एका दुर्दैवी कमांडोची व्यथा -
सैन्यातील एका वरिष्ठ अधिकार्याने पाठविलेली मेल, नेवीतील माझ्या एका मित्राने मला forward केली. त्याचे शब्दशः भाषांतर खाली देत आहे.
---------------
१. माझ्या विभागात (unit) माझा अतिशय सज्जन, कर्तव्यकठोर, कमांडोसारखा एक आधिकारी होता. त्याचे नांव कप्टन राम सिंह जेष्ठतावर्ष (seniority) २००३. (अपरिहार्य कारणास्तव मूळ नाव बदलले आहे). त्याची (NSG मध्ये) राष्ट्रीय सुरक्षा गार्डमध्ये जाण्याची इच्छा होती. आम्ही बढतीच्या धोरणात थोडा बदल करून त्याच्या तीव्र ईच्छाशक्तिमुळे अलिकडेच ह्या वर्षी त्याला NSG मध्ये आधिकारी म्हणून बढती देण्यात आली.
२. 27 नोव्हेबरच्या दिवशी दहशतवादाशी लढा देण्यासाठी पाठविण्यात आलेला कमांडोपैकी तो एक होता. ओबेराय होटेलमध्ये सुरु केलेल्या कारवाई मध्ये त्याला ताबडतोब पाठविण्यात आले. त्या दिवशी संध्याकाळी ६ वाजता १८ व्या मजल्यावरील दहशतवाद्यापैकी एकाशी त्याला सामना करावा लागला. त्या दहशतवाद्याने खोली बंद करून घेतल्याने त्याने स्फोटके वापरून दरवाजा उघडला. पण त्याला आत ग्रेनेड फेकणे शक्य होण्यापूर्वीच त्या दहशतवाद्याने बाहेर ग्रेनेड फेकले. त्याचा त्या आधिकार्याच्या अगदी समोरच स्फोट झाला. ग्रेनेडचे स्प्लिंटर्स शरीरात घुसण्यामुळे सर्वत्र जखमा झाल्या व तो बेशुद्ध पडला. अनेक ठिकाणी जखमी झालेला तो एकच अधिकारी त्या संपूर्ण मोहिमेत होता. उन्नीकृष्णन तर त्याच मोहिमेत ठार झाले होते.
३.मुंबईमधील एका हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. केवळ एक सोडून सर्व स्प्लिंटर्स त्याच्या शरिरातून काढून टाकण्यात आले. तो एक कण मात्र त्याच्या डाव्या डोळ्यात आरपार घुसला आणि त्याने तो डोळा कायमचा गमावला. नेत्रदाताच्या मदतीनेही त्यावर उपचार होऊ शकत नाही. एवढ्या महत्वाच्या बातमीचा जाहीर निवेदनात तसेच कोणत्याही मिडीयाने दिलेल्या माहितीत ह्याचा साधा उल्लेखही नव्हता.
४. तो आधिकारी आता सुद्धा मुंबईच्या हॉस्पीटल मध्ये एकाकी आहे. त्याच्या डाव्या डोळ्यातून अजून रक्तस्त्राव होत आहे. आता सर्व राष्ट्रीय सुरक्षा गार्डस् दिल्लीत परत गेले आहेत. त्याच्यवर ह्यापुढे कसा औषधोपचार होणार, त्याचे भवितव्य काय हे त्याला समजत नाही. "माझा डोळा वाचवा मला सैन्यात नोकरीत रुजू व्हायचे आहे" असा एकच आक्रोश तो करत आहे. त्याचे सांत्वन करण्यासाठी NSG मधील कुणीही त्याच्याजवळ नाही. त्याच्या नातेवाइकाना कुणाकडे मदत मागावी हे समजेनासे झाले आहे. लक्षात घ्या, सैन्याधिकारी तसेच त्या बटालियनच्या प्रमुख आधिकार्याने १ डिसेंबर पर्यंत त्याची साधी भेटही घेतली नाही. जेव्हा नजीकच्या वरिष्ठ आधिकार्याच्या नजरेस ही गोष्ट आणण्यात आली तेव्हा त्यानेही ह्याची साधी चौकशीसुद्धा न करता त्याला, "मिडीयामध्ये कुणालाही मुलाखात द्यायची नाही व कुणापाशीही चकार शब्द देखील काढायचा नाही" असे बजावले.
५. अतिशय भयंकर घृणास्पद व निंदनीय ही घटना आहे. जर एखाद्या अधिकार्याच्या बाबतीत असे घडत असेल तर सामान्य माणसाच्या जीवनात असे घडल्यास काय होत असेल ह्याची कल्पनाही करवत नाही. जर शूरवीर म्हणून ज्याना राष्ट्र मानवंदना देत्ते त्यांच्या बाबतीत हे घडू शकते तर इतरांची परिस्थीती काय असेल. NSG चा यामध्ये कोणता हेतु होता हे समजत नाही. तरी सुद्धा cannon fodder प्रमाणे NSG ने त्यांच्या सहकार्यांना अशा प्रकारे वागविणे न पटणारे आहे.
६ सुदैवाने माझी रेजिमेंट मुंबईतील त्या आपरेशनच्या जवळच आहे. मी त्याला मदत करणासाठी माझा रेजिमेंटला प्रवृत्त केले. शेवटी तो श्रेष्ठ भारतीय सैन्यातील एक अधिकारी आहे. दुर्दैव म्हणजे मी त्याचा डोळा वाचवू शकलो नाही. आणि मी त्याला कोणतीही कार्यालयीन मान्यता देऊ शकत नाही.
७. सीमेवरील सैन्यातील सर्व आधिकार्यांना माझे सांगणे हेच, की पुढे येऊन धैर्याने कुणाबरोबरही लढा पण जखमी अवस्थेत राहू नका. त्यापेक्षा मरणे बरे. कारण जर तुम्ही जगलात तर आयुष्यभर क्षणोक्षणी किती मरणप्राय वेदना सहन कराव्या लागतील याला क्षिती नाही.
---------------
NSG चा यामध्ये कोणता हेतु होता हे समजत नाही.
Play down our casualities हे सरकारचे धोरण इतर बर्याच वेळा दिसून येते. NSG ची अशा तर्हेची प्रतिक्रिया ही देखील त्याच धोरणाचा एक भाग असेल का ?
Comments
बधीर
जी नाव पेपरात आली नाहीत त्यांच काय झाले असेल. जखमींचे काय असा प्रश्न माझ्या मनात आला होता. मिडियाला समोर जे आणल जात त्याची न्युज व्हॅल्यु करतात. वलयांकित काय ठरवायच? शोध पत्रकारिता आता कमी दिसते. काही पत्रकार असतील पण त्यांचे रिपोर्टिंग संपादकीय धोरणात बसत नाहीत. मग तेही गप्प बसतात.
प्रकाश घाटपांडे
सिस्टीम
पण जे बातमीत येते तेव्हढेच जग मानायचे का?
त्यापेक्षा योग्य परिस्थितीत योग्य तो आधार देणारी सपोर्ट सिस्टीम जागेवर नको का?
आपला
गुंडोपंत
योग्य मुद्दा
पंत एकदम योग्य मुद्दा मांडला आहे. आता आपल्याला हे नक्कीच माहित झालं आहे कि जे बातमीत येता तेवढच जग नसत. गरज आहे ती जे बातमीत येत नाही ते सर्वांसमोर आणण्याची. संकेतस्थळे, अनुदिन्या, व्य. नि. हे ही माध्यमे आहेतच. या सोबतच मुद्दे फक्त न मांडता त्यातुन मार्ग काढण्याची कृती हवी. सरकार, मिडिया असं आपण म्हणत राहिलो तर फक्त बोटं दाखवण्याचे काम होईल. समांतर व्यवस्था लोकांनीच लोकांसाठी तयार करायला हवी हे सत्य आहे. आणि ती व्यवस्था अशी बनवु वगैरे या चर्चा न करता गरजवंताला शक्य त्या प्रकारे मदत करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य बनवुन घेउ.
या सत्यकथेमध्ये सिस्टीम बद्दल बोटे मोडत न बसता आपल्याला या जवानासाठी नक्की काय करता येईल यावर विचार आणि कृती करायला हवी असे मला वाटते.
नेत्ररोपणाचा उपयोग नाही हे माझे अनुमान झाले आहे. ते योग्य आहे का? जर असे असल्यास या जवानाचा लष्कराला उपयोग नाही असे म्हणून सरकार नक्कीच हात झटकेल. मग आपण काय करु शकतो? कुटुंबियांना मदत? नक्की काय करु शकतो. मन सुन्न झाले आहे.
आधी
आधी मन सुन्न झाले, मग उदास आणि शेवटी असहाय्य वाटले.
पण आशा आहे. आशाच आहे.
काहीतरी बदल घडेल.
'एका काश्मीरी अनमिकाची डायरी' वाचल्यावरही असाच सून्न होऊन काही दिवस काढले.
पण त्यातही पुढे काही तरी होईल ही आशा आहेच.
त्या आशेवरच...
आपला
गुंडोपंत
अजिबात विश्वास बसत नाही
माफ करा ह्या पत्रावर विश्वास बसत नाही.
म्हणल तर यात भयानक असे काही दिसत नाही. नक्की काय म्हणायचे आहे या पत्रातुन? जर माहीती गुप्त ठेवायची असेल तर वरिष्ठ त्या कमांडोला वार्यावर सोडतीलच कसे? का जखमी झाला म्हणून त्याचे नाव गाव जाहीर करायचे? त्याच्यावर पाळत ठेवुन कोणी इतर सदस्यांपर्यंत पोहोचले तर?
त्याच्यवर ह्यापुढे कसा औषधोपचार होणार, त्याचे भवितव्य काय हे त्याला समजत नाही. "माझा डोळा वाचवा मला सैन्यात नोकरीत रुजू व्हायचे आहे" असा एकच आक्रोश तो करत आहे....सीमेवरील सैन्यातील सर्व आधिकार्यांना माझे सांगणे हेच, की पुढे येऊन धैर्याने कुणाबरोबरही लढा पण जखमी अवस्थेत राहू नका.
म्हणजे सीमेवरील भारतीय सैन्यात / एन एस जी पथकातील जो कोणी जखमी होतो त्याचे भवितव्य संपुष्टात??? काहीच अर्थ लागत नाहीये हो. पॅराप्लेजीक रिहॅबिलीटेशन सेंटर ऐकली नाही का कधी? खडकी येथे एक असे सेंटर आहे. माझ्या माहीतीप्रमाणे सैनिकांचा अपघाती विमा असतो, पेन्शन असते. जखमी अपंग सैनिकांना विविध सवलती, योजना असतात. तुमच्या पत्रातील विधाने ही सैन्याचीच नव्हे तर भारताची बदनामी वाटते. एकोहम हे लिहताना तुम्हाला हे कसे सुचले नाही?
कमांडोसारखा एक आधिकारी , सीमेवरील सैन्यातील सर्व आधिकार्यांना माझे सांगणे ,त्याच्यवर ह्यापुढे कसा औषधोपचार होणार, त्याचे भवितव्य काय हे त्याला समजत नाही. "माझा डोळा वाचवा मला सैन्यात नोकरीत रुजू व्हायचे आहे" असा एकच आक्रोश तो करत आहे.
ह्या असल्या वाक्यांमुळे मी तरी ह्या पत्राला विश्वासार्ह मानत नाही. तुमच्या नेव्हीतील मित्राला विचारा सीमेवर जखमी झालेल्या सैनिकाला असे वार्यावर सोडले जाते का?
जर हे खोटे असल्यास अशी पत्रे शहानिशा न करता पसरवणार्यांना कुठली बरे शिक्षा करावी असे उपक्रमींना वाटते?
उपक्रमावर अशी पत्रे यावी याचे मला वाईट वाटते.
डीडी एक पत्रकार म्हणुन तुम्हाला यावर काय म्हणावेसे वाटेल? तुमच्याकडे/तुमच्या वृत्तसंस्थेकडे असे अनेक दावे येत असतील कुठला दावा पुढे तपास करण्या योग्य आहे व कुठला नाही याचे काही निकष?
माझा देखील् !
असल्या वाक्यांमुळे मी तरी ह्या पत्राला विश्वासार्ह मानत नाही
माझा देखील् !
माझ्या हाकेच्या अंतरावर् आहे एनएसजी बेस आहे, माझे काही जाणकार देखील आहे !
त्याच्याशी बोलणी केल्यावर कळाले की असं काहि नाही आहे , काही लोकांना प्रसिध्दीची हाव असते तर् काहींना आपसुकच प्रसिध्दी मिळते !
तुम्ही म्हणाल्या प्रमाणे विमा असतोच व खुप सवलती देखील असतात्...
जास्त माहीती मी त्यांना हा लेख वाचावयास देतो (भाषांतर् करुन) मग बघतो ते काय म्हणतात !
राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
माझ्या मनातलं लिहिलत..
आपलच् मनोतगत् यामुळे खच्ची होईल , सैन्यात तशीही माणसांचि कमतरता आहे..ती अजूनच वाढेल अशी प्रसिद्धी मिळाली तर्.
सत्य न तपासता अश्या मेल्स फॉरवर्ड करताना जरा तारतम्य बाळगावं.
कुशंका
१. उन्नीकृष्णन तर त्याच मोहिमेत ठार झाले होते.
उन्नीकृष्णन यांचे बलिदान ताज मध्ये असावे.
२. आता सर्व राष्ट्रीय सुरक्षा गार्डस् दिल्लीत परत गेले आहेत. त्याच्यवर ह्यापुढे कसा औषधोपचार होणार, त्याचे भवितव्य काय हे त्याला समजत नाही.
या दोहोंचा परस्परसंबंध लक्षात आला नाही.
४. नेवीतील मित्र कुणाचा आहे.?
मेलचा शेवट नकारार्थी असला तरीही अधिक माहिती किंवा मदत करण्यासाठी काय करावे असे काही नाही.
प्रसारमाध्यमांकडून अशी लक्षवेधी बातमी किंवा मदत करण्याची संधी मुकली हे पटणे कठीण आहे.
अर्थात तपशीलात किंवा घटनेबद्दल शंका असल्याने, सैन्याच्या जखमी जवानांच्या काळजी घेण्याच्या प्रक्रियेत सारे अलबेल आहे असे त्याचे मत आहे असे नाही.
सहमत
सहज आणि चाणक्य यांच्याशी सहमत आहे.
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ही बातमी खरी आहे का त्याची शहानिशा करणे. जर खरी असेल तर यावर काय उपाय करता येतील याचा विचार करणे. पहिला भाग शोध पत्रकारितेसारखा असल्याने डीडी यावर मार्गदर्शन करू शकतील.
जर हे खरे असेल तर फारच धक्कादायक आहे पण एनएसजीसारख्या संस्थेच्या बाबतीत असे होऊ शकते यावर विश्वास बसणे कठीण आहे. त्यामुळे आधी शहानिशा करून घेतलेली बरी. एकोहम यांच्या नौदलातील मित्राला हॉस्पीटलचा पत्ता माहीत असावा काय?
----
"This is Linus Torvalds. I announce Linux."
मुद्दे
चर्चेत योग्य मुद्दे येत आहेत. नाण्याची दोन्ही बाजु तपासुन पाहणे गरजेचे आहे. आपल्याला (व्यक्तिगतरित्या मला) या बद्दल फार माहिती नाही. मुळातच संरक्षण विषयक कोणकोणत्या तुकड्या अस्तिताव असतात, लष्कर,एनएसजी, बीएसएफ, सीआरपीफ असे नक्की काय काय आणि कशासाठी आहेत? थोडक्यात सरकारच्या संरक्षण विषयक कोणकोणत्या तुकड्या आहेत? घाडपांडे साहेब, यावर तुम्ही वेगळा प्रबंध लिहिलात तर आमच्या सारख्या सामान्यांच्या ज्ञानात मोलाची भर पडेल.
जर वर लिहिलेला किस्सा खोटा म्हटला तर तो असा का पसरवला जातोय? खरा म्हटला तर असे नक्की का होते आहे? खरे असेल तर अशा निराशावादी अनुभवांनी लष्करात जाणार कोण? जर लष्कराचे असे होत राहिले तर लष्करच राहणार नाहीत आणि मग आपल्या सीमा सुद्धा....
तुकड्या
इथे व त्यातून उलगडत जाणार्या दुव्यांमध्ये बरीच उपयुक्त, रोचक व 'विश्वासार्ह' माहिती आहे.
विश्वासार्ह वाटले नाही
वरील निवेदन विश्वासार्ह वाटले नाही.
एनएसजीने कायम अपंगत्व आलेल्या अधिकार्याला पुनश्च सेवेत न घेणे हे समजण्यासारखे आहे परंतु त्यांचे अधिकारी असे कोणत्याही इस्पितळात खितपत पडलेले असावेत असे वाटले नाही.
असो, अफवांवर विश्वास न ठेवणे हे संकट काळातील एक मोठे काम असते. "तथाकथित" सैन्यातील अधिकारीच अशा अफवा *पसरवत असतील तर कठिण आहे.
* ज्या बातमीत योग्य स्थळ, काळ, संदर्भ नसतात त्यांना अफवा मानता यावे शक्य असावे.
आणखी एक मुद्दा
मुंबईचे ताज प्रकरण संपल्यावर आत गेलेल्या कमांडोंची पत्रकार परिषद पाहिली होती. यात सर्व कमांडोंनी तोंडाला फडके बांधले होते. याचा अर्थ कमांडोंना आपली ओळख जाहिर करता येत नाही/करायची नसते असा घ्यावा का? आणि असे असल्यास ह्या जवानाच्या दुखापतीबद्दलही जास्त प्रसिद्धी न मिळण्यामागे हे कारण असू शकेल का?
----
"This is Linus Torvalds. I announce Linux."
बेजबाबदार आरोप -
बेजबाबदार आरोप -
ह्या असल्या वाक्यांमुळे मी तरी ह्या पत्राला विश्वासार्ह मानत नाही. तुमच्या नेव्हीतील मित्राला विचारा सीमेवर जखमी झालेल्या सैनिकाला असे वार्यावर सोडले जाते का?
जर हे खोटे असल्यास अशी पत्रे शहानिशा न करता पसरवणार्यांना कुठली बरे शिक्षा करावी असे उपक्रमींना वाटते?
असल्या वाक्यांमुळे मी तरी ह्या पत्राला विश्वासार्ह मानत नाही - काही लोकांना प्रसिध्दीची हाव असते तर् काहींना आपसुकच प्रसिध्दी मिळते !
अर्थात तपशीलात किंवा घटनेबद्दल शंका असल्याने,
एकोहम हे लिहताना तुम्हाला हे कसे सुचले नाही?
मी निनावी व्यक्ति नव्हे. माझे नाव आहे विश्वास भिडे - राहणार सांगली. माझ्या नेवीतील मित्राचे नाम आहे Capt. Gajanan Karandikar. त्याचा email ID हवा असल्यास मला vrbhide at hotmail dot com इथे विचारावे. त्याने मला जी मेल forward केली त्या अधिकार्याचे नाव व त्या मेलचे शीर्षक आहे -
Here is a true account from an officer commanding a regiment
From IS Gill CO 22 Field Regt --
आणि ज्याच्याबद्दल ही बातमी आहे ती प्रसारमाध्यमात प्रसिद्धही झालेली आहे - इथे पहा -
मला उपलब्ध असलेली सर्व माहिती पुरविली आहे. एवढ्या माहितीच्या आधारे आरोप करण्याव्यतिरीक्त काही ठोस कारवाई करणेदेखील शक्य आहे. आणि खरेच तसे करण्याबद्दल आता कोण कोण काय काय करू शकेल ते ज्याचे त्याने पहावे.
बेजबाबदार आरोप करण्याआधी थोडी शोधाशोध ही करायची देखील तसदी न घेता आरोप करण्याचा उतावीळपणा आणि आरोप करण्याची घाई दिसून आली. धन्यवाद. माझे वडील २७ वर्षे एअर फोर्स मध्ये होते. तेव्हां जगापुढे दाखवायचे काय असते आणि वास्तव काय असते याची मला तसेच माझ्यासारख्या सैन्यातील कुटुंबियांना चांगलीच जाण आहे. असो. आपल्याला बेजबाबदार आरोप करण्यात धन्यता वाटत असेल. पण माझ्यासाठी एक चांगले झाले. 'उपक्रम' मधे आता मला रस राहिला नाही. 'उपक्रम' वरील माझी ही शेवटची भेट.
एका सामान्य सभासदातर्फे विनंती
उपक्रम सोडून जाऊ नये असे , एक सामान्य उपक्रम सभासद म्हणून मी सुचवतो. (उपक्रम च्या मालकी, संपादन , इ. इ. शी माझा शून्य संबंध आहे. ) तुमच्या हेतूबद्दल इथल्या लोकांना शंका असेल असे वाटत नाही. कदाचित बातमीचा मजकूरच अतिशय संवेदनशील असल्याने , तपशीलांशिवाय विश्वास ठेवणे अयोग्य ठरले असते. या दृष्टीने , शंका घेणार्या सभासदांचे चुकले नाही. तुम्ही हे व्यक्तिशः घेऊ नये.
आता तुम्ही तपशीलवार माहिती दिल्याने , ती जास्त विश्वासार्ह बनते. यावर सामान्य नागरिकांना काय करता येईल याबद्दल पुढली चर्चा करता येईल.
सहमत आहे
एकोहम राव,
मुक्तसुनीत यांच्याशी सहमत आहे. आपल्या माध्यमांची परिस्थिती ही 'लांडगा आला रे आला' या गोष्टीप्रमाणे झाली आहे. पेपरात आलेली अशी बातमी ही सहसा खोटीच असते असे वाटल्यास नवल नाही.
तुम्ही ही बातमी घेतल्याचा स्रोत मूळ लेखात दिला असतात तर निश्चितच वेगळ्या बघायला मिळाल्या असत्या. ही बातमी फार वाईट आहे. अशा बातम्यांमुळे कित्येक सैनिकांचा भ्रमनिरास होत असेल, मनोधैर्यावर किती वाईट परिणाम होत असेल याची केवळ कल्पनाच करु शकतो.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मूळ लेख
भिडे,
मूळ लेखात तुम्ही संदर्भ दिलेले नसल्याने सदस्यांचा गैरसमज होणे मला साहजिक वाटते. त्यावरून प्रश्न पडणे आणि विचारणे हे गैर वाटत नाही. प्रश्नांची भाषा बदलून देता आली असती का असा विचार केला तर हो, तसे करता आले असते परंतु येथील बरेचसे सदस्य दुसर्या सदस्याला ओळखत नाहीत त्यामुळे समज-गैरसमज होणे शक्य आहे. आपल्याबद्दल कोणतीही माहिती वाचकांकडे नसता, ती आपण लेखात मांडली नसता, संदर्भ दिले नसता वाचकांकडून तशी अपेक्षा करणे अयोग्य वाटते.
तरी, हे सर्व इतके व्यक्तिगत घेऊन उपक्रमावर येणे सोडू नये असे सांगावेसे वाटले.
उपक्रम सोडु नका !
विश्वासराव,
'उपक्रम' मधे आता मला रस राहिला नाही. 'उपक्रम' वरील माझी ही शेवटची भेट.
बातमी आणि आपण दिलेला मित्राचा संदर्भ, या गोष्टींची चर्चा होत राहील आणि पूर्वी संदर्भ नसल्यामुळे जरा गोंधळ होणे साहजिक होते. केवळ वरील कारणाने उपक्रम सोडू नका राव ! (उपक्रम च्या मालकी, संपादन , इ. इ. शी माझाही शून्य संबंध आहे. )
कसं आहे, सध्या जरा संवेदनशील विषयाला हाताळतांना जरा चांगल्या-चांगल्यांची अडचण होत आहे. तेव्हा फार मनाला न लावून घेता आपण लिहित राहावे...!!!
असेच
प्रतिसादांशी सहमत आहे. ही माहिती लेखात आली असती तर नुसत्या ढकलपत्राद्वारे आली यापेक्षा अधिक विश्वासार्ह ठरली असती. प्रश्न विचारण्यात किंवा शंका असण्यामध्ये व्यक्तिगत रोख नक्कीच नव्हता. या कारणास्तव उपक्रम सोडू नये असे वाटते.
दुसरे एक सांगावेसे वाटते. मराठी संकेतस्थळांवर अतिसंवेदनशील राहून चालत नाही. हे स्वानुभवावरून सांगतो आहे. एक तर इथे सर्व प्रकारचे लोक असतात. परत कुणी कुठल्या मूडमध्ये तर कुणी अजून दुसर्या. त्या मानाने उपक्रमावर बर्याच प्रमाणात प्रतिसाद संतुलित असतात. पण सर्व प्रतिसाद, सर्व वेळेस पोलिटिकली करेक्ट आणि संवेदना राखून दिले जातातच असे नाही. पण एखाद्या प्रतिसादावरून जर माझे संतुलन बिघडत असेल तर याचा त्रास मलाच होतो. असो. अनाहूत सल्ला दिल्याबद्दल क्षमस्व.
ताक : उपक्रम व्यवस्थापन, संपादन याच्याशी माझाही संबंध नाही. एक सामान्य सभासद म्हणून हा प्रतिसाद देतो आहे.
----
"This is Linus Torvalds. I announce Linux."
मुळ पत्रातील
भीडेसाहेब तुम्ही दिलेला डेक्कन हेराल्डचा दुवा पहा व मूळपत्रातील भाषा अजुनही वाचली असता, विरोधी सुर उमटणे सहाजीक आहे.
वाद-मतभेद-एकमत होत रहातील पण उपक्रम सोडून जाउ नये ही विनंती तर येथील जवळजवळ सर्वांनी केली आहे. मी देखील करत आहे.
विरोधी सुर का आला, कशामुळे आला हे समजुन घ्या कृपया उपक्रम सोडून जाउ नका. विशेषता तुमची बाजु तुम्हाला बरोबर वाटत आहे तर तुम्ही जाण्याचे काहीच कारण नाही.
सहमत/ असहमत
असहमत. साहजिक ऐवजी शक्य आहे म्हटले असते तर ?
सहमत. उपक्रम सोडणे हा इलाज नाही. आम्ही पण तशीच विनंती विश्वासरावांना करतो.
सहमत.
प्रकाश घाटपांडे
अर्थ
असहमत. साहजिक ऐवजी शक्य आहे म्हटले असते तर ?
प्रकाशकाका , इथे "साहजिक" हे रूप क्रियाविशेषणापासून बनलेले नसून विशेषनामापासून बनलेले आहे हे लक्षात घेतले तर तुमची असहमती नाहीशी होईल :-)
सहमत
इथे "साहजिक" हे रूप क्रियाविशेषणापासून बनलेले नसून विशेषनामापासून बनलेले आहे हे लक्षात घेतले तर तुमची असहमती नाहीशी होईल
ह्ये आमच्या टकुर्यात च आल नवत. यखांदी लघु/ गुरु शंका 'सहज 'वाटली तरी 'सुलभ' नसते. सहज इंटरनॅशनल काढल तर निरसनगृहात जाउन पघु.
प्रकाश घाटपांडे
अस्वस्थ
आपला लेख वजा माहिती वाचून अस्वस्थ वाटले.
या प्रसंगी मनाची झालेली तडफड व घालमेल मी समजू शकतो.
हे आपल्याच का? सगळी कडच्या सरकारांचे धोरण दिसून येते.
अगदी अमेरिकेतही आणि ऑस्ट्रेलियातही याबद्दल ओरडा आरडा सुरु असतो. अनेक प्रकरणे दाबून टाकल्याचेही आरोप होतात, आणि सत्य हाताला लागते असे वाटत नाही.
उपक्रमावर आपल्यामध्ये डीडी नावाचे एक सदस्य आहेत मला आशा आहे की या ते पाठपुरावा करून गोष्टीला 'योग्यप्रकारे' वाचा फोडतील. मी पण माझ्या ओळखींद्वारे प्रयत्न करून पाहतो.
एखादी गोष्ट योग्यरीतीने लोकांपर्यंत पोहोचवणे ही पण एक लढाईच आहे आपण सगळे बरोबर राहूनच लढू या असे वाटते.
या सगळ्या शिवाय, मी व्यक्तिगत रीत्या अजून काय करू शकतो हे पण कळवा.
-निनाद
साहजिकच ???
समज गैरसमज होऊ शकतात एवढे समजण्याइतका सूज्ञ मी नक्कीच आहे. उपक्रमावरील सभासद एकमेकांना ओळखत नाहीत हे मान्य. पण ह्याचा अर्थ "अशी पत्रे शहानिशा न करता पसरवणार्यांना कुठली बरे शिक्षा करावी "असे म्हणण्यापर्यंत मजल जावी हे मुळीच पटणारे नाही. एका मेलचे मी केवळ भाषांतर केले आहे असे मी लिहिले होते. त्यात (अपरिहार्य कारणास्तव मूळ नाव बदलले आहे) केवळ एवढेच एक वाक्य माझे. आता ही बातमी वाचा. विशेष करून बातमीतील शेवटचे वाक्य. का एवढ्या उशीरा ही बातमी आली आहे कोणी सांगू शकेल ? कमांडींग ऑफिसर गिल चे नाव आता मी जाहीर केले आहे. आहे कुणाची हिम्मत त्याला विचारायची की, "तू असे कसे काय म्हणतोस ? ". आणि त्याच्याही ज्या वरिष्ठ अधिकार्यने ए. के. सिंगला जे बजावले ते आता तो कबूल करणार आहे असे वाटते ? तोच काय ज्या ए. के. सिंगला हे सांगण्यात आले तो तरी 'असे मला सांगण्यात आले' असे कबूल करू शकेल काय ? त्यालाही जगायचे आहे ना ? लोकसत्तेच्या बातमीत तर त्याच्या आई वडिलांची नावे आहेत. त्याची मानसिक स्थिती कशी आहे याचेही वर्णन आले आहे. मी फक्त एक बातमी पुढे आणायचा प्रयत्न केला. तेही लेखाद्वारे, चर्चा सदरात नव्हे. पण लगेच 'बाप दाखव नाही तर श्राद्ध कर' ही भूमिका कितपत योग्य आहे ? स्वतःला सत्याचे कैवारी समजणारे आता या सविस्तर माहितीच्या आधारे काय करवाई करतात हे पहायला मीही उत्सुक आहे; आणि याच प्रतिसादांच्या मालिकेत. आणि तसे काही दिसले नाही तर आरोप करणार्या सर्वांची लेखाची चिरफाड करणे वा 'उचलली जीभ, लावली टाळ्याला' यापलीकडे काही उद्देश नव्हता असा मी अर्थ लावला तर त्यात काही चूक नसावी.
मी व्यक्तिगत रीत्या अजून काय करू शकतो हे पण कळवा.
निनाद ज्या ज्येष्ठ अधिकार्याचे, जो ए. के. सिंहला प्रोमोशन् देऊ शकतो, त्याचा अधिकार बहुधा तुमच्या माझ्यासारख्या सिविलियन् लोकांपेक्षा जास्त असण्याची शक्यता दाट आहे. तोही मदत करायची इच्छा असूनही हताश झालेला दिसतो. त्याने माझा मित्र गजानन करंजीकर यास केलेल्या मेल मध्ये त्याचे शेवटचे वाक्य होते Your advice / guidance is this respect is solicited, without harming the offr's relation with his bosses in NSG. आणि हे वाक्य वैयक्तिक असल्यामुळे मी भाषांतरात घालणे मला योग्य वाटले नाही. सारांश असा अधिकारी देखील जेव्हां असे उद्गार काढतो तेथे व्यक्तिगतरीत्या आपण काय करू शकतो हे मी एक सामान्य माणूस काय सांगणार ? या वाक्यात without harming हे शब्द काय सूचित करतात ? ज्या वरिष्ठ अधिकार्याने 'मिडीयाशी काही बोलायचे नाही' अशी तंबी दिली तो कोणालाही make or break करण्याच्या ताकदीचा असला पाहिजे. देशातील मोठमोठे नेते एकाद वेळेस मनमोहनला घाबरत नसतील, पण राज्यव्यवस्थेत काहीही पद नसलेल्या सोनियाला वचकून असतातच ना ? का ? त्याचेही कारण हेच असावे ना ?
अस्वस्थता
आपला प्रतिसाद वाचून असहाय्य वाटते आहे.
-निनाद
बाप दाखव नाहीतर....
योग्य आहे. उपक्रमाची अगदी सुरुवातीपासून तशीच परंपरा आहे. इथे कोणाही चांगल्या लेखकाचे लेख उघडून पाहिले तर लेखाखाली संदर्भ दिलेले आढळतात. ते नसतील तर लेखकाकडे ते द्यावेत म्हणून मागणी केली जाते.
पुन्हा हेच म्हणावेसे वाटते की योग्य संदर्भ असते तर कोणीही सदस्य आपल्या लेखाला अविश्वासार्ह न मानता. आता जशी हळहळ व्यक्त होत आहे तशीच पहिल्या प्रतिसादापासून होती. तरीही, सर्वांनी विषयाशी अंसंबंधीत प्रतिसाद सोडून मूळ चर्चेकडे वळावे.
अशी पत्रे लोकांना रोज येतात. कधी मुलाला कॅन्सर आहे, नोकरी गेली आहे, नवरा मेला आणि बायको एकाकी आहे वगैरे. या पत्र पाठवणार्यांना कोणीही ओळखत नसते. माणूस एकदा हळहळतो आणि नंतर वैतागून असे मेल न वाचता डिलीट करतो. तुम्हाला न ओळखणार्या व्यक्तिचा तुमच्याबद्दलही असा गैरसमज झाला असे मानून सोडून द्यावे असे सांगावेसे वाटले. हा दोष फक्त त्या व्यक्तीचा नसून अशाप्रकारचे इमेल्स रोज वाचल्याने त्याचे गांभीर्य राहत नाही या यंत्रणेचाही आहे.
मी स्वतःला सत्याचे कैवारी वगैरे समजत नाही पण सत्य जाणून घेण्याची इच्छा नक्कीच ठेवते. बाकीच्यांचे त्यांनाच माहित पण आपली वाक्ये सहज यांच्या वरील प्रतिसादातील काही वाक्यांप्रमाणेच अनावश्यक वाटली.
सहमत पण...
>>सर्वांनी विषयाशी अंसंबंधीत प्रतिसाद सोडून मूळ चर्चेकडे वळावे.
सहमत आहे ! पण लेखकाने सदरील लेखन लेख या सदरात टाकले आहे. आणि त्यांच्या प्रतिसादात त्याचाही उल्लेख आला आहे.
सदरील लेखाला छान, आवडले, मस्तच, और भी आने दो, असे म्हणुन जमणार नाही असे वाटते. त्यामुळे लेखकाला काय अपेक्षीत आहे.
चर्चा कशावर करायची आहे. सैन्याला मिळणा-या वागणूकीबद्दल, राजकारणाबद्दल, भ्रष्टाचाराबद्दल, कशावर ? त्याचाही खुलासा झाला पाहिजे असे वाटते.
साहजिकच पण क्षम्य
आपला राग साहजिकच आहे. पण उपक्रमींच्या चिकित्सक वृत्तीतून तो उदभवला असल्याने भिडे साहेब आपण तो क्षम्य मानावा.आपण संदर्भ अगोदरच दिले असते तर कदाचित हे घडल नसत. काही गोष्टी अशा असतात कि ज्याला पुरावाही नाही आणि संदर्भही नाही तरी त्या अस्तित्वात असतात पण अदखलपात्र ठरतात.त्याची शहानिशाच होत नाही.
अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत
स्तंभ तिथे ना कुणि बांधला पेटली ना वात
प्रकाश घाटपांडे
संदर्भ -
साहजिकच पण क्षम्य..
भाषांतराद्वारे मला श्री गिल यांची व्यथा दाखवायची होती, माझ्या शब्दात नव्हे, त्यांच्याच शब्दात. त्यात नाव बदलून राम सिंह हे नाव लिहिले. मिडीयात बातमी नसताना मी ए. के. सिंह चे नाव जाहीर करणे, श्री गिल यांचे नाव जाहीर करणे, तो कमांडो बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आहे हे जाहीर करणे हे शक्य नव्हते. माझा लेख १९/१२ चा. आदल्या दिवशी म्हणजे १८/१२ ला लोकसत्तेत ही बातमी आली. लेख लिहितांना मी ती पाहिली नव्हती. उपक्रमासारख्या साईटस् मधील लेख कोणीही वाचू शकतो. त्याला काही सभासदत्वाची अट नाही. मग हे सर्व संदर्भ देऊन मी ए. के. सिंगचे नाव जाहीर करणे त्याच्यासाठी धोक्याचे होऊ शकेल असे मला वाटले. सहज यांच्या पहिल्या प्रतिसादात त्यांनीही म्हटले आहे - त्याच्यावर पाळत ठेवुन कोणी इतर सदस्यांपर्यंत पोहोचले तर ? - मला परत परत सांगण्यात आले आहे की मी हा लेख वेगळ्या पद्धतीने मांडू शकलो असतो. मान्य. पण तरीही वरील तीन नावे देऊ शकलो नसतोच. का श्री गिल यांनी त्यांच्या जवानांना दिलेल्या सल्ल्यावर आक्षेप होता ?
या लेखाआधी मी एक लेख लिहीत होतो. पूर्ण व्हायचा होता. फाडून टाकला. त्या लेखाचा माझा निष्कर्ष होता - सध्याचे राजकर्ते असेच वागत राहिले तर आपणा सर्वांची पाचवी पिढी मुसलमान असण्याची दाट शक्यता आहे. दचकलात ना ? मग हे वाचा. निवांत वाचावे लागेल. तासभरही लागेल. पण मला वाटते नीट संशोधन केलेला आणि हादरवून टाकणार लेख आहे. पण सगळ्याच मेलस् 'नवरा मेला, नोकरी गेली' टाईपच्या असतात, तसेच काही महाजालावरील लेखांचे व्हायचे. मग मी ठरवले उपदव्याअसांगितला कुणी ? दुसरे जिथे आम्ही जास्त रमतो असेताअमचे उद्योग आहेतच की.
नवा विषय
........ सहमत.
.
पुढील संकेतस्थळावर उपक्रमच्या सदस्यांना कमीतकमी एक महिना चर्चा करायला पुरेल इतके खाद्य उपलब्ध आहे.
http://www.islamdarshan.org/
छे!
छे छे वेताळा! इथले विद्वान सेक्युलर आहेत बाबा!
हिंदुं व्यतिरिक्त कुणीही काहीही केले तरी तरी त्यांना ते सेक्युलरच वाटते. त्यामुळे यात वाद तो कुठे आहे?
ख्रिस्ती किंवा मुस्लिमांना काहीही म्हणू दे, जग घशात घालण्याची भाषा करू दे, हिंदु पॉकेटस् १०० टक्के ख्रिस्ती करण्याचा प्लॅन करू दे. महाराष्ट्रात 'गाव तेथे चर्च' असा अजेंडा १९८० पासून राबवून आज गावागावात दहशत आणि उलथा-पालथ घडवू दे,
काश्मिर हे फक्त मुसलमान क्षेत्र घोषीत करू दे. मालेगावात भिवंडीत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा भींतींवर लिहु देत, मुंबई जाळून टाकु देत.
पण आम्ही फक्त हिंदुंच्याच चुका काढणार - आणि एक दिवस सुंता नाहितर बाप्तिस्मा करून घेणार!
काही मजकूर संपादित. चर्चेशी विसंगत आणि विषयांतर वाटणारे सर्व प्रतिसाद आणि मजकूर अप्रकाशित केले आहेत. परस्परांतील संवादांसाठी कृपया, खरडवही किंवा व्य. नि. चा वापर करावा. - संपादन मंडळ.
आपला
गुंडोपंत
काय वाटते आणि काय खरे ?
परंतु त्यांचे अधिकारी असे कोणत्याही इस्पितळात खितपत पडलेले असावेत असे वाटले नाही.
तुम्हाला काय वाटते आणि वास्तव काय असते ह्याची लोकसत्तेच्या बातमीवरून सांगड कशी घालायची हे आता आपणच ठरवा.
वास्तव
बातमी म्हणते की सदर व्यक्ती बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आहे. आपला लेख तसे काही म्हणत नाही. बॉम्बे हॉस्पिटल हे मुंबईतील प्रथितयश इस्पितळ गणले जाते. यावरून माझ्या म्हणण्याला पुष्टी मि़ळते की जर बातमी खरी असेल तर हा सेनाधिकारी कोणत्याही इस्पितळात नसावा तर एखाद्या चांगल्या ठिकाणी असावा.
मूळ लेख लिहिताना हे संदर्भ आले असते तर असा गदारोळ उठला नसता असे वाटते.
मुद्दा किलेर
मूळ लेख लिहिताना हे संदर्भ आले असते तर असा गदारोळ उठला नसता असे वाटते.
शिंपल् गोठ हाये
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं :)
बाबूराव :)
रागाव नको
साहेब तुमचा लेख वाचून त्या मिल्ट्रीच्या माणसाचे वैट वाटले.
आन दुसरा मुद्दा असा की,लोकालेबी मत असते तव्हा पटलं नाय म्हुन एवढ नाराज नाय् व्हाचं
>>"अशी पत्रे शहानिशा न करता पसरवणार्यांना कुठली बरे शिक्षा करावी "
साहेब अशी लय पत्र येत र्हातात. तव्हा लिव्हलं लोकायनी
त्यात काही खोटं नाय लिव्हलं
>>'उचलली जीभ, लावली टाळ्याला' यापलीकडे काही उद्देश नव्हता असा मी अर्थ लावला तर त्यात काही चूक नसावी.
ह्ये वाक्य काय पटलं नाय बरं का !
तुमाला लिव्हाचं तर लिव्हा नै तर नका लिहु पण उचलली जीभ आन लावली टाळ्याला म्हून उपक्रमी लोकायचा कचरा नका करु भो.
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं :)
बाबूराव :)