छायाचित्रकला-४

छायाचित्रकला-४
आज परत डेप्थ ऑफ़ फ़िल्ड्चा खोलात विचार करू. प्रथम लक्षात घ्यावयास पाहिजे की जुन्या फ़िल्मवाल्या कॅमेऱ्यात लेन्सचे ऍपर्चर २२,३२ किंवा पार ६४ देखील असावयाचे. तसेच फ़ोकल लेंथ १६,८ [फ़िश आय] पर्यंत कमी असावयाच्या. त्यामुळे DoF पाहिजे तेवढी नियंत्रित करता यावयाची. डिजिटल कॅमेऱ्यात फ़ोकल लेंथ २५ च्या खाली नेता येत नाही व ऍपर्चर ८ च्या आसपास. त्यामुळे DoF वर फ़ारच कमी नियंत्रण ठेवता येते. माहिती घेतांना ३५ एमेम च्या संदर्भातच घेऊ.
मागे आपण पाहिले की ab ची प्रतिमा cd येथे मिळाली.ab च्या जरा मागे पुढे असलेल्या वस्तूची प्रतिमा थोडीशी अस्पष्ट य़ॆइल. ही जराशी सरकलेली प्रतिमा १/१००० इन्चाच्या आत असेल तर डोळ्याला फ़रक जाणवत नाही.ab पुढचे व मागचे अंतर ज्यामधील सर्व वस्तू स्पष्ट दिसतात त्याला DoF म्हणावयाचे.ते पुढील गोष्टींवर अवलंबून असते.
१] अंतर.... जास्त अंतर ... जास्त DoF
२] फ़ोकल लेंथ ..कमी फ़ोकल लेंथ ... " "
३] अपर्चर .... मोठे अपर्चर [नंबर जास्त] .... " "
खालील चित्रात ते दाखवले आहे. येथे दोन गोष्टी कायम राखून एक बदलली आहे.
DoF काढावयाचे सूत्र चित्रात दिले आहे.

आता एक नवीन शब्द बघुया. Hyperfocal Distance. DoF नेहमी पुढच्यापेक्षा मागील बाजूस जास्त असते. तसेच ९५ टक्के चित्रांत आपणाला सर्वच चित्र रेखिव असावे असे वाटते. उदा. ताजमहालचा फ़ोटो काढताना मागचा ताजमहाल व जवळ उभे असलेले मित्र सगळेच शार्प असावेत असे वाटते.जेथे फ़ोकस केले असता त्यामागील सर्वच शार्प येते, त्या अंतराला Hyperfocal Distance म्हणतात. या अंतराच्या अलिकडचे अर्ध्या अंतरातील चित्रही शार्प असते. ३५ एमेम कॅमेऱ्यात एखाद्या वस्तूवर फ़ोकस केले की त्याचे अंतर लेन्सवर कळावयाचे. लेन्सवरच DoF ही मिळावयाची. पुढे दिलेली कोष्टके तेंव्हा उपयोगी पडावयाची.

dof-1" alt="">
dof-5" alt="">
dof-6" alt="">
dof-7" alt="">
dof-8" alt="">

आता डिजिटल कॅमेरात ऑटो फ़ोकसमुळे किती अंतरावर फ़ोकस केले आहे ते कळत नाही. लेन्सवरून DoF कळत नाही. फ़ोकल लेन्थही कळेलच असेही नाही. मग या वर दिलेल्या गोष्टींचा काय उपय़ॊग ? खरे म्हणजे काही नाही. मग का दिली ? एखाद्याकडे ३५ एमेम कॅमेरा असेल त्याला उपयोगी पडेल.[इतरांना मित्राशी गप्पा मारताना मलाही कळते एवढे सांगता यावे म्हणून व आमचे मित्र श्री.अभिजित यांचा वेळ वाचवावा म्हणून] डिजिटलवाल्यांनी वर दिलेल्या तीन गोष्टी लक्षात ठेवून ट्रायल-एरर मेथडचाच वापर करावा.
आता माइक्रोफ़ोटोग्राफ़ी [लघुछायाचित्रकला ? लक.]बद्दल विचार करू.या ठिकाणी अंतर कमी =DoF कमी. अंतर वाढवण्याकरिता टेलीलेन्स वापरली तर फ़ोकल लेन्थ जास्त म्हणून DoF कमी. ऍपर्चर नंबर वाढवण्यावरही मर्यादा. थोडक्यात डिजिटल कॅमेरा या बाबतीत ३५ एमेम कॅमेऱ्याइतके चांगले चित्र घेऊ शकत नाही. जास्तीत जास्त काय करता येईल ?
१]मायक्रो मोड निवडा,
२] वाईड लेन्स निवडा,
३] ऍपर्चर नंबर कमाल घ्या,
४] कमाल पिक्झल निवडा, फ़्रेममध्ये चित्र लहान दिसेल,तिकडे दुर्लक्ष करून [देवावर विश्वास असेल तर जय श्री राम म्हणून] चित्र काढा.
५] काढलेले चित्र मोठे करून, crop करून , मग डेव्हलप करा.
कॅमेऱ्यामध्ये पिक्झल निवडावयाची सोय असते. २,४,६ मेगा वगैरे.कमाल पिक्झल निवडले की क्रॉप करून Enlarge करणॆ सोपे जाते.
प्रकाश योजनेबद्दल आपण पुढे बघणार आहोतच, पण आतापासून त्या दृष्टीने लक्ष द्या. [म्हणजे Bracketing]
समित्पाणी

लेखनविषय: दुवे:

Comments

मस्तच!

मस्त! लेख आवडला. फक्त ३५मिमि हाताळला नसल्याने फार शंका नाहित.
म्हणजे थोड्या आहेतच् ;)
१. बाहेरून खोल अंधार्‍या जागेतील फोटो काढताना काय् खबरदारी घ्यावी?
२. स्वतःचे पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाला टिपायचा प्रयत्न केला होता. डोळ्यांना दिसतं ते दृश्य आणि फोटो येते ते दृश्य यात नेहेमीच प्रचंड फरक जाणवला.. हे ही DoF च्या सेटिग मधिल गडबडीने घालवता येईल का?
३. बर्‍याचदा मासिकांमधे वाळवंटात उठणार्‍या वाफा (थरथरते प्रतिबिंब/ मृगजळ म्हणा हवं तर) टिपलेल्या दिसतात. मी प्रत्यक्ष तसा प्रयत्न केला असता डोळ्यांना मृगजळ दिसत असूनहि फोटोत सपाट कोरडी जमिनच आली. हे DoF मुळे का अजून काहि कारण असु शकेल

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

माझ्यापरीने उत्तरे

१. बाहेरून खोल अंधार्‍या जागेतील फोटो काढताना काय् खबरदारी घ्यावी?

प्रकाश अंधारात मोजावा. (कॅमेर्‍यात ऑटोमॅटिक एक्स्पोझरसाठी प्रकाशाची तीव्रता कुठे मोजली जाते - तुमच्या कॅमेर्‍याच्या पुस्तिकेत "मीटरिंग मोड" बघा. प्रकाश फक्त मध्यबिंदूवरती मोजला जाईल असे सेटिंग करा - कसे? तुमच्या पुस्तिकेत बघा.) मग फोटो काढावा. अर्थातच बाहेरचा उजेडातला भाग "जळेल" पण नाहीतरी तुम्हाला आतलाच फोटो स्पष्ट हवा होता. आतला बाहेरचा दोन्ही स्पष्ट असलेला फोटो हवा असेल, तर "पोस्ट-प्रोसेसिंग" करावे लागेल (ब्राइटनेस चा "गॅमा" बदला). शरद हे तुम्हाला याबद्दल आणखी माहिती देऊ शकतील.

२. स्वतःचे पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाला टिपायचा प्रयत्न केला होता. डोळ्यांना दिसतं ते दृश्य आणि फोटो येते ते दृश्य यात नेहेमीच प्रचंड फरक जाणवला.. हे ही DoF च्या सेटिग मधिल गडबडीने घालवता येईल का?

बहुधा नाही. प्रतिबिंबांची चित्रे काढायला (किंवा प्रतिबिंबे कमी करायला) कॅमेर्‍यावर पोलरायझिंग फिल्टर लावावे लागते. तसे फिल्टर लावायची सोय तुमच्या कॅमेर्‍याला असली पाहिजे.

३. बर्‍याचदा मासिकांमधे वाळवंटात उठणार्‍या वाफा (थरथरते प्रतिबिंब/ मृगजळ म्हणा हवं तर) टिपलेल्या दिसतात. मी प्रत्यक्ष तसा प्रयत्न केला असता डोळ्यांना मृगजळ दिसत असूनहि फोटोत सपाट कोरडी जमिनच आली. हे DoF मुळे का अजून काहि कारण असु शकेल

थरथरत्या "वाफाळणार्‍या" रस्त्याबाबत डी-ओ-एफ् चा मामला असू शकतो, सहमत. पण "प्रतिबिंब"-मृगजळासाठी बहुधा पोलरायझर लागेल.

फोकसच्या डेप्थची उत्तम ओळख

डिजिटल कॅमेर्‍यातही पूर्ण मॅन्युअल मोड वापरताना तुम्ही दिलेले तक्ते उपयोगी आहेत.

धन्यवाद.

सुंदर

धनंजयशी सहमत.

वर दिलेले संदर्भ कोणत्या पुस्तकातील आहेत? नाव, प्रकाशक, लेखक.

१]मायक्रो मोड निवडा,
२] वाईड लेन्स निवडा,
३] ऍपर्चर नंबर कमाल घ्या,
४] कमाल पिक्झल निवडा,

ह्याचा उपयोग नक्की होईल.

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

संदर्भ

दिलेले संदर्भ द फ़ोकल एन्साक्लोपेडिआ ऑफ़ फ़ोटोग्राफ़ी भाग १ मधले आहेत.
समित्पाणी

 
^ वर