युरोपमधील आजी व तीची अंधश्रध्दा
युरोपमधली आजी व तीची अंधश्रध्दा
अंधश्रध्दा भारतातच आहेत असे नाही. युरोपमध्येही आहेत. युरोपमधल्या आजीची ठाम समजुत होती की हिवाळ्यात बाहेरून आल्यावर बादलीत गरम पाणी घेऊन त्यात पाय बुचकळून थोडा वेळ बसले की सर्दी होत नाही. १९५० च्या आसपास शास्त्रज्ञांनी शोध लावला की सर्दी व्हायरस [जीवाणू ?] मुळे होते. माणसाच्या नाकातील व्हायरस औषधांच्या प्रभावाने मारा, सर्दी नाहिशी ! गरम पाण्यात पाय ठेवून नाकातील व्हायरस मरतात काय ? पन्नास वर्षे सगळेजण आजीला हसत होते, चिडवत होते. नंतर काही जणांच्या मनात आले आजी म्हणतेच आहे तर कराना प्रयोग. फ़ार खर्चाचे नाही. निरनिराळ्या गटातील माणसे जमवा,हिंडवून आणून
बाकावर बसवा,निम्म्यांना गरम पाण्यात पाय बुचकळून बसावयास सांगा ,इतरांना नुसतेच. थोडे दिवसात काय ते कळेलच [ म्हणजे आजी अडाणी कसे ते]
पण झाले भलतेच! आजीच बरोबर ठरली. परत एकदा प्रयोग केला.नतिजा तोच. व्हायरस कुठे गेले ?
मग मात्र गंभीरपणाने चिकित्सा केली गेली. आजी बरोबर का ते शास्त्रीय मार्गाने सिध्द केले गेले. काय होते की हिवाळ्यात तुम्ही बाहेरून आलात की शरीराचे तपमान खाली जाते. हृदयाला जास्त रक्ताची गरज भासू लागते. शरीर काय करते ? ज्या भागांना रक्तपुरवठा कमी झाला तरी चालेल अशी इंद्रिये निवडून त्यातला पुरवठा कमी करा व तेवढे रक्त हृदयाकडे वळवा. अश्या इंद्रियात कान,नाक वगैरे आले.नाकात पुरवठा कमी झाल्याने काय होते ? सर्दीचा प्रतिकार करावयास नाकाच्या आतल्या कातडीपाशी
ऍंटिव्हायरस तयार होत असतात.जेंव्हा रक्ताचा पुरवठा कमी होतो तेंव्हा ऍंटिव्हायरस कमी तयार होतात.प्रतिकार शक्ती कमी पडली की तुम्हाला सर्दी झालीच. एकदम शिम्पल. आजी बरोबर !
आपण देवासमोर,तुळशीपाशी दिवा लावतो,उदबत्ती लावतो. चीनमध्ये तेच करतात.ख्रिस्त्यांमध्ये कृसजवळ मेणबत्त्या लावतात.इतर संस्कृतींमध्ये असे प्रकार असतील का? प्रियालीताई सांगतीलच. जर जगभर, अनंत काळ अशी श्रध्दा असेल तर या अंधश्रध्देबाबत कोण प्रयोग करणार ?
समित्पाणी
Comments
अधिक वाचायला आवडेल
या लेखात काही आश्चर्यकारक माहिती आहे.
अशी कुठली औषधे आमच्या वैद्यकीय अभ्यासक्रमात (१९९० च्या आसपास) नव्हती. त्यामुळे असा काही शोध १९५०च्या आसपास लागला असेल याबाबत आचंभा वाटतो.
पाण्यात पाय घातल्याबद्दल अभ्यासाचा एक दुवा येथे सापडला (दुवा). पण हा पाय बर्फाळ थंड पाण्यात घालण्याबद्दल आहे. गरम पाण्यात पाय घातलेल्या अभ्यासाबद्दल आणखी माहिती देता काय?
मला वाटते येथे "च्या-मुळे=कारण" शब्दाच्या वेगवेगळ्या अर्थांबद्दल गोंधळ होतो आहे.
उदाहरणार्थ :
१. रस्त्याच्या नियमाच्या उलट्या दिशेने (म्हणजे भारतात रस्त्याच्या उजव्या हाताने) मोटारगाडी चालवल्यास अपघात होतो, असे माझ्या वडलांनी मला सांगितले. (समांतर : थंडीत सर्दी अधिक होते असे आजीने सांगितले.)
२. समोरून येणार्या मोटारीशी टक्कर झाल्यामुळे असे अपघात होतात असे वाहातुक शास्त्रज्ञांनी सांगितले. समोरून मोटार येत नाही अशी तजवीज केली तर, तर रस्त्याच्या कुठल्याही बाजूने गाडी चालवली तर अपघात होत नाही. तसेच समोरून मोटार येत असेल तर आपण डाव्या बाजूने गाडी चालवली तरीही अपघात होऊ शकतो. (समांतर : विषाणूंमुळे सर्दी होते असे शास्त्रज्ञांनी शोधून काढले. विषाणू नाहीत अशी तजवीज केली तर थंडीतही सर्दी होत नाही. विषाणूंशी संपर्क आला तर थंडी नसूनही सर्दी होऊ शकेल.)
३. काही लोकांना मोटार चालवायला सांगितले. अर्ध्या लोकांना उजवीकडून, अर्ध्या लोकांना डावीकडून. उजवीकडून मोटार चालवणार्यांना अधिक अपघात झाले. हा "समोरून येणारी मोटार" प्रकार कुठे गेला? (समांतर : व्हायरस कुठे गेले?)
वरील १ आणि २ एकमेकांच्या विरोधात आहे असे वाटणे योग्य नाही. पण तसे वाटल्यास वाक्य ३ म्हणायचा मोह होऊ शकतो. ती वाक्ये एकमेकांच्या विरोधात नाही हे समजताच हे ३-वाक्य म्हणायचा मोह होणार नाही.
पूज्य स्थानापुढे ज्योत लावण्यात कारण काय आहे, आणि कार्य काय आहे? ते स्पष्ट असल्यास प्रयोग काय करावा ते सहज सांगता येईल.
म्हणजे असे आहे का?
१. पूज्य स्थान हे कारण असल्यामुळे त्यापुढे ज्योत जळणे हे कार्य होते.
किंवा
२. ज्योत जळणे हे कारण असल्यामुळे स्थान पूज्य होणे हे कार्य होते.
किंवा
३. पूज्य स्थानापुढे ज्योत जळणे हे कारण असल्यामुळे काहीतरी भले होणे हे कार्य होते.
वगैरे - यादी संपली नाही.
कारण/कार्याबद्दल काहीच तर्क नसला तर तपासण्यासाठी काहीच नसते. "पूज्य ठिकाणापुढे ज्योत जळताना आपण पाहिली" हे स्वयंपूर्ण निरीक्षण असते. कारण/कार्याबद्दल काहीतरी तर्क असला तर तो तर्क तपासण्यासाठी काय निरीक्षण आवश्यक आहे, ते शोधणे फारच सोपे असते. तसे निरीक्षण करणे फार कठिण किंवा महाग असू शकते, त्यामुळे तसा प्रयोग नेहमी करता येतोच असे मात्र नाही.
बापरे!
धनंजयराव,
धन्य आहात :)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
यूरोपातच का
भारतातही सांगतातच ना की हिवाळ्यात जाड पायमोजे घाला, कान आणि नाक बंद ठेवा, गरम/कोमट पाणी प्या, जेणेकरुन त्या त्या भागातली उष्णता टिकून राहील आणि सर्दी पडसे होणार नाही!
सर्वच गोष्टी अंधश्रद्धा म्हणून झटकून टाकण्यापेक्षा योग्य वाटतील तेथे प्रयोग करणे श्रेयस्कर.
चतुरंग
सर्दी आणि गरम पाणी
शरद
सर्दी आणि गरम पाणी
पूर्वी टि.व्हीवर पाहिलेल्या एका कार्यक्रमावर अवलंबून मी लिहले होते. मी वैद्यकीय व्यवसायातला नसल्याने तेथे दाखविलेले बरोबर की चूक याबद्दल मी सांगू शकत नाही. श्री.धनंजय यांच्या प्रतिसादावरून असे दिसते की हा टी.आर.पी.वाढवण्याकरिता दाखवावयाचा कार्यक्रमही असू शकेल. सर्वसाधारणत: प्रेक्षक धरून चालतो की टिव्हीवरील माहिती अगदी अचूक नसली तरी फ़ार चूकीची तरी नसेल. चला. एक झाले की टिव्हीवरील माहिती अचूक नसेल, पण श्री. धनंजय यांच्यामुळॆ य़ा संदर्भात नवीन नवीन गोष्टी कळाल्या.
समित्पाणी
वैद्यकीय अंधश्रद्धा
प्रत्येक देशांत असाव्यात. आपल्याकडे सर्दी-खोकला झाला की थंड खाऊ नका किंवा थंड खाल्ल्याने सर्दी झाली असे सांगतात तर इथे अमेरिकेत घसा दुखत असेल तर आईसक्रिम किंवा पॉपसिकल देण्यास सांगतात.
माझा अनुभव असा की अमेरिकेत मला हिवाळ्यात काहीही होत नाही. वसंतात मात्र सर्दी [ऍलर्जी] हमखास होते.
बाकी, पाश्चात्त्यांच्या इतर अंधश्रद्धा खूप आहेत. आमच्या कॉलनीत १३ नंचा प्लॉट गेली २ वर्षे रिकामा आहे. :-)
आमच्या
आमच्या कॉलनीत १३ नं चा प्लॉटच नाही :)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
आमच्या इमारतीत तेरावा मजला नाही
(म्हणजे तळमजल्याला "१" म्हटले तर.)
मोजून तेराव्या मजल्याला चौदावा मजला म्हणतात.
भयंकर स्वस्तात
त्या जागेवर बिल्डरने स्वतः घर बांधून दिलं. घरात अपग्रेड्स दिले. मागे-पुढे सॉड घालून दिले. मजा म्हणजे १३ हा केवळ प्लॉट नं आहे. घराचा क्रमांक पाच आकडी वेगळा आहे तरी घर रिकामचं. आम्ही म्हणतो की आम्हाला का नाही लक्षात आलं की हे स्वस्तात मिळेल म्हणून? ;-)
असो, आम्ही ते घर घेतलं नाही कारण ते पूर्व-पश्चिम होते. :-) आपल्या वास्तुशास्त्रात पूर्व-पश्चिम घर घ्यावे असे सांगतात म्हणे.
अवांतर
हो ना! हे बाकी खरं. मग मीही १३ नं अपशकुनी असतो असेच म्हणेन. ह. घ्या.
रीडर्स डायजेस्ट
च्या एका अंकात अशाच एका विषयावरचा लेख वाचला होता. बर्याचदा जुन्या काळच्या वाक्यांमध्ये काही खरेपणा असतो का या वरच्या संशोधनातले निष्कर्ष त्या लेखात मांडण्यात आले होते. त्यातले एक वाक्य आठवते ते म्हणजे 'Red sky in the morning , Sailor take warning'.
याशिवाय आईस्क्रीम खाल्ल्याने सर्दी होते हे वाक्य देखील त्यात खोडून काढण्यात आले होते. गाजरे खाल्ल्याने डोळे सुधारतात हे देखील असेच वाक्य आहे बहुधा!
- सौरभदा
=====================
Tell the truth and then run.
-Proverb
वैज्ञानिक विश्लेषण!!
मराठी असे आमुची मायबोली |
***********************************
श्री.शरद लिहितातः"आपण देवासमोर,तुळशीपाशी दिवा लावतो,उदबत्ती लावतो. चीनमध्ये तेच करतात........."
ही माहिती बरोबर आहे. पण अपुरी आहे.अधिक माहिती अशी:
...अशा दीप प्रज्वनाचा इष्ट परिणाम साधण्यासाठी देवमूर्ती ईशान्याभिमुख हवी. ज्योत पेटवताना काडी अंगुष्ठ आणि मध्यमा यांतच पकडावी.तर्जनीचा स्पर्श नको. नाहीतर ऊर्जाप्रवाह विरुद्ध दिशेने जाईल.ज्योतिप्रकाशाने देवाचे हृदयस्थान उजळल्यावर तिथून निघणारी शक्तिस्पंदने ,मूर्तीतून होणारे परमाण्विक उत्सर्जन ,ज्योतीतून येणार्या प्रकाशलहरी आणि वैश्विक विद्युतचुंबकीय तरंग यांच्या एकसामयिक संयोगाने आदिशक्तीशी एकतानता साधता येते.यास्तव ही विज्ञानाधिष्ठित प्रथा जगात सर्वत्र रूढ असावी. :)
वाती
वातीदेखील सनातनच्या सात्त्विक असल्या पाहिजेत ;)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥