धर्म, दहशतवाद आणि प्रांतवाद

१) दहशत वाद्यांनाधार्मिक चेहरा नसतो?
"दहशतवाद्यांना धार्मिक चेहरा नसतो" हे आपल्याकडील काही विचारवंतांचे आवडते वाक्य आहे. त्यांतून दहशतवादी केवळ मुस्लिमच नाही तर हिंदूही असतात असे त्यांना ध्वनित करायचे असते. मुस्लिम दहशतवाद्यांच्या कारवाया सातत्याने व नियोजनपूर्वक असतात व हिंदूंचा कधीतरी होणारा उद्रेक प्रतिक्रियात्मक असतो हा फरक त्यांच्या दृष्टीने महत्वाचा नसतो. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात २८ नोव्हेंबरच्या टाइम्स् ऑफ् इंडियाच्या चौथ्या पानावर TOI Team चा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्याचे शीर्षक आहे They let them go as they were Muslims . त्यांत असे म्हंटले आहे की दहशतवाद्यांनी एका तुर्की जोडप्याला व तीन विदेशी महिलांना ओलीस ठेवले व सर्वांना एका खोलीत बंद करून आपल्यातल्या एका मशीनगनधारीला रात्रभर त्यांच्यावर पहार्‍यासाठी ठेवले. सर्व ओलीसांना आपापला धर्म काय ते विचारण्यात आले. तुर्की जोडप्याने आपण मुस्लिम असल्याचे सांगितल्यावर त्यांना 'तुम्हाला काही इजा पोचणार नाही' असे सांगण्यात आले. उरलेल्या तीन कॉकेशियन महिलांना दुसर्‍या दिवशी वेगळे काढण्यात आले व नंतर त्यांना ठार मारण्यात आल्याचे दहशतवाद्यांनी त्या जोडप्याला सांगितले. त्या जोडप्याला त्याच्या तुर्की मित्राला फोन करायची परवानगीही दहशतवाद्यांनी दिली.
आता सांगा दहशतवाद्यांना धार्मिक चेहरा नसतो हे कोणतेही तारतम्य न बाळगता काढलेले वरवरचे अनुमान नाही का?

२) टाइम्स् ऑफ् इंडियाची प्रांतवादाला फूस
शनिवार दिनांक २९ नोव्हेंबरच्या टाइम्स् च्या अंकांत पहिल्याच पानावर Mumbai's famed spirit bruised या शीर्षकाची बातमी आहे. त्या अंतर्गत चौकटीत SMSes lampoon Raj and MNS stand या शीर्षकाखाली जो मजकूर आहे त्यात असे म्हंटले आहे की राजकारण्यांच्या दहशतवाद संदर्भात अनेक एसेमेस् राज्यभर पाठवले गेले. त्यांत "आता राज ठाकरे व त्याची शूर सेना कुठे आहे? त्याला सांगा की दिल्लीहून आलेले सर्व २०० एन् एस् जी कमांडोज् (ज्यात एकही मराठी माणूस नव्हता) दक्षिण व उत्तर भारतीय होते, ज्यामुळे राज ठाकरे रात्री स्वस्थ झोपू शकला इ. इ." मजकूर असलेला एक एसेमेस् होता. मूळ एसेमेस् पाठवणारा अर्थातच या कारवाईत मारले गेलेले पोलीस ऑफिसर्स् व शिपाई मराठी माणसे होती, त्यांच्याकडे कमांडोंइतकी शस्त्रास्त्रे नव्हती की त्यांना हेलिकॉप्टरमधून उतरवण्यांत आले नव्हते या गोष्टी सोयीस्करपणे विसरत होता. पण टाइम्स् ऑफ् इंडियाला सर्व परिस्थिति माहिती असतांनाही त्यांनी या एसेमेस् ला outstanding म्हणून प्रमाणपत्र देऊन त्याला पहिल्या पानावर प्रसिद्धि द्यावी हे आश्चर्यजनक आहे. कदाचित ते त्यांच्या मराठीद्वेष्ट्या धोरणाशी सुसंगत असावे अशा अर्थाचा मजकूर असलेले पत्र मी त्यांना त्याच दिवशी पाठवले आहे. छापून येण्याची शक्यता फारच कमी असल्याने हे इथे लिहीत आहे.

आजच्या महाराष्ट्र टाइम्स् ने उपरोल्लेखित एसेमेस् ची दखल घेऊन त्यावर राज ठाकरे यांचे म्हणणे काय ते छापले आहे. मात्र ते खोडसाळ मजकूर छापणार्‍या इंग्रजी टाइम्स् प्रमाणे पहिल्या पानावर न छापता आत नवव्या पानावर छापले आहे.

डोक्याला फार ताप होत असेल तर 'जाऊ द्या झालं!'

लेखनविषय: दुवे:

Comments

दहशतवाद्यांचा चेहरा

"दहशतवाद्यांना धार्मिक चेहरा नसतो" हे आपल्याकडील काही विचारवंतांचे आवडते वाक्य आहे. त्यांतून दहशतवादी केवळ मुस्लिमच नाही तर हिंदूही असतात असे त्यांना ध्वनित करायचे असते.

सहमत आहे ! एकाच धर्माच्या लोकांबद्दल तसे बोलले जाऊ नये म्हणून दहशतवाद्यांना धार्मिक चेहरा नसतो असे म्हटल्या जाते याच्याशी शंभर टक्के सहमत आहे. यालाच दुस-या भाषेत बुद्धीवाद्यांची हुशारी असे म्हणतात.

तसे जर म्हटले तर अल्पसंख्या़क म्हणून त्यांच्या सर्व सवलती बंद केल्या पाहिजेत. सच्चर आयोग बियोग गुंडाळून ठेवला पाहिजे. शिक्षणातल्या सर्व सोयी-सवलती काढून त्यांना दुय्यम नागरिकत्व दिले पाहिजे असे वाटते. भरल्या पोटाने माणसाला खूप उद्योग सुचतात, ज्यांच्या सहकार्याने दहशतवादी लपाछपीचा खेळ खेळतात त्यांच्या नाड्या आवळल्या की ते ओळंब्यात येतील...त्यांना वळणावर आणायला काय वेळ लागतो हो, फक्त इच्छा शक्ती असली पाहिजे.

हा एक डाव असु शकतो

१) तुम्ही म्हणता तशी मुसलमान ओलीसांना इजा न होणे ही सत्यघटना असली तरि हा एक डाव, कट् आहे असे देखील असु शकते ना? दहशतवाद्यांनी हे जाणुनबुजून् केले असेल की जेणे करुन सर्व मुसलमान हे अतिरेकी यांच्या बाजुचेच असा अन्य धर्मीयांचा समज होउन सरळसरळ फूट पडेल? नक्की असे अनेक मुसलमान् आहेत ज्यांनी या दहशतवाद्यांचा धिक्कार केला आहे.

तसेच "इस्लामी दहशतवादी" ही एक नाकारता न येणारी वस्तुस्थीति आहे हे नमुद करु इच्छीतो.

२) टाइम्सने असल्या एसेमेस् ला outstanding म्हणून प्रमाणपत्र दिल्याबद्दल निषेध.

मराठी कमांडो

त्या एन्एसस्‌जींच्या कमांडोत कमीतकमी एक मराठी होता. त्याचे आडनाव खरे. त्याची कालच दूरदर्शनच्या एका वाहिनीवर मुलाखत झाली. यावरूनही टाइम्स किती खोट्या बातम्या पसरवते ते स्पष्ट होईल. राज ठाकरेंच्या प्रकरणात त्यांचा असाच दूषित दृष्टिकोण होता. --वाचक्‍नवी

मनसेवाले कुठे होते

ह्या अशा प्रसंगीही हे प्रश्न सुचावेत हे दुर्दैवाचे लक्षण आहे. मनसेवाले कुठे होते असे विचारणाऱ्यांनी अबू आझमी/शरद यादव/लालू यादव/पासवान/मायावती/नीतीशकुमार कुठे होते हेही विचारावे.

माझा एक मित्र कोथरूडमध्ये मनसेचा कार्यकर्ता आहे. पुण्यामध्ये सर्वप्रथम रक्तदान शिबीरे आयोजित करून १००० पेक्षा अधिक बाटल्या त्यांच्या शाखेने गोळा केले आणि मुंबईला पाठवले.

अशीच कामे मनसेच्या इतर शाखांनीही केली आहेत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

डोकेदुखी.

सध्याच्या वाहिन्या आणि प्रगत तंत्रज्ञान ही वेगळीच डोकेदुखी झाली आहे. राष्ट्रावरचे संकट समझुन न घेता असा मुर्खपणाचा प्रचार आणि प्रसार कसा होतो हेच आश्चर्य आहे.

आपण दिलेला प्रतिसाद उत्तमच आहे.

मनसे, शरद पवार किंवा अन्य यांच्या सम्दर्भात असे म्हणायला हवे की आम्ही १००+५ आहोत.

मनसेचा / शिवसेनाचा काहीसा आक्रस्ताळी प्रचार / धोरण असले तरी ते अशा अडचणीत अगोदर धावुन जातील् अशी त्यांच्या विरोधकांनाही खात्री असते.

आपल्यासारख्यांची शक्ति मात्र यात वाया जाते असे वाटते.

सहमत आहे पण..

ह्या अशा प्रसंगीही हे प्रश्न सुचावेत हे दुर्दैवाचे लक्षण आहे. मनसेवाले कुठे होते असे विचारणाऱ्यांनी अबू आझमी/शरद यादव/लालू यादव/पासवान/मायावती/नीतीशकुमार कुठे होते हेही विचारावे.

सहमत आहे. पण शर्मिला ठाकरेंनी श्री बच्चन ह्यांना एसेमेस करुन मुद्दाम सगळे शहीद झालेले पोलिस मराठी होते हे सांगणे देखिल तितकेच दुर्दैवाचेच लक्षण आहे.

हतबुद्ध - ८

मध्ये हे लिहीणार होतो पण थांबलो.

----

निष्कारण प्रांतवाद !!

Public Memory is too Short !! असे म्हणतात ते अगदी खरे आहे. अशा प्रसंगी एकत्र येऊन पावले ऊचलायची गरज असताना उथळ वृत्तपत्रे निष्कारण प्रांतवाद पसरवत आहेत. प्रसंगाला दोन दिवस पण झाले नाहीत तोवर आपण आपल्या मूळ रंगावर येतोय याची या वृत्तपत्राला जाणीव नाही काय? अतिरेक्यांविरुदध लढताना कमांडोज नी कधी विचार ही केला नसेल की माझा लढणारा सहकारी कुठल्या प्रांताचा वा जातीचा वा धर्माचा आहे, त्यांना फक्त एवढेच माहीती असतेकी ते भारतीय आहेत. आपण मात्र नाही त्य विषयावर चर्चा करून तोंडाची वाफ वाया घालवतो.

सर्व शहीदांना शतशः प्रणाम !!

 
^ वर