संताप

एनडीटीव्हीवर श्री करकरे यांच्या अंत्यसंस्काराचे दृश्य पाहून परत संताप झाला. एनडीटीव्हीला ही मेल लिहीली पण त्याचा काही उपयोग होईल असे वाटत नाही. ते मेल बघत असतील असे वाटत नाही. भारतात असणार्‍यांनी कृपया एनडीटीव्हीला फोन करता आला तर पहावे. ही घटना लाजिरवाणी आहे.

Dear Sir,
We are grateful to you for bringing us the live coverage of the events in Mumbai.
However, i urge you to have some sensibility in covering the events.
WE DO NOT WANT TO SEE THE CHITA OF SHRI KARAKARE BURNING IN THE BACKGROUND
WHILE YOUR ANCHOR RAMBLES ON INCESSENTLY. Please, please have some sensibility
in coverning such tragic events.

-----------------------------------------------------------------------------------------------

मैं हूँ उनके साथ,खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़

कभी नही जो तज सकते हैं, अपना न्यायोचित अधिकार
कभी नही जो सह सकते हैं, शीश नवाकर अत्याचार
एक अकेले हों, या उनके साथ खड़ी हो भारी भीड़
मैं हूँ उनके साथ, खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़

निर्भय होकर घोषित करते, जो अपने उदगार विचार
जिनकी जिह्वा पर होता है, उनके अंतर का अंगार
नहीं जिन्हें, चुप कर सकती है, आतताइयों की शमशीर
मैं हूँ उनके साथ, खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़

नहीं झुका करते जो दुनिया से करने को समझौता
ऊँचे से ऊँचे सपनो को देते रहते जो न्योता
दूर देखती जिनकी पैनी आँख, भविष्यत का तम चीर
मैं हूँ उनके साथ, खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़

जो अपने कन्धों से पर्वत से बढ़ टक्कर लेते हैं
पथ की बाधाओं को जिनके पाँव चुनौती देते हैं
जिनको बाँध नही सकती है लोहे की बेड़ी जंजीर
मैं हूँ उनके साथ, खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़

जो चलते हैं अपने छप्पर के ऊपर लूका धर कर
हर जीत का सौदा करते जो प्राणों की बाजी पर
कूद उदधि में नही पलट कर जो फिर ताका करते तीर
मैं हूँ उनके साथ, खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़

जिनको यह अवकाश नही है, देखें कब तारे अनुकूल
जिनको यह परवाह नहीं है कब तक भद्रा, कब दिक्शूल
जिनके हाथों की चाबुक से चलती हें उनकी तकदीर
मैं हूँ उनके साथ, खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़

तुम हो कौन, कहो जो मुझसे सही ग़लत पथ लो तो जान
सोच सोच कर, पूछ पूछ कर बोलो, कब चलता तूफ़ान
सत्पथ वह है, जिसपर अपनी छाती ताने जाते वीर
मैं हूँ उनके साथ, खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़

Comments

काय करावे?

राजकिय पक्षांनी काय करावेसे वाटते? हे खुप मोठे सत्य आहे की गेल्या १० वर्षात सोनिया पवारांनी महाराष्ट्रात काही एक दिवे लावले नाहीत. खरतर आहेत ते दिवे सुद्धा लावायला वीज नाही. पर्यायी सरकार येणे गरजेचे आहे. कोणताच प्रश्न जादूची कांडी फिरवून सुटणार नाहीये. मी या मुद्याकडे उलटे पाहतो आहे. महाराष्ट्रात तत्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि नव्या निवडणुका घ्याव्यात. कारण निवडणुका या होणार आहेतच. आज नाही झाल्यातर काही महिन्यांनी. पण आत्ता गरज आहे ती नालायक राजकारण्यांना बाजूला सारुन असे प्रशासन येण्याची जे निर्णय घेउ शकेल. पत्रकार परिषदा घेउन आणि मेणबत्त्या लावुन प्रश्न सुटणार नाहीच. महत्वाचे निर्णय आणि ते सुद्धा कोणतीही आडकाठी न होता होण्याची गरज आहे. मराठी लोकांना सुद्धा धडा मिळायला हवा. लोकशासन म्हणजे काय आणि राष्ट्रपती राजवट म्हणजे काय ते सुद्धा कळू देत. या घटनांकडे नुसतेच हतबुद्ध म्हणून न पाहता त्यातला चांगला मुद्दा शोधायला हवा. मला तर या मागण्या रास्त वाटतात.





माझ्या

मते आत्ता निवडणूका घेतल्या तर प्रचार वगैरेंच्या रणधुमाळीत मुख्य प्रश्न परत विसरले जातील. मला तर वाटते लोकसभेच्या निवडणूकाही पुढे ढकलायला हरकत नाही. कारण परत हंग पार्लमेंट, खासदारांची खरेदी-विक्री, किळसवाणे डील्स आणि आणखी एक असेच सरकार. उलट सर्व पक्षांनी आम्ही एक वर्ष थांबतो, निवडणूका नंतर घेऊ, आधी परिस्थिती सुरळीत होऊ दे असे म्हटले तर? पण हे स्वप्नरंजन झाले.

राष्ट्रपती राजवट कदाचित पर्याय असू शकतो. पण आत्ता मुख्य गरज आहे ती
१. गुन्हेगारांचा तपास लवकरात लवकर लावावा.
२. यासाठी प्रतिबंधक उपाय अमलात आणावेत.

काँग्रेसने दिवे लावले नाहीत याच्याशी सहमत आहे पण इतर पक्षही आले तर फार वेगळे करतील असे वाटत नाही. तेव्हा आता दुसरे सरकार आले तरी तेच प्रश्न पडतील मग आत्ता लगेच सरकार बदलून काही होईल असे वाटत नाही. इथे आपल्या प्रायॉरिटी ठरवण्याची गरज आहे.

----

लगेच नाहीच

लगेच नाहीच निवडणुका. आत्ताचेच उदाहरण घ्या. झालेली घटना राहिली दूरच. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण? यासाठी दंगा सुरु आहे. लोकांचे लक्ष तिकडे वळवणे सुरु आहे. मी तर म्हणतो...

  1. राष्ट्रपती राजवट लावा
  2. लोकजागृतीसाठी सामायिक कार्यक्रम तयार करा आणि त्याची अंमल बजावणी या पक्षांना करायला लावा.
  3. त्याचे गुणपत्रक करा.
  4. जो पक्ष नापास होईल त्याला तो पक्षच बरबाद करा. निवडणुकाच लढवायची संधी काढून घ्या. जनतेची कळवळ असेल तर आधी काम करा. मग निवडणुका लढवा. पै नि पैचा हिशोब मागा. माजलेत साले सगळे.
  5. दशका नु दशके केलेला कचरा ५ वर्षात निघण्याची स्वप्ने अव्यवहार्य आहेत. त्याला अजुन अजुन सलग १५ वर्षे बिगर काँग्रेस सरकारे हवीत.

राजकिय आघाड्या समान कार्यक्रम राबवतात. तो ही त्यांच्या सोयिचा. आता यावेळी जनतेने कार्यक्रम आखुन द्यायला हवा आणि त्यांनी राबवायला हवा.
जाता जाता: ज्या ज्या वेळी दाउदचा संबंध येतो, त्या त्या वेळी महाराष्ट्रात राजकिय खांदे पालट करायला शरद पवार कमालीचे सक्रिय असतात. असे का बरे?





सहमत

आहे. मला कुठल्याही पक्षाच्या बाजून बोलायचे नाही. कारण प्रत्येकाच्या कपाटात सांगाडे आहेत.
तुमच्या प्रतिसादाशी बर्‍याच अंशी सहमत आहे.

----

हम्म

मला कुठल्याही पक्षाच्या बाजून बोलायचे नाही. कारण प्रत्येकाच्या कपाटात सांगाडे आहेत.

शेवटी सगळे भारतीयच आहेत ना? एक मुर्ख म्हणजे दुसरा शहाणा असा अर्थ काढणे योग्य नाहीच. माझा मुद्दा एवढाच आहे की आबांची स्वच्छता मोहिम राजकारणात राबवल्यास आधिचाच कचरा एवढा आहे की तो साफ करणे एक मोठे काम आहे. जादूची कांडी कोणाकडेच नाही.

काय माहित? उद्या आणखी एक आत्मघातकी हल्ला होईल आणि त्यातुन सहाभुतीची लाट तयार होऊन त्याचा फायदा काँग्रेस पक्षाला होईल. आजवरचा इतिहास तरी असेच सांगतो. मला तर हे हल्ले खरेच अतिरेक्यांनी वेडापायी केले आहेत की घडवून आणले आहेत या बद्दल शंका आहे. असे बोलणे हे राजकिय अपरिपक्वतेचे लक्षण म्हणायला बाकिचे तयार आहेतच. नाही म्हटले तर पाककडे बोटे दाखवून आपले कपडे साफ ठेवणे सोपे आहेच. मग इतरांना धर्मांध म्हणा आणि पुढची ५० वर्षे राज्य करा.

मला सुद्धा कोणत्याही पक्षाची बाजू घ्यायची नाही. पण एका पक्षाला विरोध नक्कीच आहे. तुल्यबळ प्रतिस्पर्धी एकच असल्याने तो दगडापेक्षा वीट मऊ एवढेच म्हणावेसे वाटते.





आशावादी - २

इफ पॉलिटिशियन्स डू नॉट हॅव समथिंग कन्स्ट्रक्टिव्ह टू से, दे शुड जस्ट शट अप. -- मिलिंद देवरा.

----

मेडियाची गरज

सर्व दुर्गुण ग्रहित धरुन सध्या तरी मेडीयाला पर्याय नाही असे दिसतेय.

कारण आम्ही जे काही लिहीत आहोत ते मेडीया वरच वाचून व बघूनच नाही का? कमीत कमी ते बिनधास्त पणे , भले आपल्याला न पटणारी का असोत, त्यान्ची मते लोकान्पर्यन्त पोचावतात.

या सूचना सम्बन्धित खात्याच्या मन्त्र्या पर्यन्त पोचवणे झाल्यास, सम्बन्धित खात्याचे इ मेल कूणाकडे आहेत काय ?
सर्व सरकारी खात्याचे व सम्बन्धित मन्त्र्यान्चे पूर्ण पत्ते व ई मेल कुणी दिल्यास आभारी होइन.

धन्यवाद् !
अविनाश रायकर
दूर्जनांच्‍या दुष्‍कृत्‍यांपेक्षा सज्‍जनांची निष्क्रीयता जास्‍त भयावह

 
^ वर