उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
रेषेवरची अक्षरे २००८
मेघना भुस्कुटे
October 22, 2008 - 7:24 am
मराठी ब्लॉगविश्व आता केवळ हौशी नवोदितांचे माध्यम उरलेले नाही. अक्षर साहित्यात ज्याला हक्काचे स्थान मिळेल असे सकस लिखाण इथले
कित्येक लेखक सातत्याने करत आहेत.
या लेखनातील सुमारे ६० निवडक ब्लॉग्सचे वाचन करून या वर्षी ३१ ऑगस्टपर्यंत प्रकाशित झालेल्या नोंदींपैकी काही वेचक नोंदी आम्ही निवडल्या आहेत. या नोंदी त्या त्या लेखकांच्या ब्लॉगपत्त्यासह आणि लेखकांच्या जालीय नावासह 'रेषेवरची अक्षरे २००८' या नावाने एका पीडीएफ फायलीत प्रकाशित करण्यात आल्या आहेत. भाषा, आशय, नाविन्य आणि घाट अशा निकषांवर ही निवड करण्यात आली आहे.
हा 'रेषेवरची अक्षरे २००८'चा दुवा - http://sites.google.com/site/reshewarachiakshare2008/?pli=1
या लेखनाचे अंतिम हक्क लेखकांकडेच राहणार असून या उपक्रमात कोणताही आर्थिक व्यवहार अंतर्भूत नाही.
संकलन वाचून आपले मत जरूर कळवा.
दुवे:
Comments
अभिनंदन
अंक फार आवडला. (आमचा लेख असल्यामुळे तर फारच ;) ) .
हा नवा उपक्रम अतिशय उत्तम आहे. इतके कष्ट घेऊन नेटका अंक बनवल्याबद्दल संपादन मंडळाचे हार्दिक आभार. :)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
अभिनंदन
आमचे परममित्र आजानुरावांचा लेख या लेखसंग्रहात आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
अभिजित...
ता. कर्हाड जि. सातारा.
अभिनंदन
छान सुरूवात झाली आहे, पुढील वाटचालीला शुभेच्छा.
प्रतिक्रिया : १
अंक वाचन चालू आहे. काही कामामुळे हवा तसा निवांतपणा मिळत नव्हता. त्यामुळे ही प्रतिक्रिया विस्कळित , अपूर्ण ठरेल.
संपादिकेचे अभिनंदन केलेच आहे. या कामात बरीच मेहनत केली असणार , बराच वेळ दिला असणार. या सार्याबद्दल कौतुक वाटते. शाबासकी द्यावीशी वाटते.
आता अंकाबद्दल. अंकामागची भूमिका प्रस्तावनेत उत्तम रीतीने विशद केलेली आहे. माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे, याची नोंद की , या अंकात कुठल्याही प्रकारचे मीमांसक लेखन : म्हणजे साहित्य, चित्रपट , संगीत , पौराणिक ग्रंथ इतिहास याबाबत विवेचन असणार नाही व सामाजिक/राजकीय विषयावरील लिखाण असणार नाही. हे वाचतानाच, वाचकाच्या अपेक्षा पुरेशा अचूकपणे प्रस्थापित झाल्या. याचा अर्थ सरळ होता की, या अंकातील लिखाणाचे स्वरूप केवळ "ललित" असे म्हणता येईल.
"ललित लिखांण" असे ज्याला पारंपारिक रीत्या म्हण्टले जाते त्यामधे कथा/कादंबर्या/कविता/लघुनिबंध( किंवा ललितलेख)/विनोदी स्फुटे/ प्रवासवर्णने याचा सामान्यतः अंतर्भाव होतो. नाटक/एकांकिका/नाट्यछटा सुद्धा यात अर्थात येतातच. आणि ब्लॉगविश्वाशी ज्याचा संबंध येणे प्रायः अशक्य आहे अशा महाकाव्याचाही समावेश यात करता येईल. आत्मचरित्रातील एखादा अगदी छोटासा भाग यात येऊ शकेल ; परंतु याच्या आणि ललितलेख यातील सीमारेषा फारच धूसर ठरतील.
पैकी प्रस्तुत अंकात कविता/लघुनिबंध( किंवा ललितलेख)/विनोदी स्फुटे/ प्रवासवर्णने स्थान मिळाल्याचे दिसते. यापैकी प्रवासवर्णन आणि विनोद यांचा परामर्शे वेगळा घ्यावा लागेल. आणि या दोन विभागांचे प्रमाण एकूण अंकामधे थोडे आहे. राहिलेल्या लिखाणाबद्दल एक महत्त्वाचे सूत्र मला दिसले. एकूण निवडीचे निकष लक्षात घेतां वैयक्तिक अनुभवाच्या चित्रणाला प्राधान्य मिळणे अपरिहार्य. आणि अनुभव ग्रहण करताना संवेदना आणि विचार या दोन प्रमुख फॅकल्टीज् (मराठी शब्द ?) पैकी संवेदनांना प्राधान्य मिळालेले दिसते. याचे एक कारण असे की, विचार या फॅकल्टीवाटे जेव्हा आपण आपल्याला येणार्या अनुभवाचे ग्रहण करतो तेव्हा त्याला सामाजिक/राजकीय/ऐतिहासिक/सांस्कृतिक संदर्भ बहुशः चिकटून येतात. आपण आपल्या विचारांची सांधणी एका पोकळीत बहुशः करत नाही. याउलट संवेदनशीलतेला जे टिपायचे त्याचे स्वरूप बहुतांशी सार्वभौम असे ठरते. आणि एकूण अंकाच्या निवडीशी , संपादनप्रक्रियेशी या प्रकारचे अनुभव नैसर्गिकरीत्या मेळ खातात.
अंक वाचायला सुरवात केली आणि अपेक्षांना फार धक्का बसेल असे (चांगल्या किंवा वाईट, दोहो अर्थांनी) दिसले नाही. काही लेख वाचले , काही कविता वाचल्या. त्याबद्दलची इम्प्रेशन्स थोडी सांगता येतील. एकेका कलाकृतीचा आढावा घेत घेत शेवटी सार्या अंकाचे सिंहावलोकन आणि एकूण ताळेबंद असे खरे तर लिहायला हवे. यापैकी पहिल्या भागाबद्दलचे थोडेसे याच धाग्यात हळुहळू लिहीत राहीन.
अभिनंदन !!!
अंक आज चाळला, ब्लॉगवरील उत्तम लेखन निवडणे तसे कठीन काम आहे. अंकासाठी संपादक मंडळाने घेतलेल्या मेहनतीचे कौतुक आहेच. या उपक्रमात सहभागी सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन !!!
तात्या, आजानुकर्ण, अनुराधा कुलकर्णी, आणि मेघना भुस्कुटे या परिचितांचे लेखन यात दिसले त्याचाही आनंद आहेच, या सर्वांचे अभिनंदन !!!
कुठे?
यादीतील एक नांव चुकले आहे हे नमूद करावेसे वाटते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
प्रकाटाआ
प्रकाटाआ.
लोकसत्तेमधील बातमी
ह्या अंकाबद्दलची लोकसत्तेत आलेली बातमी पाहा.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
खूपच छान
अंक आणि कल्पना दोन्ही!
उत्तम उपक्रम
सुरुवातीची कविता आवडली. सवडीने लेख वाचेनच. दरवर्षी हा उपक्रम सुरु ठेवावा.
आनंद जाहला
मेघनाताई अगदी बरोबर आहे. वाचकांना पुरुन उरेल इतके दर्जेदार लिखाण विखुरलेले आहे. ओळखीची नावे वाचुन बरे वाटले.
प्रकाश घाटपांडे
अभिनंदन
सुंदर संकलन..तितके दिवस वाचत होतो म्हणून प्रतिक्रियेसाठी थांबलो होतो.
असेच प्रकाशरावांसारखे म्हणतो.
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
मस्तच
अतिशय सुरेख कल्पना, आणि आवडणारे लेखन.
मी हा अंक इतक्यातच मुद्रीत केला आणि बांधणीही केली. (आशा आहे की यात कॉपीराईटचा भंग होता नाही....! :-) )
त्याचवेळी जाणवले की हा अंक साधारण दिवाळी अंका येवढा हवा होता (सुमारे १०० पाने किमान!)
शिवाय अनेक (मला वाटत असलेले) महत्वाचे ब्लॉग्ज यात आले नाहीयेत हे पण जाणवले. उदा. पामर, बातमीदार व इतर अजून.
असे का झाले असावे बरं?
-निनाद
आभार मंडळी
अभिनंदन, कौतुक आणि प्रतिसादाबद्दल आभार मंडळी. हा उपक्रम चालू ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करूच. तुमच्या सुचवण्यांचं स्वागत आहे.
बातमीदार आणि इतर काही ब्लॉग्सबद्दलः
निनाद, असा दावा अजिबातच नाही, की ब्लॉगविश्वातलं सगळंच्या सगळं उत्तम लिखाण आम्ही वाचलं आहे. प्रस्तावनेत नमूद केल्याप्रमाणे सुमारे ६० निवडक ब्लॉग्स वाचले. फक्त ललित आणि तत्कालीन संदर्भांशिवायही अर्थपूर्ण असलेली सर्वोत्तम पोस्ट्स निवडण्याचा प्रयत्न केला. यात काही दर्जेदार लिखाणावर नकळत अन्याय झालेला असणं अगदी सहज शक्य आहे. याला इलाज नाही, इतकंच म्हणता येतं.
रेषेखालील अक्षरे - २००८!
आम्हीही लौकरच "रेषेखालील अक्षरे - २००८" हा एक अंक काढण्याचा विचार करत आहोत..
असो, सदर माहिती आम्ही उपक्रमाच्या माहिती-पटलावर ठेवत आहोत..
आपला,
(संभाव्य संपादक - रेषेखालील अक्षरे - २००८!) तात्या. :)
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!