टच आणि मराठी

आयपॉड टच आणि मराठी
ऍपलचा आयपॉड आपल्याकडेही असावा आणि त्यातली गाणी मजेत ऐकावीत.
आपणही आरामात त्यातले वायरलेस तंत्र वापरून उपक्रम न्याहाळावे अथवा मटा चाळावा असे वाटले.
अशा विचाराने इतक्यातच मी हे आयपॉड टच विकत घेतले. (अर्थात नेहमीप्रमाणे सर्व माहिती न घेताच..!)
आणि मग मात्र हे वापरतांना असे लक्षात आले की यात मराठी अथवा देवनागरी वापरण्यासाठी कोणतीही सुवीधा नाही.
त्यामुळे आयपॉडच्या सफारीवरून उपक्रमावर येतांना अक्षरां ऐवजी फक्त चौकोन दिसतात!
यासाठी माहिती शोधली असता ऍपल ने भारतीय भाषांविषयी कोणतीच माहिती दिली नाहीये. किंवा आजवर त्यांनी भारतीय भाषा यात आणण्याचा प्रयत्नच केला नसावा ही काय असे वाटून गेले. चीनी मात्र प्रत्येक ठिकाणी दिसते आहे.

त्याचवेळी युनिकोड वापरतांना त्यातल्या तृटींचा फायदा घेऊन काही स्थळे तुम्हाला भलतीकडेच नेऊ शकतात असा धोकाही ऍपलच्या साईट वर नोंदलेला दिसून आला.

इतर कुणाला हा प्रश्न आला आहे का?
आला असल्यास तुम्ही तो कसा सोडवला आहे?

आयपॉड विषयी अधिक माहिती अर्थात विकीवर आहेच.
शिवाय ऍपल च्या स्थळावर त्याची माहितीही आहे.

-निनाद

Comments

कुणालाच

कुणालाच मोबाईल सफारीच्या क्षमतेविषयी हा प्रश्न पडला नाहिये की काय?
की कुणी आय पऑड टच वापरून येथे येतच नाही?

कुठे गेले ते मॅक प्रेमी?

-निनाद

ऑपेरा मोबाईल

सफारीपेक्षाही मोबाईल ऑपेरामध्ये देवनागरी जास्त चांगले दिसते असे ऐकले आहे. मात्र आयपॉड टचमध्ये ऑपेरा कसे वापरावे याचे ज्ञान मला नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मला पण...

मॅक नाही पण ब्लॅकबेरीवर पण हाच प्रश्न आहे. चौकोना व्यतिरीक्त मराठी दिसत नाही!

अरे!

अरे! म्हणजे हा प्रश्न सगळीकडेच आहे...
मी कधी ब्लॅकबेरी वापरले नाहीये.

म्हणजे आता ऍपल आपण चौकश्या करून करून भंडावायचे हाच उपाय आहे का?

-निनाद

हो

म्हणजे आता ऍपल आपण चौकश्या करून करून भंडावायचे हाच उपाय आहे का?

(९९%) हो! :)

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

अरेरे!

आयफोनबद्दल, त्यात असणार्‍या बर्‍याच त्रुटींबद्दल असेच काही वाचले होते. एकतर एवढ्या उशिरा तो भारतात सादर करण्यात आला आहे.
एखादे उपकरण काहीही माहिती न घेताच तुम्ही कसे काय घेऊ शकता? पुढच्यावेळेस नीट निर्णय घ्या! :-(
मला यातली जास्त माहिती नाही, पण थोडा शोध घेता हे पान सापडले. बघा काही उपयोग होतोय का!

-सौरभदा

असे नाही...

मुळात मी आय फोन घेतलेला नाही.
मी आय पॉड टच घेतला आहे.
माझ्यासाठी त्याचा 'तसा' मुख्य उपयोग गाणी ऐकणे हा आहे. मात्र त्याच वेळी त्यावर सर्फींगपण करता येते आणि इतरही अनेक उपयोग आहेत, जसे नकाशा पाहता येणे, यु ट्युब वरचे व्हिडीयो पाहणे वगैरे वगैरे.
(शिवाय जेल ब्रेक केले तर अजून अनेक उपयोगही वापरता येऊ शकतात असे ऐकले आहे - मी अजून केला नाहीये. )

चौकशी न करताच कसा घेतला?
आमच्या इथल्या मायर नावाच्या दुकानात (लंच मध्ये फिरत फिरत) गेलो होतो. तिथे टच पहिला, आवडला, सफारी ला युनिकोड सपोर्ट आहे का असे विचारले असता उत्तर 'हो' असे मिळाले. म्हंटला चला घेऊन पाहू.
आणि घेतला.

(बाकी मला नाही वाटत की, तो फार उशीरा वगैरे भारतात आला आहे.)

असो,
आता तरी कुणी तरी सांगा की,
मला आयपॉड टच वर मराठी कसे वाचता येईल?
की जेल ब्रेक करून मगच वाचता येईल?
मग ब्रेक केल्यावर ऍपल ची वॉरंटी राहते की जाते?

-निनाद

नाही हो!

अहो तुम्ही आयपॉड टच घेतला आहे हे मला माहीत होते. आणि टच सारख्याच् आयफोनच्या देखील तक्रारी आहेत, त्याबद्दल मी वाचले होते. एकाच कंपनीची दोन उपकरणे असल्याने झालाच तर काही फायदा होईल आणि सर्फिंग करता येत असल्याने संगणकासारखीच सेटिंग असावीत असे मला वाटले. असो.

-सौरभदा

मी एकदा

ऍमेरॉक वापरून एकदा गाण्याचे नाव देवनागरी मराठीत बदलले होते. ते आयपॉडवर व्यवस्थित दिसले. तुम्हाला येणारी अडचण ब्राऊजरची असावी. आयपॉडवर अगदी पूर्व आशियाई अक्षरेही व्यवस्थित दिसतात.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वॉरंटी

ब्रेक केल्यावर ऍपल ची वॉरंटी जाते

जेल ब्रेक म्हणजे काय?

जेल ब्रेक म्हणजे काय?
मॅक च्या कोणत्याही उपकरणाची कार्यप्रणाली (ओ एस) ही 'इतर' कोणत्याही प्रकारच्या प्रणालीला अथवा छोट्या उपप्रणाल्यांना येऊ देत नाही, काम करू देत नाही. त्यामुळे मॅक च्या प्रणालीला जेल म्हंटले जाते. ऍपलने आपली उपकरणे आपल्या कार्यप्रणालीतच कोंडून घातली आहेत. अर्थातच त्याचे कवच तोडून बाहेर पडले की मुक्तपणे काय हवे ते टाकता येते. पण त्या प्रणालीच्या कवच तोडण्याच्या क्रियेला जेलब्रेक असे असे समर्पक नाव दिले गेले आहे.

आज तरी आय ट्युन या ऍपलच्या प्रणाली शिवाय आयपॉडमध्ये गाणी, पॉडकास्ट आणि चलचित्रे घालण्याचा किंवा काढण्याचा अधिकृत मार्ग अस्तित्वात नाही. (किंवा मला माहिती नाही!)

वर अनिकेत ने म्हंटलेच आहे,
एकदा आयपॉड/मॅक जेल ब्रेक केले तर मॅक त्याची कोणतीही जबाबदारी घेत नाही असे आज डिलर कडूनही कळले!!

त्यामुळे जेलब्रेक् न करताच आयपॉड टच वर मराठी वाचण्याची इच्छा आहे.
(पण जेल ब्रेक करून मराठी कसे वाचत येऊ शकेल हे मात्र कुणाला माहिती असल्यास, नक्की कळवा.)

-निनाद

आयट्यून नको असेल तर...

आयट्यून सारखे डोकेदुखी सॉफ्टवेअर न वापरताही आयपॉड उत्तम प्रकारे म्यानेज करता येतो. मी सध्या ऍमेरॉकचा फ्यान झालो आहे. मात्र जीनोम लिसन, बानशी, फ्लूला, जीटीकेपॉड, मिडियामंकी, यमीपॉड, रिदमबॉक्स हे सर्व फार चांगल्या प्रकारे आयपॉडला हाताळतात.

आयट्यूनस् किती बकवास आहे हे इतर सॉफ्टवेअरे वापरली की लगेच लक्षात येईल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ऍमरॉक

मी सध्या ऍमेरॉकचा फ्यान झालो आहे.

:) चांगली गोष्ट आहे. केडीई वापरायला सुरू केले का? कसे वाटते?

केडीई

उबुंटूची अडचण अशी आहे की जीनोममध्ये ऍप्लिकेशन फॉंट जितके सुरेख दिसतात तितके केडीई मध्ये दिसत नाहीत. बाकीच्या डिस्ट्रोमध्ये केडीईवर बरेच लक्ष दिले आहे. उबुंटू मात्र जीनोमप्रिय दिसते अजूनही केडीईबरोबर खेळत आहे. एखादी युक्ती मिळून सगळे ठीक होईल. ;)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

झकास!

झकास, हे तर मला माहितीच नव्हते.
आता ऍमेरॉक पाहतो...
या माहिती बद्दल धन्यवाद!

-निनाद

ऍमेरॉक मध्ये म्युझिक डिव्हाईस् सपोर्ट साठी

लागणार्‍या लायब्ररीज विंडोजवर कशा पोर्ट करायच्या हे माहिती आहे का तुम्हाला?

स्प्रिंटच्या ट्रिओ वर् सुद्धा

स्प्रिंटच्या ट्रिओ वर् सुद्धा मराठीच्या ऐवजी चौकोनच !

नोकिया

भारतात विकले जाणारे नोकियाचे ह्यांडसेट देवनागरी रेंडरिंग चांगले करतात असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

तक्रार

मी ऍपल डॉट कॉम च्या फोरुमवर हा विषय आणतो आहे. (प्रयत्न करतोय!)
तुम्ही पण ट्रिओसाठी सुरु करा....

सांगितल्या शिवाय त्यांना तरी कसे कळणार???

तुम्ही साईट कळवलीत तर मी पण तिथे विषय वाढवतो.

-निनाद

मराठी वाचता आले.... नवीन २.१ प्रणाली

प्रश्न काही अंशी सुटला आहे.
आयपॉड टच वर आयफोनची नवीन २.१ प्रणाली टाकली.
यामध्ये मोबाईल सफारी जरा बरे आहे आणि युनिकोड रेंडरींग करू शकतो.

मात्र हे युनिकोड रेंडरींग ठीक येत नाही. चर्चा असेल तर 'च् र् चा ' असे काही तरी दिसते आहे.
म्हणाजे परत सुधारणा करणे आहेच...

-निनाद

अरे देवा!

बोंबला! अहो मी तुम्हाला त्या विकिपीडियाच्या पानाची लिंक आत्ता पाठवणारच होतो. पण ते पान तुम्ही स्वतःच तयार केलेले दिसते. :-)
असो, तुमचा प्रश्न सुटल्याशी कारण! :-)

सौरभदा-

आय फोन

माफ करा, मी आत्ताच हा धागा वाचला.

मी गेल्या १० महिन्यांपासून आय-फोन वापरतोय, तोही जेलब्रेक आणि अनलॉक केलेला. मुख्यतः मी आय-फोनवर (सफारीवर) इंग्रजी संकेतस्थळे पाहतो; त्यावर मराठी लिपी दिसत नाही. पण मी आय-फोनमध्ये जी मराठी गाणी टाकली आहेत, ती ऐकताना मराठी लिपी बरोबर दिसते. माझ्या मॅक-बुकवर मात्र देवनागरी लिपी ही Operating System मध्येच (OS X Leopard) असल्याने ती सगळ्या ऍप्लिकेशन्ससाठी वापरता येते (सफारी आणि इतर).

जर तुम्हाला तुमच्या आयपॉड-टचवर कोणत्या भाषा बघता येतात हे पहायचे असेल तर सफारी उघडा आणि ऍपलच्या ह्या वेबपेजवर जा. माझ्या आय-फोनचे फर्र्मवेयर जुने असल्याने (१.१.४) मला हिन्दी लिपी न दिसता फक्त पुढील लिप्या बरोबर दिसतातः लॅटिन, ग्रीक, रशियन, चायनीज, जपानी, कोरियन, व्हिएतनामी. पण तुम्ही जर नविन फर्मवेयर (२.१) वापरत असाल तर कदाचित तुम्हाला सगळ्या लिप्या दिसतील.

जाताजाता...
जेलब्रेक केलेल्या आय-फोनवर असे बरेच काही ऍप्लिकेशन्स् (मोफत) आहेत कि जे ऍपलच्या ऍप-स्टोअरमध्ये उपलब्ध नाहीत. आणि विशेष म्हणजे मला आयट्युन्स न वापरता कोणतीही गाणी, चित्रपट, फोटोज आणि इतर फाईल्स (पी.डी.एफ्., वर्ड, एक्सेल इ.) हे सगळे आय-फोनमध्ये कॉपी करता येते आणि पहाता येते.

- राहूल

आयफोन/आयपॉड टच फर्मवेयर २.१ टाकण्यासाठी हे करू शकता.

मोफत फर्मवेयर २.१ टाकण्यासाठी हे करू शकता.
आयट्युन्स मार्फत, आयफोन/पॉड

वर नवीन फर्मवेयर टाकण्यासाठी ऍपल पैसे मागते.
परंतु तुमच्या ओळखीच्यांपैकी कुणाकडे आयट्युन्स मध्ये डाऊनलोड केलेली नवीन २.१ प्रणाली असेल तर तीच तुम्हालाही टाकता येते.

टप्पे

  • नवीन २.१ प्रणाली त्या व्यक्तीच्या आयट्युन्स - संगणका मार्फत टाका. (तुमचा सर्व डाटा जाईल - आधी बॅक अप घ्या!)
  • त्या नंतर फोन तुमच्या संगणकावर जोडा - तो कदाचित ओळखणार नाही.
  • जर सिस्टीमने फोन ओळखला नाही तर आयट्युन्सला तुमचा फोन जुन्या सिस्टीमला 'रि-स्टोअर' करायला सांगा - तो काही काळ घेतो, आणि रि-स्टोअरचा प्रयत्न करतो आणि केले असा संदेश देतो. परंतु फर्मवेयर री-स्टोअर केल्यावरही प्रणाली २.१च राहील!
  • मग आयट्युन्सची नवीन आवृत्ती तुमच्या संगणकावर टाका, आणि त्याला तुमचा आयफोन 'नवीन म्हणून ओळख' करून द्या.
  • तुमचा फोन नवीन २.१ फर्मवेयर वर व्यवस्थित चालू लागेल.

आणि तुम्ही मराठी (तुटक का होईना!!) वाचू शकाल...

[वरील सर्व माहिती आणि प्रात्यक्षिक ऍपलच्या स्टाफ कडून मिळाली (आणि माझा पॉड त्याने २.१ ला अपग्रेडही करून दिला)]

-निनाद

 
^ वर