लोकायत नावाचे मराठी संकेतस्थळ...

http://www.lokayat.com/

आजच्या दिवशी लोकायत नावाचे आणखी एक मराठी संकेतस्थळ जन्माला आले आहे याचा मला विशेष आनंद वाटत आहे. मनोगत, उपक्रम आणि मिसळपावाच्या भावंडात आणखी एकाची भर झाली आहे.

वैशिष्ट्य म्हणजे यासर्व संकेतस्थळाचा आपापला चाहता वर्ग आहे. ( सकाळचा चहा, बातम्या आणि वर्तमानपत्र बरोबरच आपापली संकेतस्थळे पाहिली नाही तर दिवस सूरु झाला नाही असे वाटतेच वाटते...)

लोकायतने आपली बांधिलकी मराठी आणि तंत्रज्ज्ञान यासाठी प्रकट केलेली आहे.

मराठी शाळेच्या भाषिकांना, विद्यार्थ्यांना आणि मराठीप्रेमीजगताला याचा उपयोग होणार असे मला वाटते.

आजच्या शुभदिवशी आपण एक उडी मारली आहे याचा मला आनंद वाटतो.

आपण सर्व उपक्रमी या संकेतस्थळाचा नाव आणि लौकिक वाढेल अशी प्रार्थना करु या.

द्वारकानाथ उपक्रमी.

Comments

अभिनंदन!

सकाळचा चहा, बातम्या आणि वर्तमानपत्र बरोबरच आपापली संकेतस्थळे पाहिली नाही तर दिवस सूरु झाला नाही असे वाटतेच वाटते...

अगदी खरे आहे!

अभिनंदन

नीलकांत तिथले आद्य लेखक तरी आहेत.

नवीन संकेतस्थळाचे अभिनंदन.

नीलकांत+आनंदयात्री+विनायक अनिवसे

तंत्रज्ञानाची गरज नाही.

घोड्याला बोलतं करतं आलं पाहिजे... म्हणजे फ्रॉम द हॉर्सेस माऊथ हो

ह. घ्या.

मी आहेच...

नमस्कार,

लोकायत.कॉम हे मी नोंदवलेले संकेतस्थळ आहे. मात्र ते सुरू करण्यासाठी कैवल्य, प्रसाद, विनायक, चित्तरंजन, कलंत्रीसाहेब, घाटपांडेकाका यांची मदत व प्रोत्साहन प्राप्त झाले आहे.

तुम्हा सर्वांच्या मदतीने हा प्रकल्प पुढे जावा ही विनंती.

नीलकांत.

कलंत्रींचे आभार्

कलंत्रीसाहेबांनी हा धागा टाकुन दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल लोकायत व्यवस्थापन आपले आभारी आहे, धन्यवाद.

लोकायत.कॉम ओळख

या संकेतस्थळाचा मुख्य हेतू इंटरनेटवर संगणकावर मराठीच्या वापरास चालना देणे हा आहे. येथे साध्या सोप्या मराठीतून संगणक व इंटरनेटच्या वापराबद्दल मार्गदर्शक लेख, नवनवीन तंत्रांची मराठीतून ओळख तसेच आपल्या संगणक व इंटरनेटबद्दलच्या अडचणींबद्दल तज्ज्ञांना प्रश्न विचारण्याच्या सोई उपलब्ध आहेत/ उपलब्ध करुन् देण्याचा मानस् आहे.

मराठीचा वापर इंटरनेटवर वाढावा यासाठी अनेक लोक काम करीत आहेत. त्यांच्या कार्याबद्दल माहिती, त्यांचे प्रकल्प आदींबाबत सविस्तर वृतांत येथे देण्यात येतील. तसेच मराठी फ्रीलांसर्सची सूची येथे उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

तुम्ही सुद्धा या प्रकल्पात सामील व्हा. सदस्य व्हा. तुमच्या आवडीच्या तंत्रज्ञानासंबधी लेख लिहा. प्रश्न विचारा, इतरांच्या शंकांना उत्तरे द्या.

तुमचे सहर्ष स्वागत.

धन्यवाद.

शुभेच्छा!

लोकायतकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि लोकायतला अनेकोत्तम शुभेच्छा! :)

असेच म्हणतो...

असेच म्हणतो. मुक्तस्त्रोताचा स्त्रोत तेथे अखंड सुरु असेल अशी अपेक्षा आहे. आपल्यातील काही जणांना हे संकेतस्थळ माहित असेलच. :)





धन्यवाद.

सचिन हा होतकरु मुलगा आहे. अवकाशवेधाच्या वेळेस त्याच्याशी भ्रमणध्वनिवर बोलण्याचा योग आला होता. त्यानंतर सहजच नावाचे संकेतस्थळ त्यानेच बनविले आहे हे वाचुन खरेच खुपच आनंद झाला. नीलकांत आणि सचिन सारखे मुले ही आपली खरी संपत्ती आहे. अशी मुले आपल्याकडे असल्यावर मराठीचे दिवस चांगलीच असतील यात काय शंका?

सहजच आणि लोकायतचा प्रसार आणि प्रचार करण्याचे माझ्याकडुन मी यथायोग्य प्रयत्न करणारच.

चाणक्य साहेब यांचे विशेष आभार.

माधव शिरवळकर

माधव शिरवळकरांचे संगणक जगत्‌ नावाचे एक संकेतस्थळ याच विषयावर आहे. --वाचक्‍नवी

अभिनंदन

सर्व संबंधितांचे अभिनंदन, धन्यवाद आणि लोकायतला माझ्या अनेकोत्तम शुभेच्छा

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

अभिनंदन

हार्दिक अभिनंदन


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अभिनंदन

हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !!!
या संकल्पनेसाठी कष्ट घेतलेल्या सर्वंचे आभार

 
^ वर