उबंटु अनुभव

मी सॉफ्टवेअर इंजिनियर नसल्याने माझा संगणकीय संबंध हा ऑफिस ऍप्लिकेशन्स, जीआयएस्, थोडेफार (उगाचच) वेब ऍप्लिकेशन्स इत्यादी पुरता मर्यादीत असतो. थोडक्यात मायक्रोसॉफ्ट जी कुठली खिडकी उघडेल त्यातून माहीती तंत्रज्ञानाचा प्रकाश पाडून घेयचा हेच सोयीस्कर. तरी देखील काहीतरी नवीन प्रकार करायला आवडत असल्याने ८-१० वर्षांपुर्वी तत्कालीन जुन्या झालेल्या अडगळीतील संगणकात रेडहॅट लिनक्स घालून पाहीली. जमले देखील मात्र इंटरनेटला जोडता न आल्याने तसेच राहून गेले... शिवाय सिस्टीम हळू वाटली हे पण कारण होतेच. नंतर तो विचार परत डोक्यात आला नाही. मात्र मधे परत येथे चर्चा वाचल्यावर मोह झाला पण टाळला. मग परत काही दिवसांनी वाचले आणि म्हणले बघूया तरी...

शोध घेतल्यानंतर् वुबी हा विन्डोजवाल्यांसाठीचा इन्स्टॉलर मिळाला जो बाकी लिनक्स कमांड न वापरता उबंटू इन्स्टॉल करतो. मग एक जुना लॅपटॉप धूळ फुंकरून बाहेर काढला आणि चढवायचा प्रयत्न केला. हे वुबी प्रकरण अपेक्षेपेक्षा फारच सोपे निघाले! आणि साधारण अर्ध्यापाऊण तासात उंबटू सिस्टीम चालू झाली. लगेच त्यात वायरलेस कनेक्शन्स कुठे आहेत ते दाखवले आणि काही कीस्ट्रोक्स मधे आंतर्जालावर होतो. आश्चर्य म्हणजे मराठीपण सहज दिसत होते. थोडे ब्लर्ड. अजानुकर्णाने माहीती दिली त्याचा फायदा झाला. (माझ्या खरडवहीत पहा).

गेले दोन दिवस घरात मी फक्त उबंटूच वापरत आहे. कारण अगदी साधे (नव्याच्या नवलाई व्यतिरीक्त!) - विंडोज् शी तुलना करता येत नाही इतके गतिमान! आता जरा खेळायला येऊ लागल्याने कॉन्फिडन्स वाढला आणि मग म्हणले कॅमेराचे एसडी कार्ड घालून पाहू. लगेच ओळखले. त्यात एफ-स्पॉट म्हणून एक सॉफ्टवेअर आधीच होते. पण ते तितकेसे आवडले नाही म्हणून जरा शोधले. मग ल्क्षात आले की कदाचीत डिजीकॅम म्हणून एक सॉफ्टवेअर चांगले असावे...

मग सिस्टीम मधे जाऊन सिनॅप्टीक पॅकेज मॅनेजर मधे ते शोधले. आणि काही टिचक्यात ते इन्स्टॉल केले.

हे डिजीकॅम बर्‍यापैकी प्रोफेशनल फोटो एडीटींग सॉफ्टवेअर आहे. ज्यांनी वापरले नसेल त्यांनी अवश्य वापरून पहा:

बाकी अजून ओपन ऑफिसपेक्षा ऑफिस २००७ आवडते त्यातील सोयींमुळे ही वस्तुस्थिती आहे. पण ओपन ऑफिस येथे गतिमान असल्याने चांगले वाटत आहे हे देखील तितकेच सत्य आहे. (विंडोज मधे खूप रिसोअर्सेस ते घेते...)

Comments

बीएसएनलची जोडणी

बीएसएनलची जोडणी करण्यासाठी मी उबंटु वर rpppoe उतरवले. आणि बाकी थोडी सेटींग केल्यावर बीएसएनल ब्रॉडबँड मस्त चालत आहे. एक्स पी पेक्षा सरस :)

कोणाला rpppoe हवे असल्यास मी विपत्राद्वारे पाठवू शकतो. त्यात एक माहितीची टेक्स्ट फाईलही आहे.

-
ध्रुव

ही कमांड वापरुन पहा

eth0 हे तुमच्या इथरनेट कंट्रोलर चे नाव होय.

हे करुन पहा
sudo lshw - C Network

हे तुम्हाला इथरनेट चे नाव देईल.स्

छान

मीसुद्धा एका संगणकावर उबुंटू स्थापला आहे. या समुदायातून लोकांचे अनुभव कळतीलच. धन्यवाद विकास.

उबुंटू कॅफेत चालेल का आणि कसे.

गेल्या काही दिवसांपासून उबुंटू विषयी उपक्रमवर वाचतो आहे. मी मायक्रोसॉफ्ट चा सामान्य पारंपारिक वापरकर्ता आहे. आणि याशिवाय संगणकावर सामान्य वापरासाठी काही आहे हे सुद्धा मला आजवर माहित नव्हते. मी इंटरनेट कॅफे चालवतो. कॅफेत एकूण सहा संगणक वापरकर्त्यांसाठी व एक सर्वर असे एकूण सात संगणक आहेत. सर्वर मध्ये विंडोज २००३ सर्वर ही ऑपरेटिंग सिस्टीम व इतर सर्व संगणकांमध्ये विंडोज एक्सपी ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे. सिस्टीम लॅन कनेक्शनने एकमेकांना जोडलेल्या आहेत. मला या सर्व सिस्टीम मधून उबुंटू वापरता येईल का. त्यासाठी संगणक हे एकमेकांना कशा पद्धतीने जोडावे लागतील जेणेकरून इंटरनेट कनेक्शन, प्रिंटर व फाईल्स शेअर करता येऊ शकतील. उपक्रम मध्ये एकमेकांना मदत करण्याची जणू चढाओढ ही कायमच लागलेली असते. आणि माझ्यासारख्या सामान्य माहिती (तंत्रज्ञानाबद्दल ) असलेल्या माणसाला याची खुप मदतही होते.मला आपल्या समुदायातील व उपक्रमवरील सदस्यांची मदत अपेक्षित आहे.
आपला सहकार्याभिलाषी,
बाबासाहेब जगताप
bpositive78@gmail.com
भ्रमणध्वनी 9403632565

चालेल काय पळेल...पण

कॅफेमध्ये उबुंटू टाकण्याचा महत्त्वाचा धोका म्हणजे त्यात आयईची उपलब्धता नसणे. फायरफॉक्सची लोकप्रियता भारतात फार कमी आहे. उबुंटूमध्ये इंटरनेट एक्सप्लोरर थेट उपलब्ध नसल्याने ग्राहकांची गैरसोय होईल.

विंडोजच्या तुलनेत नेटवर्किंगमध्ये लिनक्स फारच पुढे असल्याने उबुंटू टाकणे तुमच्यासाठी सोयीचे असले तरी ग्राहकांसाठी अडचणीचे होईल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हो अवश्य

तुम्ही हे जरुर वापरुन पहा, पण त्याही पे़क्षा सुसे लीनक्स हे सुन्द्दर आहे.
भ्रमणध्वनी : ९८९०७०६१११

इंटरनेट कॅफेत लिनक्स प्रणाली प्रस्थापित करणारे तज्ञ

इंटरनेट कॅफेत लिनक्स प्रणाली प्रस्थापित करणा-या व्यावसायिक अथवा हौशी तज्ञांबद्दल माहिती असल्यास हवी आहे. कामाचे ठिकाण सिल्लोड, ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद(महाराष्ट्र), औरंगाबाद पासून साठ किमी अंतरावर.

वापर कसा करायचा आहे हे महत्त्वाचे

बाबासाहेब यांस,

इंटरनेट कॅफेमध्ये संगणकांची जोडणी कशी असते हे मला नक्की माहीत नाही. उदा. प्रॉक्सी कसा वापरतात. प्रत्येक संगणक हा थेट आयएसपीकडे जातो की तुमच्या प्रॉक्सीमधून जातो. अनेक ठिकाणी शेअर्ड बँडविड्थ दिलेली असते असे आठवते. तर काही ठिकाणी प्रत्येक संगणकासाठी वेगळे कनेक्शन पाहिले आहे. लिनक्सची सर्वर एडिशन आणि डेस्कटॉप एडिशन वेगवेगळी आहेत. डेस्कटॉपवर लिनक्स वापरणे हे फारच सोपे आहे. नेटवर्क सर्वर म्हणून वापरायचे असेल तर थोडा अधिक अभ्यास आवश्यक आहे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निदान पुण्यात तरी इंटरनेट कॅफेमधील महत्त्वाचा जोडधंदा म्हणजे गेमिंग पार्लरसारखा. बहुतेक सर्व गेम्स हे विंडोज वापरकर्त्यांसाठी बनवलेले आहेत. त्यासाठी लागणारे डायरेक्ट एक्स ड्रायवर आणि जॉयस्टिक किंवा इतर सपोर्ट हे लिनक्समध्ये थेट उपलब्ध असतीलच असे नाही. अशा परिस्थितीमध्ये विंडोज ड्रायवरांना लिनक्समध्ये वापरण्यासाठी शोधाशोध व चाचण्या यात वेळ जाण्याची शक्यता आहे. (थोडक्यात जर तुम्हाला विंडोजचे मेंटेनन्स स्वतः जमत असेल मात्र लिनक्ससाठी दुसर्‍यांवर अवलंबून राहावे लागत असेल तर इट्स नॉट वर्थ इट.) तुम्ही स्वतःच्या संगणकावर आधी उबुंटूच्या चाचण्या घ्याव्यात हवे असलेले सर्व ऍप्लिकेशन चालतात की नाही ते पाहावे असे सुचवावेसे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

उबूंटू चा अनुभव झकास

दोन दिवसांपूर्वी मी माझ्या विंडोज एक्सपी असलेल्या डेस्कटॉप कॉम्प्युटरवर उबुंटु सीडी च्या सहाय्याने इंस्टाल केले. सीडी उपक्रमवर सुचविलेल्या दूव्यावरूनच नोंदणी करून मागवली होती. उबुंटु मध्ये वेबसर्फिंग करतांना वाढलेल्या वेगाचा भन्नाट अनुभव आला. उपक्रमींना याबद्दल शतशः धन्यवाद. माझ्या इंटरनेट कॅफेवरील ग्राहकांना आता मी आश्चर्यचकित करून सोडणार आहे. पण कॅफे मधल्या इतर डेस्कटॉप कॉम्पूटरवर सीडी रोमची सुविधा उपलब्ध नाही. ऑनलाईन इन्स्टालेशन खुपच वेळ खाऊ आहे. पेनड्राईव्ह मधून हे इन्स्टालेशन करता येईल का. मी पेनड्राईव्ह मधून ऑटोरन फाईल ओपन केली असता इन्स्टॉलेशन सुरु झाले पण ते ऑनलाईन पद्धतीने होते आहे. पेनड्राईव्ह मध्ये ऑटोरन फाईलच्या शेजारीच असलेल्या फाइल्स वापरून ते झटपट का होत नाही याचा मला आतापर्यंत तरी उलगडा झालेला नाही. उपक्रमींना याबद्दल काही सांगता येईल का.

यूएसबी/पेन ड्राईव वरुन उबुंटूसाठी येथे पाहा

दुवा १

दुवा २

येथे आवश्यक ती माहिती उपलब्ध आहे असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

काल मी उबंटू २ मशिन्स वर टाकलं

पण २ ही मशिन्सवर ह्या दोन् अडचणी आल्या. काही मदत मिळेल् का?

१. डेस्क्टॉप् वर आधी एक्स्पी होतं. उबंटू सुरळीतपणे स्थपित झालं थोड्याश्या खटपटी नंतर वायरलेस कार्ड (एक्सट्र्न्ल युसबी द्वारा) ने एटीटी च्या डिएसएल ला पण जोडलो गेलो. पण नंतर अपडेट मॅनेजरने दाखवलेले सगळे अपडेट्स स्थापित करण्याची बुद्धी झाली. ते होत् असतानाचा इंटरनेटची जोडणी बंद पडली. जे काय अपडेट्स तोअ पर्यंत आले होते ते स्थापित केलं. कॉम्प्युटरने पुनश्च हरिओम् केलं पण त्यानंतर वायरलेस चा एकही सिग्नल दिसत नाही आहे.

२. लॅप्टॉप् वर तोच प्रयत्न केला. (आधीचं एक्सपी आहेच्) पण लॅपटॉप्मधे अंतर्भुत असलेलं वायरलेस कार्ड उबंटू ला दिसतच नसावं. वायरलेस ऑन्-ऑफ् करायचा स्विच (खराखुरा) उबंटू मधे चालत नाही आहे पण एक्सपी मधे चालतो..

उबंटू भयंकर आवडलं आहे. हे दोन प्रॉब्लेम सुटले तर विंडोज् ला कायमची तिलांजली देण्यात येईल्. :)

ही अडचण

मला वाटते ही अडचण ९.०४ (जॉन्टी) पुरतीच आहे. मी परवापर्यंत ८.०४ वापरत असल्याने ही अडचण आली नव्हती. परवाच ९.०४ टाकले तेव्हा मलाही ही अडचण आली. भटकेरावांनी ही अडचण सोडवल्याचे कळवले असले तरी, पुढे ज्यांना अडचण येईल त्यांनी System->Administration->Hardware Drivers मध्ये जाऊन वायरलेससाठीचे ड्रायवर टाकावे. (जे करणे अतिशय सोपे आहे.)

९.०४ मला फारच आवडले. ८.०४ च्या तुलनेत अधिक वेगवान आणि आकर्षक आहे. विंडोजची प्रत्येक नवी आवृत्ती फुगत असताना उबुंटूने प्रत्येक आवृत्तीत सडपातळ होण्याचा घेतलेला ध्यास विशेष आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

टाटा इंडिकॉम

टाटा इंडिकॉमचे plug2surf कोणी उबुंटूवर् वापरले आहे का?

गो डाटा

टाटाचे गोडाटा उबंटूवर वापरले आहे. व्हिस्टापेक्षा उबंटूवर चांगला रेट मिळतो.
रूट टर्मिनल उघडून wvdial& ही कमांड द्यावी. & मुळे प्रोसेस ब्याकग्राउंडला जाईल आणि टर्मिनल वापरता येईल.

---

मॉडेम्

नेट् वरचे सगळे पर्याय् वापरुन् झाले.

१. मॉडेम् जोडले असता ओएस् ला समजत् नाही. ड्रॉयव्हरची अडचण्????

नंतर् हे सगळे केले.
http://www.cdspacetilde.com/blog/2008/05/getting-tata-indicom-plug2surf-...
२. मोबाईल ब्रॉडबँड मधुन् कन्नेट् केले तर् 'your net connection has been disconnected'.

---------------
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

क्रमांक

क्रमांक १ मधील पर्याय वापरून माझे कनेक्शन सुरू झाले. wvdial करताना रूट असायला हवा. माझा त्यात बराच वेळ गेला होता.

ब्रॉडबँडमधून कनेक्ट केलेले नाही त्यामुळे त्याची कल्पना नाही. :-(

---

उबंटुला

उबंटुला सापडला का मॉडेम् जोडल्यावर?

हो

हो. उबंटूला सापडायला काहीच अडचण आली नाही. wvdial दिल्यावर तो ppp डीमन सुरू करतो, आणि आय पी ऍड्रेस दाखवतो.
--
"बोले तो.. जंगल मे मंगल और अंधेरी मे दंगल. क्या?" --- पैचान कोन?

माझा अनुभव

फार चांगला आहे. फक्त तांत्रिक बाबींमध्ये अडचणी आल्या. सध्या विंडोज ७ वापरतोय ते ही आवडले. आता ऊबुंटु १०.०४ २९ एप्रिलला येईल मग तेच वापरून् बघेन...आणि अडचण असेल तर मदतीची हाक देईन.

 
^ वर