उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
गणित आणि भाषा
यनावाला
September 1, 2008 - 4:10 pm
१)संख्या
म आणि न या दोन धनपूर्णांकी संख्या आहेत. म ही न पेक्षा मोठी आहे.
या दोन संख्यांवर बेरीज, वजाबाकी (म-न),गुणाकार आणि भागाकार या चार प्राथमिक अंकगणिती क्रिया केल्या.आलेल्या चार उत्तरांची बेरीज केली. ती सातशे एकोणतीस आली.म्हणजे (ब +व+ग +भ=७२९)*. तर म आणि न या संख्या कोणत्या?. अशा तीन जोड्या आहेत त्या शोधून काढा.
*ब=(म +न) इत्यादि.
२)व्युत्पत्ती
पुढील शब्द कोणत्या मूळ शब्दांपासून सिद्ध झाले असावे? कसे?
*वंगाळ * अळणी * मिसरूड
*मखर *ताम्हण *खिरापत
*खिल्लार (गाईंचे) *बित्तंबातमी
.
दुवे:
Comments
व्यनि. उत्तर :१
मराठी असे आमुची मायबोली |
***********************************
श्री.वाचक्नवी यांनी गणित(संख्या) प्रश्नाचे अचूक उत्तर कळविले आहे.
मात्र भाषेसंबंधी काही लिहिले नाही.
भाषेसंबंधी का लिहिले नाही.
शब्दांची व्युत्पत्ती सांगणे हे विद्वानांचे काम. त्यासाठी त्याला मराठी भाषेव्यतिरिक्त संस्कृत-प्राकृत-अपभ्रंश-महाराष्ट्री, फार्शी-अरबी आणि कानडी-तमिळ -गुजराथी या भाषांतील शब्दांचे कामचलाऊ ज्ञान हवे. एका भाषेतून शब्द दुसर्या भाषेत जाताना त्यात कुठल्या नियम किंवा संकेतांनी काय फेरफार होतात याचे ज्ञान, ह्याशिवाय मराठी इतिहास-संस्कृती-चालीरीती यांचा अभ्यास हवा. व्युत्पत्ती सांगणे हे आमच्यासारख्या येरागबाळ्याचे काम नोहे. व्युत्पत्तिकोश जवळ असता तर त्यातून वाचून पटण्यासारख्या दोनतीन व्युत्पत्त्या सांगितल्या असत्या. पण जवळ कोश नाही. (एकदा पाहिला होता, आवडला नाही म्हणून विकत घेतला नाही.)---वाचक्नवी
सुधारणा
मराठी असे आमुची मायबोली |
***********************************
संख्या कोड्यात "म ही न पेक्षा मोठी आहे." असे दिले आहे. ते
"म ही न पेक्षा लहान नाही." असे हवे. म्हणजे तीन जोड्या मिळतात.
...
भाषा कोड्याचे शीर्षाक 'व्युत्पत्ती' असे आहे. पण "पुढील शब्द कोणत्या मूळ शब्दांपासून सिद्ध झाले असावे? कसे?" एव्हढेच विचारले आहे. शास्त्रशुद्ध व्युत्पती अपेक्षित नाही.मूळ शब्द कोणता असावा ते दिले तरी ठीक.
व्यनि उत्तरः२
मराठी असे आमुची मायबोली |
***********************************
श्री. विनायक यांनी संख्यांच्या तीनही जोड्या कळविल्या आहेत. त्या अचूक आहेत.
व्यनि उत्तरः३
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.धनंजय यांनी संख्यांच्या जोड्या अचूक ओळखल्या आहेत.
तसेच त्यांनी चार शब्दांची योग्य व्युत्पत्ती दिली आहे.
व्यनि.उत्तरः३
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
गणित कोड्यातील संख्यांच्या तीनही जोड्या शोधण्यात श्री. वैभव कुलकर्णी यशस्वी झाले आहेत.
संख्या कोडे :उत्तर
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. विनायक यांनी पाठविलेले उत्तर असे:
आपण विचारलेल्या गणितातील संख्यांच्या तीन जोड्या अशा
१. म = १६२, न = २
२. म = ७२, न = ८
३. म = न = २६
रीत अशी
(म +न) + (म - न) + म*न +म/न = ७२९
सोपे करून
म * (न +१)* (न+१)/न = ७२९
म्हणजेच म/न * (न +१) * (न +१) = ८१ *९
शक्यता १, (न +१)* (न +१) = ८१
न + १ = ९
न = ८ त्यावरून म = ७२ मिळवता येते
शक्यता २ , (न +१)* (न +१) = ९
न + १ = ३
न = २ त्यावरून म = १६२ मिळवता येते
शक्यता ३ मूळचे समीकरण असे मांडल्यास
म/न * (न +१)* (न *१) = ७२९ *१
(न+१)* (न+१) = ७२९
न + १ = २७
न = २६ त्यावरून म = २६ असे उत्तर मिळवता येते
अर्थात आपण गणितात म्हटल्याप्रमाणे म ही न पेक्षा मोठी येत नाही ही गोम आहेच.
आणखी एक शक्यता (न +१)* (न +१) = १
न +१ = १ वरून न = ० असे निरर्थक उत्तर येते. यापेक्षा आणखी कुठलीही शक्यता माझ्या डोक्यात येत नाही.
काही चूक असल्यास कळवावे.
विनायक
इतके अवघड?
समजा म=क्षन, क्ष धन पूर्णांक.
क्षन+न+क्षन-न+क्षन वर्ग+ क्ष=७२९. म्ह. क्षन वर्ग+२क्षन+क्ष=७२९. म्ह. क्ष(न वर्ग+२न+१)=७२९. म्ह. क्ष(न+१)वर्ग=७२९.
७२९चे वर्ग असलेले अवयव: १, ९, ८१ आणि ७२९. म्ह. (न+१)वर्ग=(१,९,८१किंवा७२९). आणि क्ष=७२९, ८१, ९ किंवा १.यावरून नच्या किमती: शून्य(त्याज्य!), २,८, आणि २६. म्हणून म=७२९(त्याज्य!), १६२, ७२ आणि २६.--वाचक्नवी
अरेरे! व्यनी उत्तर गहाळ?
यनावालासाहेब, माझे व्यनितून दिलेले उत्तर आपणास पोचलेले दिसत नाही. (दि.४ सप्टेंबर)
ठीक आहे.. संख्यांबद्दल माझे उत्तर बरोबर आहेच.
आता शब्दांबाबत कळू द्या.
उत्तर हरवले नाही.
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. विसुनाना खेदाने लिहितात :"अरेरे ! व्यनि. उत्तर गहाळ?"
वस्तुतः त्यांचे उत्तर मला मिळाले होते. त्यावर" श्री.विसुनाना यांचे संख्या कोड्याचे उत्तर बरोबर आहे. तसेच त्यांनी तीन शब्दांची व्युत्पत्ती अचूक दिली आहे." असा प्रतिसाद लिहून सुपूर्द केला होता. नंतर वीज गेली. त्यामुळे घोटाळा झाला असावा.
भाषा
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
व्युत्पत्ती
वंगाळ: अमंगल--->अवंगळ--->वंगळ--->वंगाळ
(’म’ चा ’व’ होतो. जसे: ग्राम-->गाव, कोमल--> कोवळ-->कोवळा, कुमारी-->कुवारी. ल चा ळ होतोच)
अळणी : अलवणी--->अळवणी--->अळणी.
(लवण =मीठ. अलवणी= मिठाविना.)
मखर : मखगृह---> मखघर---> मखर.......(श्री.धनंजय यांनी ही व्युत्पत्ती दिली आहे.)
(मख = यज्ञ)
मिसरूड : श्मश्रू---> मिस्रू--->मिसरू--->मिसरूड (..............."................”......................)
(श्मश्रू= दाढी मिशी.
बित्तंबातमी : यात एकाच अर्थाचे दोन शब्द आहेत. संस्कृत: वृत्तम् ,फ़ारसी: बातम्
वृत्तं--->व्रित्तं---->ब्रित्तं---->बित्तं (व चा ब होतो),बातम--->बातमी.
वृत्तंबातम---> बित्तंबातमी. .....( श्री. विसुनाना यांनी हे दिले आहे,)
खिरापत : क्ष्रीरपत्र--->खीरपत्र--->खीरपत्त----> खिरापत.....(क्ष चा ख होतो.जसे: वृक्ष-->रुख,लक्ष-->लख-->लाख)
(पूर्वी काही समारंभान्तीं खोलपीतून (वटपत्राचा एकपानी द्रोण) खीर देण्याची पद्धत असावी.)
ताम्हण : ताम्रभांड--->ताम्मभांड--->तांभांड--->तांम्हंड---> ताम्हण.)
खिल्लार : गाईंचे खिल्लार म्हणजे दुग्धालयच.(मोबाईल डेअरी). क्षीर= दुग्ध. दुगधालय= क्षीरालय.यावरून
( क्षीरालय--->खीरालय--->खिलारय [ वर्णविपर्यय .जसे बादली-->बालदी. अमानत--. अनामत)..
खिलारय---> खिल्लारय---> खिल्लार.)
"खिल्लार" पटले नाही
"खिल्लार"/क्षीरालय पटले नाही
र <-> ल वर्णविपर्याय झालेला दुसर्या एखाद्या शब्दाचे उदाहरण देता येईल का? किंवा या व्युत्पत्तीच्या मधल्या कुठल्या प्राकृत पायरीचा उल्लेख सापडतो का?
बित्तंबातमी मध्ये द.ह. अग्निहोत्र्यांचा कोश "बित्तम्" चे मूळ अरबी, आणि 'बातमी'चे मूळ संस्कृत "वार्ता" असे देतो.
माझ्यापाशी अरबी शब्दकोश नाही, पण उर्दू शब्दकोशात अरबी "बितमामिह"=संपूर्ण असा शब्द सापडतो. (बित्तं च्या मुळात त्यांनी सांगितलेला अरबी "बातम्" शब्द सापडत नाही. ते साधारण अरबी आणि फारसी मध्ये घोटाळा करत नाहीत.)
बितमामिह-बातमी = संपूर्ण/सविस्तर बातमी, असे अग्निहोत्र्यांचे म्हणणे आहे की काय असे मला वाटते. अग्निहोत्र्यांना कुठला अरबी शब्द अभिप्रेत होता हे माहीत नाही
र<-->ल विपर्यय
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.धनंजय लिहितात : र <-> ल वर्णविपर्याय झालेला दुसर्या एखाद्या शब्दाचे उदाहरण देता येईल का?
....खरे तर "रलयोरभेदः" असे कुठे तरी वाचल्याचे स्मरते.'होली' ला 'होरी' म्हणतात.
उदाहरण सापडल्यावर कळवितो.
अभेद म्हणून आणखीनच आश्चर्य
अभेद वर्णांमध्ये विपर्याय व्हावा याचे तर फारच आश्चर्य वाटते.
अभेद असल्यामुळे कधीकधी एकाच्या जागी बोलीप्रमाणे दुसरा येतो, दुसरा शेष राहातो. (उदाहरण : होरी/होली, किंवा दुसर्या एका बोलीत विशिष्ट परिस्थितीतला ल-ळ अभेद - होली/होळी)
वर्णविपर्याय एकवत्-नसलेल्या वर्णांमध्ये होतो. पैकी एका क्रम नव्या बोलीत जिभेला सोपा जाणारा असतो, दुसरा क्रम जिभेला जड असतो.
खिल्लार?
बैलदेखील खिलारी असतात. तर इथे क्षीरालयाचा काय संबंध?--वाचक्नवी
खिल्लारें
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
खिल्लार = गाई म्हशींचा कळप ... असा अर्थ कोशात आहे.तसेच ''गाई म्हशींची खिल्लारे" असा शब्दप्रयोग वापरतात.
खिलार =बैलाची एक जात ..असाही अर्थ त्याच कोशात आहे.
कोड्यात (गाईंचे ) खिल्लार असे दिले आहे.
क्षीरालय
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या शब्दाची व्युत्पत्ती मी कुठे वाचलेली नाही. मात्र ज्ञानेश्वरीत 'गाईंची क्षीरालये" असे वाचल्याचे स्मरते.(नेमका अध्याय आठवत नाही.धुंडाळून सापडल्यावर कळवीन.) त्या शब्दप्रयोगावरून खिल्लारे शब्द आला असे अनुमान आहे. ते बहुधा योग्यच असावे. कारण क्ष चा ख होतो.
कामधेनूंची खिल्लारे
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
'क्षीरालये' शोधताना ज्ञानेश्वरीच्या ९ व्या अध्यायात पुढील ओवी आढळली :
....मात्र अजून 'क्षीरालय' हा शब्द सापडला नाही.
वर्णविपर्यय
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
फलाहार--->फलार--->फराल--->फराळ
('ह'चा अनेकदा लोप होतो..ल<-->र हा वर्णविपर्यास स्पष्ट आहे.)