एक क्षुल्लक गोष्ट

दिनांक ८ डिसेंबरपासून १३ डिसेंबरपर्यंत भारत सरकार, आपण लोकांसाठी काय केले याची दूरदर्शनच्या "झी मराठी" वाहिनीवर जाहिरात करीत होते. त्यांत "७१००० अब्ज रुपयांपर्यंत कृषिकर्ज माफ" असे म्हंटले होते. माझ्या माहितीप्रमाणे कृषिकर्जमाफीसाठी केंद्र सरकारने केलेली तरतूद सुमारे ७०००० कोटी रुपये आहे. असे असतांना ७१००० अब्ज (म्हणजे ७१००००० कोटी) रुपयांची कर्जमाफी कशी होऊ शकेल? याचा अर्थ ज्यांनी जाहिरातीचा मसुदा तयार केला त्यांना व ज्यांनी तो मंजूर करून दूरदर्शनवर पाठवला त्यांना अब्ज व कोटी यांच्यातला फरक एकतर माहीत नाही किंवा लक्षांत आला नाही.

या संदर्भात पु. ल. देशपांडे यांची "म्हैस" ही गोष्ट आठवते. त्यांत एका म्हशीला एस् टी चा धक्का लागतो नी पोलीस त्याचा पंचनामा कसा करतात याचे वर्णन केले आहे. पंचनाम्यात काही मजकूर का असतो ते त्या बसमधून प्रवास करणार्‍या पु. ल. ना कळत नाही. उदाहरणार्थ, "म्हशीचे एक शिंग दुसर्‍या शिंगापेक्षा सव्वादोन इंच ज्यास्त लांब होते." लेखकाने पुढे म्हंटले आहे की पंचनामा लिहिणार्‍या शिपायाने ते "सव्वादोन यार्ड ज्यास्त लांब होते" असे लिहिले होते.

"म्हैस"च्या काळांतील शिक्षणाचे प्रमाण व त्या काळी पोलीस शिपायाला लागणारी किमान शैक्षणिक पात्रता लक्षांत घेता पंचनामा लिहिणार्‍याचे इंच व यार्ड यांच्यांतील फरकाविषयीचे अज्ञान समजण्यासारखे आहे व ही गोष्ट एक विनोद म्हणून हसून सोडून देण्यासारखी आहे.

पण अलीकडच्या काळांतील भारत सरकारच्या प्रसिद्धि खात्यांतील अधिकार्‍यांना "कोटी" व "अब्ज" यांतील फरक लक्षांत येऊ नये याला काय म्हणावे?

Comments

सहमत आहे.

पूर्वी भाषा आणि लेखन याचा पीळ असे तो बहुधा उरला नसावा.

अजुन एक

महाराष्ट्र राज्य वितरण मंडळ,
चक्क म.रा.वि. म. च त्रिभाजन च्या वेळी जाहिरातीत डिस्ट्रिबुशन ला हा कंपनी च्या नावाला पर्याय निश्चित होता. आता आरे धान्य वितरण कि राकेल वितरण ? असा प्रश्न आला. मग कंपनी नावात बदल करायला प्रोसिजर करावी लागली होती. मग विद्युत वितरण असा शब्द आला.
प्रकाश घाटपांडे

कोटीपेक्षा मोठे आकडे

मला नीट लक्षात राहात नाहीत. :-(

उपक्रमावर ते शब्द अनेकांनी वेळोवेळी दिलेले आहेत. १०० कोटी=अब्ज, १०० अब्ज = ? हे इतपत लक्षात राहिले तरी पुरे... हिंदीमधले "१ अरब" आणि "१ खरब" म्हणजे किती? अरब=अब्ज, खरब=खर्व असे आहे काय?

खरे तर मला १०चा घात असे समजायला जास्त सोपे जाते - २ क्विंटिलियन पेक्षा २*१०^१८ - पण वर्तमानपत्राच्या बहुतेक वाचकांना माझी सोय गैरसोयीची होईल असे वाटते.

पेटी-खोका

अहो कोटी अब्ज हे मोठे गुंतागुंतीचे आहे.
हल्ली पेटी, खोका अश्या पद्धतीमध्ये अर्थिक देवाण-घेवाणीचे व्यवहार चालतात असे चित्रपटांतून लक्षात येते. त्यामुळे १७शे खोका वगैरे सोपे वाक्प्रयोग सरकारी भाषेत 'टेबलावरती' आले नसावेत.

अजून काही काळाने तसे झाले तर? आम्ही अपघातातील जखमींना प्रत्येकी ५ पेटी देत आहोत असे ऐकू येईल ;)
-- लिखाळ.

किंवा

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज (दुष्काळ/पूर/दंगल) ग्रस्तांसाठी पाच खोक्यांची मदत जाहीर केली. :)

----
"This is Linus Torvalds. I announce Linux."
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

 
^ वर