छायाचित्रकला-६

फ़्लॅश
जोपर्यंत कुठेही नेता येईल, वजनाने हलका, फ़ार खर्चाचा नाही असा प्रखर प्रकाशाचा हुकुमी स्रोत हातात नव्हता तोपर्यंत फ़ोटोग्राफ़ीवर मर्यादा होत्या. फ़्लॅशबल्ब्ने थोडासा दिलासा मिळाला पण तो वापरावयास कटकटीचा होता.फ़्लॅशगनमुळे कमी प्रकाशातात व रात्री फ़ोटो काढणॆ सुकर झाले. सुधारणा भराभर झाल्या. कॅमेऱ्यावर किंवा बाहेरही फ़्लॅश ठेवावयाची सोय झाली. अनेक फ़्लॅश एकावेळी उडवता येत व त्यांची तीव्रता कमी जास्त असे किंवा करता येत असे. मात्र कॅमेऱ्याच्या ब्रॅकेटवर बसवलेल्या साध्या फ़्लॅशवर एक मोठी मर्यादा होती. त्याच्या प्रखर प्रकाशामुळे [१] सावल्या गडद काळ्या येत, [२] चित्रातील रंगछटा [shades] जवळजवळ नाहिश्याच होत,[३] डोळे लाल होत, [४] चेहऱ्यावरील दोष उठून दिसत,
थोडक्यात चित्रातील नैसर्गिक गोडवा नाहीसा होई. पण सुधारीत फ़्लॅश कोनामध्ये बदलता येई[swiveliing], प्रकाशही कमीजास्त करता येई; कंट्रोल करणे जमावयाचे.उदा. फ़्लॅश कोनात फ़िरवून, रेफ़्लेक्टरवर टाकून, डिफ़्युजेड लाइटमध्ये सुरेख पोर्ट्रेट घेता येत. अगदी समोरूनच प्रकाश टाकला तर तो[तीव्रता कमी करून] भरीकरता [fill in] वापरता येई.
दुर्दैवाने डिजिटल कॅमेऱ्यातील फ़्लॅशबाबतीत तुमच्या हातात एकच पर्याय असतो. वापरणे किंवा न वापरणे. कार्यांमधील फ़ोटो काढताना तुमचा इलाजच नसतो. कार्यालयात किंवा घरात नैसर्गिक प्रकाश इतका कमी असतो की फ़्लॅश वापरवाच लागतोच. पण अशावेळी एक बरे असते. Documentation एवढाच उद्देश असल्याने माणूस ’ ठसठशीत ’ दिसले की सर्व समाधानी असतात. अगदीच हलले नसले की झाले. बहुतेक फ़्लॅश मॉडेल्समध्ये red eye reduction शी सोयही असते.
जेंव्हा कलात्मक व्यक्तीचित्रे काढावयाचे आहे तेंव्हा काय करावे ? माझा सल्ला शक्य तो फ़्लॅश टाळा. असलेल्या प्रकाशात एक्स्पोझर वाढवून , सीलिंग-भिंतीवरील दिवे वापरून जमते का बघा.नाहीतर फ़्लॅश आहेच. तोही पुढीलप्रमाणे वापरा. पांढऱ्या ,पातळ कापडाचा छोट्या हातरुमाला एवढा एक तुकडा फ़क्त फ़्लॅशवर टाका. काढा फ़ोटो. एकाच दमात [१] प्रकाश
मंद होतो, [२] डिफ़्युजड होतो, [३] सावलीचा गडदपणा कमी होतो, [४] रंगछटा जास्त नैसर्गिक दिसतात. Fill in flash म्हणूनही असा वापर करता येतो. सोपे आहे.
आता फ़क्त दोन लेख राहिले आहेत. येत्या लेखात आपण चित्रकला आणि छायाचित्रकला यांमधील समान गोष्टींचा विचार करणार आहोत व शेवटच्या लेखात compositioon चा.
समित्पाणी

लेखनविषय: दुवे:

Comments

व्हिडिओ फ्लॅश

कार्यांमध्ये हल्ली व्हिडिओ वाल्यांचा फ्लॅश जास्त उपयोगी पडतो का?





रंगतदार

फ्लॅशची माहिती देणारा हा भाग आवडला. पुढील भागांची प्रतीक्षा आहे.

रुमाल

रुमालाची आइडीया आवडली, खुप उपयोगी पडेल असे वाटते.
उत्तमोत्तम लेख लिहिल्यबद्दल धन्यवाद.
अभ्यास आणि सराव करतो आहे

सुरेख!!!

काल शेवटी वेगळा वेळ काढून , ठरवून राहीलेले सगळे भाग वाचले :).. खुप आवडले. सुटसुटीत.. आणि समजणेबल :)
बाकी शंका (नेहेमीप्रामाणे) भरपूर आहेत. बघतो विकांताला वेळ मिळाला की (तर) टंकेन.

पुढील भागांची वाट पाहतोय :)

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

छान

चांगला लेख. योग्य मापाचा प्रकाश फोटोत घालायचा म्हणजे खरोखर कौशल्याचे काम आहे.

वापरणे न वापरणे...

दुर्दैवाने डिजिटल कॅमेऱ्यातील फ़्लॅशबाबतीत तुमच्या हातात एकच पर्याय असतो. वापरणे किंवा न वापरणे.

हे अंगभूत (in-built) फ्लॅश बाबतीत खरे असेल. पण हॉट-शू वर बसवायच्या बाहेरील फ्लॅश मधे आपण घेऊ त्या दर्जाच्या सोयी मिळतात.

अशा फ्लॅश मधे अंगभूत (in-built) परावर्तक (रिफ्लेक्टर्) असतो आणि हा फ्लॅश कुठल्याही कोनात फिरवून छतावरून किंवा बाजूच्या भींतीवरून परावर्तीत प्रकाश वापरता येतो.

कॅमेराचा फ्लॅश आपण सांगितल्याप्रमाणे किंचित प्रकाश भरण्याकरीता (fill-in) वापरून, दूसरा मुख्य स्रोत म्हणून वापरल्यास छाया-प्रकाशाचा चांगला समन्वय साधता येतो. त्याच बरोबर fill-in फ्लॅश हा मालक (master) आणि मुख्य स्रोत असलेला गुलाम (slave) म्हणून वापरून त्यावर एखादा रंगीत जिलेटीन वापरल्यास पोर्ट्रेट ग्लॅमरस दिसते.

पोर्ट्रेट फोटोग्राफीत भींतींवर गडद सावली येऊ नये म्हणूनही गुलाम (slave) फॅशचा उपयोग करता येतो.

रंगीत दारूच्या किंवा पर्फ्यूमच्या बाटल्यांचे फोटो काढताना बाटलीच्या मागून गुलाम (slave) प्लॅश उडविल्यास फार नाट्यमय परिणाम् साधता येतात.

केस मोकळे सोडलेल्या स्त्री मॉडेलवर समोरून मंद (डिफ्यूज्ड) फ्लॅश टाकून, गुलाम (slave) फ्लॅश पायाकडून डोक्याकडे असा टाकल्यास छायाचित्रात भयानकतेचा परिणाम् साधता येतो. (समोरचा मंद फ्लॅश हनुवटी आणि भुवयांवर येणार्‍या सावल्या सॉफ्ट करतो).

पोर्ट्रेट फोटोंमध्ये फ्लॅश वापरताना कॅमेरा लेन्सवर एखादा रंगीत टिश्यू पेपर, एक १/४" बारीक वर्तु़ळाकार भोकपाडून लावावा, त्या छिद्राला चेहर्‍यावर केंद्रित करून फोटो काढल्यास चेहरा नैसर्गिक रंगात आणि चेहर्‍याभोवती सुंदर रंगीत सॉफ्ट आभा तयार होते. तरूण सुंदर मुलीचा फोटो काढताना गुलाबी टीश्यूपेपर लेन्सवर लावावा तर लहान बाळाचा फोटो काढताना पोपटी, पिवळा, गुलाबी कुठलाही वापरावा.

आपला लेख नवशिक्यांसाठी आहे हे मी जाणतो (मीही नवशिकाच आहे) पण पोर्ट्रेट फोटोग्राफीत वरील प्रमाणे फ्लॅशचा उपयोग करता येतो हे तुम्हीही जाणता. नवशिक्यांनी वेगवेगळे प्रयोग सतत करीत राहावे. (डिजीटल फोटोग्राफीत विविध प्रयोग फुकटात करता येतात्.) नाहीतर ते कायम नवशिकेच राहतील्. माझ्या लिखाणात काही चूकत असेल तर, जरूर दाखवून द्यावे मी चुका सुधारून घेईन्.

 
^ वर