संस्कृतभारतीद्वारा सरलसंस्कृत सम्भाषणवर्ग

सोमवार, दि. ८-१२-२००८ ते मंगळवार, दि. १६-१२-२००८ पर्यंत सरस्वती भुवन, १ ला मजला, गणेश पेठ गल्ली, प्लाझा चित्रपटगृहासमोर, दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८ येथे नि:शुल्क संस्कृत सम्भाषण वर्ग होईल.

वेळ - सायंकाळी ६.३० ते ८.०० पर्यंत.

अधिक माहितीसाठी संपर्क - श्री. प्रतीक रुमडे,
दूरध्वनि क्रमांक - २४३८४७२९, ९७७९९०३३१२.

लेखनविषय: दुवे:

Comments

विसंगत

मल वाटते असे लेख उपक्रमाच्या उद्दिष्टात बसत नाहीत. उद्यापासून सर्व जणांनी त्यांचे कट्टे कधी कुठे भरणार आहे याची माहिती उपक्रमावर द्यायला सुरुवात केली तर् हे एक जाहीरातस्थळ बनून राहील.

अवांतरः सदरहू कार्यक्रम मराठीत होणार नसून संस्कृतमध्ये होणार आहे असे दिसते.

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

नि:शुल्क

नि:शुल्क शब्द वापरल्यास सकाळसारख्या दैनिकात निवेदन / प्रासंगिक अशा सदरात तो येतो. शुल्क असल्यास मात्र जाहिरातीचे निकष लागु होतात अशी वर्तमानपत्रांच्या व्यवस्थापनाची धारणा आहे.
प्रकाश घाटपांडे

हम्म

आस्सं आस्सं..

चालुद्या मग.

अभिजितआबा यादव-पाटील...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

नि:शुल्क कार्यक्रम

मराठी असे आमुची मायबोली
***********************************
श्री. अभिजित यांच्या मताशी मी सहमत आहे. असे फुकट कार्यक्रम खूप असतात. त्यांची जाहीरात या संस्थळावर करणे अनुचित आहे.
"आस्स आस्सं" म्हणत अभिजित पाटलांनी माघार का घेतली कळत नाही.

उपक्रम्

उपक्रमाचे उद्दीष्ट माहीतीपुर्ण लेख असा आहे. वरील लेखात माहीती आहेच व ती मराठीत दिलेली आहे. त्यामुळे उपक्रमाच्या उद्दीष्टात बसतोय असेच वाटते. बाकी उपक्रम पंत ठरवतीलच.

- राजस.

सहमत

राजसाशी सहमत आहे.
एकुण माहिती चांगली आहे. मला शक्य असते तर मी नक्की गेलो असतो.
आपला
गुंडोपंत

अजुन एक

सोमवार, दि. ६-०४-२००९ ते मंगळवार, दि. १४-०४-२००९ पर्यंत कर्णाटक संघ मित्र मंडळ, कर्णाटक संघ सभागृह, श्री. कटारीया मार्ग, रेल्वे स्थानकाजवळ, माटुंगा पश्चिम, मुंबई - ४०० ०१६ येथे नि:शुल्क संस्कृत सम्भाषण वर्ग होईल.

वेळ - सायंकाळी ७ ते रात्रौ ९ पर्यंत.

चालक - डॉ. चैतन्य गुलवडी.
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

ग्रँट रोड येथे

दि. १५-०४-२००९ ते दि. २५-०४-२००९ पर्यंत बालकवृंद शिक्षण संस्थेचे इंग्रजी विद्यालय, नवी चिखलवाडी, स्लेटर मार्ग, ग्रँट रोड, मुंबई - ४०० ००७ येथे नि:शुल्क संस्कृत सम्भाषण वर्ग होईल.

वेळ - सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत.

संपर्क - सौ. स्मिता माविनकुर्वे - दू. क्र. २३८१ ३१ ०५.
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

दादर येथे

बुधवार, दि. १५-४-२००९ ते शुक्रवार, दि. २४-४-२००९ पर्यंत जादुगार सौ. उज्ज्वला पवार यांच्या घरी ६, मंदार, द.स. बाबरेकर मार्ग, फुले कन्याशाळेसमोर, दादर, मुंबई - ४०००२८ येथे नि:शुल्क संस्कृत सम्भाषण वर्ग होईल.

वेळ - सकाळी ८.३० ते १०.०० पर्यंत.

अधिक माहितीसाठी संपर्क - श्री. प्रतीक रुमडे,
दूरध्वनि क्रमांक - २४३८४७२९.

वि.सू. : संस्कृत पूर्वज्ञानाची अपेक्षा नाही आणि वयोमर्यादा नाही.
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

 
^ वर