्धत . . .

तुमच्या होम फोल्डर मध्ये .fonts.conf या नावाची नवीन टेक्स्ट फाइल बनवा.
खालील ओळी त्या फाईल मध्ये टाका
( हा एक्सएमएल कोड असल्याने मला तो खाली तसाच्या तसा टाइप करता आला नाही. म्हणून चित्र टाकत आहे. )

http://farm4.static.flickr.com/3332/3312193570_6e0d4dd63d_o.png

लॉग ऑफ करुन परत लॉग इन करा.

काही प्रश्न

१.(हा बहुधा अति- मठठ प्रश्न असावा:) वुबी म्हणजे काय?

२. आधी विन एक्स्-पी असलेल्या मचिनवर उबुंटु इन्स्टॉल केले की ते आपोआप डुएल बूट कसे होते? (बहुधा इन्स्टॉलर तसे काही विचारत असावा?). आणी मग उबुंटूच्या पार्टिशनची साईजही ठरवावी लागत असेल, जी अगोदरच्या विनमधूनच घेतली जाईल?

३. उबुंटूमधे बहुधा एक्सेल, वर्ड वगैरे नसेल? त्यांना पर्याय काय आहेत?

वुबी वगैरे

कुठलाच प्रश्न मठ्ठ नसतो...

वुबी हा एक इन्स्टॉलर आहे. एखाद्या विंडोजच्या प्रोग्रँम प्रमाणे हा इन्स्टॉलर विंडोजमधेच क्लिक केला की पुढचे सगळे आपोआप होते. यातच तुमच्या दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर आहे. अर्थात विन मधून उंबंटूसाठीची डिस्कस्पेस तशीच जाते. मला वाटते साधारण् ४ गिग्ज् जाते. (माझ्या लॅपटॉपवर आत्ता १५-२० गिग्ज मोकळ्या होत्या जेंव्हा मी उबंटू घातले तेंव्हा).

उबंटु मधे ओपनऑफिस इन्स्टॉल्ड आहे ज्यात वर्ड एक्सेल प्रमाणे सर्व काही करता येते (ऍक्सेस् डेटाबेससारखे काही नाही पण ते ओपन ऑफिसमधे उपलब्ध नक्की आहे. जास्तीचे विनामुल्य घालता येऊ शकते). त्यातील फाइल्स वर्ड्/एस्केल २००७ सोडून इतर आधीच्या फॉर्मॅट मधे सेव्ह करता येऊ शकतात.तसेच् अ पिडीएफ पण एका टिचकीत करू शकता. हा प्रोग्रॅम विंडॉजमधे जलद चालत नाही पन उबंटूमधे मला काही प्रश्न आला नाही.

ओपन ऑफिस

ओपन ऑफिस जर वापरले नसले तर अवश्य विचार करा. ते सर्व ऑपरेटींग सिस्टीम्स मधे मिळते - विंडोज् सहीत!

http://why.openoffice.org/

डुएल बूट

आधी विन एक्स्-पी असलेल्या मचिनवर उबुंटु इन्स्टॉल केले की ते आपोआप डुएल बूट कसे होते? (बहुधा इन्स्टॉलर तसे काही विचारत असावा?). आणी मग उबुंटूच्या पार्टिशनची साईजही ठरवावी लागत असेल, जी अगोदरच्या विनमधूनच घेतली जाईल?

'लूपमाउंटेड व्हर्चुअल पार्टिशन मॅनेजर' ह्या तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाल्याचे समजते. अधिक तांत्रिक माहिती इथे

उबुंटू हे विन्डोजमध्येच व्हर्चुअल पार्टिशन तयार करुन त्यात इन्स्टॉल होते त्यामुळे नविन फिजिकल पार्टिशन करावे लागत नाही.

ओपन ऑफिस आणि उबुंटू

एक्सेल, वर्ड वापरण्यासाठी ओपन ऑफिस हा उत्तम पर्याय आहे. उबुंटूबरोबर आपोआप येते. मात्र विंडोजइतकेच स्मूद चालण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या काही फॉन्टांना टाकून घ्यावे लागेल. हो फॉन्ट टाकले की ओपन ऑफिसबरोबरच अनेक संकेतस्थळेही फार छान दिसू लागतील.

या फॉन्टांबाबतची व इनस्टॉलेशनह माहिती http://ubuntu.wordpress.com/2005/09/09/installing-microsoft-fonts/


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ड्युएल बूटला पर्याय

विन्डोज न वापरता राहणे अगदीच अशक्य असेल तर ( उदा. काही संकेतस्थळे फक्त आयईवरच चालतात. एक्सेल-वर्ड वापरणे अत्यावश्यक असते वगैरे) ड्युएल बूट ऐवजी व्हर्चुअल मशीन तंत्रज्ञानाचा वापर करुन उबुंटू असलेल्या संगणकावर विंडोजचे व्हर्चुअल मशीन तयार करता येईल. व्हर्चुअल मशीनचा वापर करुन तयार केलेल्या आभासी संगणकावर संपूर्ण ऑपरेटिंग सिस्टम टाकता येते.

मी कालचा एक दिवस व्हीएमवेअर वापरुन उबुंटू असलेल्या संगणकावर विंडोज टाकले होते. मात्र त्यात साऊंड आणि नेटवर्क ड्रायवरांना अडचणी आल्या. नंतर सनचे व्हर्चुअल बॉक्स वापरुन पुन्हा विंडोज टाकले आणि ते चकाचक चालू लागले.

असा वापर करुन टाकलेल्या संगणकावर तुमची एकमेव ऑपरेटिंग सिस्टम म्हणून उबुंटू वापरता येईल. आवश्यकता असेल तेव्हा व्हर्चुअल मशीन मधील विंडोज चालू करुन त्यात विंडोजपुरते काम करता येईल. तुमची प्राथमिक आणि एकमेव ओएस उबुंटू असल्याने कर्नल अपग्रेड किंवा तत्सम प्रकारांमुळे बूटलोडरचा लोचा होणे व विंडोज बंदच पडणे वगैरे तापांपासून कायमची मुक्ती मिळेल.

एकाच संगणकावर एकसमयावच्छेदेकरुन दोन ऑपरेटिंग सिस्टम चालू ठेवण्यासाठी तुमचा संगणक थोडा शक्तिमान असणे आवश्यक आहे. निदान दोन जीबी रॅम (उबुंटूसाठी ५१२ पुरेशी आहे. मात्र त्याच वेळी चालू असलेल्या विंडोजसाठी १ ते १.५ जीबी लागेल). १० जीबीची मोकळी जागा. विन-एक्सपीची सीडी व की या गोष्टी आवश्यक आहेत.

मी येथील सूचना वाचून त्याबरहुकूम कोणतीही अडचण न येता व्यवस्थित विंडोज टाकू शकलो. http://seogadget.co.uk/how-to-install-virtualbox/

(मला तरी विंडोजचा वापर फक्त कार्यालयीन सुट्यांसाठी करावा लागतो कारण आमचे एम्प्लॉई पोर्टल अतिरिक्त ऍक्टिवएक्स वापरामुळे फक्त आयईवरच चालते.)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

व्हीएमवेअरची अडचण आणि व्हर्चुअल बॉक्सचे फायदे

व्हीएमवेअर व्यवस्थित का चालत नव्हते याचा थोडा शोध घेतला असता व्हीएमवेअरची १. वर्कस्टेशन, २. प्लेअर ३. आणि सर्वर अशी तीन स्वतंत्र उत्पादने आहेत असे कळले. त्यापैकी व्हीएमवेअर प्लेअर आणि सर्वर मोफत आहे तर वर्कस्टेशन हे विकाऊ आहे.

आता यात गंमत अशी की व्हीएमप्लेअर वापरुन विंडोज टाकता आले तरी विंडोजसाठी आवश्यक असलेले ड्रायवर व्हीएमप्लेअरसोबत येत नाहीत. त्यासाठी व्हीएमवेअर सर्वर किंवा वर्कस्टेशनचा आधार घ्यावा लागतो. त्यापैकी वर्कस्टेशन मोफत नसल्याने त्याचा पत्ता कट. मात्र व्हीएमवेअर सर्वर टाकणे ही फारच किचकट प्रक्रिया आहे. तुमच्या लायनक्सच्या कर्नलसाठी आवश्यक तो रनेबल प्रॉडक्ट तयार करण्यासाठी व्हीएमवेअर सर्वर डाऊनलोड करुन मशीनवर कंपाईल करावे लागते. (ज्याची डाऊनलोडेबल साईज ४०० एमबी आहे.)

त्यातुलनेत व्हर्चुअल बॉक्स हे मुक्तस्रोत आणि मोफत आहे शिवाय त्याचा आकारही ४० एमबीइतका सुटसुटीत. विंडोजसाठी आवश्यक ड्रायवर हे नंतर मोफत टाकता येतात.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

किती जागा लागते?

उबुंटुसाठी साधारण किती जागा लागते?
हेही नियमित अद्ययावत(अपडेट) करावे लागते काय?
मी पूर्वी एकदा उबुंटू माझ्या संगणकावर टाकली होती पण त्याने पूर्ण संगणकाचा ताबा घेतला होता आणि विंडोजचे नामोनिशाण हटवले होते.त्यामुळे मी ती लगेच काढून टाकली. अर्थात ती काढून टाकतानाही खूप मनस्ताप झाला होता.त्याच्याबरोबर विंडोजही गायब झाली होती. मला पूर्ण हार्डडिस्क फॉरमॅट करणे भाग पडले होते.
विंडो अथवा उबुंटू असा पर्याय यायला हवा..पण तसा तो कधीच आला नाही.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

विंडो अथवा उबुंटू असा पर्याय

हो मलाही पुर्वी उबुंटू टाकताना असाच अनुभव आला होता. काहीतरी चूक झाली आणि सगळी हार्ड डिस्क् फॉरमॅट करावी लागली होती*. पण आता ही समस्या दूर झाली आहे. वरती दिलेल्या वुबीच्या दुव्यावर जाउन तिथे दिलेलया सुचनांप्रमाणे संस्करण करा. फारच सोपे आहे. विंडोजवर काहीही परिणाम होत नाही संगणक सुरु होताना विंडोज की उबुंटू? असा पर्याय मिळतो.

*मायक्रोसॉफ्टच्या एन टी एफ एस पद्धतीच्या पार्टीशनवर लिनक्स इन्स्टॉल होऊ शकत नाही. त्यासाठी फॅट ३२ ह्या प्रकारचे पार्टिशन लागते. पण एन टी एफ एस हे आधुनिक आणि वेगवान प्रकारचे पार्टिशन असल्याने बहुतेक संगणकाच्या हार्ड डिस्क ह्याच पद्धतीने पार्टीशन केलेल्या असतात त्यामुळे वर उल्लेखलेल्या समस्या यायच्या. पण वुबीमुळे हा अडथळा दूर झाला आहे. पार्टीशनमध्ये कसलेही फेरबदल न करता तुम्ही उबुंटू इन्स्टॉल करु शकता आणि गंमत म्हणजे तुमच्या हार्ड डिस्कवरील सर्व विदा उबुंटू मध्ये वापरु शकता. /host इथे तुम्हाला सगळा विदा पहायला मिळेल.

उबुंटू टाकताना

विंडोजवर काही मोकळी जागा निर्माण करा.
Administrative Tools >Computer Management > Storage मध्ये जाउन्.
मग् उबुंटू टाकताना, 'Largest continuous free space' सिलेक्ट् करा.

------------------
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

होत नाही

आपल्या लेखामुळे उद्युक्त होऊन काल उबंतु टाकण्याचा प्रयत्न केला. पण काही झाले नाही.
ubuntu-fail-message

c:\ubuntu\install\MD5SUMS-metalink.gpg येथे आल्यावर

'डाउनलोड इस् इंटरप्टेड विथ् एरर' असा निरोप येत राहिला.

३ -४ वेळा असे झाल्यावर नाद सोडला.
काही मदत मिळेल का?

वुबी शिवाय काही पर्याय?
मला माझे एक्स पी हवे आहे. कारण त्याची सवय झाली आहे. जे काय कोसळायचे होते दुरुस्त करत करत आता एक्स पी स्टेबल झाले आहे.
शिवाय विन्डोज खुप काळापासून वापरतो आहे.

आवांतरः विसु नानांच्या प्रतिसादाने माझ्याही स्मृती जागृत झाल्या!

पुर्वी मी डॉस वापरले आहे. ते ५१२ केबीच्या फ्लॉपीवर असत असे.
मग त्याचे पुढील व्हर्जन ६.२० आले. हे १.२ च्या फ्लॉपीवर असत असे.
६.२२ हे पुढचे १.४४ एमबी च्या फ्लॉपीज् वर आले.

त्याकाळी लोटस १२३ हे स्प्रेडशीट सॉफ्टवेयर इतके मस्त वाटत असे.
आणि वर्डस्टार तर टायपींगवाल्यांना चमत्कार वाटत असे.

त्याकाळात माझ्या एका मित्राने वींडोज वापर म्हणून सुचवले.
त्याच्या कडे एक कॉपी होती. त्याने ती मला आग्रहाने दिली.
(अति आवांतरः दादरला एका ठिकाणी सगळी सॉफ्टवेयर्स कॉपी करून मिळत. तेथे पोलिसांनी धाड घातली. आणि सगळ्या फ्लॉपीज एका सुतळीत ओऊन पोलिस स्टेशनच्या धुळीत ठेऊन दिल्या. अनेक महिन्यांनंतर खटला उभा राहील्यावर त्यातली एकही चालली नाही! आणि खटला निकाली निघाला - अर्थात पुढे पोलिसही सुधारले! (असे वाटते!) असो,)

मग पहिल्यांना विन्डोज १.२ च्या फ्लॉपीज वापरून
२.६ डॉस च्या प्रॉम्प्टवरून
२० एम बी ची भल्ली मोट्ठी (!) हार्ड डिस्क असलेल्या
०८६ मशिनवर लोड केले. (त्याकाळी मशिन हा शब्द बरोब्बर फिट बसायचा इतके ते डब्बे जड असत!)

ते विन अशी कमांड देवून डॉस वरून सुरु करावे लागत असे.

त्याकाळात सॉफ्टवेयर ते हार्डवेयर काहीच आजच्या इतके स्टेबल नव्हते.
शिवाय व्हायरसेस चा सुळसुळाट होता. एकदा डार्क ऍव्हेंजर नावाच्या व्हायरसने मला खुप पिडले होते.
त्यामुळे एक नावडती का होईना पण विंडोजशी ऍटॅचमेंट झाली आहे.

आता उबंटु हवे तर लोड होत नाहीये!

-निनाद

अवांतर - रम्य आठवणी

आणखी अवांतर-
मी पहिला पीसी वापरला तो ८०८६ वर चालत असे.
त्याला हार्ड डिस्क नव्हती.२ 'मेगा' बाईट (बापरे!इतकी प्रचंड!) की अशीच रॅम होती.
३ १/२ इंचांच्या फ्लॉपीवर येणारे डॉस 'ड्राईव्ह ए' मध्ये टाकून पीसी बूट करायचा, मग आपले 'ड्राईव्ह बी'( a:>> b:) मधले मायक्रोसॉफ्ट बेसिक प्रोग्राम्स (उदा. हॅलो वर्ल्ड, अ+ब = क इ.) अक्षरशः 'रन' कमांड देऊन पळवायचे. इ.इ.

'ड्राईव्ह बी' वरचे जोक्स फेमस होते. हल्ली हा 'बी' ड्राईव्ह बर्‍याच वेळेला गायबच असतो. त्यामुळे ड्राईव्ह ए नंतर एकदम ड्राईव्ह सी (हार्ड डिस्क) का असतो असा प्रश्न हल्लीच्या लोकांना पडला तर नवल नाही.

उंबटू :(

चर्चा वाचून आम्हालाही उंबटूचा मोह आवरला नाही. पण दुसर्‍यांदा पुन्हा अडकलो.
ubuntu
या पुढे काहीच हालचाल नाही.

किंवा दुसरा पर्यास सांगा. माझ्याकडे उंबटू सेव्ह केलेले आहे. तेव्हा ते कसे टाकता येईल त्याचा सोपा (न )मार्ग सांगा !

सेव्ह म्हणजे काय?

सेव्व्ह म्हणजे नक्की काय केले आहे? ते सांगितल्यास पुढचा मार्ग सांगणे सोपे होईल.


सेव्ह म्हणजे...

उंबटू आम्ही या दुव्यावरुन आमच्या संगणकाच्या मुख्यपृष्ठावर उतरवले आहे. आम्हाला कसं आहे, त्यात सेटप ची फाइल असली की डबल क्लीक केले की काम सुरु झाले पाहिजे अशी अपेक्षा असते.

मला वाटतयं

मला वाटतयं हा तुमच्या इंटरनेटच्या कनेक्शनचा प्रश्न आहे. असे माझ्या बाबतही त्या दिवशी एक - दोनदा घडले. आधी वाटले की वायरलेस मुळे हळू डाउनलोड होत असेल. मग लक्षात आले की काहीतरी कारणामुळे इंटरनेट कनेक्शन मधेच अडकून बंद पडतयं आणि नंतर चालू झाले तरी ते डाउनलोड चालू होत नाही आहे! मग मी प्रत्येक वेळेस कॅन्सल करून परत् इन्स्टॉल करू लागलो. एक चांगली गोष्ट म्हणजे ते आधी जितके डाउनलोड झाले त्याच्या पुढे डाउनलोड करायचे (अर्थात त्या आधी परत युझरनेम, पासवर्ड वगैरे करावे लागाय्चे पण ते अर्ध्या मिनटात होते).

थोडक्यात परत इन्स्टॉलर चालू करा. मला खात्री आहे जर हा इंटरनेट कनेक्शन जाण्यायेण्याचा प्रश्न असेल तर हा प्रश्न वर सांगितल्याप्रमाणे सुटेल.

झाले, पण मराठी टंक

झाले!
मिळालेल्या सल्ल्या प्रमाणे सगळेकाही एकत्र उतरउन घेतले आणि टाकले
असता वुबी कृपेने सगळे जमून आले आहे.
आत्ता हा निरोप मी उबंटूद्वारेच लिहित आहे.
या शिवाय नेट कनेक्शन सापडल्यावर उबंतुने २५९ अपडेटस् ही टाकले.
आता सगळे उत्तम चालते आहे.

मराठी टंक चांगले दिसावेत म्हणून बोक्याने सुचवलेला उपाय केला आहे.
काही बदल झाले पण मात्र अजूनही मराठी टंक मासॉ सारखा सुबक दिसत नाहिये, पण वाईटही नाहिये...

-निनाद

आधी उबंटू डाउनलोड

करुन घ्या. (आयएसओ फाईल) मग ते वुबी ज्या डिरेक्टरीत आहे तिथेच ठेवा. म्हणजे वुबी ला ते व्यवस्थित सापडेल. मग वुबीने इंस्टॉल करा - बघा ह्या उपायाने जमते का ते
कळवा नक्की काय एरर येते आहे ते ! आम्ही आहोतच मदतीला

धन्यवाद!

वाचकराव,
तुमचा उपाय अचुक ठरला. उबंटु लोड झाले आणि चालते आहे.
पण हे मला खुप वेगवान वगैरे काही वाटत नाहिये!
-निनाद

नक्की कसे केलेत?

तुम्ही नक्की कसे केलेत? वुबी वापरून की पॅकेज (.टार वगैरे) उतरवून ते अनपॅक करून? मी वुबी वापरले. जर तुम्ही पण वुबी वापरले असेल तर हा एक उबंटु फोरम वरील धागा वाचून पहा.

वुबीचे नक्की कुठले व्हर्जन वापरेत, तसेच उबंटु पण कुठले आहे त्याचा जरा शोध घ्या. बाकी येथील जाणकार पण सांगतील!

मोग्यांबो खूश हुवा

वा वा उबुंटूधर्मीयांची संख्या वाढत असल्याचे पाहून संत आजानुकर्ण महाराज प्रसन्न झाले आहेत.


उबुंटू मस्तकी धरावा | अवघा हलकल्लोळ करावा ||

प्रसन्न झालात? आता वर द्या!

आता उबंटुवर आपल्याला काय काय कसे करता येते याचाही एक लेख आला पाहिजे.
मला (याहू) मेसेंजर वापरून ऑडियो चॅट करायचे आहे.
कसे करू?

-निनाद

मस्त

अनेकदा उबंटु वापरायचे ठरवून आयत्यावेळी कच खाल्ली आहे ;)
घरी सीडी देखील येऊन पोचली आहे ..आता तुमचा अनुभव वाचून एकदा उबंटु वापरावाच म्हणतो...
मस्त लेख्

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

हे पण वापरुन पहा....


open suse 10 मी वापरुन पाहिले आहे (आता त्याचे ११ आले आहे.) एकदम चाबूक! दिसायला उबंटू पेक्षा रापचिक!

हे पहा. विकीवरुन साभार. विकी पानाचा दुवा


* विषय लिहिताना रोमन अक्षरे वापरू नयेत.* विषय लिहिताना रोमन अक्षरे वापरू नयेत.* प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
* प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत * विषय लिहिताना रोमन अक्षरे वापरू नयेत.* प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

-सौरभ.
==================

सुस

सुस(सुझ?) बद्दल बरेच ऐकले आहे. कधी वापरले नाही.
बाकी लेख, समुदाय इ. लई आवडले हे वेगळे सांगायला नकोच.

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ समजावा.

दिसणे

"दिसणे" हा प्रकार लिनक्सच्या फ्लेवरपेक्षाही डेस्कटॉप एन्वायर्नमेंटवर जास्त अवलंबून आहे. सुसे (व याआधी प्रचलित असणारी रेडह्याट, मँड्रेक व इतर) लिनक्समध्ये केडीईला प्राधान्य देत होते. उबुंटूवाल्यांनी जीनोम एनवायर्नमेंटला प्राधान्य दिले आहे.

सुसे लिनक्स मलाही फार आवडते. मात्र ते फारच जास्त जागा खाते आणि त्यांचा सपोर्ट फोरम उबुंटूइतका त्वरित उत्तरे देणारा नाही. :(


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

नवशिक्यांसाठी

ज्यांना वुबी अथवा आयएसओ फाईल उतरवुन घेउन, चकती तयार करुन उबंटु टाकण्याचा प्रकार त्रासदायक वाटतो त्यांच्याकडे २ उपाय आहेत.

  1. या ठिकाणी जावे आणि चकती घरपोच मागवावी. ती फुकट मिळते घरपोच. :) फक्त पत्ता बरोबर दिलेला असला पाहिजे. चकती मिळाल्यावर त्यावरुन उबंटु टाकण्याची घाई न करता आगोदर चकती वापरुनच उबंटु वापरुन पहावे.
  2. माझ्यासारखे काही उपक्रमी/मित्र असतील त्यांना संपर्क करुन चकती मागावी. :)

बाकी उबंटु नव्याने वापरणार्‍यांना शुभेच्छा.


चकतीसाठी नोंदणी केली

चकतीसाठी नोंदणी केली. चकती मिळाल्यावर उंबटू वापरुन पाहीन.
पण उंबटू टाकल्याशिवाय राहणार नाही.

चकती

चकती चा पर्याय अधीक चांगला.
चकती मुंबईत येण्यास तीनेक आठवडे लागतात.
वाट पहायची नसल्यास व ७०० एम् बी डाउनलोड करायचे नसल्यास, ज्यांच्याकडे चकती आहे ते सदस्य एक कॉपी जवळपासच्या लोकांना देउ शकतात. ( उबुंटु च्या चकतीचर लिहिलेले असते कि... you are encouraged and legally entitled to copy)
मुलुंड / ठाणे भागात कोणाला चकती हवीय ?

इंटरनेट्

बुबी वापरुन उबंटु इन्स्टॉल केले. आता विस्टा आणि उबंटु दोन्ही आहेत. परंतु, उबंटु वरुन इंटरनेट कनेक्ट् करता येत नाहीये. यासाठी काही खास करावे लागते का ? विस्टावर फक्त केबल जोडली की काम होते आहे आहे.

जोडणी

सुलभ माहितीसाठी उबंटु सुरु झाले की F1 दाबा. माहिती येईल. तिथे सापडेलच. अथवा सुरु झाल्यावर एक रुट टर्मीनल सुरु करा. (तुम्ही ब्रॉडबँड जोडणी करणार आहात आणि नेटवर्क केबल जोडली आहे, असे समजुन लिहितो आहे.) मग त्या टर्मीनलमध्ये sudo pppoeconf असे टंकुन एंटर कळ दाबा आणि जे पर्याय येत जातील ते मान्य करत जा. एके ठिकाणी तुम्हाला सदस्य नाम आणि परवलीचा शब्द (पासवर्ड) द्यावा लागेल. हे सर्व तुम्हाला एकदाच करावे लागेल. पुढच्यावेळी उबंटु सुरु होताच नेट सुरु झालेले असेल.


कुठल्या प्रकारचे इंटरनेट

आहे? वायरलेस असेल तर वेगळे पर्याय सुचवता येतील - अपडेट्स करुन् पाहिलेत का ?

एरर

धन्यवाद चाणक्य.
वाचक, माझ्याकडे वायर्ड (कॉमकॅस्ट ब्रॉडबँड) नेटवर्क आहे.

मी टर्मिनल उघडले (आधी ते शोधायलाच वेळ लागला ;) ). तेवढ्यात चमत्कार घडला व नेटवर्क कनेक्टेड असा मेसेज आला. (sudo pppoeconf करण्याआधीच). असे कसे झाले विचार करत फायरफॉक्स ओपन केले. त्यात उबंटु स्टार्ट पेज दिसु लागले होते. मग मी गुगल पेज उघडले. मग नवीन टॅब ओपन केल्यानंतर लॅपटॉप हँग झाला. (म्हणजे माउसने कुठेही क्लिक केले तरी काहीच फरक पडत नव्हता). मग मी रिस्टार्ट् केले. आता इंटरनेटला कनेक्ट झाले नाही. मग sudo pppoeconf करुन बघितले पण एक एरर मेसेज येत आहे. त्यानंतर आता विस्टा सुद्धा इंटरनेटला कनेक्ट होत नाही :(. मी पुन्हा प्रयत्न करुन एरर मेसेज पुर्ण लिहुन घेतो व इथे लिहीतो.

- सूर्य.

विंडोजमध्येही चालत नाही?

नेटवर्क उबुंटूबरोबरच विंडोजमध्येही चालत नाही म्हणजे हार्डवेअरलाच काहीतरी अडचण असावी असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

नाही...

मॉडेम रिस्टार्ट केल्यावर विंडोजवर इंटरनेट चालु झाले..

ethtool वेगळे इन्टॉल करावे लागते का ?

- सूर्य

उबंटू ची कुठली आवृत्ती आहे ?

जर ८.१० असेल तर अपडेट्स् केल्यावर ही अडचण येणे बरेच स्वाभाविक आहे.
नेटवर्क् मॅनेजर चा दोष असावा -
sudo ifdown eht0
sudo ifup eth0

ह्या कमांड्स वापरुन बघा.

८.१०

उबंटु ८.१० च आहे. पण तेच नवीन आहे ना.
या कमांडस सुद्धा देउन बघतो.

- सूर्य.

वेलकम टु उबंटु

sudo pppoeconf
रन केल्यावर असे उत्तर आले

"सॉरी, आय स्कॅनड् थ्री इंटरफेसेस बट द ऍक्सेस कॉन्सेंट्रेटर ऑफ युवर प्रोवायडर डिड नॉट रिस्पाँड. (...चेक केबल वगैरे..). अनादर रिझन फॉर स्कॅन फेल्युअर मे अल्सो बी अनादर रनींग pppoe प्रोसेस विच कन्ट्रोलस् द मॉडेम."

उफ्फ्... म्हणजे काय कळले नाही :)

sudo ifdown eth0 असे मी सांगितल्यावर
उबंटु असे म्हणतो की "eth0 नॉट कन्फीगर्ड."

जालावर अजुन शोध घेतला तर use ethtool असे कोणीतरी म्हणुन गेले आहे. म्हणुन ते बघुया म्हटले तर कमांड नॉट फाउंड असे आले.

म्हणुन मग sudo apt-get install ethtool हे चालवले (अर्थात जालावर शोधुनच) तर उबंटु म्हणतोय पॅकेज नॉट फाउंड.

शेवटी थकुन डोळे मिटल्यावर, डोळ्यासमोर 'वेलकम टु उबंटु' ही अक्षरे नाचायला लागली. ;)

अखेर इथे रथी-महारथींच्या आश्रयास आलो.

- सूर्य.

सेम अडचण

उंबटूचकती मिळाल्यावर इन्स्टॉलचा आनंद झाला, पण इंटरनेट जोडणी करतांना सूर्य म्हणतात तशी सेम अडचण आली आहे.
नेटाची काही जोडणी करता येईना. बीएसएनलची जोडणी आहे, कोणी जाणकार मदत करेल का ?

-दिलीप बिरुटे

 
^ वर