उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
एरोपोनिक्स - माती विरहीत शेती
सहज
August 25, 2008 - 7:03 am
नुकताच एरोपोनिक्स तंत्रावर आधारित एका ग्रीन हाउस ला जायचा योग आला. [म्हणजे मला या विषयातील माहीती नाही तिथले काही फोटो दाखवण्याकरता हा लेख :-) ]
एरोपोनिक्स म्हणजे थोडक्यात माती विरहीत शेती म्हणता येईल. हवा व [सत्वयुक्त ??] पाण्यावर वनस्पती [शक्यतो पालेभाज्या ] वाढवण्याचे तंत्र.
ह्या विषयावर अजुन् माहीती येथे व येथे मिळू शकेल. ह्या एनिमेशन मधे ही प्रक्रिया काय ते लक्षात येईल.
मी काढलेले काही फोटो.
दुवे:
Comments
मातीशिवाय
मनीप्लांट वाढते इतकीच क्षुल्लक माहिती होती. फोटो पाहून आश्चर्य वाटले. पालक आहे का तो?
दुवे सवडीने वाचते. माहितीबद्दल धन्यवाद.
बटरहेड लेट्युस
तो बटरहेड लेट्युस आहे. खायला खूप छान रसाळ होता.
मला हायड्रोपोनिक्स काही वर्षांपुर्वी माहीत होते. हे एरोपोनिक्स मधे एकदा नासा टेक्नोलॉजी संदर्भात वाचले होते पण अचानक बघायची संधी मिळाली. म्हणुन इथे लोकांबरोबर फोटो शेयर केले. :-)
मूडी गार्डन्स(?)
मला आता आठवले की मी अशाप्रकारची शेती फार पूर्वी कुठेतरी पाहिली आहे. कुठे ते नक्की आठवत नाही, गोष्ट जुनी असावी. :-( मूडी गार्डन्स, गॅल्वेस्टन का काय कोणास ठाऊक?
तो
तो पालक वाटत नाही. (मी तो या सदस्या बद्दल बोलत नाही. कृपया गैरसमज नसावा.) सहजच सांगु शकेल काय आहे ते.
असो, फक्त चित्रां ऐवजी मराठीत लेख वाचायला जास्त आवडला असता. बाकी कमी खर्चातल्या पॉलीहाउस बद्दल येथे वाचा
माहितीत भर
छान आणि वैशिष्ठ्यपूर्ण माहिती!
वा
सहजराव,
फोटो आवडले. थोडी अधिक माहिती दिली तर अधिक आवडेल. अगदी शास्त्रीय भाषेत नको. आम्हाला समजेल अशा सोप्य शब्दात.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
चित्रे
असेच म्हणतो. चित्रे आवडली, विशेषतः लहान रोपं आणि मुळांची चित्रे मस्त आहेत.
वॉटरवर्ल्ड!
एकदम नवीन माहिती आणि विषय! फोटो पण छानच आहेत. वर आले आहेच पण अधिक माहीती सांगता आली तर पहा. हे काही नवे तंत्रज्ञान आहे का पाश्चात्यांमधे रुळलेले तंत्रज्ञान आहे? सुरवातीचे काही फोटो मेथीच्या पानासारखे वाटले.
अरे वा !!!
सहजा,
मातीविरहीत शेतीची माहिती, आणि चित्रे आवडली.
कोण-कोणती पिके घेता येतील ?
( माझ्या डोक्यात ज्वारी, बाजरी, कापुस, अस्सं यायला लागलं आहे. )
आश्चर्यकारक नवी माहिती
फोटो छानच आहेत.
आधी मला प्रश्न पडला होता - पण का? दुव्यांवर जाऊन त्याविषयी माहिती कळली.
वेगळेच्!
सहज, वेगळ्याच विषयावरच्या लेखाबद्दल आभार. चित्रे देखील आवडली.
मातीशिवाय मुळांवर थेट पोषक द्रव्ये फवारून हा प्रयोग केला जातो का? चित्रांबरोबर थोडी माहिती द्यायला हवी होती.
आणि त्या माशांचा देखील या प्रक्रियेत काही सहभाग असतो का?
-सौरभदा
==============
... ask not what your country can do for you, ask what you can do for your country.
-John F. Kennedy
धन्यवाद
परत एकदा सांगतो की मला खरचं एरोपोनिक्स बद्दल माहीती नाही. :-) पण प्रत्यक्षात ते सर्व पाहून व अनायसे कॅमेरा बरोबर असल्याने काढलेले फोटो इथे तुम्हा सर्वांना दाखवावेसे वाटले. तरीही मला वाटलेच होते की माझ्यावर आता एरोपोनिक्स बद्दल लिहायची वेळ येणार. म्हणुन शोधुन दुवे काढून शक्य तेवढी माहीती देण्याचा प्रयत्न केला आहे. :-)
नाही त्या माशाचा ह्या प्रक्रियेत काही सहभाग नाही. :-) तो मासा त्या फार्मच्या सुरवातीच्या भागातील एका फिश टँक मधे होता व चक्क त्या काचेचे प्रतिबिंब, काचेवरचे डाग इ न येता जणू अंडरवॉटर फोटो काढल्यासारखा होता म्हणून तो फोटो मला आवडला व इथे टाकला वेगळा टाकायच्या ऐवजी. ;-)
छान
सुरेख आलेत फोटो !
कुठे आहे हे ग्रीनहाउस ?
वा!
सहजराव,
निमित्त काहिहि असो.. तुम्ही लिहायला सुरवात केलीत याचाच आनंद झाला. :)
छाचि. मस्त! मुळे आवडली.. शिशुवर्गात गिचडीकरून मुले बसली आहेत असे वाटले ;)
माहिती नका देऊ हवं तर.. अनुभव सांगा.. तिथे जमलेली लोकं, तिथला मजेशीर प्रसंग, त्या स्थळाला जाताना आलेले स्मरणीय अनुभव!
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे