उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
डोम्बिवली-नगरमध्ये संस्कृत-अनुरागिणां संस्कृतेन सम्मेलनम्
सृष्टीलावण्या
October 11, 2008 - 4:46 am
सुन्दरी च सरला च मधुरा च एषा भाषा, आगच्छन्तु, आगच्छन्तु, आस्वादयन्तु ।
*
*
*
*
*
![]() |
दुवे:


Comments
निमंत्रण पत्रिका आवडली
:)
निमंत्रण पत्रिका आवडली :)
(सुसंस्कृत) ऋषिकेश
:)
संस्कृत-अनुरागिणां संस्कृतेन सम्मेलनम्
बापरे !!! शिर्षकावरुन काहीतरी मोठा कार्यक्रम दिसतो. :)
'संस्कृत' ही अखिल मानवाची भाषा व्हावी, यासाठी प्रयत्न करणा-यांना हार्दिक शुभेच्छा !!!
धन्यवाद !!!
'संस्कृत' ही अखिल मानवाची भाषा बनवण्याचा उल्लेख किंवा दावा मला तरी कुठे दिसला नाही.
आपण केलेल्या स्पष्टीकरणाबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. खरं म्हणजे आपल्याला शाळेत संस्कृत शिकायला मिळाले आणि त्या ज्ञानावरुन आपण केलेले वरील स्पष्टीकरणाबद्दल आपले आम्हाला कौतुकच आहे. दुर्दैवाने आम्हाला वरील विषयाचा कोणताच गंध नाही. त्यातील कोडे सोडविण्याचा फंदात आम्ही पडत नाही. शिर्षकावरुन आणि निमंत्रणपत्रिकेवरुन एक ढोबळ अर्थ आम्ही घेतला (केवळ शिर्षकावरुन शब्दशः नव्हे ) की संस्कृतचा कुंभमेळा भरत असावा आणि समस्त जनाच्या गळी संस्कृत भाषा उतरविण्याचा प्रयत्न असावा असा अर्थ आम्ही आमच्यापुर्ता अर्थ घेतला. तो विचार आम्ही कोणावरही लादलेला नाही. भव्य शोभायात्रा, संस्कृत विज्ञान प्रदर्शनी, रम्य क्रिडात्सोव, संस्कृतस्य उत्कर्षाय योजनानां चिन्तनम पंन्डितानां मार्गदर्शनम, संस्कृत नाटकम, नुतन पुस्तके प्रदर्शन आणि विक्रीम या वरुन संस्कृत ही अखील मानवाची भाषा बनविण्याची एक प्रयत्न चालू असावा आणि मृत भाषेसाठी असा एक प्रयत्न जो स्तुत्य आहे. असा आम्ही आमच्यासाठी अर्थ घेतला. आमच्या प्रतिसादात आपल्याला कोणता उल्लेख आणि कोणता दावा त्यात दिसतो किंवा तो तसा नाही, याच्याशी आम्हाला कोणतेही कर्तव्य नाही. धन्यवाद !!!
अर्थात माझ्यापेक्षा श्रेष्ठ ज्ञानापुढे मी नमतं घेतो.
आम्हीही श्रेष्ठ ज्ञानापुढे आणि विशेष करुन संस्कृतच्या विद्वानांपुढे तर सतत नमतेच घेतो. :)
जबरा!
'संस्कृत-विज्ञान-प्रदर्शन' (हे जे काही असेल ते), 'रम्य क्रीडोत्सव' (म्हणजे बहुधा वेगवेगळे खेळ असावेत - संस्कृतमधून 'डंब शराड्स' वगैरे?)
संस्कृतमधून 'डंब शराड्स' हा विचारच खरनाक आहे...
सॅल्युट्स् टू युवर क्रियेटीव्हिटी! ;)))
आपला
गुंडोपंत
बिरुटेंना खुले आव्हान
मी माझ्या पहिल्या लेखाच्या प्रतिसादांपासून पहात आलेलो आहे की हे बिरुटेमहाशय प्रत्येकवेळी संस्कृतचा गंध नाही असे म्हणतात पण जळी, स्थळी, काष्ठी, जमेल तिथे स्वत:ची पात्रता लक्षात न घेता संस्कृतवर तोंडसुख घेतात.
जर ते संस्कृतचा इतकाच तिरस्कार करत असतील तर पुढील ३ महिने त्यांनी मराठी बोलताना आणि लिहिताना एकाही संस्कृत शब्दाचा वापर करू नये. उदा. धन्यवाद, अखिल, मानव, अर्थ इ.
त्या ऐवजी उर्दु, फारसी, फ्रेंच, पाली, स्वाहिली इ. कुठल्याही भाषेतील शब्द वापरावेत किंवा पुढील ३ महिने संस्कृतचा गांभीर्याने झपाटून अभ्यास करावा आणि त्या नंतरच ह्या विभागात अभ्यासपूर्ण प्रतिसाद लिहावेत.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।
अहो, कसले आव्हान करता !
>>स्वत:ची पात्रता लक्षात न घेता संस्कृतवर तोंडसुख घेतात.
ऋजू महाराज, आपले म्हणने एकदम खरे आहे. मागे एका आपल्या संस्कृत विषयाच्या चर्चेत आम्ही भरपूर तोंड्सुख घेतले आहे. त्यानंतर वेगवेगळ्या ऋच्या त्याचा अर्थ आमच्या दृष्टीने अशा फाल्तू चर्चेत आम्ही सहभाग घेतला नाही. पुढेही घेणार नाही. संस्कृतवरील चर्चा प्रामाणिकपणे वाचत राहिलो. संस्कृत समजून घेण्याजोगी कोणतीही पात्रता आमच्यात नाही. पण चर्चेत सहभागी होणार्या एका जेष्ठ सदस्यांना शुद्धीत राहून प्रतिसाद लिहा असे म्हटल्यामुळे अशा चर्चेत आम्ही सहभागी होत नाही. त्यामुळे कितीही चांगले लिहायचे ठरवून आपल्या सारख्या विद्वानांच्या समोर संस्कृतबद्दल दुदैवाने चांगले लिहिता येत नाही, हा आमचा दोष आहे. राहिला पात्रतेचा प्रश्न, संस्कृत ही भाषा कधीही माझ्या आजूबाजूला बोलल्या गेली नाही. त्यामुळे संस्कृत कधी शिकावी वाटली नाही, तिच्याविषयी कोणतीही ओढ नाही. पुढेही शिकणार नाही. ती भाषा येत नसल्यामुळे कोणत्याही संभाषणात अडचण निर्माण होत नाही. ती भाषा शिकण्याचा प्रयत्नही करणार नाही असे वाटते.
>> जर ते संस्कृतचा इतकाच तिरस्कार करत असतील तर पुढील ३ महिने त्यांनी मराठी बोलताना आणि लिहिताना एकाही संस्कृत शब्दाचा वापर करू नये. उदा. धन्यवाद, अखिल, मानव, अर्थ इ.
अहो, महाशय, आपण जर संस्कृतचे अभ्यासक असाल तर सांगतांना अतिशय आनंद होत आहे की, कोणतीही भाषा जशाच तशी कधी कायम राहात नाही. म्हणून् आपण जो संस्कृत शब्द सोडून इतर शब्द लिहायचा आग्रह करत आहात तो प्रकार फारच हास्यास्पद आहे. त्याचे कारण असे की, कोणत्याही भाषेत कमीत कमी दोनशे वर्षात अनेक शब्दांसहीत अनेक बदल होत असतात. त्यामुळे आपण उल्लेख केलेले शब्द हे संस्कृतच आहेत,असावेत हा गैरसमज काढून टाकावा. उदाहरणच सांगायचे झाले तर 'देवा' याबद्दल 'देवासः ' देवौ:' याबद्दल 'देवेभि' अशी रुपे आपणास वैदिक काळातच दिसतील याचाच अर्थ कोणत्याही भाषेतील शब्द हे सतत बदलत असतात तेव्हा हे शब्द् सोडून दुसरे शब्द लिहावे, असा आग्रह धरणे मला तरी मोठा विनोद वाटतो.
>>पुढील ३ महिने संस्कृतचा गांभीर्याने झपाटून अभ्यास करावा आणि त्या नंतरच ह्या विभागात अभ्यासपूर्ण प्रतिसाद लिहावेत.
हा हा हा :) संस्कृत या विषयावर झपाटून अभ्यास करण्याची आम्हाला गरज वाटत नाही . मृत भाषेवर गांभिर्यपूर्ण लिहावे असे आम्हाला स्वप्नातही वाटत नाही. तेव्हा त्याच्यावर अभ्यासपूर्ण प्रतिसाद लिहिण्याचा प्रश्नच उरत नाही. तेव्हा आपण म्हणत असाल तर यापुढे आम्ही या विभागात प्रतिसादच लिहिणार नाही. आपण मात्र संस्कृत व्यतिरिक्त उपक्रमवरील लेखांना मनापासून दाद द्यायला विसरु नका, हेही सांगावेसे वाटते.
यात काय आही?
बिरुटे साहेब,
सहीच बरं का!! काय हाणलंय...
(काहीही म्हणा, पण हाणायला संस्कृत काही कामी येते नाही राव.
कारण त्यात शिवी दिली तरी ती मंत्र म्हंटल्या सारखीच वाटते.
काही दमच नसतो, येकदम पांचट!
समोरचा उचकटायच्या ऐवजी हसायलाच लागतो.)
बाकी तुम्ही दिलेल्या शुभेच्छाही या लोकांना इतक्या बोचाव्यात?
येथे तर तुम्ही कोणताही तुच्छतापुर्ण प्रतिसाद दिला आहे असे मला तरी आढळलं नाही बॉ!
असो,
आपल्या काही विचारांशी सहमत
आपला
गुंडोपंत
अरेरे,
आपण कान बंद करून फिरता का? कारण संस्कृत हे सर्व बोली भाषांमध्ये आढळते.
आता आपल्याला शांताबाईंबद्दलसुद्धा आदर नसेल तर प्रश्नच खुंटला.
____________________________________________________________________
सुन्दरी च सरला च मधुरा च एषा भाषा, आगच्छन्तु, आगच्छन्तु, आस्वादयन्तु ।
तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तोम् ।।
शांताबाईंचे शेवटचे वाक्य पटले
तद्भव शब्द मराठमोळे झाले असल्यामुळे "इधोशी" "इसाळू", "माणूस", "पाणी", वगैरे शब्दांचा गोडवा ओळखावा. त्यांचा उद्धार, शुद्धीकरण वगैरे करू नये.
आम्ही लहान असताना संस्कृत परीक्षा द्यायला, श्लोकपठन करायला, मडगाव येथे जायचो. एकच वाईट वाटायचे की कार्यक्रमाच्या पत्रकात स्थळाचे नाव "मठग्राम" असे लिहिले जायचे. (मठग्रामे आयोजितं श्लोकपठनम्... वगैरे)
"मडगाव" हे गोड नाव संस्कृतमध्ये लिहायचे म्हणून 'उद्धार' केला तर कोकणीच्या गोडव्याला हिणकस म्हटल्यासारखे वाटायचे. संस्कृतातही "मडगाव" असे म्हटले तर चालले असते, असे आता वाटते. (म्हणजे "मडगावे आयोजितं श्लोकपठनम्" असे...)
"मडगांवांन येवजण केल्ली स्लोक म्हणपाची कार्यावळ..." सर्व संस्कृतोद्भव शब्द असले तरी कोकणीतले ध्वनी लळा लावून जातात... असो.
हुं,
खरे आहे. मी सहमत.
एक मात्र खरे की संस्कृत ही विशेषत: बहुजन समाजाची सुद्धा बोलीभाषा होती. बिरुटे साहेबांनी नाकारले तरी. उदा. कवि कालिदास गुराखी, ऋषी वाल्मिकी (बहुदा महादेव) कोळी, सत्यकाम जाबाली वंश अज्ञात इ.इ.
असे नसते तर वाल्या कोळी १ लक्ष+ श्लोकांचे रामायण संस्कृत मधून लिहू शकला असता का?
_______________________________________________
सुन्दरी च सरला च मधुरा च एषा भाषा, आगच्छन्तु, आगच्छन्तु, आस्वादयन्तु ।
तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तोम् ।।
सुंदर
सुंदर लेख. इथे डकवल्याबद्दल आभार.
----
हेच
हेच +१
आपला
गुंडोपंत
असेच
म्हणतो.
+१
खतरनाक प्रतिसाद. आवडला. (एका संकेतस्थळाच्या भाषेत सांगायचं तर) जहबहर्या!
-सौरभदा
शांता शेळके तुमच्या आवडत्या लेखिका आहेत आणि त्यांचं जवळजवळ सगळं साहित्य तुम्ही वाचले आहे असं तुम्ही मागे लिहलं होतं त्याची खात्री पटली.
हम्म्
>>आपण कान बंद करून फिरता का? कारण संस्कृत हे सर्व बोली भाषांमध्ये आढळते.
बहुतेक आपल्याला संस्कृत शब्द हे सर्व बोलींमधे आढळतात असे म्हणायचे असेल तर ते आम्हाला मान्यच आहे. ;)
मराठी भाषेते येणारे संस्कृत शब्द आणि संस्कृत भाषा यात आपण गल्लत करत आहात असे वाटते.
शांताबाईंच्या लेखाचा संदर्भ मस्तच !!!
पटले
मराठी भाषेते येणारे संस्कृत शब्द आणि संस्कृत भाषा यात आपण गल्लत करत आहात असे वाटते.
वा! पटले.
अशी गल्लत तर मी पण करतो असे आता मागे वळून पाहतांना वाटले.
आपला
गुंडोपंत
अपप्रचार थांबवावा
संस्कृत संमेलन आहे ही गोष्ट विशेष आहे. भाषा मृतवत होत असल्यास ती वृद्धिंगत करण्याचे प्रयत्नही पटण्याजोगे. परंतु
हा अपप्रचार कशासाठी? शांताबाई शेळके यांचा लेख उत्तम आहे, आधीही वाचलेला आहे. परंतु उद्या एखाद्या प्रथितयश लेखकाने/ कवीने लिहिले की हल्ली सर्व भारतीय भाषांत इंग्रजी शब्द आढळतात. (जसे, ग्यास, ठेसन, डागदर, प्येपर , प्यांट, एश्टी वगैरे वगैरे) त्यामुळे भारताची बोलीभाषा इंग्रजी आहे असे म्हटले तर चालेल का?
विद्वान जी भाषा बोलतात किंवा जी भाषा ज्ञानभाषा/ राजभाषा असते तिच्यात नवनवे शब्द बोलीभाषेपेक्षा अधिक येतात. त्या अनुषंगाने बोलीभाषा असे नवे शब्द आपापल्या समजूतीनुसार स्वीकारणे सहजशक्य आहे आणि बहुधा तसे होतेच.
कवी कालिदास आणि वाल्मिकी यांच्याबद्दल तज्ज्ञांमध्ये अनेक शंका आहेत. विशेषतः वाल्या कोळी आणि वाल्मिकी एकच नाहीत यावर अनेकांचे शिक्का मोर्तब आहे. तरीही यांना एकच मानले म्हणून दोन चार व्यक्तिंना पुढे करून अखिल भारताची भाषा संस्कृत होती सारखी विधाने पटणारी नाहीत. फारतर, ब्राह्मणेतरांना शिक्षणाची संधी मिळत असावी असे म्हणता येईल पण तेही धारिष्ट्याचे आहे. गेल्या ५००० वर्षांत हाताच्या बोटांवर मोजण्याची गरज नाही इतपत ब्राह्मणेतर लेखक/ कवींची उदाहरणे देता येत असतील तर ती उदाहरणे न ठरता अपवाद ठरतात हे लक्षात येते.
शांताबाई म्हणतात की बोलीभाषेने अनेक संस्कृत शब्द अंगीकारलेले आहेत. हे सत्यच आहे पण याचा विपर्यास भारताची बोलीभाषा संस्कृत होती असा कृपया करू नये.
लेखिकेची वैयक्तिक पातळीवर उतरण्याची पद्धत लक्षात घेऊन ही विनंती की कृपया यावर बोलायचे झाल्यास विषयाशी संबंधीत बोलावे.
सहमत..
शांताबाई म्हणतात की बोलीभाषेने अनेक संस्कृत शब्द अंगीकारलेले आहेत. हे सत्यच आहे पण याचा विपर्यास भारताची बोलीभाषा संस्कृत होती असा कृपया करू नये.
प्रियालीशी सहमत आहे...
दुसरे एक उदाहरण द्यायचे झाले तर -
आमचे धुणंभांड्यांचं काम करणारी शिताबाई फॅन, टेबल, टीव्ही इत्यादी इंग्रजी शब्द तिच्या बोलीभाषेत अगदी सहज वापरते. याचा अर्थ इंग्रजी ही तिची बोलीभाषा आहे असा होत असल्यास मी स्वत:ला रामा-रामौ-रामा: हे शंभरवेळा घोकण्याची शिक्षा करून घेईन.. :)
तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
हेदेखिल सत्यच
शांताबाई म्हणतात की बोलीभाषेने अनेक संस्कृत शब्द अंगीकारलेले आहेत. हे सत्यच आहे
हे सत्य आहेच पण त्याबरोबरच हेदेखिल सत्य आहे की, संस्कृतने तत्कालीन बोलीभाषांबधून अनेक शब्द स्वीकारले आहेत.
असो, संमेलनाला शुभेच्छा!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
शेवटचे वाक्य मस्त!
संस्कॄत शब्द जे मराठी झाले आहेत ते आता मराठी आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.. माझ्या ऑफीसात पटवर्धन आडनावाचा मुलगा जन्मापासून हैद्राबादमधे आहे. त्याला मराठी येत नाहि. तो स्वतःला मराठी समजत नाहि. मात्र इतरच "मुळचा मराठी हो तो" करून उगाच 'आपल्यात' ओढायला बघतात नी तो अस्खलीत तेलूगूमधे "मी मराठी नाहि" ठणकावतो :)
थोडक्यात काय तर,
हेच योग्य वाटते.
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
उत्तम कार्यक्रम
चांगला कार्यक्रम आहे.
कार्यक्रम उत्तम होवो या शुभेच्छा.
(हल्ली येथे शुभेच्छा द्यायला पण भीतीच वाटते...;)) )
तसेच कार्यक्रम कसा झाला याचा वृत्तांत सदृष लेखही वाचायला आवडेल.
(शक्य तोवर मराठीत.)
आपला
गुंडोपंत
डिस्क्लेमरः
कोणत्याही तुच्छतापुर्ण/उपहासा सारख्या कोणत्याही प्रकारे या शुभेच्छा दिलेल्या नाहीत. मनापासून दिल्या आहेत. तसेच वाचतांना याचा स्वर (टोन)कसा असावा हे गुंडोपंतांच्या हाती नाही नसून, वाचणार्यांच्या हाती (डोळी/गळी) आहे, याची नोंद घ्यावी.
- गुंडोपंत
शुभेच्छा
कार्यक्रमासाठी शुभेच्छा
शुभेच्छा
कार्यक्रमासाठी अनेक शुभेच्छा.
----
शुभेच्छा
कार्यक्रमासाठी हार्दीक शुभेच्छा.
शुभेच्छा
कार्यक्रमासाठी अनेक शुभेच्छा.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
संस्कृत : अवांतर
वरील चर्चा वाचल्यानंतर कूतूहलाने थोडे शोधले तर असे दिसले की सिलोनमध्ये एका जमातीचे लोक अजूनही रोजच्या व्यवहारात (लेख १९०७ मधला आहे, सध्या माहीत नाही) संस्कृत बोलतात. हे आत्ताही होत असल्यास तिथे जाऊन बघायला नक्कीच आवडेल.
----
छान दुवा.
वाचून मस्त वाटले. अफगाणीस्थानातसुद्धा काही संस्कृत शिलालेख मिळाल्याचे स्मरते.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।
शांताबाईंचा लेख
शांताबाईंचा लेख अतिशय आवडला. इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
संमेलन
संमेलन कसे झाले?
फोटो, प्रमुख घडामोडी, उद्द्यिष्टे, नवे प्रकल्प इ. इ. वृत्तांत वाचायला आवडेल.