कधी जागे होणार?

मटामधील या बातमीनुसार मुख्यमंत्र्यांनी कुणालाही संपर्क करता यावा यासाठी आपला रिडिफमेल विरोप पत्ता दिला आहे. महाराष्ट्र राज्याच्या संकेतस्थळावर अजूनही विलासरावजीच मुख्यमंत्री म्हणून विराजमान आहेत.
जग इकडचे तिकडे झाले तरी चालेल, आम्ही जागे होणार नाहीत असा बहुधा आपला मूलमंत्र असावा. किंवा अजूनही शिवशाहीप्रमाणे खलिते पाठवून दोन महिने वाट बघावी असा त्यांचा समज असावा. अधिक काय लिहीणे?

लेखनविषय: दुवे:

Comments

कायम

आश्चर्य वाटत आले आहे - एवढे संगणक अभियंते असताना नेहमी संकेतस्थळांवर जुनी माहितीच कशी सापडते? बहुदा कोण मंत्री येणार यावर सगळे अवलंबून असावे. मंत्री बदलले की संकेतस्थळांचे कामकाज चालवणारे खात्यातील निम्नस्तरीय अधिकारी/अभियंते बदलतात का?

आदेश

अहो सरकारी आदेशांशिवाय काम कसे होईल. संबंधीत लोकांना माहिती बदलण्याचे आदेश द्यायला मंत्री महोदय अजुन कार्यालयात यायचे असतील ना?

काँग्रेसची वेबसाईट!

जर कॉग्रेसपक्ष अजूनहि २००४च्या विजयामधेच रममाण आहे तर हा पालटतर अगदी आत्ता आत्ता झाला आहे.. एवढ्यात कुठे बदल?

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

कॉंग्रेस

आताच आलेले तीन राज्यांच्या विधानसभांचे निकाल पाहिले तर २००९ मध्येही तोच मजकूर कॉंग्रेसला वापरता येईल असे वाटते.

आपला,
(कॉंग्रेजी) आजानुकर्ण केतकर


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

साल?

हं म्हणजे सालहि तेच (२००४) ठेवावं लागेल तर

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

रालोआ

२००२ का ०३ साली मध्यावर्ती निवडणूकांच्या आधी जेंव्हा रालोआ पक्षांना एकत्रीत विजय विधानसभांमधे मिळाले, तेंव्हा त्यांना देखील असाच आत्मविश्वास आला होता. पण "शायनींग" नंतर कुणाचे झाले ते माहीत आहेच :-)

तरी महाराष्ट्र काँग्रेसच्या दृष्टीने एक गोष्ट बरी झालेली दिसते, ती म्हणजे नारायण राणे आत्ताच गेले, ते जर अजून सहा महीने गुमान बसून नंतर नवीन मंत्रीमंडळाचा नाकर्तेपणा सिद्ध करून आवाज करू लागले असते तर नाके नउ आले असते...

हा हा हा!

हा हा हा!
ही माहिती इथे ठेवून भारतातले कोण लोक पाहतील असे वाटते?

आणि पहायला विज तर हवी ना?
इथे प्यायला पाण्याचा पत्ता नाही.

इमेल पत्ता दिला हे नशीब समजा!

आपला - जमिनीवर असलेला
गुंडोपंत

अजून एक

मुख्यमंत्र्यांचे जाऊंदेत... ते अजून तसेही पडद्यामागे विलासरावच आहेत...

पण म.टा. मधील ही बातमी वाचा. थोडक्यात अशी:

डोंबिवलीतील मुलीचा एक कॉलेजातील खलील खान नामक मित्राने १९ सप्टेंबरला तीला एसएमएस करून सांगितले की तो आता जिहादी होण्यासाठी म्हणून सर्व काही सोडून् चालला आहे. नंतर १८ नोव्हेंबरला त्याने एसएमएस करून कळवले की, Do not travel by train for next few days- 'your care taker'.

त्या मुलीने ताबडतोब पोलींसांना कळवले पण पोरखेळ म्हणत पोलीसांनी दुर्लक्ष केले आणि आता या खलीलला शोधत हिंडत आहेत. गुन्हा रोखण्यासाठी म्हणून नाही तर पंचनामा करण्यासाठी, गुन्हा होऊन गेल्यावर...

सरकारी उत्त्तर

माहिती अपडेट करायचे सोडा. महाराष्ट्र सरकारचे संकेतस्थळच लोड व्हायला खूप वेळ लागतोय. अनेकदा तर् ते संकेतस्थळ येतच नाही. ही सर्व्हरची समस्या आहे, असे राज्य सरकारच्या माहिती खात्यात काम करणार्‍या माझ्या एका मित्राने सांगितले. सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान खात्याच्या अधिकार्‍यांना विचारले तर त्यांनी आधी असं काही होत असल्याचंच नाकारलं. त्यांना स्वतःला ही संकेतस्थळे उघडायला सांगितले, तेव्हा कुठे त्यांना ही समस्या अस्तित्वात असल्याचे कळाले. मग त्यांनी खरोखर सर्व्हर आणि बँडविड्थची समस्या असल्याचे मान्य केले. कहर म्हणजे राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे संकेतस्थळ उघडतच नाही, उघडले तर त्यावरची लिपीही दिसत नाही आणि या संकेतस्थळावर इंग्रजीचा पर्याय दिलेला असला तरी ती लिंक वापरात नाही.

माहिती अपडेट करण्याबद्दल म्हणाल, तर या लोकांना म्हणे सरकारकडून काल सूचना मिळाली. मंत्र्यांच्या माहितीत काही गडबड व्हायला नको, म्हणून अधिकृत माहिती येईपर्यंत यांनी काहीही केले नाही. टीसीएसच्या एका तंत्रज्ञाला घेऊन रात्री उशिरापर्यंत त्यांचे काम चालू होते व म्हणून आज ही माहिती अपडेट झाली, असा हा मामला आहे.

 
^ वर