चंद्रयान - १

हे चंद्राकडे जाणारे भारताचे पहिले यान श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून अवकाशात झेपावलेले आहे. ते सुमारे पांच दिवसांनी चंद्रावर पोचेल आणि त्याच्याभोंवती
१०० किलोमीटर अंतरावरून त्याला प्रदक्षिणा घालत राहील. या घिरट्या घालत असतांनाच त्यावर बसवलेल्या अत्याधुनिक उपकरणांद्वारे चंद्राविषयी अत्यंत उपयुक्त अशी माहिती ते
यान गोळा करणार आहे. चंद्राची पृथ्वीवरून दिसणारी (सशाचे चित्र असलेली ) बाजू तसेच त्याची पलीकडली आपल्याला कधीच न दिसणारी बाजू या दोन्हींच्या पृष्ठभागाचा सविस्तर
त्रिमित नकाशा काढणे, चंद्राच्या पृष्ठभागावरील तसेच गर्भातील विविध खनिजांचा शोध घेणे वगैरे उद्देशाने ही निरीक्षणे करण्यात येणार आहेत. मॅग्नेशियम, ऍल्युमिनियम, सिलिकॉन,
कॅल्शियम, लोह, टायटेनियम आदि पृथ्वीवर ब-या प्रमाणात सापडणारी मूलद्रव्ये तसेच रेडॉन, युरेनियम व थोरियम यासारखी दुर्मिळ मूलद्रव्ये यांची चंद्रावर किती उपलब्धता आहे
हे यावरून समजू शकेल. अखेर चंद्राचा जन्म नेमका कशामुळे आणि कसा झाला असावा हे समजण्याच्या दृष्टीनेही या निरीक्षणांचा उपयोग होऊ शकेल.

(ही माहिती अवकाश खात्यातर्फे प्रसिध्द करण्यात आली आहे.)

दोन अडीच वर्षांपूर्वी मी चंद्रासंबंधी विविध प्रकारची माहिती गोळा करून ती ३२ लेखांच्या मालिकेतून माझ्या ब्लॉगवर सादर केली होती. ती या दुव्यांवर पाहता येईल.
तोच चंद्रमा नभात - Unicode

तोच चंद्रमा नभात - JPEG

लेखनविषय: दुवे:

Comments

वा

चांगली माहिती दिलीत.
अजून माहिती शोधायला गेलो तर मराठीमध्ये फारशी मिळाली नाही.

http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%...

शक्य असेल तर हा लेख पुर्ण करू शकाल का?
येथे माहितीची खुपच गरज आहे असे वाटले.

आपला
गुंडोपंत

 
^ वर