पक्ष्यांचे मनोहर जग!

आत्ता काही महिन्यांपूर्वी बारामती परिसरात पणदरे गावात माझ्या आत्याकडे गेलो होतो. तिच्या घरातल्या बागेतच काढलेले पक्ष्यांचे काही फोटो टाकत आहे.
छायाचित्रण विषयाशी संबंधित हा माझा पहिलाच लेख आहे. फोटो कसे वाटले ते जरुर सांगा.

पक्षी - टिकेलचा फुलटोच्या
कॅमेरा - कॅनन इओएस ३५० डी
लेन्स - सिग्मा ७० ३०० एपीओ डीजी मॅक्रो
१/६० सेकंद.
एफ नं. ५.६
आयएसओ ४००
फोकल लेन्थ ३०० मीमी
फ्लॅश : होय.


या पक्षाने खूप हुलकावणी दिली. शेवटी कुठे एका फांदीवर ५/६ सेकंद बसल्यावर तातडीने हा फोटो घेतला. बरर्‍याचदा ऍपर्चर प्रायोरिटी मोडवर फोटो काढतो मात्र यावेळी कॅमेरा ऑटो मोडवर होता आणि वेळ कमी असल्याने फटकन फोटो काढले. सावलीत असल्याने फ्लॅश उडाला आहे.

पक्षी - चष्मेवाला.
कॅमेरा - कॅनन इओएस ३५० डी
लेन्स - सिग्मा ७० ३०० एपीओ डीजी मॅक्रो
१/१२५ सेकंद.
एफ नं. - ५.६
आयएसओ - ४००
फोकल लेन्थ - ३०० मीमी


व्हाईट आयड् किंवा चष्मेवाला पक्ष्याचा सीताफळाच्या झाडावर माझ्या काकाने काढलेला फोटो.

पक्षी - साळुंक्या.
कॅमेरा - कॅनन इओएस ३५० डी
लेन्स - सिग्मा ७० ३०० एपीओ डीजी मॅक्रो
१/४०० सेकंद.
एफ नं. - ६.३
आयएसओ - ४००
फोकल लेन्थ - २६३ मीमी


या दोघांचे फोटो काढताना कुठलीच अडचण आली नाही. बराच वेळ बसून होते. दोघांचे वेगवेगळे फोटो पण काढून झाले. शेवटी मलाच कंटाळा आला.

पक्षी - जांभळ्या शिंजीर पक्षाची मादी.
कॅमेरा - कॅनन इओएस ३५० डी
लेन्स - सिग्मा ७० ३०० एपीओ डीजी मॅक्रो
१/२५० सेकंद.
एफ नं. - ५.६
आयएसओ - ४००
फोकल लेन्थ - २३८ मीमी


लांब चोचीवरुन हा पक्षी लगेच ओळखता येतो. जांभळ्या शिंजीर पक्ष्यांमध्ये मादीचा रंग वेगळा असतो. जास्वंदाच्या भल्यामोठ्या झाडावर दर पाच मिनिटांनी हा पक्षी हजेरी लावत होता. मात्र अतिशय चपळ. तासभर हातात जडजंबाल सिग्मा ७०-३०० घेऊन वैतागलो. काही फोटो मिळाले. पण शेवटी काकाला ही पोझ मिळाली.

पक्षी - बुलबुल.
कॅमेरा - कॅनन इओएस ३५० डी
लेन्स - सिग्मा ७० ३०० एपीओ डीजी मॅक्रो
१/५०० सेकंद.
एफ नं. - ९.०
आयएसओ - ३२०
फोकल लेन्थ - ३०० मीमी


जास्वंदाच्या झाडावर तोंडल्याचा एक वेल होता. त्यावर पिकलेलं तोंडलं खाताना लालबुड्या बुलबुल. याच पक्ष्याची लालगाल्या बुलबुल अशीही एक जात आहे. त्याच्यात गालावरही एक लाल ठिपका असतो. माझ्या भावाने हा फोटो काढला. (उशिरा झोपेतून उठल्याने त्याला चांगले फोटोच मिळाले नाहीत. :-(

पक्षी - चिमणा.
कॅमेरा - कॅनन इओएस ३५० डी
लेन्स - सिग्मा ७० ३०० एपीओ डीजी मॅक्रो
शटरस्पीड - १/६४० सेकंद.
एफ नं. - ६.३
आयएसओ - ८००
फोकल लेन्थ - ३०० मीमी


घरट्याशेजारी आरामात बसलेल्या चिमण्याचे बरेच फोटो काढले. त्यातला हा एक.

पक्षी - ?.
कॅमेरा - कॅनन इओएस ३५० डी
लेन्स - सिग्मा ७० ३०० एपीओ डीजी मॅक्रो
शटरस्पीड - १/१६०० सेकंद.
एफ नं. - ६.३
आयएसओ - ८००
फोकल लेन्थ - ३०० मीमी


या पक्ष्याचे नाव कुणाला माहित आहे का? घरामागे बाभळीच्या झाडावर हा पक्षी बराच वेळ अंगाची साफसफाई करत आरामशीर बसला होता.

शहरात हे पक्षी दिसतात का नाही हे मला माहित नाही. पण शहरापासून दूर गावाकडे एकदोन दिवसात इतके वेगवेगळे पक्षी बघायला मिळाले. कसे वाटले? काही सुचवण्या असतील तर जरुर सांगा.
टीपा: १) पक्ष्यांची माहिती 'भारतीय पक्षी' , लेखक - 'सलीम अली, लईक फतेहअली' या पुस्तकातून साभार.
२) वर सांगितल्याप्रमाणे छायाचित्रांपैकी २, ४ व ५ हे फोटो मी काढलेले नाहीत.

-सौरभ.

Comments

मनोहर

सौरभदा खरोखर मनोहर फोटो.

:-)

असेच म्हणतो

शहरात हल्ली चिमण्याही दिसत नाहीत.(निदान मला तरी)
हे पक्षी खरोखरीच मनोहर आहेत.

धन्यवाद..

सहज, विसुनाना धन्यवाद.

-सौरभ.

शेवटचा पक्षी -

शेवटचा पक्षी बहुधा ब्राह्मणी मैना.

बाकी चित्रे दिसली नाहीत.

एक्सिफ वरुन एक माहिती कळली व हेही आवडले की तुम्ही सुद्धा सिग्मा कंपनीची ७०-३०० लेन्स् वापरता. अनेक लोक म्हणतात की ही लेन्स् फार सॉफ्ट छायाचित्रे देते पण, मलातरी या लेन्स्ने सर्वच चित्रे मस्त शर्प आणि सुरेख रंगसंगतीत दिली आहेत.
मी ही लेन्स पक्षांचे फोटो काढायला मुख्यत्वे वापरतो. तुमचीही चित्रे मस्त असतील असतील असेच वाटते.

-
ध्रुव

चित्रांचे दुवे...

ध्रुव, सगळ्यांनाच चित्रे दिसत आहेत. काय झाले असावे? असो. हे घ्या चित्रांचे दुवे.
टिकेलचा फुलटोच्या
चष्मेवाला
साळुंक्या
जांभळ्या शिंजीर पक्षाची मादी
बुलबुल
चिमणा

शेवटचा पक्षी ब्राम्हणी मैना आहे का? मी तरी चित्र पाहिलेले नाही.

बाकी माझा नाईलाज आहे पण सिग्मा ७० ३०० मला तरी आवडत नाही. तशी बरी आहे पण कॅननच्या परवडत नाहीत म्हणून सिग्मा वापराव्या लागतात. :-(
कॅनन १८-५५ आयएसने जसे रंग आणि दर्जा मिळतो तसा सिग्मा ७०-३०० ने मिळत नाही. (असं मला आपलं वाटतं!)

आता परत चित्रे बघून आवडली का नाही जरुर कळवा.

(नवशिका)सौरभ.

चित्रे...

चित्रे दिसली. (माझ्या कार्यालयात सद्ध्या फ्लिकर बंद केलं आहे. :( त्यामुळे दिसत नव्हती)
मस्त. मल शि़ंजीर (सुर्यपक्षी) आवडला. अजूनही थोडा शार्प असता तर जास्त आवडला असता.

बाकी मला तरी ही लेन्स आवडते. मी ही लेन्स् माझ्या निकॉन कॅमेर्‍यावर वापरतो. या लेन्स्ने घेतलेले काही फोटो बघा - http://www.flickr.com/photos/dhruva/

माझ्या कॅमेरर्‍यावर ही लेन्स् ऑटोफोकस होत नाही :( तरी आवडते :)
-
ध्रुव

बघितले...

ध्रुव, दुव्यावरचे फोटो बघितले. मॅन्युअल फोकस असूनही मस्त फोटो काढले आहेत हे विशेष. दुवा जपून ठेवतो. सगळे बघतो आणि कसे वाटले ते कळवेन.
शिंजीर पक्ष्याचा फोटो काकाने काढलेला आहे. ;-)
-सौरभ.

सुंदर चित्रे

पक्ष्यांनी पोझही छान दिल्या आहेत. (म्हणजे तुम्ही तत्पर आहात, असे म्हणायचे आहे!)

चित्रे २,३,५,६,७ कात्रलीत तर आणखी खुलून दिसतील असे वाटते.
क्रमांक १ सर्वाधिक आवडले. क्रमांक ४ मध्ये रंगसंगती उठावदार नाही, पण त्याला आपण काय करणार? म्हणून आवडलाच.

राजेंद्र आणि अभिजित कोण आहेत?

ओके...

धनंजय, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
क्रॉप आवडत नाही. होता होईल तो क्रॉप करण्याचं टाळायलाच बघतो..( तसं ते येतही नाही म्हणा, क्रॉप केल्यावर कापलेल्या भागात जो काळा भाग दिसतो तो कसा टाळावा हे मला अजून माहीत नाही.)
राजेंद्र माझा काका आणि अभिजीत माझा भाऊ. उपक्रमावरचे अभिजीत आणि राजेंद्र मात्र नाहीत ते. :-)

-सौरभ.

:)

राजेंद्र माझा काका आणि अभिजीत माझा भाऊ. उपक्रमावरचे अभिजीत आणि राजेंद्र मात्र नाहीत ते. :-)

खुलाश्याबद्दल धन्यवाद. नाहीतर मी हा नवीन पुतण्या कोण हे शोधत बसलो असतो. :)

----

सुरेख...

एकापेक्षा एक सुरेख चित्र आहेत. पाहून खरोखरच अतिशय प्रसन्न वाटले..!

सौरभदा, जियो...!

आपला,
(पक्षीप्रेमी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

हेच

असेच म्हणतो.

साळुंक्या विशेष आवडल्या. (सामान्यत: विषमांकी साळुंक्या या -लहान मुलांमधील समजुतींमध्ये- अशुभ समजल्या जातात. तुम्ही २ येण्याची वाट पाहिली का?)

आपला,
(कावळा) आजानुकर्ण


कर्ण म्हणे आता... उरलो कट्ट्यांपुरता...

नाही..

साळुंके फॅमिली जोडीनेच फिरत होते!
विषमांकी अशुभतेची त्यांनाही कल्पना असावी! :-)

-सौरभ.

अप्रतिम

अफलातुन फोटो ...
टिकलेचा फुलटोच्या आणि साळुंक्या सर्वात जास्त् आवडल्या.....
खासच् फोटो शब्दच नाहीत...

अप्रतिम फोटो

फोटो खूप आवडले.

हे फोटो कुठे काढले आहेत? घराबाहेरच असतील तर भरपूर हिरवेगारपणा आहे - शहरातीलच का?

हे..

हे सर्व पक्षी शहरातल्या गजबजाटात अगदी थोडिशी हिरवाई असेल तरी दिसतात. आमच्या घराच्या मागच्या बाजुला अंगणात थोडी झाडे आहेत, तिथेही हे दररोज 'आलेले सदस्य' असतात :)
-
ध्रुव

पणदरे गावात

लेखकाने पहिलेच वाक्य लिहिले आहे त्यात फोटो कुठले आहेत त्याचा खुलासाही आहे. मीच फोटो पाहण्याच्या नादात ते वाक्य वाचले नाही. :)

हो शहरातील गजबजाटातही काही पक्षी येतात हे खरे आहे. :-) पण शहरात अभावाने सापडणारी हिरवाई प्रसन्न करून जाते.

छायाचित्रे

शरद
.छान.

मस्त

पक्षी खूप आवडले.

सुंदर

सुंदर चित्रे आहेत. प्रतिसादांशी सहमत आहे.

----

सुंदर

सुंदर चित्रे आहेत. प्रतिसादांशी सहमत आहे.

----

फारच छान

फोटो खूप आवडले... इतक्या प्रकारचे पक्षी महाराष्ट्रात अजून दिसू शकतात आणि महाराष्ट्राचा सायलेंट स्प्रिंग झालेला नाही हे पाहून आनंद झाला!

आवडले

मस्त फोटो !!!

छान चित्रे!

शेवटचा फोटो सर्वात जास्त आवडला. पिवळी धमक चोच आणि त्याला मॅचींग मागची फुले ही रंगसंगती खूप आवडली. ऍपर्चर अजुन मोठे ठेउन पार्श्वभुमी अस्पष्ट केली असती तर चित्र आणखी लक्षवेधक झाले असते.

पहिल्या काही चित्रांमध्ये आयएसओ ४०० थोडा जास्त वाटला काही विशिष्ठ कारण?

होय..


शेवटचा फोटो सर्वात जास्त आवडला. पिवळी धमक चोच आणि त्याला मॅचींग मागची फुले ही रंगसंगती खूप आवडली. ऍपर्चर अजुन मोठे ठेउन पार्श्वभुमी अस्पष्ट केली असती तर चित्र आणखी लक्षवेधक झाले असते.

सहमत आहे. ऍपर्चर मोठे ठेऊन आणखी लक्षवेधक नक्कीच झाले असते. पण खरं सांगायचं तर त्यावेळी मला फारसं काही सुचत नव्हतं आणि तांत्रिक बाबींकडे मी फारसे लक्षही दिले नाही. आता नक्की लक्षात ठेवेन.
आयएसओ जास्त ठेवण्याचे काही विशेष कारण नाही. ३५० डी मध्ये जास्तीत जास्त ४०० पर्यंत चालून जातो. पुढे मात्र noise येतो आणि फोटोपण ग्रेनी दिसतो.

-सौरभ.

मस्त!

सगळेच पक्षी मस्त टिपलेत!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

वा

वा !
पक्ष्यांची चित्रे सुंदर आहेत. चश्मेवाला या चंचल पक्ष्याचा फोटो छानच मिळाला.
ब्राह्मणी मैनेचा फोटो छान आहे. बाभळीची फुले फुलली आहेत ते सुद्धा सुंदर दिसत आहे.
शिंजीरचा फोटो सुद्धा अवघडच असतो..तो सुद्धा छान आला आहे.
अभिनंदन.

पहिला फोटो शिंपी पक्ष्याचा म्हणजे टेलर बर्डचा आहे असे मला वाटते. (टिकेलचा फुलटोचा तो नसावा. टिकेलचा फुलटोचा पूर्ण करडा असतो.)
--लिखाळ.

अरे व्वा!

लिखाळ, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
तो पक्षी नक्की टेलरबर्डच असावा. हे पहा चित्र.(जालावरून साभार.)

'भारतीय पक्षी' पुस्तकातला टिकेलचा फुलटोच्या पण याच्यासारखाच दिसतो आहे :-) संदर्भासाठी अजून खात्री न करता तेच नाव दिले. :-(

-सौरभ.

हा शिंपीच

हा शिंपीच असावा. त्यात ते पिलू आहे असे वाटते आहे. त्याला नीट पिसे आलेली दिसत नाहित. फोटो चांगलाच काढला आहे (जालावरचा आणि तुम्ही काढलेला. दोन्ही!)

अनेकदा पक्ष्यांचे फोटो इतके झटकन काढावे लागतात की तेव्हा चित्रातील मांडणीचा फारसा विचार करता येत नाही. त्यामुळे चित्र नंतर क्रॉप केले आणि मांडणी आकर्षक केली तरी हरकत नसते. पक्ष्याच्या ठराविक सवयी माहिती झाल्या, त्याची पुन्हपुन्हा एकाच जागी येऊन बसण्याची ढब असेल तर फोटो काढतानाच योग्य कंपोज करता येतो. तुमचे प्रयत्न चांगलेच आहेत.

गडद सावलीत पक्षी असेल आणि त्याच्या मागे आकाश अथवा ऊन असेल तर एक्सपोजर काँपेनसेशनचा विचार आधीच करुन ठेवावा लागतो. पक्ष्यावर ऊन आणि पाठीमागे गडद सावली ही रचना सर्वात उत्तम. तशीच रचना आपण जालावरुन घेतलेल्या शिंप्याच्या फोटोत आहे.

पुढील चित्रांसाठी शुभेच्छा.
--लिखाळ.

पहिला शिंपीच :)

पहिला फोटो शिंपी पक्ष्याचाच आहे.

-
ध्रुव

धन्यवाद..

ध्रुव,धन्यवाद!

अप्रतिम

सगळीच छायाचित्रे आवडली. सुरेख आहेत. आश्चर्यचकित, किंचित हताश अशा चिमणरावांची मुद्रा मस्त टिपली आहे. [कदाचित मोरूने आपल्या आंतरजातीय विवाहाची माहिती दिल्यावर खर्‍या चिमणरावांचा चेहराही असाच झाला असता :).]

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

कुल फोटो

बुलबुल सोडून सग़ळेच फोटू आवडले. चष्मेवाला सह्ही आलाय.
त्यातहि साळुंके फ्यामिलिला टिपताना जो फोकस साधला आहे त्याला तोड नाहि :)
खूप मस्त!

अवांतरः

पक्ष्यांची माहिती 'भारतीय पक्षी' , लेखक - 'सलीम अली, लईक फतेहअली' या पुस्तकातून साभार

माझ्याकडेहि हे पुस्तक हतं. एका परिचिताने २ दिवसांसाठी नेलं आणि "हरवलं" असे सांगितले .तरी बरं त्याच्या मुलीने पक्षांवरचे प्रोजेक्ट आदल्यादिवशीच दाखवले होते .. पुस्तक परत न करण्यासाठी चक्क हरवले म्हणणे म्हणजे ..... असो.... आता ते आऊट ऑफ प्रिंट आहे. तेव्हापासून मी कोणालाहि माझी पुस्तके देत नाहि. आज ह्या पुस्तकाचे नाव वाचून ती जखम पुन्हा ओली झाली आणि त्या परिचितांचा नव्याने राग आला ;)

(बिनचष्याचा)ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

अरेरे...

ऋषिकेश प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
तुझं पुस्तक नेणार्‍या आणि परत न करण्यासाठी हरवले म्हणणार्‍या परिचिताचा निषेध. (हे परिचित एका झाडाखाली उभे राहोत आणि वरुन पक्ष्याचा प्रसाद त्यांना मिळो :-)
चांगली बातमी ही की मी मागच्याच शनिवारी १८ ऑक्टोबरला 'पुणे बुक फेअर' मधून हे पुस्तक विकत घेतले. नॅशनल बुक ट्रस्ट च्या स्टॉलवर ४५ रुंना मिळाले. त्यामुळे आऊट ऑफ प्रिंट असण्याचा प्रश्नच नाही. (बाकी सगळ्यांसाठी माहिती देतो की कोणत्याही पुस्तक प्रदर्शनात 'नॅशनल बुक ट्रस्ट'च्या स्टॉलवर डोळा ठेऊन असावे. चांगली पुस्तके खूप स्वस्तात मिळतात.)

-सौरभ.

कॉपीराईटचा मुद्दा...

प्रतिसाद देऊन चित्रे आवडल्याचे कळवण्यार्‍या, सुचवण्या सांगणार्‍या सर्वांचे आभार.

आताच मागे विसुनानांच्या लेखात कॉपीराईटची चर्चा झालेली होती. या लेखासाठी मी आधी फ्रेम आणि कॉपीराईट मार्क न करता चित्रे टाकणार होतो. पण नंतर असा मार्क टाकून चित्रे देण्याचा विचार केला. पण एका ठिकाणी मी असेही वाचले की असा मार्क काढणेही काहीच अवघड नाही. फोटोशॉपवर काहीही करता येणे शक्य आहे. मग असा मार्क टाकावा की टाकू नये?
याचबरोबर असेही वाटते की मार्क काढण्याएवढे फोटोशॉपचे ज्ञान असणारे असा भुरटा प्रकार करणार नाहीत.
इथल्या सर्व सदस्यांना काय वाटते?

-सौरभदा.

कॉपीराईट

तुझ म्हणणं अगदी खरं आहे. फोटोशॉपमध्ये वॉटरमार्क काढून टाकणे सहज शक्य आहे. मी जाहिरात क्षेत्रात काम करत असल्याने माझ्या अनुभवावरून असे सुचवेन की, त्यापेक्षा छायाचित्रांवर तू नावासोबत तुझा एखादा ईमेल आयडी का टाकत नाहीस? जेणेकरुन एखाद्या व्यक्ती वा संस्थेस तुझे छायाचित्र व्यावसायिक उपयोगासाठी हवे असल्यास ते तुला संपर्क साधु शकतील.

बाकी माझ्या ऐकीव माहिती प्रमाणे छायाचित्रे स्वाभाविकतःच काढणार्‍याच्या मालकीची होतात. फक्त वेळ पडल्यास ते सप्रमाण सिद्ध् करण्याची व्यवस्था तयार असावी. (चु.भू.दे.घे.)

वैयक्तिक व कोणत्याही प्रकारच्या नॉन प्रॉफिट वापरासाठी छायाचित्रे विनामोबदला उपलब्ध करुन देण्यास हरकत नाही या मताचा मी आहे. त्याच सोबत वापरणार्‍यानेही क्रेडीट लाईन टाकाण्याचे सौजन्य बाळगावे.

वरील सर्व छायाचित्रे सुंदर या सर्वांच्या मताशी १०० % सहमत. पक्ष्यांवरून आठवलं. मुंबईत माहुल व शिवडी खाडी परिसरात फ्लेमिंगोंचे थवे पाहण्याचा आनंद शब्दात व्यक्त करणे कठीण आहे, तो तू छायाचित्रबद्ध् नक्कीच करू शकतोस.

जयेश

धन्यवाद...

जयेश आपल्या प्रतिसादाबद्दल खरेच धन्यवाद. नावाबरोबर ईमेल आयडी टाकण्याचाही विचार करता येईल.
छायाचित्रे स्वाभाविकतःच काढणार्‍याच्या मालकीची होतात ही नवीनच माहिती कळाली. पण वेळ पडल्यास ते सप्रमाण सिद्ध् करण्याची व्यवस्था तयार असावी म्हणजे नक्की काय करावे?
वैयक्तिक व कोणत्याही प्रकारच्या नॉन प्रॉफिट वापरासाठी छायाचित्रे विनामोबदला उपलब्ध करुन देण्यास हरकत नाही हे मत पटले.
फ्लेमिंगोंच्या माहितीबद्दलही आभार.

-(होतकरु) सौरभ :-)

युनिक फोटोग्राफी

युनिक फोटोग्राफी.
आपल्याला पक्ष्यान्विषयी अधिक जाणून घ्यायची आवड असल्यास सा. सकाळच्या दिवाळी अन्कातील इन्गळहळीकर यान्चा लेख जरूर वाचा.

अप्रतिम

फोटो तर खूपच छान आहेत आणि शेवटचा पक्षी ब्राह्मणी मैनाच आहे....
आकाराने मैने पेक्षा लहान असून वरील रंग राखी तर खालील रंग तांबूस पिवळसर असतो.डोके चकमकीत काळे त्यावर काळी शेंडी .पंखाच्या कडा काळ्या आणि शेपूट पिंगट व शेपटीच्या टोकाची पिसे पंढरी .नर मधी दिसायला तसे सारखेच असतात.हे भारीय निवासी आहेत......संधर्भा पक्षी मित्रा मारुती चितमपल्ली.

 
^ वर