गूगल क्रोम

गूगलने क्रोम हा नवा न्याहाळक बाजारात आणला आहे.

या न्याहाळकाविषयी इथे चर्चा करूयात.

Comments

ह्म्म्

फार काही विशेष वाटत नसला तरी लुक् आवडला मला.. फ्रेश वाटतोय. बीटा व्हर्जन असल्याने बघु अजुन काय बदल होणार आहेत ते..

प्रयोग

कुणी वापरलाय का? आन् ते बेटा म्हणजे नेमक काय असत? अनेक ठिकाणी तो शब्द असतो. काही तरी वर्जन शी संबंधीत वाटते. एखाद्या न्याहाळकाची सवय झाली कि तोच वापरण्याकडे कल झुकतो.
प्रकाश घाटपांडे

बीटा म्हणजे काय?

अल्फा, बीटा, ग्यामा/गामा ही ग्रीक मूळाक्षरे आहेत.

सॉफ्टवेअरांच्या बाबतीत

१. अल्फा आवृत्ती म्हणजे काम चालू रस्ता बंद.

२. बीटा आवृत्ती म्हणजे जवळजवळ काम संपले आहे. आता वापरा, चुका शोधा आणि कसे वाटते ते आम्हाला सांगा म्हणजे आम्ही चुका दुरुस्त करून देऊ.

३. ग्यामा असे कोणी अधिकृतपणे वापरत नाही. एलटीएस किंवा सपोर्टचे एखादे एक्रोनिम जोडतात. त्याचा अर्थ म्हणजे आमच्या दृष्टीने हे काम झाले आहे. यात नवे काही मिळणार नाही. मात्र तुम्हाला येणार्‍या अडचणी आम्ही सोडवू!


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मी नुकताच वापरायला घेतला

मी अत्ताच वापरायला घेतलाय, अत्तापर्यंततरी ज्या त्वरेनी ह्यात नवीन पानं दिसु लागतात त्यावरून ह्यात खरोखरच दम आहे असं वाटतं. "बेटा" ही खरंतर प्रायोगिक पातळीवरची गोष्टं असते, पण गूगलनी एकंदरच ह्या नियमाला सुट्टी दिली आहे कारण लाखो लोक जी जीमेल सुविधा अनेक वर्ष वापरतात ती पण "बेटा" मध्येच आहे!

माझं क्रोम वापरून लिहिलेलं पहिलंच प्रकरण! आज गणेश चतुर्थी असल्यामुळे मला "क्रोम, फायरफॉक्स्, सकळं परस्मी(?) - इंटर्नेटाय समर्पयामी" म्हणावसं वाटतय :)

रोचक

बातमीबद्दल धन्यवाद. न्याहाळकाचा 'लुक' तर छान वाटतो आहे. सुटसुटीतपणा हा स्थायीभाव, ग्राहकांचा 'कन्विनियन्स' बघण्याची वृत्ती आणि सतत नवीन प्रयोग या गूगलच्या गुणांमुळे या न्याहाळकाकडून बर्‍याच अपेक्षा आहेत.

----

उतरवून घ्यायला हवा

मगच पुढे चर्चा करावी म्हणते. ;-)

निरीक्षणे

१. मराठी डायनामिक फाँट्स दिसत नाहीत.
२. मराठी युनिकोड फाँट्सही तितकेसे चांगले दिसत नाहीत. फायरफॉक्समध्ये भाषेसाठी एक default फाँट लावून ठेवता येऊ शकतो तशी सोय इथे दिसत नाही.
३. मुक्तस्रोत असले तरी फायरफॉक्स प्रमाणे एक्स्टेंशने आणि ऍड ऑन टाकण्याची जागा दिसली नाही. (प्रत्येक वेळी छोटीशी सुधारणा करायची असेल तर सगळा कोड कंपाईल करणार का? आणि ती सुधारणा आवडली नाही तर काय?)
४. गूगल डेस्कटॉप आणि गूगल गिअर प्रमाणेच गूगलच्या या उत्पादनामध्येही सुरक्षिततेच्या त्रुटी आढळतात. 'सर्च हिस्टरी' या खिडकीत काही टाईप केले तर ब्यांक अकाऊंटचे डिटेल्स दिसू लागले. अर्थात त्यावर टिचकी मारली असता 'कृपया लॉगिन करा' असा संदेश आला. मात्र तरीही गूगलने हिस्टरीमध्ये अशी माहिती ठेवणे व ती दाखवणे धोक्याचे आहे. या अनुभवाने मोठा भ्रमनिरास झाला.
५. गूगल बुकमार्क्स, डेलिशिअस बुकमार्क्स वगैरे इथे कसे टाकायचे ते कळले नाही.
६. सर्वात महत्त्वाचे, सध्या फक्त विंडोज वर उपलब्ध आहे असे दिसते. लायनक्समध्ये काय? अनेकांचे मत गूगलचा सोर्स कोड पुन्हा कंपाईल करून वाईनद्वारे तो वापरता येऊ शकतो. मात्र वाईन वापरणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने तितकेसे योग्य नाही.
७. हा न्याहाळक 'फास्ट' आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. मला तर काही फरक जाणवला नाही. मी सध्या फास्टरफॉक्स लावून घेतले आहे. तेही वापरून बघा.

तात्पर्य: एक दिवस गूगल क्रोम वापरून पाहिले आणि पुन्हा फायरफॉक्स कडे वळलो :)
गड्या आपला फायरफॉक्स बरा!


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

माझी काही निरीक्षणे

  1. मी मिपावर पण वाचले की मराठी डायनॅमिक फाँट वाचायला त्रास होतो. पण मला एक लोकसत्ता सोडल्यास, उपक्रम, मिपा, म.टा. सकाळ वगैरे सर्व व्यवस्थित दिसले.
  2. मला फक्त मराठीत संपादीत करताना जरा त्रास जाणवला - म्हणजे मी एखादा शब्द बॅकस्पेस वापरून डीलीट केला आणि परत त्याच जागेवर लिहू लागलो तर अक्षरांची सरमिसळ होताना दिसली.
  3. कंट्रोल कळ वापरून दोन संलग्न नसलेल्या गोष्टी निवडता येत नव्हत्या. जसे नवीन लेख/चर्चा टाकताना आपण विषय, वर्गवारी निवडतो तसे.
  4. बँकेचा अकांऊट नंबर दिसणे वगैरे नक्कीच गोची आहे. माहीती बद्दल धन्यवाद!
  5. गुगल लायनक्स साठू सोअर्सकोड उपलब्ध करून देणार आहे असे ऐकले. मी लिनक्स वापरत नसल्याने त्यात जास्त लक्ष घातले नाही. आत्ता ते फकत् व्हिस्टा आणि एक्स पी साठीच आहे.
  6. बाकी वाचल्याप्रमाणे, ही गुगल ऑपरेटींग सिस्टीमची नांदी आहे (अर्थात ती येयला २-३ वर्षे वेळ लागेल!)

गूगल-लायनक्स

गूगलने पिकासा, जीटॉक आणि तत्सम सॉफ्टवेअरे बाजारात आणली तेव्हाही लायनक्ससाठी देण्याचे ठरवले होते. मात्र अद्यापही ही सॉफ्टवेअरे लायनक्समध्ये थेट वापरता येत नाहीत.

असे म्हणतात की मोझिला आणि गूगल हे मित्र आहेत. दोघांचाही शत्रू एकच आहे. त्यामुळे लायनक्समध्ये अत्यंत लोकप्रिय असणार्‍या फायरफॉक्सला इजा पोचणार नाही असे धोरण गूगलचे असेल आणि त्यामुळे लायनक्ससाठीची आवृत्ती येणारच नाही.

किंबहुना फाफॉ असताना क्रोम वापरण्याचे काहीच कारण मला तरी दिसत नाही. :)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मान्य आहे!

असे म्हणतात की मोझिला आणि गूगल हे मित्र आहेत. दोघांचाही शत्रू एकच आहे. त्यामुळे लायनक्समध्ये अत्यंत लोकप्रिय असणार्‍या फायरफॉक्सला इजा पोचणार नाही असे धोरण गूगलचे असेल आणि त्यामुळे लायनक्ससाठीची आवृत्ती येणारच नाही.

किंबहुना फाफॉ असताना क्रोम वापरण्याचे काहीच कारण मला तरी दिसत नाही. :)

दोन्ही मुद्दे पटले! :-)

तरी देखील गुगलचे नवीन काहीआले की पहाण्याची उत्सुकता असते. जसे त्यांनी पिकासा मधे टॅग प्रकार जरा जास्त एस्टेन्सिव्ह केला आहे ते आज पहात होतो.

सहमत

तरी देखील गुगलचे नवीन काहीआले की पहाण्याची उत्सुकता असते.
सहमत आहे. जीमेलचे सुरूवातीचे रूप आणि नंतर त्यात टाकलेल्या बर्‍याच नवीन गोष्टी असेच या बाबतीत होईल असे वाटते.

----

फायरफॉक्स

फायरफॉक्समध्ये भाषेसाठी एक default फाँट लावून ठेवता येऊ शकतो तशी सोय इथे दिसत नाही.

म्हणजे काय आणि हे कसे करायचे? हे केल्यावर फाफॉ मध्ये मराठी स्थळांचे फाँट आयई सारखे सुबक दिसतात का?

हाच प्रश्न

हे केल्यावर फाफॉ मध्ये मराठी स्थळांचे फाँट आयई सारखे सुबक दिसतात का?

हाच प्रश्न मला देखील पडला आहे...

फायरफॉक्स आणि मराठी फॉन्ट्स

विंडोजवर असाल तर फायरफॉक्स च्या टूल्स->ऑफ्शन->कंटेन्ट (लायनक्स वर असाल तर एडिट ->प्रेफरन्सेस-> ऑप्शन->कंटेन्ट) मध्ये डिफॉल्ट फॉन्टच्या ऍडव्हान्स्ड वर क्लिक करा. तिथे फॉन्ट्स फॉर मध्ये देवनागरी निवडा. मग प्रपोर्शनल फॉन्ट कोणता हवा (सेरिफ की सान्स सेरिफ) ते निवडा. जे निवडाल त्या प्रकारचा डिफॉल्ट फॉन्ट सिलेक्ट करा.

मनोगत, उपक्रम, मिसळपाव यांसारख्या संकेतस्थळांमध्ये वापरला जाणारा योगेश या फॉंटची सीडॅक आवृत्ती येथून घ्या.

विंडोज असेल तर विंडोजच्या इन्स्टलेशन डिरेक्टरीतील फॉन्ट्स या डिरेक्टरीत फॉन्ट ठेवल्यास तुम्हाला हा फॉन्ट फाफॉच्या वरील सूचनेप्रमाणे निवडता येईल.

लायनक्स असेल तर त्या डिस्ट्रोच्या सूचना वापरा.
(उबुंटूमध्ये /usr/share/fonts/truetype मध्ये custom नावाचे फोल्डर तयार करून तिथे हा फाँट ठेवा. नंतर फाँट क्याशे रिकामी करून घेण्यासाठी sudo fc-cache -f -v वापरा.)

उपक्रम/मनोगत जसे तुम्हाला आयई वर दिसते तसेच फाफॉवरही दिसू लागेल.

आमच्या मित्राकडे असलेल्या श्रीधर या फाँटमध्ये नव्या रुपातले मनोगत हे (आमचे आवडते!) संकेतस्थळ किती सुंदर दिसते ते पहा.

दुर्दैवाने हा फाँट खुला उपलब्ध नाही. तो विकत घ्यावा लागेल.

अवांतरः एक सांगायचे राहून गेले. वरील चित्र आम्ही वालपेपर म्हणून लावायचा विचार करत आहोत. फारच गोमटे रुपडे आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

धन्यवाद कर्णशेठ!!

धन्यवाद कर्णशेठ!! लगेच कामाला लागलो आहे.
फाफॉवर मिपा/उपक्रम आयई सारखेच दिसायला लागले तर आमच्या एक्स्ल्पोररला राम राम!

यू'र वेल्कम

वेल्कम वेल्कम वेल्कम वेल्कम!

फाफॉची एकच अडचण अशी आहे की देवनागरी डायनामिक फाँट्स दाखवण्यासाठी ते तुमच्या मशीनवर हवेत. बाकी काही नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ह्म्म्म

वरचे सगळे प्रतिसाद वाचले. पण सुरक्षिततेचा नेहमी प्रमाणे घोळ असेल गुगलचा तर मग अपेक्षाभंग आहे बुवा. उतरवुन घेतो आणि पहातो.

प्रयत्न केला. पण संस्करण फसले. :( इंटरनेटची जोडणी नाही असे सांगुन संस्करण बंद पडले. गम्मतच आहे. कदाचित प्रॉक्सीचा घोळ असावा. पण हा एक किडा आहे हे नक्की. तसेच हे सुद्धा वाचा. एव्हाना तुम्ही संस्करण केले म्हणजे गुगलचे गुलाम झाला आहात. :)

यु हॅव नो प्रायव्हसी

गूगल डेस्कटॉप आणि गूगल गिअर प्रमाणेच गूगलच्या या उत्पादनामध्येही सुरक्षिततेच्या त्रुटी आढळतात. 'सर्च हिस्टरी' या खिडकीत काही टाईप केले तर ब्यांक अकाऊंटचे डिटेल्स दिसू लागले

सर्केश्वरांचे "यु हॅव नो प्रायव्हसी.. गेट ओव्हर इट्" आठवले...

बाकी लेख विषय आणि चर्चा मस्तच!

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

क्रोमचे विसर्जन

ह्याच कारणामुळे मी आज क्रोम माझ्या संगणकावरून काढून टाकला. मी कुठल्या संकेतस्थळावर जातो ही माहिती गूगलला कळवण्याचं काहीच कारण नाहीये. ह्यामुळे क्रोम माझ्या दृष्टीने प्रिव्हसी च्या बाबतीत नापास झाला आहे. ह्याबद्दलची ताजी बातमी इथे वाचा.

वापरला...

पण वेगात काही फारसा फरक जाणवला नाही बुवा! आमचे बंधुराज म्हणाले की चार जीबी मेमरी असली तर क्रोम वापरायला मजा येईल. पण त्यातले मला काहीच कळत नाही. :-)
आजानुकर्ण, तुमच्या मित्राकडच्या श्रीधर फाँटवर मनोगत काय फाकडू दिसत आहे हो!
तुम्ही सांगितल्याप्रमाणे फाफॉ वर करून पाहिले पण डिफॉल्ट फाँट मध्ये सान्स् आणि सान्स सेरिफ् दिसतच नाहीत. केवळ मंगलच दिसत आहे.

-सौरभदा

==============
Blue eyes say, Love me or I die; black eyes say, Love me or I kill thee.
-Spanish proverb

ता. क.-
जमले! क्रोममध्ये देखील आणि फायरफॉक्समध्ये देखील! :-)
धन्यवाद!

-सौरभदा

सौरभदाशेठ

डिफॉल्ट फॉन्ट समोर ऍडव्हान्स्ड नावाचे बटण आहे त्यावर जा. तिथे तुम्हाला प्रपोर्शनल असे दिसते का? त्यासमोर सेरिफ किंवा सान्स सेरिफ निवडता येईल.
जो प्रपोर्शनल फॉन्ट प्रकार तुम्ही निवडाल त्या प्रकारचा फॉन्ट तुमच्याकडे उपलब्ध हवा. वर योगेश फॉन्ट आणि तो इन्स्टॉल कसा करावा हे सांगितले आहे. तो इन्स्टॉल केल्यानंतर फाफॉ बंद करुन पुन्हा चालू करुन पहा. तुम्हाला तो फॉन्ट ड्रॉपडाऊन मध्ये दिसेल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

फायरफॉक्स आणि क्रोम

फायरफॉक्स वापरले आहे. आयई तर नेहमी.
क्रोम डाऊनलोड केले. वापरले. माहिती घेतली.

आजानुकर्णसाहेब, क्रोमही ओपनसोर्स आहे.
त्यामुळे फाफॉबद्दलचा आपला प्रखर अभिमान (कारण ओपनसोर्स) क्रोमबद्दल थोडा बोथट व्हायला हरकत नसावी.

काही बाबतीत क्रोम इतरांच्या पुढे आहे. टॅब बेस्ड ब्राऊजिंग फाफॉकडून आयईने चोरले.
क्रोमनेही ती कल्पना उचलली.. पण क्रोम एक पायरी पुढे गेले.
टॅब हीच न्याहाळकची पहिली पायरी आहे.
क्रोममध्ये प्रत्येक टॅब वेगळ्या प्रोसेसमध्ये टाकला आहे.
मल्टीथ्रेडिंग नाही तर मल्टीप्रोसेसिंग केले आहे.
त्यामुळे रोसोर्स अलोकेशनचे (मेमरी) ओव्हरहेड वाढले असले तरी प्रोसेस इंडिपेंडन्स (प्रत्येक टॅबमधील पानाच्या माहितीचे आणि
त्यातील क्रियांचे स्वातंत्र्य) वाढले आहे.
याचा फायदा म्हणजे एका टॅबमधील प्रक्रिया 'बसली' तरी संपूर्ण न्याहाळक 'टांगला' जात नाही.
तसेच त्यामुळे स्मृतीमधील तुरळक फुटक्या कणांचा कचरा साठत नाही. (मेमरी लीक)

क्रोममध्ये फिशिंग/मालवेअर/ऑटोएक्झेक्यूट् या गोष्टींवर नियंत्रण आहे.
असे अनेक फायदे आहेत.

क्रोम परिपूर्ण नाही पण त्यांच्या काही चांगल्या गोष्टी इतर ओपनसोर्स न्याहाळक उचलतील अशी अपेक्षा आहे.

+१

चांगली माहीती दिली आहे. धन्यवाद.

----

फायरफॉक्स आणि क्रोम पुढे चालू

क्रोममध्ये प्रत्येक टॅब वेगळ्या प्रोसेसमध्ये टाकला आहे. मल्टीथ्रेडिंग नाही तर मल्टीप्रोसेसिंग केले आहे. त्यामुळे रोसोर्स अलोकेशनचे (मेमरी) ओव्हरहेड वाढले असले तरी प्रोसेस इंडिपेंडन्स (प्रत्येक टॅबमधील पानाच्या माहितीचे आणि त्यातील क्रियांचे स्वातंत्र्य) वाढले आहे.
याचा फायदा म्हणजे एका टॅबमधील प्रक्रिया 'बसली' तरी संपूर्ण न्याहाळक 'टांगला' जात नाही.
तसेच त्यामुळे स्मृतीमधील तुरळक फुटक्या कणांचा कचरा साठत नाही. (मेमरी लीक)

याचा विशेष फायदा काय आहे ते कळले नाही. यामुळे वाढणार्‍या ओव्हरहेड्सचा उल्लेख तुम्ही केला आहेच त्याच्या तुलनेत त्यातून होणारा फायदा कितपत आहे याचा विचार करावा लागेल. 'एफिशियन्सी' हा आजच्या काळाचा मूलमंत्र आहे. याचाच विचार करून फाफॉमध्ये थ्रेड्सचा वापर केला जातो. जसजसे नियंत्रण प्रणाल्या आधुनिक होत आहेत तसतसे थ्रेड्स सांभाळण्याचे तंत्रही आधुनिक होत आहे. तसेच मेमरी लीक आणि थ्रेड वापरणे/न वापरणे यांचा थेट संबंध लावता येणार नाही.

क्रोममध्ये फिशिंग/मालवेअर/ऑटोएक्झेक्यूट् या गोष्टींवर नियंत्रण आहे.

हे सर्व फाफॉमध्ये बर्‍याच दिवसांपासून आहे.

क्रोम परिपूर्ण नाही पण त्यांच्या काही चांगल्या गोष्टी इतर ओपनसोर्स न्याहाळक उचलतील अशी अपेक्षा आहे.

अजून कित्येक आवृत्त्या क्रोमला फाफॉ आणि आयई शी 'कॅचअप्' करावे लागेल असे वाटते. फाफॉच्या सध्याच्या सोयीसुविधांइतपत येईपर्यंत क्रोमला बरेच दिवस लागतील. फाफॉच्या बदलाचा वेग आणि फाफॉच्या हजारो एक्स्टेन्शन्सची सदैव वाढत जाणारी यादी पाहता ही कामगिरी अवघड आहे यात शंका नाही.

आजानुकर्णसाहेब, क्रोमही ओपनसोर्स आहे.
त्यामुळे फाफॉबद्दलचा आपला प्रखर अभिमान (कारण ओपनसोर्स) क्रोमबद्दल थोडा बोथट व्हायला हरकत नसावी.

क्रोम मुक्तस्रोत असला तरी त्याच्या आणि फाफॉच्या 'मुक्तस्रोतपणा'त फरक आहे तो हेतू चा. गूगल ही एक पब्लिक कंपनी असल्याने गूगलच्या दृष्टीने समभागधारक आणि कंपनीचा फायदा यांना कधीही तुम्हाआम्हांपेक्षा अग्रक्रम मिळेल याउलट मोझिलाचा उद्देश नेहमी नवनवीन सुविधा, अत्याधुनिक तंत्र आणि तुमच्या आमच्या सारख्या वापरकर्त्यांना त्याचा लगोलग फायदा हाच राहील. गूगलचा सर्व व्यवसाय इंटरनेटवर अवलंबून असल्याने आपली मते, आपली सोय पसरवण्याचे साधन म्हणून गूगल क्रोम हा प्रामुख्याने वापरला जाईल असे वाटते.

मोझिला सीईओ जॉन लिली यांची ही जालनोंद आणि मोझिला युरोप अध्यक्षांची मुलाखत वाचण्यासारखी आहे.

अवांतर - क्रोमच्या EULA मध्ये झालेली ही गडबड पाहा.

गंमत आहे

आपण दिलेले दुवे वाचले. मजकूर समजला.
फाफॉ ३ वापरत आहेच!

माझा फाफॉला जात्या विरोध असण्याचे काहीच कारण नाही. तसेच क्रोम आणि आयई ला सुद्धा! आयई विंडोजवर फुकटात मिळते, फाफॉ फुकट आहे, क्रोमही फुकट आहे.
मग त्यातल्या त्यात जे सर्वात सुरक्षित आहे, वेगवान आहे, सर्व गरजा पुरवते आणि कमी रिसोर्स वापरते ते मी वापरणार.
ते तयार करणारी कंपनी किती फायदा मिळवते त्याच्याशी मला काही देणे-घेणे नाही.
दुसरे असे की पगार देऊन बनवून घेतलेल्या सॉफ्टवेअरचे सोर्स-कोड उघड असावे या म्हणण्याला माझा पाठिंबा नाही. (एखादी कंपनी आपल्या कामगारांना पैसे देऊन एखादे न्युक्लिअर रिऍक्टर तयार करत असेल तर त्याची डिझाईन्स त्यांनी जगाला का वाटावीत?)

एकीकडे फाफॉ निर्माण करणारे आणि त्याचा उत्कर्ष करणारे मोझिल्ला कॉर्पोरेशन (जे मोझिला फाउंडेशनचे अपत्य आहे) गूगलबरोबर गेली काही वर्षे करार करून सॉफ्टवेअर बनवत आहे. याचाच अर्थ मोझिल्लाला गूगलकडून त्याचे पैसे मिळतात. (फायदा म्हणता येणार नाही. पण पैसे मिळतात!)
दुसरीकडे मासॉ व्हिस्टासाठी फाफॉ तयार करतानाही त्यांना काही पैसे मिळाले असावेत.(नसतीलही. माहित नाही.)
पुढे २०११ नंतर असा करार करण्यासाठी ते इतर कंपन्या शोधत आहेत. समजा अशी कंपनी त्यांना सापडली नाही तर?
मोझिला फाफॉ शेअरवेअर होईल काय? काही अंदाज करता येत नाही.

मुक्तस्रोत

ते तयार करणारी कंपनी किती फायदा मिळवते त्याच्याशी मला काही देणे-घेणे नाही.
दुसरे असे की पगार देऊन बनवून घेतलेल्या सॉफ्टवेअरचे सोर्स-कोड उघड असावे या म्हणण्याला माझा पाठिंबा नाही.

बरोबर आहे.

एकीकडे फाफॉ निर्माण करणारे आणि त्याचा उत्कर्ष करणारे मोझिल्ला कॉर्पोरेशन (जे मोझिला फाउंडेशनचे अपत्य आहे) गूगलबरोबर गेली काही वर्षे करार करून सॉफ्टवेअर बनवत आहे.

असे असले तरी फाफॉ आणि इतर सर्व मुक्तस्रोत ऍप्लिकेशन्स तयार करण्यात आणि त्यात नवनवीन सोयी सुविधा, त्रुटींचा शोध, त्रुटींचे निराकरण इ. कामे सर्वसामान्य वापरकर्ते कोणत्याही मोबदल्याविना करत असतात. हेच त्यांचे खरे शक्तिस्थान आहे. बर्‍याच व्यावसायिक कंपन्यांनी मुक्तस्रोत प्रकल्प सुरू केले होते पण (त्यात बहुतेकदा व्यावसायिक हितसंबंध असल्याने) वर उल्लेखलेले स्वयंसेवक त्यांच्या वाटेला जात नाहीत.

दुसरीकडे मासॉ व्हिस्टासाठी फाफॉ तयार करतानाही त्यांना काही पैसे मिळाले असावेत.(नसतीलही. माहित नाही.)
पुढे २०११ नंतर असा करार करण्यासाठी ते इतर कंपन्या शोधत आहेत. समजा अशी कंपनी त्यांना सापडली नाही तर?
मोझिला फाफॉ शेअरवेअर होईल काय? काही अंदाज करता येत नाही.

मोझिला फायरफॉक्स आपल्या नव्या प्रणालीवर चालणे मासॉ लाही आवश्यक वाटले असणे स्वाभाविक आहे. फाफॉ आता काही तज्ज्ञ लोकांपुरता मर्यादित न राहता जागतिक स्तरावर सर्वसामान्यांचा न्याहाळक झाला आहे. नुकताच फाफॉ ३ साठी झालेला विश्वविक्रम ही या वाढत्या लोकप्रियतेची पावती आहे. तेंव्हा फाफॉ-कंपन्या करार ही दोघासाठीही विन-विन परिस्थिती आहे. मुक्तस्रोत प्रणाल्यांमध्ये कार्यक्षमता हा सर्वात मोठा निकष आहे. जोपर्यंत तो कार्यक्षम राहील तोपर्यंत मुक्तस्रोत स्वयंसेवक आपला वेळ, पैसा, ज्ञान खर्चून त्याला अधिकाधिक चांगले बनवत राहतील. जेव्हा जेव्हा एखादी व्यावसायिक कंपनी स्पर्धेत उतरते तेव्हा तेव्हा मुक्तस्रोत समुदाय अधिक कार्यक्षमतेने काम करतात असा अनुभव आहे :)

अबाऊटची पाने

काही गमती जमती - पत्त्याच्या जागेत खालील माहीती टंकून पहा.

about:memory
about:stats
about:network
about:internets (मजेशीर आहे, पण मला दिसलेले नाही)
about:histograms
about:histograms/Loop
about:dns
about:cache
about:plugins
about:version
about:crash
about:%
about:ipc
about:shorthang
about:hang
about:objects
about:chrome-nativeui
view-cache:[Full_URL_of_Website]
view-source:[Full_URL_of_Website]
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

नाही आवडला

मला क्रोम नाही आवडला.
मला हवी असलेली जालावरची कोणतीही फाईल त्याने माझ्या डेस्कटॉप वर सेव्ह केली नाही. तसेच उपक्रमावरची अक्षरे चिकटलेली दिसतात.
शेवटी काही वेल खळून मी परत आय ई कडे आलो आहे.

फाफॉ पण मला तितकेसे आवडले नाही. मराठी अक्षरे धड दिसत नाहीत.

बहुभाषिक व्यवस्थेसाठी आय ई जितके झकास चालते तितके इतर कोणतेही न्याहाळक चालत नाहीत असे वाटते.

-निनाद

इंटरनेट एक्सप्लोरर ८

न्याहाळकांची स्पर्धा आणखीनच रंगणार असे दिसते आहे. मासॉ ने इंटरनेट एक्सप्लोरर ८ बीटा आणला आहे. अधिक माहिती. नुकतेच एका ब्लॉग वर वाचले 'कॉपियर्स ऍट रेडमंड वेर ऍट वर्क सिन्स दि रिलिज़ ऑफ फायरफॉक्स ३' :)

अनुभव

+
वेग
-
क्रोममधे अनेक मराठी संकेतस्थळे दिसत नाहित, फाईल सेव्ह कुठे करायची हे न विचारता आपोआप डिफॉल्ट् फोल्डरमधे सेव्ह करतो, चुकून बंद झाला तर ऑपेराप्रमाणे टॅब्स आपोआप सेव्ह होत नाहीत.

नेहमी वाचली जाणारी संकेतस्थळे क्रोम उघडल्याबरोबर समोरच दिसतात. हे जरी + वाटले तरि मला नाही आवडले.
मला बुवा ऑपेरा आवडतो

लायनक्सवर उपलब्ध

काही दिवसांपूर्वी गूगल क्रोम लायनक्सवर उपलब्ध झाले आहे. (बीटा/अनस्टेबल आवृत्तीच्या स्वरुपात)

दुवाः www.google.com/chrome?platform=linux


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर