२१ वे शतक आणि भारतीय संस्कृती

आपण जेव्हा २१ व्या शतकात जगायचा प्रयत्न करतो, म्हणजे नक्की काय करतो? माझ्यामते, आपण विज्ञान-तंत्रज्ञानाने पुढारलेल्या समाजाचे प्रतिनीधीत्व करतो. हे मी आत्ता लिहीलेले तुम्ही वेबवर वाचू शकता ते त्याच वैज्ञानिक प्रगतीने.

मेडीकल सायन्स (मानवाच्या जीनचा संगणक आराखडा तयार होणे), संगणक, अंतराळ, इ अनेक क्षेत्रातील भरारी थक्क करते. ह्यात भारतीयांचा वाटा जो काही आहे त्याबद्दल वेगवेगळी मते असू शकतील, पण सगळेच मान्य करतील की, सकाळी डोळे उघडल्यापासून "टूथपेस्ट" पासुन सुरु होणारा आपला प्रवास रात्री "लाईट स्विच-ऑफ" करे पर्यंत जे काही आपण करतो त्यात अनेक तंत्र हे मुळ भारतीय शोध नाही. पण ह्यासगळ्या झाल्या वस्तु (things).

मग भारतीयांनी जगाला काय दिले?

भारतीय संस्कृतीत पुर्वीपासुनच मानवाच्या मनाचा, शरीराचा (आयुर्वेद), आरोग्याचा (योग), विश्वाचा, निसर्गाचा, जगण्यासंबधी नियमांचा (वेद), संस्कृतीचा (विवाहसंस्था, सण, शेती, काव्य, संगीत, साहित्य, काम, शिल्पकला, चित्रकला, इ) सर्वांगीण अभ्यास झाला व त्यामुळे जंगली माणूस, "मानव" झाला. ती सर्व तत्वे आजही तितकीच लागू पडतात. ती rock-solid priciples आहेत. माणूस म्हणून माणसाने कसे जगावे हेच भारतीयांनी जगाला दिले. आणि हाच तो महत्वाचा फरक मला नेहमीच पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीत दिसत आला आहे.

त्यामुळे २१ व्या शतकात जायचे असेल असेल तर त्याचा अर्थ इतर संस्कृतींची नक्कल करणे ह्यात पुढारलेपण नसुन, त्या विज्ञानात प्रगत झालेल्या समाजाने जे शोध लावले तसे नवे शोध भारतीयांनी लावायला हवेत. त्यासाठी आपली मुळ संस्कृती (वर वर्णन केलेली) सोडण्याचे प्रयोजन मला तरी दिसत नाही. दोहोंचा योग्य संगम (त्यांचे विज्ञानज्ञान + आपली संस्कृती) आपल्याला जगात सर्वोत्तम करु शकते.

सकाळी ६ वाजता आपण भजन, इ न ऐकता जर आयटम सॉंग ऐकले तर त्याचा तिटकारा येतो. "प्रेम" इश्वरावरील असेल तर ती पवित्र भक्ती असते आणि मानवाच्या देहावर असेल तर भावना असते. आपल्याला सकाळी ६ वाजता इश्वरभक्तीची आस असते; आयटम सॉंगमधून व्यक्त होणाऱ्या भावनेची नसते, हे त्या तिटकाऱ्याचे कारण असते. हे आपल्या मनाला समजते तेच भारतीय संस्कृतीचे आपल्याला देणे.

लेखनविषय: दुवे:

Comments

भारतीयांनी जगाला काय दिले ?

आयुर्वेद,योग, वेद, संस्कृतीचा[ विवाहसंस्था, सण, शेती, काव्य, संगीत, साहित्य काम शिल्पकला, चित्रकला] या पैकी आपण
जगाला काय दिले ? मला वाटते योग[चीन व पूर्व आशिया पुरता मर्यादित], शिल्पकला [पूर्व आशिया] सोडले तर आपण जगाला
[भारत सोडून] काहीही दिले नाही.आपण आपल्या देशात जे विकसित केले ते जगाने स्विकारले तर ती जगाला देणगी झाली. तसे
काही इतिहासात तरी दिसत नाही. कोणी समजावून सांगेल काय ?
शरद

जगाला काय दिले

मला असे अनेक् अमेरिकन् व् ब्रिटीश माहित आहेत् की जे योगशिक्षण घेतलेले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या एका ब्रिटिश कुटूंबातील् स्त्री रोज् योग करते. त्यांच्या घरी आठवड्यातून् एकदा भारतीय आहार् केला जातो.

एका लाहानश्या ब्रिटिश खेड्यातील् सुपरमार्केट मधे भारतीय पदार्थांची अनेल कोल्ड स्टोरेज बघीतली. बरे वाटले.

एखादी गोष्ट जगाला देणे म्हणजे त्याचा अंगीकार सगळ्या जगाने केला तरच ते जगन्मान्य असे नव्हे. भारतात किती जण योग करतात?

मग

एखादी गोष्ट जगाला देणे म्हणजे त्याचा अंगीकार सगळ्या जगाने केला तरच ते जगन्मान्य असे नव्हे.
जगाला देणे याची नेमकी व्याख्या काय?

----
"Is there a pinkish hue?" -- George Costanza

+१ : फ्रॉईडियन स्लिप?

आयडी निवडताना फ्रॉइडीयन स्लिप* झाली की काय? :-)

*आम्ही स्त्रियांना समान हक्क देण्याच्या पक्षात असल्याने स्लिप झाली असे म्हटले आहे. यावर शंका असल्यास चर्चा होऊन जाऊ द्या. ६७ प्रतिसाद, फ्रॉइडीयन स्लिप स्त्रीलिंगी की पुल्लीगी - भाग २ इ.
----
"Is there a pinkish hue?" -- George Costanza

नपुंसकलिंगी ?

"स्लिप्"चे भाषांतर "चूक" . "चूक" हा मराठी शब्द स्त्रीलिंगी आहे.
मात्र "स्लिप्" हा इंग्रजी शब्द नपुंसकलिंगी असला पाहिजे :

"इटस् अ स्लिप् ( से, ऑफ टंग्)"" : बरोबर
"शी इज् अ स्लिप् ( से, ऑफ टंग्) " : चूक

अर्थात , वर राजेंद्र यांनी "फ्रॉइडीयन स्लिप्" हा वाक्प्रचार मराठी वाक्यात वापरला आहे , त्यामुळे अर्थातच तिथे "स्लीप्" स्त्रीलिंगीच असायला हवी.

भारतीयांची कामगिरी शून्य आहे...

इंग्लंडला गेले असताना आर के लक्ष्मण एकदा सर बर्ट्रांड रसेल यांना भेटायला गेले होते. गप्पाटप्पा झाल्यावर सर रसेल हसत लक्ष्मण यांना म्हणाले,"शोध लावण्याच्या बाबतीत तुम्हा भारतीयांची कामगिरी शून्यच आहे." एकदमच असे वाक्य आल्याने लक्ष्मण गांगरले. चीड दिसू न देता मग त्यांनी तुम्ही म्हणता ते बरोबर नाही, तत्त्वज्ञान, बुद्धिबळ, खगोलशास्त्र वगैरेचं काय असा प्रश्न रसेल यांना विचारला.
खट्याळपणे रसेल उद्गारले," अरे जरा शांत हो. मी तुम्हा भारतीयांना फार मोठे श्रेय देतोय, प्रशंसा करतोय. शून्याची कल्पना हा गणितशास्त्रातील फार मोठा शोध आहे आणि त्याचे सारे श्रेय भारतीय विचारवंतांना जाते."

-सौरभ.

==================

शून्य, बुद्धिबळे, बुद्ध धर्म वगैरे

ह्या बद्दल मी बोलत नाही हो. श्री.त्रास यांनी दिलेल्या गोष्टीं पुरताच माझा प्रश्न मर्यादित समजावा.
[समित्पाणी] शरद

आरक्षण

आजकाल संस्कृती शब्द ऐकला की दचकायला होते.

सकाळी ६ वाजता आपण भजन, इ न ऐकता जर आयटम सॉंग ऐकले तर त्याचा तिटकारा येतो.
मला तर 'जै हो' कधीही ऐकले तरी चालते बॉ. याचा अर्थ मी भारतीय नाही असा घ्यावा का? किंवा कदाचित माझी संस्कृती बुडाली असावी का?

----
"Is there a pinkish hue?" -- George Costanza

योग शिक्षण घेतलेले अमेरिकन व ब्रिटिश---

माफ़ करा, श्री. त्रास, आपण योग[मग तो भले पातंजली ,हट, राज वा भक्तियोग असो] आणि योगासने यांची गल्लत तर करत नाही ना ?
आज योगाच्या नावाखाली जगभर योगासने व थोडासा प्राणायाम एवढेच शिकवले जाते. हा भाग साधनांचा एक अल्प भाग आहे. साध्य
नक्कीच नव्हे. आपणास माहित असलेल्या भगिनीला एकदा अवष्य विचारा,यम-नियम म्हणजे काय ? त्यानी इतक्या दिवसात यातील
काय काय साध्य केले आहे ? अष्टांग योगातील ही प्रथम पायरी त्यांनी आत्मसात केली आहे का ? त्यात त्यांची प्रगती किती झाली आहे ?
मॅकडोनाल्डच्या मार्गाने भारतात आलेले जंक फ़ूड ही अमेरिकेची भारताला " देणगी " म्हणता येणार नाही तसेच योगासने ही शारीरिक
कसरत [त्यांचा उपयोग मान्य करूनही] फ़ार मोलाची देणगी आहे असे मला वाटत नाही.
सुपर मार्केटमधील भारतीय अन्न पदार्थ याला भारताची जगाला देणगी म्हणने अम्मळ ---
शरद

आँ?

सकाळी ६ वाजता आपण भजन, इ न ऐकता जर आयटम सॉंग ऐकले तर त्याचा तिटकारा येतो.

हे असं सर्वसामान्यिकरण का झालेले आहे इथे? मला नाही बॉ तिटकारा येत. माझा मूड असेल तर सकाळी ६ वाजताच का, पाच वाजताही "खल्लास" ऐकेन.

"प्रेम" इश्वरावरील असेल तर ती पवित्र भक्ती असते आणि मानवाच्या देहावर असेल तर भावना असते. आपल्याला सकाळी ६ वाजता इश्वरभक्तीची आस असते; आयटम सॉंगमधून व्यक्त होणाऱ्या भावनेची नसते, हे त्या तिटकाऱ्याचे कारण असते.

काय मतलबी आहोत आपण? सकाळी ६ वाजता इश्वरभक्ती, ७ वाजता लोकल ट्रेनभक्ती, ९ वाजता बॉसभक्ती, १२ वाजता पोटपूजाभक्ती,सं. ५ वाजता हापिसला टाटाभक्ती, सं. ७ वाजता न्यूजचॅनेलभक्ती, रा. ९ वाजता आयटेम साँग भक्ती असे काही असते का? असेल असेल भारतीयांकडे असे वरिजनल भक्तीयोग असणे शक्य आहे. ;-) ह. घ्या.

 
^ वर