संताप

एनडीटीव्हीवर श्री करकरे यांच्या अंत्यसंस्काराचे दृश्य पाहून परत संताप झाला. एनडीटीव्हीला ही मेल लिहीली पण त्याचा काही उपयोग होईल असे वाटत नाही. ते मेल बघत असतील असे वाटत नाही. भारतात असणार्‍यांनी कृपया एनडीटीव्हीला फोन करता आला तर पहावे. ही घटना लाजिरवाणी आहे.

Dear Sir,
We are grateful to you for bringing us the live coverage of the events in Mumbai.
However, i urge you to have some sensibility in covering the events.
WE DO NOT WANT TO SEE THE CHITA OF SHRI KARAKARE BURNING IN THE BACKGROUND
WHILE YOUR ANCHOR RAMBLES ON INCESSENTLY. Please, please have some sensibility
in coverning such tragic events.

-----------------------------------------------------------------------------------------------

मैं हूँ उनके साथ,खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़

कभी नही जो तज सकते हैं, अपना न्यायोचित अधिकार
कभी नही जो सह सकते हैं, शीश नवाकर अत्याचार
एक अकेले हों, या उनके साथ खड़ी हो भारी भीड़
मैं हूँ उनके साथ, खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़

निर्भय होकर घोषित करते, जो अपने उदगार विचार
जिनकी जिह्वा पर होता है, उनके अंतर का अंगार
नहीं जिन्हें, चुप कर सकती है, आतताइयों की शमशीर
मैं हूँ उनके साथ, खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़

नहीं झुका करते जो दुनिया से करने को समझौता
ऊँचे से ऊँचे सपनो को देते रहते जो न्योता
दूर देखती जिनकी पैनी आँख, भविष्यत का तम चीर
मैं हूँ उनके साथ, खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़

जो अपने कन्धों से पर्वत से बढ़ टक्कर लेते हैं
पथ की बाधाओं को जिनके पाँव चुनौती देते हैं
जिनको बाँध नही सकती है लोहे की बेड़ी जंजीर
मैं हूँ उनके साथ, खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़

जो चलते हैं अपने छप्पर के ऊपर लूका धर कर
हर जीत का सौदा करते जो प्राणों की बाजी पर
कूद उदधि में नही पलट कर जो फिर ताका करते तीर
मैं हूँ उनके साथ, खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़

जिनको यह अवकाश नही है, देखें कब तारे अनुकूल
जिनको यह परवाह नहीं है कब तक भद्रा, कब दिक्शूल
जिनके हाथों की चाबुक से चलती हें उनकी तकदीर
मैं हूँ उनके साथ, खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़

तुम हो कौन, कहो जो मुझसे सही ग़लत पथ लो तो जान
सोच सोच कर, पूछ पूछ कर बोलो, कब चलता तूफ़ान
सत्पथ वह है, जिसपर अपनी छाती ताने जाते वीर
मैं हूँ उनके साथ, खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़

Comments

सहमत

एकवेळ वाटले की छायाचित्रण चालु ठेवा पण निदान बकबक बंद करा. खर तर नुस्ती बातमी देणे पुरेसे होते, हे सगळे छायाचित्रण दाखवण्याची गरज नव्हती.

सगळ्याच वाहिन्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.

या

बाबतीत पाश्चात्य वाहिन्या थोडा समंजसपणा दाखवतात. प्रेतांची चित्रे वगैरे दाखवत नाहीत.

----

सहमत

सकाळी/दुपारी लाईव चित्रण सीएनेन् आयबीएन्वर पाहत होतो.. तिथे अंत्यसंस्काराच्यावेळी (फक्त काहि मिनिटेच्) बडबड बंद होती.. तरी आज त्यांची इतर चॅनलपेक्षा संयत पत्रकारीता वाटली

वरील कविता अमिताभच्या आवाजात इथे ऐकता येईल

बाकी. एन्डीटीव्हीच्या वॉईसमेल वर ही भावना आताच पोहोचवली आहे.. तिथे प्रत्यक्ष बोलायला कोणीही नव्हते

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

धन्यु

दुव्याबद्दल धन्यू. ही कविता अमिताभच्या आवाजात ऐकल्यावर थोडा वेळ तरी बरे वाटते.

मेलबद्दलही धन्यू. बर्‍याच मेलचा मारा केला तर त्यांना जाग येण्याची शक्यता आहे असे वाटते.

----

संताप कोणा कोणावर?

१. एक माणूस त्याचा हात जखमी झाला म्हणून कळवळत आणि वेड्यासारखा (घाबरून, दु:खाने, गोंधळून) धावत होता, त्याच्यामागे मागे चित्रणासाठी धावणार्‍या कॅमेरामॅनबद्दल?

२. शहिदांचे फोटो लगोलग छापून त्याची भलीमोठ्ठी पोस्टरे बनवून रस्त्यांवर होर्डींग्ज लावून त्याखाली आमदार/ खासदारांची नावे लावून जाहीराती करणार्‍यांवर?

३. सर्व अतिरेकी पाकिस्तानी आहेत हे कळल्यावरही पाकिस्तानची भलावण करणार्‍या पाश्चात्त्य मिडियावर?

४. संपूर्ण कश्मिर भारताचा भाग नाही हे दाखवणार्‍या सीएनएनसारख्या वाहिन्यांवर. ... भारताचा शिरच्छेद झाल्यासारखे वाटले.

५. आपल्या गुबगुबीत खुर्च्यांत बुडं रोवून अतिरेक्यांना शूर म्हणणार्‍या आपल्याच भारतीयांवर?

सहमत

आहे. यादी बरीच मोठी आहे. म्हणूनच चर्चाप्रस्तावात 'परत संताप झाला' असे म्हटले आहे.
आभाळ फाटले आहे, कुठे कुठे ठिगळ लावणार?

----

उठवळ वाहिन्या

कसलेही तारतम्य आणि प्रसंगाचे गांभीर्य नसलेल्या सर्व वाहिन्या ताबडतोब बंद करून टाकाव्यात. या वाहिन्यांमुळे प्रत्येक लहानसहान गोष्टींमध्ये राईचा पर्वत होत आहे. यांच्या थेट प्रक्षेपणामुळे अतिरेक्यांच्या हल्ल्यांच्या कितीतरी पट दहशत निर्माण होत आहे. सामान्य जीवन जगणे अवघड होत आहे. काल अनेक वाहिन्यांनी न झालेल्या गोळीबाराची माहिती देऊन पुन्हा दहशत पसरवली होती. एक महाशय ताज हॉटेलसमोर झोपून वृत्तांकन करत होते. राष्ट्रीय सुरक्षा दलाचे किती जवान दिल्लीहून निघाले, त्यांच्याकडे कोणती संरक्षक साधने आहेत, सैन्य कशी फिल्डींग लावत आहे हे प्रेक्षकांना दाखवण्याची काय गरज आहे हे बिलकुल समजण्यासारखे नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

एनडीटीव्ही इमेल पत्ता

एनडीटीव्हीचा विरोप पत्ता feedback@ndtv.com आहे. चर्चा वाचणार्‍या प्रत्येकाने वरील मजकूर कॉपी-पेश्ट करून ह्या पत्त्यावर पाठवला तरी बरेच विरोप जातील. (आत्ताच ८५ वाचने झाली आहेत.)
इंटरनेटवर अजूनही वरील दृश्य दाखवीत आहेत.

----

पाठवली

इमेल पाठवली आहे.

धन्यू

इमेल पाठवल्याबद्दल धन्यू.

----

सलाम!!

जेव्हा भयनाट्याला सुरूवात झाली, भारतीय-पाश्चिमात्त्य वाहिन्या जेव्हा विश्लेषण वगैरे न करता फक्त प्रसंगांचे चित्रण दाखवत होत्या, लोक घरच्यांच्या काळजीत होते, एकमेकांना संपर्क करण्याच्या प्रयत्नांत होते, आपल्यापैकीच अनेकांचे बळी जात होते तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी अजिबात वेळ न दवडता, राजकारणी, पोलीस, जनता वगैरेंवर रसभरित पानं भरून वांझोट्या चर्चा सुरू करणार्‍या, लेख लिहिणार्‍या, कविता पाडणार्‍या सर्वांना सलाम.

मुंबईकर घाबरून, कळवळून होणारा प्रकार पाहत असता, चिंता करत असता "मुंबईकरांच्या स्पिरिट"ची आवर्जून आठवण काढणार्‍या सर्व बिगर मुंबईकरांना लक्षावधी सलाम.

अतिरेकी भ्याड नाहीत तर शूर आहेत, नियोजनबद्ध हल्ले करणारे आहेत, निधड्या छातीचे आहेत वगैरेसारखे प्रतिसाद लिहिताना करकरे, कामटे, साळस्कर, उन्नीकृष्णन यांची आठवणही न झालेल्या प्रत्येक देशभक्ताला माझा सलाम!

आपले सैन्य समोरासमोर युद्ध करू शकते, त्यांना अद्यापही शूर म्हणावे लागेल यावर विश्वास न ठेवणार्‍या सर्वांना माझे लक्ष लक्ष सलाम!

अशा थोर विचारांच्या लोकांमध्येच माझा जन्म झाला याचा मला आज अतिशय खेद होतो आहे.

सैन्य

या निषेधार्ह हल्ल्यानंतर होणारा उद्वेग समजण्यासारखा आहे.

अतिरेक्यांना जे करायचे होते ते त्यांनी केलेच आहे. आपण त्यांना भ्याड म्हणू वा शूर त्याने त्यांना काही फरक पडत नाही. गेले कित्येक तास जवळपास प्रत्येक भारतीयाच्या मनोधैर्यावर झालेला जबरदस्त परिणाम पाहता त्यांना भ्याड म्हणून आपण आपलेच समाधान करून घेत आहोत. जे केले यापेक्षा या अतिरेक्यांना काही वेगळे हवे होते असे वाटत नाही हे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते.

आपले सैन्य शूर आहे यात काहीच वाद नाही. मात्र आपल्या देशाच्या विविध सुरक्षा यंत्रणांचे हे सामायिक अपयशच आहे. गुप्तहेर यंत्रणा, तटरक्षक दल वगैरे कोणालाही याचा सुगावा लागू नये हे कशाचे द्योतक आहे? आपली सुरक्षा यंत्रणा किती पोखरली गेली आहे याचे अजून किती पुरावे हवे आहेत. असे प्रश्न कोणाच्याही मनात उभे राहणारच. एका मोठ्या देशाच्या सैन्याला ४८ तास झुंजत ठेवण्याचे काम करू शकणारा हा हल्ला नियोजनबद्ध नव्हता असे आपण म्हणूच शकत नाही. किंबहुना लष्कर ए तोयबा किंवा इंडियन मुजाहिदीनपेक्षाही खूप मोठ्या संघटना आणि पाकिस्तानसारखे शेजारी यांनी मोठ्या चलाखीने हे काम केले आहे.

करकरे, कामठे, साळसकर, उन्नीकृष्णन यांच्यासोबत हुतात्मा झालेल्या अनेक पोलीस शिपायांची आणि ह्या दुर्दैवी हल्ल्यांत मृत्युमुखी पडलेल्यांची कोणाला आठवणही होऊ नये असे प्रामाणिकपणे वाटत नाही.

बाकी मुंबईचे स्पिरीट वगैरे मुद्दयांवर काही लिहिण्यासारखे नाही.

ते भ्याड आहेत

त्यांना भ्याड म्हणून आपण आपलेच समाधान करून घेत आहोत.

नाहि. नि:शस्त्र नागरीकांवर गोळीबार करणार्‍यांना मी तरी भ्याड म्हणतो.. माझ्या समाधानासाठी नाहि तर ते भ्याड आहेत म्हणून!
असो.

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

प्रश्न!

प्रश्न कोणाला भ्याड किंवा शूर म्हणण्याचा नाही परंतु मनोधैर्य खच्ची झालं म्हणून कोणी अतिरेक्यांना शूर म्हणत असेल तर करावा तेवढा निषेध कमी आहे.

आपली सुरक्षा यंत्रणा किती पोखरली गेली आहे याचे अजून किती पुरावे हवे आहेत. असे प्रश्न कोणाच्याही मनात उभे राहणारच.

असे प्रश्न उभे रहायलाही हरकत नाही आणि त्यात तथ्यही असू शकेल परंतु प्रश्न उभे राहणे आणि ते ज्या पद्धतीने मांडले गेले, विशेषतः अगदी क्षणार्धात, आणि ते मांडताना अतिरेक्यांचे शौर्य वगैरे वर्णिले गेले ते खेदजनक आहे. तसेच, प्रश्न उभे करणे आणि ठाम मत मांडणे यात फार मोठा फरक आहे. देशाचे सैन्य मुंबईवर राज्य करत नाही, सैन्याकडे ताजचा आराखडा ताबडतोब असणे अशक्य नसले तरी शक्यही नाही, सैन्य म्हणजे अतिरेकी नाही की दिसला माणूस घाल गोळी. त्यांची कार्यपद्धती वेगळी, ते रेस्क्यू ऑपरेशन करतात, तिथे अतिरेक्यांसमवेत अनेक नागरिक अडकले होते, सैन्याकडे प्लॅन तयार नव्हता आणि पुढेही नसेल या सर्व बाबींवर क्षणभर विचार केला तर सैन्याला जेरीस आणले वगैरे फालतू वाक्ये सुचणार नाहीत. विशेषतः, आज ज्यांच्या जिवावर आपपल्या टिव्हीसमोर बसून या गफ्फा ज्यांना सुचल्या, आणि त्या सुचताना त्या सैन्याचे जीव जात होते त्या मूर्ख लोकांनी गावगप्पा जाहीरपणे मांडलेल्या पाहून विशाद वाटला.

खरे आहे

तुमच्या म्हणण्याशी अगदी सहमत आहे. गेले दोन दिवस अनेक भारतीयांप्रमाणेच मीदेखील पूर्ण खच्ची झालो आहे. अतिरेक्यांचे उदात्तीकरण न करता त्यांची उपद्रवक्षमता मान्य करून - आता त्यांना कमी लेखून चालणारच नाही - या प्रश्नावर उपाय शोधणे आवश्यक आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

खच्ची होणे

खच्ची होणे साहजिक आहे. :-( सर्वच खच्ची आहेत. मीही परंतु म्हणून उगीच आरोपांच्या फैरी झाडत राहण्यात आणि भेकडांचे शौर्य वाखाणण्यात शहाणपणा आहे असंही वाटत नाही. खालील वाक्ये देखील आरोपच आहेत :-( -

ज्या देशात चांगल्या घरातील मुले सैन्यात, पोलीसदलात जाण्यास उत्सुक नाहीत, जिथे या दलांना त्यांचा जीव खर्ची घालण्यासाठी मिळणारा मोबदला, सुविधा, सोयी या अतिशय तुटपुंज्या आहेत, जिथे भ्रष्टाचार बोकाळलेला आहे की संपूर्ण यंत्रणा ही केवळ बाहुले आहे आणि सैनिक आणि पोलीस या कठपुतळ्या बनले आहेत. तेथे कोणा एकाला दोष देण्यात तरी काय अर्थ?

आपण सर्वच या अपयशाचे धनी आहोत.

+१

आपण सर्वच या अपयशाचे धनी आहोत.

+१
अगदी अगदी हेच कालपासून सतत बोचते आहे.. :(

(सुपातला)ऋषिकेश

उधम

या बातम्या दाखविताना चॅनलवाल्यांनी थोडातरी तोल सांभाळला. कारवाई संपल्यापासून मात्र केवळ 'उधम' केला आहे. भारतीयांना मला वाटते लोकांच्या दुःखाचे जरा जास्तच भांडवल करायची सवय आहे. पाश्चात्य (मुख्यतः युरोपीय) माध्यमांनीही नाही म्हटले तरी हात राखूनच बातम्या दिल्या. (ब्रिटीश माध्यमांचा विचार केलेला नाही.) त्याबाबत कालच मी लिहिले होते. या वाहिन्यांच्या त्रासाला कंटाळून शेवटी पोलिसांनी शहरातील केबल सेवा बंद केली.

या अतिरेक्यांना शूरवीर नाही म्हणता येणार. मात्र पोलिसांचे जे बळी गेले ते केवळ उथळपणामुळे आणि समन्वय नसल्यामुळे. राज्याचा गृहमंत्री कारवाई संपण्याची वेळ आलेली असताना घटनास्थळी जातो आणि (खुर्चीवर उभे राहून) ‘भारतमाता की जय’च्या घोषणा देतो, हे दृष्य उबग आणणारे नाही काय?

सहमत

आपल्या वाहिन्या, वृत्तपत्रे अशा बातम्या अतिरंजित करून का सांगतात कळत नाही. मृत लोकांचे देह दाखवणे, असंबद्ध बडबड करणे, शहानिशा न करता बातमी ठोकून देणे.
पूर्वी पोलिस टाइम्स नावाचा एक भयानक प्रकार येत असे (अजूनही असेल, कल्पना नाही.), अतिरंजित क्याटेगरीमधले हे अगदी टोकाचे उदाहरण. पाश्चात्य प्रसारमाध्यमे याबाबत अलिखित संकेत पाळताना दिसतात. ते संकेत आपल्या माध्यमांसाठी आता 'लिखित' करण्याची गरज आहे असे वाटते.

----

हतबुद्ध

It keeps getting worse!

विलासराव ताज हॉटेलला भेट देताना त्यांच्याबरोबर रामगोपाल वर्मा आणि रितेश होते. :-(

----

राजीनाम्याची वेळ

विलासराव ताज हॉटेलला भेट देताना त्यांच्याबरोबर रामगोपाल वर्मा आणि रितेश होते. :-(

राजीनामा देण्याची वेळ जवळ येत आहे असे वाटते.

आठवण

अशा वेळी यशवंतराव चव्हाणांसारख्या नेत्यांची आठवण होते.

----

ताज २०१०

या आगामी चित्रपटात (तरी) विलासराव मुख्यमंत्र्यांची भूमिका 'निभावतील/वठवतील' असे दिसते आहे. रितेशच्या नेतृत्वाखाली कमांडोज अपहरणनाट्यावर पडदा टाकण्यासाठी आत शिरण्यापूर्वी जळत्या ताजच्या पार्श्वभूमीवर निशा कोठारी अथवा मल्लिकाबाईंचे आयटेम नृत्यही सादर केले जाईल. जनतेची स्मरणशक्ती क्षीण असल्याने हे गाणे अर्थातच टॉपला जाईल, यात शंका नसावी.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

स्पीचलेस

खरोखरीच शब्द इथे अपुरे पडत आहेत. :-(
तिकडे आबा म्हणतात प्रत्येक शहरात अशी छोटी मोठी घटना होतच असते. :-(
आपल्या राजकारणी ही पृथ्वीतलावरील सर्वात हीन जमात असावी. कुणी सांगावे, जंतूंमध्येही काही सुसंस्कृतपणाचे कायदे असतील.

----

अरारा

ही बातमी वाचून स्वतःच्याच तोंडात मारून घ्यावेसे वाटते आहे. राणे-देशमुख वादही जोरात चालू आहे म्हणे. आर आर पाटील यांना काय बोलायचे आणि किती बोलायचे याचा कधीच धरबंद नव्हता. विलासरावाने मात्र हद्द केली. रामगोपाल वर्माने दाऊदचे उदात्तीकरण करणारा डी काढला होता... आता तो डेक्कन मुजाहिदीन साठी डी एम काढेल. रामगोपालवर्माने तरी तिथे जाताना लाज बाळगायची होती. निदान त्या मेलेल्या शिपायांच्या चिता विझेपर्यंत तरी वाट पाहा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

रितेश

विलासरावाला अजून जाणीव झालेली दिसत नाही की असे लोक मरत गेले तर रितेशचे पिक्चर पाहायला कोण शिल्लक राहणार ? निदान त्याचा तरी विचार करायचा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

रितेश

रितेशचा अभिनय बघणे हे जिवंत मरण आहे ही गोष्ट वेगळी.

----

राम गोपाल वर्मा

राम गोपाल वर्मा तिथे विलासरावांच्या निमंत्रणावर आला नव्हता. घटनास्थळ कुणालाही भेट देण्यास खुले होते. रामू तिथे कोणत्याही सामान्य नागरिकासारखा आला होता. योगायोगाने विलासराव त्याच वेळेला तिथे हजर असल्याने त्यांना भेटला. ह्या सगळ्याला 'विलासराव रामूला मुद्दाम निमंत्रण देऊन सदर ठिकाणांची पाहणी करायला गेले' असे ट्विस्टेड स्वरुप दिल्याने लोकांना संताप आला आहे.

मला विलासरावांची बाजू अजिबात घ्यायची नाही आणि फिल्मी लोकांविषयी तर कसलीही सहानभुती नाही पण ह्या हल्ल्यांमुळे आपण सगळेच हळवे झालो आहोत आणि त्यामुळेच अश्या गोष्टींचा संताप येतो आहे का? इतकेच विचारायचे आहे.

संताप

राम गोपाल वर्मा तिथे विलासरावांच्या निमंत्रणावर आला नव्हता. घटनास्थळ कुणालाही भेट देण्यास खुले होते. रामू तिथे कोणत्याही सामान्य नागरिकासारखा आला होता. योगायोगाने विलासराव त्याच वेळेला तिथे हजर असल्याने त्यांना भेटला.

राम गोपाल वर्मा निमंत्रणावर आला नव्हता हे वक्तव्य विलासरावांचेच. जरी त्यांनी रामूला निमंत्रण देऊन बोलावले तरी ते प्रकरण अंगाशी आल्यावर हे तोंड उघडून सांगतीलच असे नाही.

ताजच्या बाहेर अनेकजण आले होते. मी एका टिव्ही स्टारची मुलाखत पाहिली. ती सांगत होती की 'मी ताजला रहायचे. माझ्यासाठी ताज घरासारखे आहे. मला खबर मिळताच मी इथे धावत सुटले.' असे अनेकजण ताजच्या बाहेर दिसत होते. त्यापैकी काही डॉक्टर असतील, काही राजकारणी असतील, काही सिनेस्टार असतील, व्यावसायिक असतील, सामान्य असतील. यापैकी, फक्त रामूनेच 'मी आत येतो.' असे सांगितले काय? तसे असल्यास तो विलासरावांच्या इतक्या जवळ कसा पोहोचू शकला कारण सुरक्षेच्या कारणास्तव विलासराव ताज पासून १००-२०० फुटांवर जिथे लोक उभे होते तेथे नक्कीच उतरले नसावेत. म्हणजे रामूला त्यांनी ताजवर यायचे निमंत्रण दिले असेल/ नसेल परंतु त्यांच्या "खास" परवानगीनेच, फोनाफोनीने वगैरे रामू आत शिरला असावा.

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विलासराव पहाणी करणे सयुक्तिक आहे. रितेशही वडिलांना धीर द्यायला गेला असे समजू. रामू कशासाठी गेला होता? तो राजकारणी नाही, समाजसेवक नाही, हॉटेल व्यवस्थापनात त्याचा भाग नाही, तो इमारतीला किती इजा झाली हे पहाणारा इंजिनिअर नाही, पत्रकार नाही तर त्याला आत सोडण्याचे कारण कोणते असावे? प्रेक्षक म्हणून बघायला ताजची साईट इतरांसाठी खुली करून देण्यात आली होती असे वाटत नाही.

ह्या हल्ल्यांमुळे आपण सगळेच हळवे झालो आहोत आणि त्यामुळेच अश्या गोष्टींचा संताप येतो आहे का?

हो आणि नाही. नेमकं सांगता येत नाही. कुठेतरी पाणी मुरताना दिसतं आणि संताप येतो हे मात्र खरं.

माफी का?

जर रामू विलास सोबत गेलाच नव्हता तर मग विलासांनी ही माफी का मागितली? सगळच परस्पर विरोधी वाटत नाही का?

तसेच मिशन संपल्यानंतर खुद्द रतन टाटांना सुद्धा लगच्या लगेच हॉटेलमध्ये जाउ दिले नव्हते असे वाचल्याचे आठवते.

जर

घटनास्थळ कुणालाही भेट देण्यास खुले होते.

असे असेल तर ते धोकादायक आहे कारण अजून तपास संपलेला नाही.
९/११ नंतर बुश आणि स्पिलबर्ग दोघे एकत्र घटनास्थळी गेले तर जे होईल तेच इथे झाले आहे. आता देण्यात येणारे स्पष्टीकरण खरे आहे किंवा कसे माहित नाही. अशा वेळी आपली प्रत्येक कृती राजकारणी लोकांनी तपासून बघायला हवी असे वाटते.

----

हतबुद्ध - २

आता या शीर्षकाची नवी लेखमालाच सुरू करावी लागेल.
मनमोहन सिंग यांनी बोलावलेल्या सर्व पक्षीय बैठकीला अडवाणी हजर राहणार नाहीत. अशा वेळीसुद्धा राजकारण विसरून एक होणे आपल्या राजकारण्यांना जमत नाही. :-(

----

हतबुद्ध - ३

भाजपची मागणी आहे की सर्व मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा. म्हणजे सर्व सोडून आत्ता निवडणुका घ्यायच्या?

----

हतबुद्ध - १०

पाक सरकार दाऊद आणि इतरांना भारताच्या ताब्यात देणार नाही. जर ते दोषी आढळले तर त्यांना आधी पाकिस्तानी न्यायालयात शिक्षा होईल.(याचा अर्थ कधीही नाही.)
वर म्हणे प्रणव मुखर्जींच्या निवेदनामुळे भारत-पाक तणाव वाढू शकतो!!!

--

----

हतबुद्ध - ४

एनडीटीव्हीवर इतके सर्व होऊनही लोक लग्नसोहळा कसा साजरा करत आहेत त्याची बातमी देत आहेत. :-(

----

च्यानेल

राजेंद्रसाहेब,

ती च्यानेले पाहणे बंद करा... तुमच्या चांगल्यासाठीच सांगतो. भल्याभल्यांना वेड लावले आहे त्यांनी. आणि बातम्याही वाचू नका थोडे दिवस.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सहमत

सहमत आहे हो, पण काय करणार? काय चालले आहे ते कळल्याशिवाय स्वस्थही बसवत नाही. इंटरनेटवर एनडीटीव्ही आणि आयबीएन हे दोनच च्यानेल दिसतात हे त्यातलेत्यात बरे (माझ्या माहितीप्रमाणे. पण आत्ताच प्रियालीच्या प्रतिसादातून आणखी एक च्यानेल कळाला.)

----

हतबुद्ध-०५

नारायण राणे यावेळी विलासरावांविरुद्ध कान फुंकण्यात बीझी आहेत, तेव्हा अर्थात सोनियाबाई ते एकून घेण्यात
पंतप्रधान अडवाणी नसणार्‍या मिटींगच्या गडबडीत आहेत तर कमलनाथ, एखाद्या वरच्या पदाच्या सेटींगच्या
चिदंबरम गृहमंत्री होण्याच्या, तर (माजी)गृहमंत्री विस्कटलेल्या केसांच्या काळजीने त्रस्त
विलासराव मुलाच्या फिल्म रिलिझच्या तर, आबा पाटील वाचलेल्या ३५०० जणांच्या समाधान मानण्यामधे
मुंडेजी मोदींना सीऑफ करण्यातस्, तर उद्धव वडापावची होर्डीग काठून शोकाची बनवण्यात

थोडक्यात काय हे हल्ले कमांडो सांभाळतील, मुळ मुद्दे सोडून इतरत्र पुचाट विरोध मुर्ख मिडीया वाले करतील आणि जनता????

ती तर केव्हाच हतबुद्ध झाली आहे!!

:((((((((((((((((((((

ऋषिकेश

हतबुद्ध १००

कालच्या दिवसात कितीवेळा हतबुद्ध होण्याची वेळ आली ते आठवत नाही परंतु आताच सकाळी उठून विलासराव देशमुख यांची मुलाखत पाहिली. (रामू आणि रितेश संबंधात) तिथे त्यांना कोणीतरी विचारले की तुमच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

यावर विलासरावांचे उत्तरः

माझ्यापेक्षा तुम्हालाच अधिक माहित. हाहहाहाहाहाहा! आधीही अनेकवेळा अशा वावड्या उठून तुम्ही फसले गेले आहात. -काय बोलणार यावर पत्रकार गपगार झाले.

संदर्भः आयबीएन-लोकमत लाईव विडिओ

हातोहात बुद्धु

केवळा हतबुद्ध करत नाहि तर जनतेला हातोहात बुद्धु बनवू पाहतात ही मंडळी!!! :(

-(हातोहात-बुद्धु) ऋषिकेश

फक्त संताप

येथे फक्त संताप करून काय होणार आहे? चॅनेल्सवर तेच तेच दाखवणार त्यावर आपण येथे ***०५ वगैरे प्रतिसाद लिहिणार. माफ करा थोडे विषयांतर करतो. पण उदाहरणादाखल हे लिहिणे मला योग्य वाटते.

संकेतस्थळावरच्या उपद्रवी सदस्यांबद्दल आपण सगळेच जाणून आहोत. तेच ते सदस्य वेगवेगळ्या नावाने खाती उघडुन अतिरेक करतात. त्याचा निषेध करून कृती करण्या ऐवजी ते पोलिटीकली करेक्ट आहेत वगैरेचे गोडवे गायले जातात. काही काळ हेच सदस्य शांत बसून नेहमीचेच उपद्रवी धंदे काही कालावधीने सुरुच ठेवतात. आपण सजग सदस्य यांचा बंदोबस्त करु शकत नाही. पण कळफलक बडवायला कोणी अडवत नाही म्हणून राजकारण्यांवर लिहायला सरसावतो. का? कारण तुम्हाला समोर येऊन विरोध करणारे कोणी नाही आणि या अतिरेकी सदस्यांच्या अतिरेकाबद्दल सुद्धा बोलायला कोणाची इच्छा नाही. दुर्लक्ष करा. उत्तम उपाय. असे म्हणून गप्प बसतो.

आपल्या भारतातल्या राजकारणाचे आणि समाजकारणामध्ये देखील हेच प्रतिबिंब पहायला मिळते. जर ते संकेतस्थळावर आपण रोज करतो, तर मग आपले राजकारणी आणि देशावर हल्ला करणारे अतिरेकी यांच्याकडे नुसतेच हतबल होऊन पहाण्याच्या सवय असलेल्या आपल्यासारख्या सदस्यांना काही लिहायचा/बोलायचा हक्क आहे का?
संपादकांनी कृपया व्यक्तिशः घेउ नका. पण हे कळकळीने सागावेसे वाटते की उपद्रवी सदस्यांना आपण येथे पाठीशी घालतो. मग हे राजकारणी निर्लज्ज का? गेंड्याच्या कातडीचे का?

सांगायचा मुद्दा एवढाच आहे की जे काही घडते आहे ते आपले प्रतिबिंब आहे. मी त्यातला नाही म्हणून आपण सुद्धा जबाबदारी झटकू शकत नाही. सर्वांनी सरकारच्या बाजूने उभे रहा. विरोधकांनी संयम दाखवा वगैरे लिहायला ठिक आहे. पण सत्तेत आल्या आल्या पोटा रद्द करणार्‍या सरकारला आपण माफ कसे करु शकतो? अरे धर्माच्या बाजूने बोलले असतील काही पक्ष. पण भारताला अणु चाचण्या करून स्वाभिमान मिळवून देणारे सरकार आपण त्या पक्षांना बनवू दिले नाही हे सत्य आहे. अवघड आर्थिकस्थितीतुन बाहेर काढण्यासाठी, पायाभुत व्यवस्था निर्माण करणारे सरकार आपण परत उभे करु शकलो नाही हे सत्य आहे.

विरोधकांना कसे मोडून काढावे हे काँग्रेसला इतक्या दशकांच्या अनुभवा नंतर माहित नाही असे म्हणण्याची हिंमत कोणामध्ये असेल तर त्याने या प्रतिसादाला उपप्रतिसाद द्यावा. काँग्रेसने इतके वर्षे केलेला हाहाकार आपण सहन करतो आहोत. कदाचित यापुढे ही सहन करणार आहोत. पण त्यांना विरोध करणार्‍यांना मात्र नावे ठेवायला आम्ही पुढे मागे पाहणार नाही. मला तरी या प्रतिसादांमध्ये तथ्य वाटत नाही.

राजकारणी लोकं, चित्रपट क्षेत्र आणि गुन्हेगार यांची घट्ट बांधणी आपल्याला चांगलीच माहिती आहे. मग हे लोकं आता जे करत होते ते खुले आम करु लागले तर त्यात आत्ताच का चिड येते? रामु तर डी गँगवर चित्रपट काढण्यात माहिर आहे. अगदी सर्व बारकाई नुसार. मग तो आता तिथे का गेला असे प्रश्न विचारणे म्हणजे, सगळे माहित असुन सुद्धा पाकिस्तानवर आक्रमण का होतं नाही? असा प्रश्न विचारणे आहे. डी म्हणाला असेल, "बघ रामु, मी कथा तयार करुन दिली आहे. आता तु चित्रपट काढ पाहू.". मग कसा काढायचा हा विचार करुन तो गेला असेल. त्यात चिडण्यासारखे काय आहे? इथले सदस्य नाहीत का म्हणत? आता बघ हं गंमत.. मे नवी चर्चा टाकतो. तु असा प्रतिसाद दे, मी असा देतो. आपण सर्वांची गंमत पाहू.

मित्र हो, समाजात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीत आपले प्रतिबिंब असते. आपण या समाजाचा भाग आहे हे नाकारु नका. विरोधातले अथवा समर्थनार्थ प्रतिसाद देऊन आपण या समाजापासून वेगळे नाही होऊ शकत.

मद्रिदच्या स्फोटा नंतर माझ्या मित्रांची तपासणी झाली आहे. फक्त आशियाखंडातले गहू वर्णाचे लोक, हा एकमेव निकष पुरेसा होता. तिथे कोणाची हिंमत नसते विरोध करायची या तपासणीला. पण इथे मात्र लगेच कांगावा. धर्म, जात, राजकारण आणि काय? अरे, समाज दुभंगतो आहे म्हणून एक होण्याची भाषा करुन ते दुभंगणे थांबत नाही. काही करायचीच इच्छा असेल तर जागे व्हा. इंग्रजांनी हिंदु-मुसलमान फाळणी करुन जे साध्य करायचे ते केले. पण आपण मात्र त्यात सुद्धा आता जातीची, पंथाची, पक्षांची फाळणी करत सुटलो आहोत. सुरुवात आपल्या पासून हवी. आपल्याला वेगळे करणारे मुद्दे अभ्यासणे गरजेचे आहे. युद्धाचा अभ्यास न करता युद्ध केल्यास आपण कधीच जिंकणार नाही.
आपल्याला हवे तसे कायदे करणारे सरकार आधि तयार करु, देशात फक्त दोनच प्रमुख राजकिय पक्ष हवेत आणि आघाडीची सरकारे नकोत असा निर्धार करु आणि मगच या राजकारण्यांवर आरोप करु. नाहीतर शांत राहू आपापल्या घरांमध्ये पुढचा हला आपापल्या दुरचित्रवाणी संचावर पहायला आणि त्या हल्ल्यात आपण बळी पडणार नाही याची काळजी घ्यायला!!!

जाता जाता!! आता ६ डिसेंबर आलाच जवळ!! आणखीन एक दिवस जीव मुठीत घेउन जगायचा. मुसलमानांना सवलती असताना एखादी गोष्ट हिंदूंसाठी करा म्हणायचा मोठेपण काँग्रेस आणि मित्रपक्ष कधी दाखवणार? कि या जखमा अशाच भळभळत राहणार? सगळ्यांसाठीच?

दुर्दैव

सहमत आहे असे म्हणताना वाईट वाटते आहे. आपण असे आहोत म्हणूनच आपले राजकारणी असे आहेत.
वी ऑल गेट द वॉर वी डिझर्व.

----

हतबुद्ध ७

राज ठाकरे यांनी करकरेप्रकरणाबद्दल शिवसेनेवर टीका केली आहे आणि परत परप्रांतीयांच्या लोंढ्याचा मुद्दा मांडला आहे. आपले राजकारणी त्यांच्या परिघातून बाहेर येऊ शकत नाहीत हेच खरे. अशा वेळी भारतातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे हे फक्त स्वप्नच रहाणार असे दिसते.

----

विविधतेत एकता

यालाच विविधतेत एकता म्हणतात. सर्वांनी आपापले पक्ष काढून लढायचे. सत्तेसाठी एकत्र यायचे. मला तर राजने सोनियाचे सुद्धा कौतुक केले आहे. सर्व पक्ष एकत्र कशासाठी हवेत? इतके पक्ष म्हणजे तितकी वैचारीक मतभिन्नता. मग एकत्र येणे कशासाठी? आपल्या वरच्या वाक्यातच विरोधाभास आहे असे जाणवत नाही का? अहो, यालाच तर जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणतात. ज्याला जसे हवे तसे वागा. कोणीही या, काहीही करा. कारण हि जगातील सर्वातमोठी आणि मुख्य म्हणजे धर्मनिरपेक्ष लोकशाही आहे.
भारतात काही करा, देशाची सीमा ओलांडा (या दोन्हीसाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत) म्हणजे झालं. भारतात सगळच शक्य आहेत कारण हि जगातील सर्वातमोठी आणि मुख्य म्हणजे धर्मनिरपेक्ष लोकशाही आहे. या लोकशाहीचे जगाला कौतुक आहे. आता कळलं का ते?

मला

ब्याकग्राउंडमध्ये 'मिले सुर मेरा तुम्हारा' ऐकू येत आहे.

----

:)

:)

हतबुद्ध - ६

मुख्यमंत्र्यांनी रामूला घेऊन जाणे म्हणजे शांतता यात्रेसाठी काही स्त्रिया लिपस्टीक लावून येतात तसे आहे. - नक्वी, भाजप.

----

आशावादी - १

अशा परिस्थितीत आशावादी वक्तव्य एका परकीय नेत्याकडून यावे ही सर्वात मोठी आयरनी/विरोधाभास.
"ऑल सोव्हेरिन नेशन्स हॅव अ राइट टू प्रोटेक्ट देमसेल्व्स." - बराक ओबामा

आपल्याकडचा सावळा गोंधळ बघितल्यानंतर आता लक्षात येते आहे की ओबामाचे विजयी भाषण इतके मनाला का भिडले!

----

सोनेरी

काळ्या ढगांच्या गर्दीत सोनेरी किनार शोधण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. पण सहा महिन्यांच्या अवधीत ह्या चर्चा परत रंगतील असे आमची अतिंद्रीय शक्ती आम्हाला सांगत आहे!

----

हतबुद्ध - ९

महाराष्ट्रात तत्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि नव्या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडे केली.

हतबुद्ध - ९ : आशावादी - १

----

 
^ वर