सारेगमप लिट्ल चँप्स

लोकसत्तेतला हा लेख वाचून सारेगमपचे भाग मुद्दाम शोधून पाहिले.

सर्वच जण अप्रतिम गात आहेत पण विशेषतः हे तिघं बघा.

Comments

जबरदस्त रोहित राऊत!

रोहित राऊत हा एक व्हर्सटाइल गायक आहे. हेच बघा 'जबरदस्त फंडा' हे गाणे ऐका. (सुरुवातीला कदाचित तितके चांगले वाटणार नाही पण दुसर्‍या कडव्यापासून जरूर ऐका)

तसेच 'दशरथा'ही सुरेख म्हटले आहे.

क्या बात है

चौथा भागही सुरु झाला वाटतं. ती बेला शेंडे होती का मध्ये बसलेली?

खूपच मस्त. ही गाणी ऐकल्यानंतर घरी जाऊन पाण्याने कान धुतले नाहीत तर गाण्यांच्या गोडव्यामुळे कानाला मुंग्या लागतील ही अवधूतची प्रतिक्रिया किती मार्मिक आहे. :))


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हो

ती बेला शेंडे होती का मध्ये बसलेली?

हो ती बेला शेंडेच आहे.

सुंदर

मस्त :)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मुग्धा वैशंपायन

या कार्यक्रमात छोटा गट, मोठा गट असे भाग आहेत असे वाटते. त्यातील लहान गटातील मुग्धा वैशंपायन चे हे गाणेही मजेशीर आहे.

स्ट्रेसबस्टर

लहान मुलांनी गायलेली ही गाणी खरीखुरी स्ट्रेसबस्टर आहेत. विशेषतः मुग्धाचे वरील गाणे रोज संध्याकाळी ऐकावे असे आहे ;)

छान छान छान :)

सहीच


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

चांगला कार्यक्रम

सध्या "झी मराठी" ऑनलाईन असल्यामुळे थोडाफार पाहीला गेला. कार्यक्रम अगदी मस्त आहे आणि आयोजक पण चांगला करतात. पल्लवी जोशी, वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते तिघेही एकदम जसे बोलायला हवे तसे लहान मुलांशी बोलतात त्यामुळे त्या कार्यक्रमाची शोभा वाढली आहे. फक्त कधी कधी पल्लवी जोशी आणि ऑलमोस्ट प्रत्येक वेळेस वैशाली सामंत जे "क्या बात है" असे म्हणतात त्याने जरा डोके फिरते :)

क्या बात है!

फक्त कधी कधी पल्लवी जोशी आणि ऑलमोस्ट प्रत्येक वेळेस वैशाली सामंत जे "क्या बात है" असे म्हणतात त्याने जरा डोके फिरते :)

खरे आहे :)

क्या बात है!

विकासरावांशी सहमत झाल्याने दुसरे काहीच सुचले नाही ;)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सोप्पे

विकासरावांशी सहमत झाल्याने दुसरे काहीच सुचले नाही ;)

बघा किती सोप्पे असते एकदा सहमत असले की! विचार करणे आणि टंकणे सगळ्यातला वेळ वाचतो ! :-)

छान कार्यक्रम

मराठी सारेगमप हा कार्यक्रम मागच्या वर्षी पाहिला, आणि खूपच आवडला.
मुलेही छान गात आहेत. त्यातही प्रथमेशचे गाणे आवडलेच.

अवधूत गुप्तेही परिक्षक म्हणून आवडतो. कधी तरी मुलांना जास्त "चढवीत" आहे असे वाटले तरी.
मागे एकदा अवधूत गुप्तेला कशामुळे परीक्षक व्हायला मिळाले म्हणून कोणीसे (!) म्हणाल्याचे आठवते. :-) पण म्हणून कोणी मूर्ख म्हटले तरी पर्वा नाही, सारेगमप मध्ये त्याच्यामुळेही "गंमत" येते ही एकदम खरी फ्याक्ट.

खरे आहे

अवधूत गुप्ते फारच छानपैकी गुण वगैरे देतो. 'एकापेक्षा एक' किंवा 'होम मिनिस्टर' प्रमाणे या कार्यक्रमात आचरटपणा नाही. कदाचित लहान मुले भाग घेत असल्याने एक प्रकारची म्याच्युरिटी कार्यक्रमाला आली आहे.

शिवाय 'काय गं कसं वाटतंय? गुलाबी फ्रॉक, गुलाबी इयरिंग्ज, गुलाबी चपला, आणि थोड्डीशी गुलाबी लिपस्टिक सुद्धा" या पल्लवीच्या प्रश्नावर छोट्या मुलीचे, "मी कधीच एवढी नटले नव्हते" हे प्रामाणिक उत्तर पाहून कार्यक्रम वारंवार पहावासा वाटतो.

शिवाय संगमेश्वर, लातूर, आळंदी अशा दूरदूरच्या गावातली ही मुलं आहेत हे पाहून अधिकच आनंद होतो.

आपला,
(गावकरी) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वा!

सगळी गाणी ऐकली. मस्तच चालू आहे!

सा रे ग म

स्पर्धक बहुगुणी असावेत ही अपेक्षा पण परिक्षक मात्र कसे असावेत?
१) "सान्गा मुकुन्द कुणी हा पाहीला " हे मुळ गाणे पन्डित राव नगरकर यानी म्हटले हे एकाहि परिक्षकाला माहीत नव्हते.
२) वैशाली 'म' देते व अवधुत 'नी' याचे कारण कसेच कळत नाही.
३) स्पर्धक अन्तिम फेरीत आल्यावर आम्ही परिक्षण कडक करु असे सान्गितले पण 'मुग्धासाठी मात्र गाणे विसरुन देखील रेटिन्ग 'ध" हे अनाकलनीय ! वय हा पण निकष होता की काय ?
४ ) असे समजते की स्पर्धकान् कडुन पैशाची मागणी केली जात आहे , परन्तु या विषयी खुले आम कोणी आवज नाही आहे. या कुजबुजीत काही दम आहे काय ?
५) प्रादेशीकता अवधुत कडुन नकळ्त जपली जात असे आपल्याला वाटत नाही का, त्या त्या भागातून एस एमे एस् पाठविण्याचा आग्रह पाहीला की ?

आपली प्रतिक्रीया अपेक्षित!

धन्यवाद् !
अविनाश रायकर

दूर्जनांच्‍या दुष्‍कृत्‍यांपेक्षा सज्‍जनांची निष्क्रीयता जास्‍त भयावह

सज्जनांचे दुष्कृत्य

"सारेगमप लि'ल् चँप्स" हा दृष्ट लागण्याइतका सुरेख कार्यक्रम आहे. (असे म्हणण्याची पद्धत आहे. माझा विश्वास आहे की नाही यावर वाद नसावा.)
त्याला तुमच्या शंका गालबोट म्हणू या! :) (असे म्हणण्याची पद्धत आहे. माझा विश्वास आहे की नाही यावर वाद नसावा.)

१) "सान्गा मुकुन्द कुणी हा पाहीला " हे मुळ गाणे पन्डित राव नगरकर यानी म्हटले हे एकाहि परिक्षकाला माहीत नव्हते.
- परीक्षक गाईड घेऊन बसलेले नव्हते किंवा कार्यक्रम खोटाखोटा शूट केलेला नव्हता याचे हे द्योतक नाही काय?

२) वैशाली 'म' देते व अवधुत 'नी' याचे कारण कसेच कळत नाही.
- कोणी काय मार्क द्यायचे ते परीक्षकच ठरवणार.

३) स्पर्धक अन्तिम फेरीत आल्यावर आम्ही परिक्षण कडक करु असे सान्गितले पण 'मुग्धासाठी मात्र गाणे विसरुन देखील रेटिन्ग 'ध" हे अनाकलनीय ! वय हा पण निकष होता की काय ?
- मुग्धा वैशंपायन मुळात बाल गटातून येऊन किशोर गटाशी टक्कर देत आहे हेच किती कौतुकास्पद आहे. स्पर्धेत वय हा निकष नसला तरी परीक्षकांना गाणे आवडले तर ते कितीही मार्क देऊ शकतात. आपण कोण बोलणार? (जसे चुकीच्या उत्तरालाही अक्षर आवडले म्हणून थोडे मार्क देणारे परीक्षक अनुभवात आहेत.)

४ ) असे समजते की स्पर्धकान् कडुन पैशाची मागणी केली जात आहे , परन्तु या विषयी खुले आम कोणी आवज नाही आहे. या कुजबुजीत काही दम आहे काय ?
- पैशाची मागणी ही कमी दर्जाच्या स्पर्धकांकडून होऊ शकते. यातला एकजण तरी कच्चा आहे असे म्हणता येईल काय? ही 'कुजबुज' तुम्ही कोठे ऐकली? 'असे समजते'ला काही पुरावा आहे काय?

५) प्रादेशीकता अवधुत कडुन नकळ्त जपली जात असे आपल्याला वाटत नाही का, त्या त्या भागातून एस एमे एस् पाठविण्याचा आग्रह पाहीला की ?
- एसेमेस् पाठवून सर्वोत्कृष्ट गायक ठरवणे ही पद्धत चूक की बरोबर? यावर वाद होऊ शकतो. पण तसा वाद कोणत्याही बाबतीत घालता येतो. एकदा स्पर्धेचे नियम ठरले की आपल्या भागातील स्पर्धकाला एसेमेस् पाठवण्याची अहमहिका लोकांमध्ये नैसर्गिकच असते. तिथे वेगळी प्रादेशिकता कशाला जोपासायला हवी? (उदा. देशाच्या पातळीवर आपण महाराष्ट्राच्या स्पर्धकाला एसेमेस् देऊ, अमेरिकन आयडलमध्ये भारतीय स्पर्धकाला, नाही का?)

असो. लि'ल् चँप्सच्या परीक्षकांवरील तुमचा राग समजला नाही. **(दुखरी नस कुठे आहे?)**

सा रे ग म चम्पस्

प्रतिक्रिया
परीक्षक गाईड घेऊन बसलेले नव्हते किंवा कार्यक्रम खोटाखोटा शूट केलेला नव्हता याचे हे द्योतक नाही काय?

अपेक्षा
परीक्षक म्हटला की काही अपेक्षा असतात.एक सुप्रसिद्ध भूपाळी कुणी गाइली हे परीक्षकाना माहिती असावी ही माफक अपेक्षा असणे यात परीक्षकांवर राग असण्याचे काहीच कारण नाही.
इतर वेळी बर्याच वेळा मुद्दाम अशा बाबतीत बराच वेळ् दिला जातो.

प्रतिक्रिया
कोणी काय मार्क द्यायचे ते परीक्षकच ठरवणार
अपेक्षा
वैशाली 'म' देते व अवधुत 'नी' याचे कारण कसेच कळत नाही. जर नेमलेल्या परीक्षकांच्या मार्कात एवढी तफावत असेल , तर शन्केला नक्किच वाव असे मला वाटते. हे मी प्रथमच अनुभवले म्हणुन असेल कदचित.

बाकी मुद्द्यावर विषेश लीहीण्यासारखे काहीच नाही. यथावकाश लिहीत जाउ.

धन्यवाद् !
अविनाश रायकर
दूर्जनांच्‍या दुष्‍कृत्‍यांपेक्षा सज्‍जनांची निष्क्रीयता जास्‍त भयावह

सा रे ग म चम्पस्

तुषार काळभोर

|वैशाली 'म' देते व अवधुत 'नी' याचे कारण कसेच कळत नाही. जर नेमलेल्या परीक्षकांच्या मार्कात एवढी तफावत असेल , तर शन्केला नक्किच वाव असे मला वाटते. हे मी प्रथमच अनुभवले म्हणुन असेल कदचित.

मला वाटते, एखादा पेपर २ परीक्षकांनी तपासला तर दोघेही सारखेच गुण देण्याची शक्यता किती असते? त्यामुळे दोन्ही परीक्षक वेगळे गुण देतात हे स्वीकरार्ह असावे. गुणांत किती फरक असावा हे त्यांनीच ठरवलेले बरे.

उत्तम उदाहरण

तुषार यांनी उत्तम उदाहरण दिले आहे. मात्र परीक्षकांच्या गुणांनीच गुणी चँपची निवड व्हावी. एसेमेसांनी लोकप्रिय चँपची निवड करावी असे वाटते. असे दोन पुरस्कार द्यावेत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

छान कल्पना

दोन पुरस्कार देण्याची कल्पना खरंच छान आहे.
एक परीक्षकांचा(ज्युरीज् सिलेक्शन) आणि एक जनतेच्या प्रतिसादाचा(व्युअर चॉईस)....असे ठेवता येतील.

पहिल्या पर्वात अभिजीत कोसंबीला परीक्षकांनी एका फेरीत बाद केल्यावर पुन्हा संधी दिली होती. त्यानंतर तो सर्वाधिक मते(एस् एम् एस् द्वारे) मिळवून विजेता ठरला होता. अशावेळी प्रेक्षक सहानुभूतिच्या लाटेत मतदान करण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी इतरांमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण होऊ शकते.

(अभिजीतच्या कौशल्याविषयी मी शंका घेतलेली नाही. तो एक चांगला गायक आहे, याची मला कल्पना आहे.)

१४वा भाग प्रथमेश, आर्या आणि रोहित

सारेगमप लिल् चॅम्प्सच्या १४व्या भागात प्रथमेश आणि आर्या या दोघांनीही फार अपेक्षाभंग करणारी गाणी गायली. प्रथमेशच्या आवाजातील उठी उठी गोपाळामध्ये त्याचा चिरकणारा आवाज ऐकून धक्का बसला. त्याचा आवाज सध्या फुटत आहे आणि पब्लिकसमोर फार जास्त गावे लागत असल्याने असे व्हावे का? या भागातील त्याची इतर गाणीही फार आवडली असे झाले नाही. (त्यातही त्याने 'मी हाय कोली' चांगले म्हटले. )

आर्याने 'छम छम करता' या गाण्यात रंग भरला नाही. मात्र तिने म्हटलेली 'येणार नाथ आता' आणि 'मागे उभा मंगेश' ही चांगली होती.

तुलनेत रोहितने म्हटलेले 'येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील' हे गाणे प्रोफेशनल वाटावे इतके चांगले झाले आहे. कार्तिकीचीही नवरी नटली आणि विलोपले मधुमिलनात या ही गाणी सुरेख.

मुग्धाची गाणी मी फारशी ट्रॅक करत नाही. मात्र तिने मागे म्हटलेले अरे अरे पावट्या हे फारच जबरा होते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

१५ वा भागः अपेक्षाभंग पुढे सुरु

कार्तिकीचे लिंगोबाचा डोंगुर झकास होते. मात्र आता कार्यक्रम पातळी घसरवून झी टीवीची लाल करायचा प्रयत्न करत आहे असे वाटते. गाणी आणि संगीताशी काहीही संबंध नसावा असे वाटणारे असंभवमधील पांचट कलाकार (त्यात एकीचेही नावही संगीता नाही इथवर त्यांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही), एकापेक्षा एकची विजेत्या कोणा नाचमोगरीचे नृत्य. फार उबगवाणा प्रकार. त्यात काही न सुचल्यामुळे नीलम शिर्केच्या 'तू एकदम आयला गायलीस' वगैरे पाहून आतात डोळे मिटून कार्यक्रम ऐकावा असे वाटत आहे.

असो प्रथमेशची दोन्ही गाणी अपेक्षेप्रमाणेच सुंदर झाली. रोहित आणि आर्याही उत्तम.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ह्म्म्

वाचतोय...

लोकसत्ता मधील ह लेख वाचा

http://www.loksatta.com/daily/20090205/viva02.htm

धन्यवाद् !
अविनाश रायकर
दूर्जनांच्‍या दुष्‍कृत्‍यांपेक्षा सज्‍जनांची निष्क्रीयता जास्‍त भयावह

 
^ वर