छायाचित्रकला-८
ह्या भागात आपण फ़ोटो कॉम्पोझिशन यावर थोडी माहिती घेऊ. जेंव्हा मानवाने गुंफ़ेतल्या भिंतीवर चित्रे काढण्यास सुरवात केली तेंव्हा त्याला एक विशाल फ़लक उपलब्ध होता. बैलाचे चित्र कोठे काढले आणि हत्तीचे कोठे याने फ़रक पडत नव्हता. पण जेंव्हा त्याने कागदावर चित्र काढावयास सुरवात केली तेंव्हा त्याला एक बंधन आले. आता त्याचे चित्र एका चौकटीत बंदिस्त झाले होते. बघणाऱ्याची दृष्टी आता त्या चौकटीतच फ़िरणार होती. हत्ती कोठे आणि बैल कोठे याला मह्त्व प्राप्त झाले. विशेषत : पाश्चिमात्य चित्रशैलीत. ऐतिहासिक भारतीय चित्रकलेने तिकडे दुर्लक्ष केले तर चीनमध्ये मोकळ्या सोडलेल्या जागेला असाधरण महत्व मिळाले. फ़ोटोग्राफ़ीबद्दल विचार करताना आपण पाश्चिमात्य शैलीचाच उपयोग करतो.
काय होते की आपण एखादा फ़ोटो/चित्र बघतो तेव्हा आपली दृष्टी एकदम सगळा फ़ोटो/चित्र पहात नाही. प्रथम आपली नजर चित्रातील एखाद्या प्रमुख बिंदूकडे आकर्षित होते. तेवढा भाग मेंदूत पोचे-पोचेतो नजर दुसरीकडे वळलेली असते. तेवढा भाग पाहून ती तिसरीकडे वळते.अश्या रीतीने सर्व चित्र पहाण्यास आपण दोन-तीनदा किंवा जास्त वेळही नजर फ़िरवत असतो. ह्या पध्दतीने scanning झाल्यावरच संपूर्ण चित्राचे "ज्ञान " मेंदूला होते. हा प्रवास सरलतेने झाला तर सुखावह वाटतो. यात कोठे बाधा आली तर विरसता [jaarring note] निर्माण होते. लक्षात घ्या, हे सर्व sub-conscious level[मराठी ?] वर होते. पण फ़ोटो चांगला वाटणॆ किंवा न वाटणॆ या वरच अवलंबून असते.खालील चित्रात आपली नजर कशी फ़िरते ते दाखवले
आहे.
" alt=""> |
ही फ़िरणारी नजर कोठून सुरवात करते तेही महत्वाचेव आहे.खालील चित्रातील A,B,C,D हे चार बिंदू महत्वाचे मानले जातात.
" alt=""> |
अर्थात हे सर्व चित्राना लागू नाही. उदा. चेहऱ्याच्या close up मध्ये A,B,C D य़ॆणार नाहित. पण ज्या फ़ोटोत ३-४ वस्तू नजर खेचून घेण्याचा प्रयत्न करत असतील, त्या वेळी तुम्हाला महत्वाची वाटणारी , ह्या चार बिंदूंपाशी असेल तर जास्त उत्तम. हा नियम नव्हे. कॉम्पोझिशनला वेळ असेल तर व तुम्हाला व्ह्यु फ़ाइंडर मध्ये चांगले दिसत असेल तर उपयोग करा.
चित्राची चौकट विषयाला बंदिस्त करते. बघणाऱ्याच्या कल्पनाशक्तीला नव्हे. तीला वाव द्यावा. उदा. तुम्ही profile मध्ये एक फ़ोटो काढलात. व्यक्ती डावीकडे पहात आहे. ती काय पहात असावी याची कल्पना करावयाला बघणाऱ्याची नजर चौकट ओलांडून डावीकडॆ जाते.पलीकडे काही नाही हे तुम्हाला व त्याला माहित असले तरी. डावीकडे लगेच चौकटीची रेषा आली
तर ती खटकते.म्हणून त्या बाजूला जास्त जागा सोडा. उजवीकडची कमी करा. उपक्रमवर प्रसिध्द झालेल्या एक फ़ोटोवर अशी सुचना नैसर्गिक पणाने आली होती. येथे reletivity चा उपयोग करा. डावीकडे जास्त जागा नसेल तर उजवीकडची कमी करा.
या सुचनेचा उपयोग फ़ोटोत क्षितिज येत्र असतानाही होतो. क्षितिजाची रेषा कधीही मध्यावर नसावी. आकाशातील रंगसंगती महत्वाची असेल तर तीला ५० टक्क्यापेक्षा जास्त जागा द्या किंवा जमीन-पाणी महत्वाचे असेल तर आकाश ३० टक्क्यातच बसवा. माझी मते विसरा. स्वत : फ़ोटो काढताना आकाशाला ३०, ५०, ७० टक्के जागा देऊन फ़ोटो
काढा व काय भावते ते पहा.[हेही एक प्रकारचे bracketting झाले]. इमारतीचा फ़ोटो काढतानाही वरचा भाग ५० % ला लटकावू नका.
आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे चित्रातील तोल. हे समजावून सांगणे थोडे कठीण आहे. [थोडे कसले बरेच!] कारण हा भाग थोडासा तांत्रिक व थोडासा भावनिक.एक सोपे उदाहरण घेऊ. एखादे चित्र भिंतीवर लटकावयाचे आहे. मागची दोरी खिळ्यावर लावली की चित्र जागेवर रहाते. पण बहुतेक वेळी ते कललेले असते.[बायको ओरडली] म्हणजे परत खुर्चीवर चढून, दोरीची जागा बदलतो, खाली उतरले की [तीच्या] लक्षात येते की मगाशी डावी बाजू खाली होती आता उजवी आहे. पण आता आपण हुशार झालेले असतो. खुर्चीवरून न उतरताच तीचे मत विचारतो. अगदी हेच चौकटी मधील चित्राचे होत असते.चित्रात निरनिराळ्या वस्तूना स्वताचे वजन [gravitaional नव्हे] असते. सोपे करून सांगावयाचे म्हणजे तुमचे लक्ष ओढून घ्यावयाची ताकद. चित्रातील एकाच भागात अश्या वस्तू जास्त झाल्या तर ती बाजू जड होईल, उरलेली हलकी. असे झाले की चित्र/फ़ोटो unballanced होते. दुसऱ्या बाजूला लक्ष ओढून घेणारी वस्तू असेल तर चित्र समतोल होईल. हे सर्व वर सांगितल्या प्रमाणे sub conscious level वर. असे काही होत नाही याकडे ध्यान दिले पाहिजे. ही थोडी advance photography झाली. पण सगळ्य़ा कलांमध्ये याचा विचार होतो. एक उदाहरण घेऊ. ताज महालच्या बाजूचे मिनार मुख्य इमारतीला ballance करतात. ही समतोलपणा राखणारी वस्तू दुय्यम असावी. ती वस्तू असेल [object] किंवा एखादा निराळा गडद रंगही ! वर सुचवल्याप्रमाणे अभ्यास हाच प्रत्यक्षातला गुरू. एका सुंदर इमारतीचा दुरून फ़ोटो काढा.कोन बदलून दुसऱ्या फ़ोटोत बाजूला थोडी जागा मोकळी ठेवा व त्यात एका माणसाला उभे करून परत इमारतीचा फ़ोटो काढा. जवळचा छोटा माणुस मोठ्या वास्तूला समतोलपणा देईल. दूरवरच्या टेकड्यांचा तोल राखावयास शेजारच्या झुडुपाचा उपयोग होतो.
फ़ोटोमध्ये खालील गोष्टी बघणाऱ्याचे ध्यान खेचतात व त्यांच्या सुयोग्य उपयोगाने फ़ोटो आकर्षक होतो.या पायाभूत गोष्टी पुढील :
१]shape आकार ,२] tone रंगाच्या छटा, ३] form , ४] colour रंग, 5] pattern व ६] texture. फ़ोटोमध्ये यातील एक, दोन किंवा अधीक गोष्टींचा वापर काळजीपूर्वक करता येतो.
उदा. सिल्हौटमध्ये फ़क्त shape दिसतो. जून्या दरवाजाचा फ़ोटो काढला तर त्यांत गंजलेली कडी, टवके उडालेले लाकडी दार, टेक्श्चर दाखवेल. दूरवरील डोंगरांच्या रांगा वा दाट झाडी तुम्हाला निरनिराळ्या रंगछटा दाखवेल.बागेमध्ये फ़ुलझाडांचे पॅटर्न मिळतील.रंग तर सर्वत्रच असतात पण नांगरलेल्या जमिनीचा एखाद-दुसऱ्या रंगातला फ़ोटोही छान येतो. फ़ोटो काढताना यातील कोणत्या element वर भर देता येईल त्याचा विचार करा.
असो. फ़ोटोग्राफ़ीमध्ये सुधारणा व्हावी असे मनापासून वाटत असेल तर दोन गोष्टी करा,
[१] चित्रांची / फ़ोटोग्राफ़ीची प्रदर्शने न चुकता बघा. तेथे अभ्यास म्हणून हा फ़ोटो मला का आवडला किंवा का आवडला नाही त्याचा विचार करा..आपण हा फ़ोटो कसा काढला असता ते ठरवा. फ़ोटोग्राफ़ीवरील पुस्तके / मासिके वाचा. तिथे भरपूर टिप्स असतात. इंटरनेटवर तर तुम्हाला अल्लाउद्दीनाची गुहाच भेटते. त्यात वेळ खर्च करा. सहजसाध्य आहे म्हणूनच
तिकडॆ दुर्लक्ष होते.
[२] फ़ोटो हा Art व Technic यातून निर्माण होतो. दुसऱ्या भागाकरिता एकच सुचना : आपल्या कॅमेऱ्याचे मॅन्युअल तोंडपाठ करा. सुचना पोरकट वाटते ? नाही, मी गंभीरपणे लिहित आहे. आजचे कॅमेरे तांत्रीक दृष्ट्या इतके सुधारलेले आहेत की आपण त्यांचा ५०% वापर करीत नाही. मॅन्युअलमध्ये सगळे आहे हो, फ़क्त पहा,आणि फ़ोटो काढताना विचार करत न बसता
कॅमेरा वापरता यावा म्हणून मॅन्युअलवर वेळ खर्च करा.[तरीही काही अडलेच तर व्यनि करता येतोच !]
पुढील लेख शेवटचा. कॅमेरा खरेदी करताना काय पहावे यावर.
शरद
Comments
प्राधान्यक्रम
.
ढोबळ मानाने याच प्राधान्यक्रम असाच आहे का? एकदा ग्रहांकित मासिकाचे मुखपृष्ठ पहाताना मला मासिकाचे नांव 'ग्रहांकित 'ऐवजी 'गहांकित' असे होते हे लक्षात यायला फारच उशीर झाल.
प्रकाश घाटपांडे
अनेक आभार!
आतापर्यंच्या लेखांतील हा लेख मेरूमणी वाटला.. अतिशय महत्त्वाची माहिती तितक्याच समजेल अश्या शैलीत .. व्वा! खूपच छान!
अनेक आभार!
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
सुंदर
उत्तम लेख. परत एक दोनदा वाचायला हवा. पुढच्या लेखात क्यामेर्याविषयी लिहीताना डिजीटल क्यामेर्यांविषयीही लिहावे अशी विनंती.
----
"मै तेजा हूं, मार्क इधर है."
प्राधान्यक्रम्
शरद
यात प्राधान्यक्रम असा काही नाही.महत्वाच्या, मूलभूत गोष्टी [VITAL ELEMENTS] म्हणून यांच्याकडे लक्ष वेधले. फ़ोटो काढताना अश्या गोष्टींकडे आपले ध्यान असले म्हणजे बघणारा आपोआपच त्यातले सौंदर्य अनुभवतो.
अवांतर : माझा एक मित्र आहे. त्याने सांगितले होते की संध्याकाळी ७ नंतर फ़ोन करत जाऊ नकोस. काय बोलतो आहेस ते कळावयास वेळ लागतो.असो. हसून घ्या.
शरद
डिजिटल कॅमेरा
हल्ली सगळीकडे हाच कॅमेरा वापरात असल्याने माहिती त्याच्याबद्दलच. ३५ एमेम ची कोणाला पाहिजे असेल तर विचारल्या
नंतर.
शरद
मॅनुअल
आपल्या कॅमेऱ्याचे मॅन्युअल तोंडपाठ करा.
सहमत आहे.
अभिजित...
ता. कर्हाड जि. सातारा.
हीच एक काळजी घेतो...
आळशीपणे बाकी सर्व काम ऑटो-फोकस, ऑटो-एक्स्पोझर वगैरे वरती सोपवतो. + ब्रॅकेटिंग करून चुका झाकतो. पण मांडणीकडे आणि चौकटीकडे थोडे लक्ष देतो. तेवढ्यानेही चित्रे सुधारली आहेत.
उत्तम लेख.
आवडला.
लेख एकदम झकास झालेला आहे. मॅन्युअलमधून माहिती वाचणे आणि लगेच कॅमेरा हातात घेऊन सराव करण्याने खूप फायदा होतो. मी असं बर्याचदा करतो. मात्र हे करताना कटाक्षाने एकावेळी एकच विषय निवडावा. आपण सगळं एकाच दिवशी करु पाहतो आणि मग काहीच लक्षात राहत नाही. (असा अनुभव बर्याचदा आला आहे.) ;-)
-सौरभदा
मस्तच!
लेख आवडला.
फ़ोटोग्राफ़ी चे माझे ज्ञान म्हणजे "Smile Please.." आणि " Click!"
ह्या लेखाचा नक्कीच उपयोग होईल.
आभार!
मनी...म्याऊ...