चपात्या मऊ कशा होतील?

एक प्रश्न विचारत आहे. येथे याचे उत्तर मिळेल याची खात्री आहे.

गेले काही दिवस मी चपात्या करण्याचे वेगवेगळे प्रयोग करत आहे मात्र त्या घरच्यासारख्या मऊ होत नाहीत. अनेकींनी कणीक मळताना मीठ घाल. (जे मी आधीच करत होतो.) चमचाभर तेल घाल. (जे मी आधीही करत होतो.) कणीक थोडी पातळ कर (हे करुन पाहिले.) लाटताना पीठ लाव/लावू नकोस. भाजताना तेल लाव/लावू नकोस असे वेगवेगळे सल्ले दिले.

मात्र पहिले पाढे पंचावन्न. चपात्या मऊ होत नाहीत.

म्हणजे तीन पदरी छान खमंग होतात. गरमगरम खाता येतात. मात्र तयार करुन ठेवल्यावर ३० मिनिटांत लाकडासारख्या कडक होतात ही एक अडचण आहे.

यामागे काही वैज्ञानिक कारण आहे का? वर्षा जोशी यांचे "स्वयंपाकघरातील विज्ञान" हे पुस्तक सोबत नाही याचा फार पश्चात्ताप होत आहे...

मी आशीर्वाद/सुजाता वगैरे दोन्ही प्रकारची पीठे वापरुन पाहिली आहेत. सुजाताच्या त्यातल्या त्यात बर्‍या झाल्या. मात्र घरी होतात तशा मऊ नाही. अर्थात यात केवळ पिठाचा दोष आहे असे वाटत नाही. कारण हेच पीठ वापरुन केलेल्या माझ्या मित्राच्या घरच्या चपात्या फार मऊ असतात.

अधिक माहितीः
१. मी पीठ चाळून घेत नाही. (१०० टक्के गहू. मैदा नाही.)
२. कणीक मळल्यानंतर एकजीव होण्यासाठी तासभर झाकून ठेवतो. (एक सल्ला!)
३. चपाती भाजून झाल्यावर कापडात गुंडाळून डब्यात झाकून ठेवतो.

लेखनविषय: दुवे:

Comments

भाजणे - फुगणे

पोळी फुगते आहे का?

१. ३ पदरी पोळी लाटून झाल्यावर तव्यावर
ज्या बाजूला शेवटी लाटणे होते ती टाकणे

२. जराशी शेकल्यावर (रंग बदलेल) आणि फुगेल उलटणे

३. परत उलटणे परत् फुगेल - हे शेवटचे शेकणे.

४. मग तुप/तेल/लोणी इच्छे नुसार लावणे

पोळी मऊ होईल/राहील

-निनाद

फुगते

होय. पोळी फुगण्याची शक्यता ८० टक्क्यांपर्यंत आहे. तुम्ही सांगता तसेच करतो आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ह्म्म्..

तुमच्या लेखात आलेले सर्व् उपाय, प्लस् निनाद यांनी सांगितलेली पद्धत वापरूनही माझ्या पोळ्या मनासारख्या होत नव्हत्या..
आई आली होती तेव्हा उपाय सापडला..
गॅस अगदी हाय् वर ठेवणे. थोडक्यात तवा दणदणीत् तापला की पोळ्या पटकन भाजल्या जाऊन मऊ राहत.
पण यासाठी, पोळ्या आधी लाटून् ठेऊन मग भाजायला सुरवात करते मी, नाहीतर १-१ करत खूप् वेळ जातो. व तवाही फारवेळ तापवत् बसावा लागतो.
जास्त वेळ पोळी भाजली की त्यातील पाण्याचा अंश् निघून जाऊन पोळ्या कडक् होतात..

आय होप, तुम्हाला याचा काही फायदा होईल.. शेवटी अनुभवच शिकवतो याबाबतीत!! :)

बरोबर

हीच एक शक्यता मलाही जाणवते. माझ्याकडे गॅस नाही. हॉटप्लेट आहे. त्याचा तोटा असा की तव्याच्या पृष्ठभागाला समप्रमाणात उष्णता मिळत नाही. तव्यावर गरम बेटे तयार होतात. त्यामुळे चपातीही तशीच भाजली जाते. फार दणदणीत तापवला की चपाती टाकल्याटाकल्या रंग बदलतो पण अनेकदा आतून थोडी कच्ची राहते.
गॅसवाल्या अपार्टमेंट फारच महाग आहेत :((


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

कौशल्य

मुद्दा चपात्या मउ होण्यामागे तांत्रिक भाग किती आणि कौशल्याचा भाग किती?

पोळ्या आधी लाटून् ठेऊन मग भाजायला सुरवात करते मी, नाहीतर १-१ करत खूप् वेळ जातो.

भाग्यश्री ही कल्पना माझ्या मनात होती. सर्व पोळ्या अगोदर लाटुन मगच एकेक भाजायला घ्यायच्या. मी घरात बोलुन पाहिले असता त्या वाळतात व नंतर भाजताना मउ रहात नाहीत असे उत्तर मिळाले. मला काही ते पटले नाही.
बर पोळ्या गोलच का हव्यात चौकोनी किंवा त्रिकोणि का नकोत? गोल आकारामागे काही विशिष्ट कारण आहे का?

मउ होण्यासाठी सोयाबीनचा वापर करतात.

प्रकाश घाटपांडे

चौकोनी पोळ्या

चौकोनी पोळ्या असतात.
आम्ही काही वेळा विकत तयार मिळणार्‍या चौकोनी पोळ्या आणतो
परंतु या तव्यावर भाजणे अवघड जाते.
त्या मानाने गोलाकारातील फ्रोजन पराठे सोपे पडतात असे वाटते.

-निनाद

बरोबर आहे.

मी घरात बोलुन पाहिले असता त्या वाळतात व नंतर भाजताना मउ रहात नाहीत असे उत्तर मिळाले. मला काही ते पटले नाही.

हे का पटू नये? पीठ पाणी शोषून घेते. चपाती लाटून ठेवल्यावर तिचा पृष्ठभाग वाळला गेल्याने ती कडक होते. पटत नसेल तर करून पहावे. स्वयंपाक घरात रोज काम करणारी सुग्रण स्त्री कधीच पोळ्या आधी लाटून नंतर भाजणे पसंत करणार नाही. चपात्या लाटणार्‍याचे कौशल्य सर्व पोळ्या लाटून नंतर भाजण्यात नसून एक पोळी भाजताना दुसरी पोळी लाटून तयार करण्यात आहे. ही गोष्ट सवयीने जमते आणि ती सवय लागण्यासाठी काही काळ लागतो.

तीन पदरी पोळी त्रिकोणी लाटता येते. चौकोनी पराठे आजकाल मिळू लागले आहेत.

सहमत

चपात्या लाटणार्‍याचे कौशल्य सर्व पोळ्या लाटून नंतर भाजण्यात नसून एक पोळी भाजताना दुसरी पोळी लाटून तयार करण्यात आहे. ही गोष्ट सवयीने जमते आणि ती सवय लागण्यासाठी काही काळ लागतो.

सहमत आहे.






सोयाबीन

ही युक्ती आमच्याकडे घरी करतात. तैलजन्य प्रवृत्तीमुळे सोयाबीनच्या बियांचे चूर्ण पिठात मिसळले की चपात्या मऊ होतात व राहतात.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पिठावर अवलंबून आहे.

अमेरिकेत चांगल्या मिळाणार्‍या पिठांत अन्नपूर्णाचे पीठ चांगले असते. सुजाताचे पीठही आतापर्यंत चांगले असे परंतु गेल्यावेळेस आणले असता त्याच्या पोळ्या नेहमीपेक्षा कडक होऊ लागल्या (कदाचित त्या बॅचचा दोष असेल. अशीच तक्रार करताना मी इंडियन स्टोरमध्ये दोघीतिघींना ऐकले होते [तरी सवयीने सुजाता घेऊन आले हा भाग वेगळा] तेव्हा दोष पिठाचाच आहे.) आणि तीन पदरी चपात्या करण्यावाचून पर्याय उरला नाही. हे पीठ मी चाळूनही पाहिले पण विशेष फरक पडला नाही. सध्या हेच घरात आहे. ते संपल्यावर अन्नपूर्णा मिळाले नाही तर चपात्या खाणे बंद करण्यावाचून आम्हाला पर्याय नाही. अन्नपूर्णाच्या चपात्या मऊसूत होतात. तूर्तास पीठ थोडे सैलसर मळ. बाकी कृती तू करतोस तिच.

तुझ्या चपात्या बनवण्याच्या प्रक्रियेत दोष नसून पिठात दोष असतो. अन्नपूर्णाचे पीठ बर्‍यापैकी महाग असते. (इतर पिठांपेक्षा सुमारे आठ डॉलर अधिक) अन्नपूर्णाचे पीठ वापरून बघ किंवा नवनवीन पीठे वापरून बघ. चांगल्या पिठाच्या पोळ्या मऊ होतील.

दुसरी एक गोष्ट अशी की तुझ्याकडे हॉटप्लेट असेल आणि फुलके बनवायचे असतील तर इंडियन स्टोरमध्ये हॉटप्लेटवर ठेवण्याची जाळी मिळते. फुलका दोन्ही बाजूंनी शेकला की या जाळीवर टाक. फुलून येईल.

ठीक

अन्नपूर्णापेक्षा सुजाताच्या पिठाने जरा बऱ्या चपात्या झाल्या होत्या. फुलक्यांचा पर्याय चांगला वाटत आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हे बघ

इथे बघ.






दोष

बहुदा पिठाचाच असतो, अशी मी माझ्या मनाची समजूत करून घेते. अमेरिकेत येणारे पीठ अनेकदा एकाच ब्रँडखाली विकले जात असले तरी त्याची प्रत सारखीच असते असे समजण्याचे कारण नाही. मीही सवयीने सुजाता वापरते पण ते फारसे उत्तम दरवेळी असतेच असे नाही.

आमच्या भारतीय किराणामालाच्या दुकानात एक अजून पीठ मिळते (स्वर्ण ) ,ते बहुदा खूप दळलेले असते, त्यामुळे मळताना त्यात खूप पाणी सामावते. त्याच्या चपात्या काहीशा जाडसर पण मऊ होतात आणि मऊ राहतात. पणा हे पीठ तरीही मी सवयीमुळे आणत नाही.

तेल

पोळ्यांसाठी कणिक मळताना तुम्ही त्यात तेल घालता का? की उत्तरेकडे रोट्यांसाठी भिजवतात तशी बिना तेलाची कणिक मळता? मी सुमारे पाच कप कणकेसाठी एक तृतियांश कप तेल असे प्रमाण वापरून कणिक मळते. कणकेच्या ब्रँडवर पोळ्यांचा पोत अवलंबून असतोच, मात्र माझ्या अनुभवानुसार कणिक मळताना (वरील प्रमाणात) तेल घातल्याने पोळ्या कोणत्याही ब्रँडची कणिक असली तरी लाकडासारख्या कडक कधीच झाल्या नाहीत.

तेल

हो. कणीक मळताना त्यात तेल घालतो. साधारण चार चपात्यांसाठी मळलेल्या कणकेत १ छोटा टेबलस्पून इतके तेल घालतो. चपात्या लाटताना त्याची घडी करण्यापूर्वीही तेल लावतो.

तेलाचा प्रमाण थोडे वाढवून पाहतो. (दोन चमचे.)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आगाऊ सल्ला

आमच्या नात्यातील बर्‍याच जणी कणकेत तेल घालताना मिश्र तेल घालतात त्यात तीळ+जवस+सोयाबीन+सूर्यफुल+एरंडेल+शेंगदाणा इ. तेले गरजेनुसार एकत्र केलेली असतात. कणकेत ही तेले घातल्याने फारसे कळून येत नाही आणि आवश्यक तेले पोटांत जातात. ज्यांना ही कल्पना आरोग्यदायी वाटत असेल त्यांनी पण अवश्य असे करून पाहावे. एका आयुर्वेद तज्ज्ञाने सुचविलेला हा उपाय आहे.

_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

मिश्र तेलांचा फायदा

अभय बंग यांनी साक्षात्कारी हृदयरोग या पुस्तकात मोहरी-शेंगदाणा आणि सूर्यफूल यांच्या तेलाचे समसमान प्रमाण घेऊन ते वापरावे असे सुचवले आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

बेकर्स यीस्ट

चपात्यांचे पीठ भिजवताना त्यात कोमट पाण्यात विरघळवलेले चमचाभर बेकर्स यीस्ट घालून मळून तासभर ठेवावे. याने चपात्या मऊ होतील असे नाही (नाहीतरी आता होत नाहीच आहेत!), पण अधिक चविष्ट आणि पौष्टिक होतील असे विज्ञान सांगते.
सन्जोप राव

चविष्ट आणि पौष्टिक

यीस्ट घातल्याने फरमेंटेशन होऊन चपात्या काहीशा आंबट लागतील पण पौष्टीक कश्या काय होतील?

बहुधा

यीस्टमध्ये प्रोटीन, बी-कॉम्प्लेक्स इ. गोष्टी असतात म्हणून कदाचित पौष्टीक मानले जात असावे.
----
काय? तुम्ही चित्रपट पाहिलेत? आणि वर फोटोही काढलेत? स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ कसे म्हणवते तुम्हाला?

यीस्ट

यीस्ट हे 'सिंगल सेल प्रोटीन' आहे.यीस्टमुळे पिठातील साखरेचे कार्बन डाय ऑक्साईड आणि अल्होहोलमध्ये रुपांतर होते. अल्कोहोल हा काही आपला उद्देश नाही. (ते बाजारात सहज विकत मिळते!) पण हे करत असताना यीस्टच्या संख्येत वाढ होते. बेकर्स यीस्ट हे स्वतःच पौष्टीक असल्यामुळे चपात्यांचे पोषणमूल्य वाढते.
सन्जोप राव

यीस्टचा परिणाम

घरात यीस्ट नसल्याने वरील प्रयोग करता आला नव्हता. परवाच बेकर्स यीस्ट (फास्ट राईज़) आणले. आता हे चमचाभर यीस्टचे प्रमाण किती पिठासाठी आहे हे माहीत नसल्याने चार चपात्यांसाठीच्या पिठात घाबरत घाबरत अर्धा चमचा यीस्ट मिसळले.

अर्ध्या तासातच कणकेच्या गोळ्याचा फुगा झाला. :)
पुन्हा एकदा हाताने दाबून व्यवस्थित करुन घेतला. आणि चपात्या लाटायला सुरुवात केली. तर लाटतानाच चपात्या फुगू लागल्या. :))

भाजताना तर अगदी टम्म फुगू लागल्या. ह्या चपात्या नानप्रमाणे मऊ आणि चविष्ट लागतात. एक दोन उत्तर भारतीय मित्रांनीही ही युक्ती करुन पाहिली. आणि त्यांना घरच्याघरी नान खायला मिळू लागले. रुचिपालट म्हणून माझ्यासाठी हे कधीतरी खाणे योग्य आहे. मात्र रोजच्या चपात्या तसे खाणे अवघड जाईल.

माझा निष्कर्ष असा की अर्धा चमचा यीस्ट हे चपात्यांसाठी थोडे जास्तच झाले. थोडे कमी वापरुन पाहतो.
फास्ट राईज यीस्ट हे चपात्यांसाठी योग्य नसावे. (मात्र हावरटपणाने ६ डालरची यीस्टची बाटली आणून ठेवली आहे. ती फेकून द्यावीशी वाटत नाही.) :(


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

प्रयोग करुन बघायला हरकत नाही

अरे वा! हा प्रयोग करुन बघायला हरकत नाही. यीस्ट घातल्यावर घडीच्या चपात्या करता येतात का? (तुम्ही बनवलेल्या चपात्या घडीच्या होत्या का?)

घडीच्या होतात मात्र त्याचा उपयोग नाही.

या चपात्यांची घडी किंवा बिघडी असे कसेही केले तरी चालते. या चपात्या फुगतात म्हणजे स्पाँजी होतात. (खुसखुशीत). घडीच्या पोळ्यांप्रमाणे फुगणे येथे अपेक्षित नसावे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पीठ

वा! स्वयपाकघरातला पीएचडी लेव्हलचा प्रश्न विचारला आहेत आपण! :)

मलाही पोळ्या मऊ न होण्याची समस्या भेडसावयची. सगळा स्वयपाक जमला तरी पोळ्या घरी आई बनवते त्याच्या १/१० गुणवत्तेच्या सुद्धा होईनात. शेवटी एकच उपाय केला, आणि आता मऊसुत पोळ्या मिळतात. तो उपाय म्हणजे,

"लग्न करुन टाकले" :)

असो...हा उपाय सद्यपरिस्थितीत शक्य नसल्यास,

होय वरती काही जणांनी म्हंटल्याप्रमाणे पीठ कुठले आणता ह्यावर बरेच अवलंबून असते. मध्यंतरी आम्ही लक्ष्मी नावाचे पीठ आणले आणि पोळ्या अचानक वातड बनू लागल्या. तेव्हा लक्षात आले हे पीठ अगदी बंडल आहे.

सध्या आम्ही वरती चित्राताईंनी उल्लेखलेले 'स्वर्ण' पीठ आणतो, आणि त्याच्या छान मऊ पोळ्या बनतात. पुढच्यावेळेस हे 'स्वर्ण' ब्रँडचे पीठ आणून पहा नक्की फरक पडेल.

स्वाद

"स्वाद"चेही पीठ चांगले आहे असे स्वानुभवावरून सांगतो.

चार इंच

आजच चार चार इंचाच्या पंचवीस पोळ्या केल्यात

चार इंच ही त्रिज्या, व्यास की जाडी?

उगाच "नाचता येईना अंगण वाकडे", असा हा प्रस्ताव मला वाटतो.

नाचता येत नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे आणि त्याबाबत नाचाच्या ष्टेपांमध्ये बदल सुचविण्याची विनंती केली आहे.

जमत नसेल, तर छायाचित्र द्या !

एकदा जमले की छायाचित्र देऊच.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अवांतर

मिशेश छाया चित्रे यांच्याबद्दल सर्वजण खूप बोलले. हे बोलताना मिश्टर प्रकाश चित्रे, कुमारी रेखा चित्रे आणि कुमार आलेख चित्रे यांचा विसर सर्वांना पडला होता. तरीही, आधीच खूप बोलणे झाल्यामुळे तूर्तास या फ्यामिलीला जरा श्वास घ्यायला उसंत देऊ? कसें? ;-)

जबरन

+१ जबरन प्रतिसाद!

अवांतर: जबरन = ओढूनताणून ना?

बहुधा

अवांतर: जबरन = ओढूनताणून ना?
बर्‍याच अंशी हो वाटते आहे. जबरन शब्द असणारे वाक्य आठवत होतो पण सध्या तरी आठवत नाही.

----
काय? तुम्ही चित्रपट पाहिलेत? आणि वर फोटोही काढलेत? स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ कसे म्हणवते तुम्हाला?

"जबरन"

"जबरन" हा शब्द असलेली वाक्ये शोले चित्रपटातल्या सूरमा भोपाली या पात्राच्या तोंडी आहेत. त्याचा अर्थ बहुदा "बळाचा वापर करून". वर सर्किट यांनी हा शब्द "जबरदस्त" / "बेअरिंग अ ग्रेट् डील् ऑफ् इम्पेशस्"या अर्थी वापरला असावा.

चपात्या मऊ कशा होतील?

त्यांची कणीक चांगली तिंबून!! ;)

कणीक भिजवताना निम्मे पाणी निम्मे दूध असे वापरुन बघ. दुधातल्या स्निग्धतेने फरक पडेल असे वाटते.
कणकेचा गोळा भिजवून झाल्यावर झाकून ठेवण्याआधी त्याला वरुन तेलाचा हात लाव म्हणजे गोळा सुकत नाही.

चतुरंग

धन्यवाद

सध्या असलेले सुजाता पीठ संपवून स्वाद/स्वर्ण वापरुन पाहीन. मात्र इथल्या युक्त्यांनी बराच फरक पडला आहे. :)

दूधही वापरुन पाहतो.

सर्वांचे मनापासून आभार.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

चपात्या मऊ कशा होतील? - (चपात्या करताना)

१. कणीक मळाताना - ती करताना आधी परात / मोठया ताटात मीठ , १ च. (४चपात्यांसाठी )तेल आणि मग पाणी टाकायचे.
मग त्यात पीठ टाकायचे. आणि हलक्या हाताने पीठ बाहेर् पडू न् देता , कणीक मळायची.
पीठ शक्यतो जास्तीत जास्त fine (चाळल्यानंततर् जास्त कोंडा उरायला नको. जास्त कोंडा असेल तर बाजूला काढून ठेवा. नंतर एखाद दिवशी कोंड्याच्या वेगळ्या चपात्या करा) असायला हवे. त्यात मैदा नको.
मी पीठ चाळते ते केवळ त्यातील कचरा काढण्यासाठी.
कणीक मळताना मात्र मोठे
''भरपूर पसरट भांडे हवे''. परदेशात मी मोठी थाळीच वापरते.

२. कणीक मळल्यानंतर लगेच चपात्या लाटायच्या नाहीत.
''१५ मि. कणीक परातीतच अलगद झाकूण ठेवायची''. उघडी राहिली कि तो भाग कडक होतो. चपत्या खराब दिसतात , लाटताही येत नाही.

त्यानंतर चपात्या लाटण्याआधी जेवढया चपत्या करायच्यात तेवढेच कणीक् घेवून, (बाकीची कणीक तशीच घेवून हवाबंद डब्यात फ्रीज मध्ये ठेवावी. )परत परातीत १ चमचा तेल घेवून कणीक व्यवस्थीत मळायची / एकजीव करायची.

फ्रिजमध्ये गोळा ठेवताना जर त्याला तेल लावलेले असेल तर् तो भाग लवकर काळा पडतो, माझा अनुभव.

३. चपात्या लाटताना -
कणकेचे समान गोळे करून घ्यायचे. प्रत्येक गोळा लाटून तेल लावून ,
''त्रिकोणी घडी करून बाजूला ठेवायचा''. ( एका वेळेस साधारण् पाचच गोळे / घड्या तयार करायच्या; जास्त् केल्यास शेवटचे गोळे कडक होतात्).
चपत्या नेहमीप्रमाणे लाटायच्या.

४. चपात्या भाजताना -
एक चपाती लाटली कि लगेचच ती भाजून घ्यायची. त्रिकोणी घड्या तयारच असल्याने तवा रिकामा राह नाही.
पहिल्या चपातीसाठी तव्यावर थोडे तेल पसरावे.
''तवा चपाती टाकल्यानंतर मात्र तो मोठ्या आचेवर हवा.''
लहान आचेवर चपात्या भाजतानाच पापडासारख्या कडक होतात.
तवा चपाती टाकण्या आधीच अती गरम असेल तर, चपाती त्याला चिटकते , तिला घाम् सुटतो व थोडी करपतेही.
तवा नॉन-स्टिक असल्यास् उत्तम . तेल कमी लागते, भाजताना चपाती चिटकत नाही.

५. चपात्या लगेच खाणार असाल तर भाजताना तेल लावले तरी चालते.
डब्यात नेण्यासाठी जर चपाती करत असाल तर तिला भाजल्यानंतर
"तुपाचा हात लावावा". ऑफिसमध्ये जर ओव्हनची सोय असेल तर चपाती गरम करतावना तुप (लगेच) पाघळून चपाती अगदी मऊ होते.

६. माझा अनुभव आहे, घरातल्या पीठाच्या चपात्या माऊ होतात .
पण विकतच्या पीठाच्या चपात्या मात्र कडक होतात. तेव्हा विकतचे पीठ असेल तर चपाती लाटताना अगदी पातळ न लाटता नेहमीपेक्षा
'' थोडी जाड लाटायची''. बाकी सर्व वरीलप्रमाणे.

परफेक्ट! (चांगभले)

अनुताई आणि सुमनताईंनी दिलेल्या सूचनांबरहुकूम चपात्या केल्या. अगदी झकास झाल्या.

सुमनताईंची चपात्यांच्या लाट्या तयार करुन ठेवण्याची सूचना तर फारच उपयुक्त. आता एक चपाती लाटेपर्यंत दुसरी भाजते.

तात्पर्य
१. तवा चांगला तापत नव्हता.
२. पीठ अजून थोडे सैलसर हवे होते.
३. भाजताना तेल लावायला नको होते.

या चुकांमुळे चपात्या चांगल्या होत नव्हत्या. पिठाचा दोष नाही.

सर्किटशेठ, लवकरच फोटू टाकतो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वा!

उपयुक्त धागा! धन्यु कर्ण!

उपक्रमराव,
वाचनखुणांचे मनावर घ्या हो :)

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

 
^ वर