छायाचित्रकला
उपक्रमवरील वरील समुहाला मिळणारा मोठा प्रतिसाद बघून वाटू लागल्रे की या विषयावरची थोडीशी प्राथमिक माहिती सर्वांना करून द्यावी. थोड्य़ा तांत्रीक माहितीने छायाचित्राच्या गुणवत्तेत फ़ार फ़रक पडू शकतो. उदा. Shutter Priority केंव्हा वापरावी व Apperture Priority केंव्हा हे जर माहीत असेल तर तुम्ही तुमच्या कॅमेराचा जास्त चांगला उपयोग करू शकाल. इंग्रजी शब्द वापरावे लागल्याबद्दल सुरवातीसच क्षमा मागतो.
छायाचित्र काढण्यास तीन घटकांची जरूरी आहे.
. १] फ़ोटो काढणारा, २] फ़िल्म, ३] कॅमेरा.पहिला जास्त महत्वाचा कारण तो चेतनामय आहे तर उरलेले दोन जड.
[असे लिहले कारण आचार्य धनंजयांच्या छायाचित्रांपेक्षा त्यांच्या लेखांचा परिणाम आमच्यावर जास्त होतो.असो. विसरून जा.} काढणारा प्रयत्नाने सुधारणा करू शकतो. फ़िल्म व कॅमेरा एकदा खरेदी केला की त्यांमध्ये परिवर्तन नाही.फ़िल्मपासून सुरवात करू.[digital photographyवर नंतर] सर्व माहिती ३५ एमेम कॅमेऱ्याचा वापर गृहित धरून.
फ़िल्म :- अगदी सुरवातीला १०x१२ इंचावी काच वापरली जायची. नंतर ६x४, ४x४ इंचाची व आता ३६x२४ एम एम ची प्लस्टिक फ़िल्म.हीच ३५ एमेम म्हणून ओळखली जाते.त्यातील निरनिराळे प्रकार म्हणजे ISO ६४,८०,१००, २००, ४०० वगैरे.जितका आकडा कमी तितका फ़ोटोचा आकार मोठा करता येतो व grains कमी दिसतात.पण कमी प्रकाशांत फ़ोटो काढता येत नाही. फ़ार जास्त नंबरची फ़िल्म घेतली तर कमी प्रकाशात फ़ोटो घेता येतो पण grains जास्त दिसतात. रात्री फ़ोटो काढतांना किंवा हलत्या वस्तूचा फ़ोटो काढतांना ४०० किंवा जास्त नंबरची फ़िल्म वापरतात. नेहमीच्या कामाला १०० वा २०० ची वापरणे उत्तम.
कॅमेरा :- यातील दोन महत्वाचे घटक म्हणजे Lens व Shutter. इतर गोष्टी उदा. फ़िल्म पुढे सरकवण्याची सोय, लेन्स बदलणॆ, ISO बदलणे,ट्रिपॉड सॉकेट,फ़्लॅश गन इ.
लेन्स :- खास प्रकारच्या काचेपासून बनविलेले बहिर्गोल भिंग. निरनिराळे दोष [Aberrations] टाळण्याकरिता ८-१० निरनिराळे भाग [Elements] जोडून लेन्स तयार करतात.लेन्सेस निरनिराळ्या Focal Length च्या असतात. साधारणत; २५ ते ४०० मि.मि. जास्त उपयोगी पडतात. या पेक्षा कमी-जास्त फ़ोकल लेन्ग्थच्या मिळतात पण त्या विशेष कामाकरिताच उपयोगी पडतात. आपण डोळ्याने पाहतो तेवढ्या दृष्याचे छायाचित्र ५० मिमि. च्या लेन्सने मिळते. तीला Standard Lens
म्हणतात.५० पेक्षा कमी फ़ोकल लेन्थ असली तर जास्त रुंद भागाचे चित्र काढता येते. त्यांना Wide Angle Lenses म्हणतात. फ़ोकल लेंथ ५० पेक्षा जास्त असणाऱ्याना Tele Lenses म्हणतात. घरामधील किंवा इमारतीचे फ़ोटो काढावयास wide वापरतात व लांब असलेल्या वस्तूव्रे फ़ोटो tele ने काढतात.एक लक्षात ठेवावे की १०० वा ३५ मिमि.च्या लेन्सने काढलेला फ़ोटो तुम्हाला तुमच्या ५० च्या स्टॅन्डर्ड लेन्सनेही काढता येईल; फ़क्त जरा पुढे-मागे सरकावे लागेल.पूर्वी निरनिराळ्या
फ़ोकल लेन्थकरिता निरनिराळ्या लेन्सेस खरेदी कराव्या लागत. नंतर एका लेन्समध्येच निरनिराळ्या फ़ोकल लेन्थ मिळू शकणारी झूम लेन्स आली. उदा. ३५-१०५ एम.एम. याचा अर्थ तुम्हाला ३५एमेम वाईड पासून १०५ एमेम टेली पर्यंत कुठलीही फ़ोकल लेन्थ निवडता येते.१०५भागिले३५ = ३ हा झूम रेशो झाला. प्रत्येक लेन्सवर तो ३x, ४x, १२x असा लिहलेला असतो. कॅमेरा निवडताना इथे विशेष लक्ष द्यावे. सर्वसाधारण लेन्सने ५-६ फ़ूटापलिकडचे फ़ोटो काढता येतात. त्याहून
जवळचा फ़ोटो काढण्याकरिता उदा. एकच फ़ूल, माइक्रो लेन्स लागते. हल्ली अनेक लेन्समध्ये ही सोय अंतर्भूत असते.
भिंग कसे काम करते ते आपण शाळेत शिकलो आहोत. आकृती पहा.
ab या वस्तूची प्रतिमा cd आहे. ab चे भिंगापासूनचे अंतर बदलेले तर cdचेही बदलते.कॅमेऱ्यात cd म्हणजे जिथे फ़िल्म असते ती जागा.ती बदलता येत नाही. आपल्याला निरनिराळ्या अंतरावरील वस्तूंचे फ़ोटो घ्यायचे असतील तर भिंग पुढे-मागे
करावे लागते. त्यालाच focusing म्हणतात.
आकृती २ |
आकृती २ मध्ये निरनिराळ्या फ़ोकल लेन्थच्या भिंगांचे कोन दिले आहेत.एकाच जागेवरून निरनिराळ्या भिंगांनी छायाचित्रे घेतली तर येणाऱ्या चित्रात कसे फ़रकघडून येतील ते कळू शकेल.
आकृती ३ |
आकृती ३ अनेक elements नी तयार झालेली लेन्स दिसेल. यामधील elements ची मागे-पुढे सरकासरव केली की zoom lens ची फ़ोकल लेन्थ बदलते. कॅमेरा वापरताना आपण लेन्सची लांबी लहान-मोठी होताना बघू शकतो.
आता EXPOUSURE ची माहिती घेऊ.EV म्हणजे भिंगातून फ़िल्मवर पडणारा प्रकाश.तो नियंत्रीत करण्याकरिता दोन सोयी असतात.पहिली Aperture[f]. दुसरी Shuttter Speed.
Aperture म्हणजे भिंगाच्या किती टक्के भागातून प्रकाश जातो त्याचा निर्देशक.ही लहान लहान होत जाणारी वर्तुळे असतात.सर्वात मोठ्या वर्तुळाच्या आकाराच्या निम्मा आकार दुसऱ्या वर्तुळाचा; त्याच्या निम्मा तिसऱ्या वर्तुळाचा वगैरे. म्हणजे पहिल्याचे क्षेत्रफ़ळ १ असेल तर दुसऱ्याचे १/२, तिसऱ्याचे १/४ , चवथ्याचे १/८.
वर्तुळाच्या क्षेत्रफ़ळाऐवजी व्यासाचा विचार केला तर तो अनुक्रमे १,१/१.४, १/२, १/२.८, १/४, १/५.६, वगैरे. [१.४ चा वर्ग=२, २चावर्ग=४, २.८ चावर्ग=८ ] १.४, २, २.८, ४, ५.६ यांना Aperture [f] म्हणतात.प्रत्येक भिंगावर सर्वात लहान आणि सर्वात मोठे ऍपर्चर लिहलेले असते.व तेवढ्या मर्यादेतच तुम्हाला निवडीस वाव असतो. .[उदा. f2.8--f11]
प्रत्येक भिंगावर पुढील गोष्टी लिहलेल्या असतात.कंपनी, लेन्सचा क्रमांक, फ़ोकल लेंथ,[झूम असेल तर किमान-कमाल उदा. 70-210] , कमाल ऍपर्चर उदा. f२.८
आज येथे थांबू. तीन चार दिवसांनी पुढचा भाग. या भागाबद्दल काही शंका असल्या, जास्त माहिती हवी असेल तर विचारा. त्याबद्दल लिहून मग पुढचा भाग.
slr कॅमेऱ्याची मागची बाजू [फ़िल्म नसताना] उघडून लेन्सकडे पहावे व अपर्चर रिंग फ़िरवावी. ओपनिंगची वर्तुळे लहानमोठी होतांना दिसतील.
अवांतर : तांत्रीक गोष्टी थोड्याफ़ार सोप्या करून लिहाव्या लागतात. निर्दोषपणाऐवजी समजण्यास सोपे महत्वाचे. एखाद्यास जास्त खोलात माहिती हवी असेल तर देता येईल.
समित्पाणी
Comments
चांगली सुरुवात
सुरुवात चांगली आहे. एक सुचवणी : लेख लिहिताना समुदाय निवडल्यास लेख त्या समुदायांतर्गत दिसेल.
अनेक प्रश्न आहेत. एक एक विचारतो.
१. शटरला कधी महत्व द्यावे आणि ऍपर्चरला कधी? शटर आणि ऍपर्चर बद्दल विस्तृत माहिती दिल्यास समजायला सोपे जाईल. :)
मध्ये एकदा कोलबेरना मी प्रश्न विचारला होता. तो प्रश्न आणि त्यांचे उत्तर येथे देत आहे.
प्रश्नः आय एस ओ चा वापर नक्की कशासाठी असतो?
उत्तरः आय एस सो म्हणजे कॅमेर्याच्या सेन्सरची प्रकाश शोषण्याची क्षमता...जसेकी नळ जास्त जोरात सोडला की नळाच्या तितक्याच व्यासातुन अधिक पाणी येते तसे आयएसओ वाढवला की कॅमेर्याच्या ऍपर्चर/छीद्रातुन अधिक प्रकाश येतो. ह्याचा उपयोग इनडोअर फोटोग्राफी करताना होतो. जसेकी देवळाचा गाभारा, उजेड कमी असल्याने प्रकाश अधिक शोषता आला पाहिजे.. पण आयएसो वाढवला की चित्रावर नॉइअज देखिल वाढत जातो म्हणून शक्यतो आयएसो फक्त लो लाईट सिचुएअशन मध्येच वापरावा
माहिती हवी
या चित्रामधल्या डायल बद्दल सविस्तर माहिती मिळेल का? खास करून त्या M A S P बद्दल.
माहिती हवी
मला वाटते:
M: Manual (ऍपरचर व शटर आपण ठरविणार)
A: Aperture प्रायोरटी (ऍपरचर आपण ठरवू शकतो व शटर कॅमेरा ठरविणार)
S: Shutter प्रायोरटी (शटर आपण ठरवू शकतो व ऍपरचर कॅमेरा ठरविणार)
P: Program (कॅमेरा स्वतः ठरवेल ऍपरचर व शटर किती ठेवायचे ते)
नितीन
मोड्स
शरद
महाजन यांनी बरोबर माहिती दिली आहे. मोड्सबद्दल पुठे येणार आहेच.
समित्पाणी
३५ मिमि एक्विव्हॅलंट
लेखमालेची सुरुवात छानच झाली आहे. यातून खूप चांगली माहिती मिळेल.
एक तळटीप द्यावी : कॅमेर्याच्या फोकल लेंग्थ बद्दल चर्चा होते, तेव्हा कॅमेरा ३५ मिमि चित्रफितीचा आहे असे गृहीत धरावे. स्वतःच्या कॅमेर्यासाठी आकडे गणीताने काढावे.
स्पष्टीकरण : म्हणजे ३५ मिमिचा कॅमेरा असला, तर ५० मिमि फोकल लेंग्थच्या भिंगाने डोळ्यांना साधारण दिसते तसे "स्टँडर्ड" कोनातले चित्र चित्रफितीवर उमटते.
आजकाल ३५ मिमि कॅमेरा पूर्वी इतका वापरात नाही. बहुतेक डिजिटल कॅमेर्यांत भिंग-सेन्सॉर अंतर हे ३५ मिमि कॅमेर्यांत असे त्यापेक्षा वेगळे असते. पण वर जी काही सैद्धांतिक माहिती दिली आहे, ती कुठल्याशा गुणोत्तराने सर्वच कॅमेर्यांना लागू असते. म्हणजे स्टँडर्ड पेक्षा कमी फोकल लेंग्थ् = वाईड अँगल, स्टँडर्डपेक्षा अधिक फोकल लेंग्थ = टेलेफोटो भिंग.
अजूनतरी डिजिटल कॅमेर्यांमध्ये ही माहिती दिलेली असते - ३५ मिमि चित्रफितीच्या कॅमेर्याच्या सैद्धांतिक आकड्यांना कुठल्या गुणाकाराने गुणायचे? आता माझ्या ऑलिंपस ईव्होल्ट कॅमेर्यात हा फॅक्टर १/२ आहे.
म्हणजे माझ्यासाठी स्टँडर्ड भिंग ५०/२ = २५ मिमि फोकल लेंग्थचे आहे. <२५ मिमि = वाईड अँगल, >२५ फोकल लेंग्थ = टेलेफोटो भिंग.
कॅनन डिजिटल रेबेल साठी हा फॅक्टर १/१.६ आहे. म्हणजे स्टँडर्ड ५०/१.६ = ३१.५ मिमि फोकल लेंग्थ इ.इ.
हा फॅक्टर भागाकाराऐवजी गुणाकार म्हणून द्यायची प्रथा आहे. म्हणजे माझ्या कॅमेर्यासाठी फोकल लेंग्थ मल्टिप्लायर २ आहे (२५*२ = ५०) कॅनन डिजिटल रेबेल साठी १.६ आहे (३१.५*१.६ = ५०). फोकल लेंग्थ मल्टिप्ल्यायरबद्दल अधिक माहिती येथे मिळेल (दुवा).
कॅनन
कॅनन एस् एक्स् १०० आय् एस् च्या लेन्सवर ६-६० मीमी असे लिहिले आहे . तेव्हा मी चक्रावलो होतो. एवढी ६ मीमीची फिश आय लेन्स कशाला दिली असेल वगैरे किंवा स्टँडर्ड लेन्स् ५० मीमी असताना ६ ते ६० मीमी रेंज देऊन ह्यांनी काय साध्य केलं वगैरे. पण कॅमर्याच्या युजर गाईडमध्ये त्यांनी एक्विवॅलंट फोकल लेंथ ३६-३६० मीमी दिली आहे. म्हणजे ६-६० ला ६ ने गुणले.
तेव्हा माझा प्रश्न हा आहे की..मी वर म्हटलेल्या फॅक्टरला फोकल लेंग्थ मल्टिप्लायर म्हणायचे की ३६*१.३८८ = ५० म्हधल्या १.३८८ ला?
अभिजित...
ता. कर्हाड जि. सातारा.
तुमचा फॅक्टर ६ - बरोबर
वर "डिजिटल रेबेल" मॉडेलचा फॅक्टर १.क्षक्ष काय तो आहे. तो आकडा त्या मॉडेलच्या तांत्रिक माहितीत सापडला.
तुमच्या एस् एक्स् च्या पुस्तकाप्रमाणे त्या मॉडेलचा फॅक्टर ६ आहे हे तुम्ही बरोबरच शोधून काढले. पुस्तकात फोकल लेंग्थ मल्टिप्लायर थेटच दिला नाही हे आश्चर्य वाटते. कदाचित या कॅमेर्याची लेन्स काढून नवीन लेन्स बसवता येत नाही, म्हणून पुस्तक लिहिणार्याला वाटले असेल की फोकल लेंग्थ मल्टिप्लायर देऊन काय उपयोग? कॅमेरा वापरणारा नाहीतरी झूम मागेपुढे करूनच कंपोझिशन करणार आहे...
तुमच्या कॅमेर्यात "स्टँडर्ड" फोकल लेंग्थ ८.३३ मिमि आहे. हे भिंग फारसे वाइड अँगल नाही, फिशआय तर मुळीच नाही, हे वापरताना तुमच्या लक्षात आलेलेच असणार.
उत्तम लेख
उत्तम आणि उपयुक्त लेख
३५ एमेम कॅमेरा व आय.एस.ओ.
शरद
३५ एमेम कॅमेरा आणि आय.एस.ओ.
लेखाच्या सुरवातीलाच सर्व संदर्भ ३५ एमेम कॅमेरा गृहीत धरून असे स्पष्ट केले आहे.डिजिटल नंतर हेही.
आय.एस.ओ. बद्दल सुरवातीला थोडी माहिती दिली आहे,आज जरा जास्त. प्रकाश कमी असेल तर फ़िल्मवर चित्र अस्पष्ट उठावयाचे. रसायने बदलून त्यात सुधारणा केली. पण बदल केला आहे हे कळावे म्हणून आय.एस.ओ. नंबर देण्यास सुरवात झाली. डिजिटल कॅमेऱ्यात फ़िल्म व रसायने नाहीत पण सेन्सर आहे.त्यातही बदल करता येतो.तुम्ही कमी प्रकाशातही चांगला फ़ोटो काढू शकता. मागील दुवा जुळवून घेण्यासाठी परत आय.एस.ओ.शब्दप्रयोगा चाच वापर केला जातो. पूर्वी जास्त आय.एस.ओ.ची फ़िल्म वापरली की ग्रेन्स यावयाचे आता नॉईज येतो. मागे डेव्हलपमेंटमध्ये फ़रक करून ग्रेन्स कमी करता येत, हल्ली " पोस्ट प्रोसेसिंग " करून नॉईज कमी करता येतो.
priorities and modes var सखोल माहिती पुढे येईल.
समित्पाणी
सुरेख..
लेखमाला सुरु झाली त्याबद्दल सर्वांकडून अभिनंदन. पहिलाच भाग उत्तम झाला आहे.
एक शंका - वरील चित्रात दिल्याप्रमाणे, Angle of view हा focal length बरोबर बदलत जात आहे.
aperture हे पडदा कमी जास्त उघडुन, कमी जास्त प्रकाश कॅमेर्याच्या फिल्मवर सोडणार हे माहित आहे पण ऍपरचर मुळे Angle of view वर काही फरक पडतो का? अगदी थोडातरी??
अवांतर : ५० मिमि लेन्स् ही स्टँडर्ड /नॉर्मल लेन्स् म्हणली जाते याबद्दल थोडेसे येथे वाचा
-
ध्रुव
ऍपर्चरने फरक नाही
ऍपेर्चरने अँगल ऑफ व्ह्यूवर फरक पडू नये. पडत असेल तर भिंग बनवणार्याने ऍपर्चर कमीअधिक करणार्या गोल पडद्याची नेमकी जागा गंडवली!
अजून एक शंका
अजून एक शंका...
लेन्स च्या बनावटीमध्ये काही बदल केले तर angle of view बदलता येतो का? म्हणजे अश्या काही लेन्स बाजारात आहेत का?
-
ध्रुव
नाही - बनावटीवर अवलंबून नाही
म्हणजे कुठल्याही एका कॅमेरा बॉडीवर वेगवेगळ्या बनावटीची भिंगे लावलीत, तर दृष्य-कोन (अँगल ऑफ व्ह्यू) केवळ केंद्रीभवन-अंतरावरच (फोकल लेंग्थ) अवलंबून असतो. हे भौमितिक गणित आहे. ट्रिगोनोमेट्रीच्या भाषेत -
२१.५/केंद्रीभवनअंतर = tan(दृष्यकोन)
म्हणजेच
दृष्यकोन = arctan(२१.५/केंद्रीभवनअंतर)
तुम्हाला जे वाटते की "बारीक नळकांडीतून कोन का आडत नाही?" तर तसे वाटणे स्वाभाविक आहे. पण अपेर्चर मधून कुठल्याच कोनातला प्रकाश आडत नाही. भूमितीने सिद्ध कोन नळकांडीत कुठेच आडणार नाही अशाच तर्हेच्या नळकांडीत भिंगे बसवली जातात. त्यापेक्षा मोठे कोन नळकांडीत आडतात, पण त्याचे आपल्याला काय. त्या कोनातले प्रकाशकिरण भूमितीच्या नियमामुळे चित्रफितीवर (सेन्सॉरवर) पडूच शकले नसते. ते नळकांडीत आडले तर आडले.
निर्मात्याने भिंग नीट बनवले नसेल, तर सेन्सारवर पडले असते असे प्रकाशकिरण नळकांडीत अडू शकतात, हे खरे आहे. याला "व्हिन्येट्टिंग" (vignetting) म्हणतात. एका भिंगावर दुसरे भिंग खोचून "घरगुती डबल भिंग" मी (=अकुशल निर्मात्याने!) बनवले तेव्हा व्हिन्येटिंगमुळे दृष्य-कोन कमी झाला. त्यामुळे "नळकांडीच्या विवराचा आकार/अँगल ऑफ व्ह्यू"बद्दल तुमचे कुतूहल रास्तच आहे.
फक्त कुठल्याही चांगल्या निर्मात्याच्या भिंगाबद्दल (जसे वापरायला सांगितले तसे वापरल्यास) ही समस्या उद्भवणार नाही.
ऍपरचर व शटर
मला वाटते की ऍपरचर व शटर या बाबत थोडे स्पष्टीकरण आवश्यक आहे.
ऍपरचर :
कॅमे-याचे ऍपरचर आपल्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे काम करते. आपण अंधारात पाहताना डोळ्याची बाहुली मोठी होते, तसेच प्रखर उजेडात ती लहान होते. तीच कृती कॅमे-याच्या ऍपरचर बद्दल होते. आपण दुपारच्या उन्हात छायाचित्र काढत असू तर कॅमे-याचे ऍपरचर खूप लहान (त्यावरील आकडा मोठा) ठेवावे लागते. जर कमी प्रकाशात छायाचित्र काढत असू तर कॅमे-याचे ऍपरचर मोठे (त्यावरील आकडा लहान) ठेवावे लागते.
शटर :
कॅमे-याचे शटर कॅमे-यात किती वेळ प्रकाश आत् येऊ द्यायचा आहे ते ठरवते. त्यावरील आकडा हा कॅमे-याचे शटर सेकंदाचा कितवा हिस्सा उघडे ठेवायचे आहे ते सुचविते. जर ऍपरचर मोठे असेल तर शटर थोडा वेळ उघडे राहिलेले चालते. पण कमी प्रकाशात जास्त प्रकाश फिल्मवर पडणे आवश्यक असते म्हणून शटर जास्त वेळ उघडे ठेवावे लागते.
नितीन
उत्तम सुरुवात...
सुरुवात छान झाली आहे. पुढील भाग वाचण्यास उत्सुक.
सदस्यांना हवी ती माहिती लेखमालेत हळूहळू येईलच. धीर धरावा. :-)
सौरभदा-
==================
Coffee isn't my cup of tea.
-Samuel Goldwyn
असेच म्हणतो
असेच म्हणतो.
उत्तम लेखमालिका
उत्तम लेखमालिका आणि उत्तम सुरुवात! वाचतो आहे.