उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
भारताला पहिलं सुवर्णपदक..
सौरभदा
August 11, 2008 - 5:10 am
आज ११ ऑगस्ट २००८, आत्ताच सकाळी १० वाजता ऑलिंपिक स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. १० मी टर एअर रायफल प्रकारात अभिनव बिंद्राने हे सुवर्णपदक मिळवले.
डीडी स्पोर्टस् वर् थेट प्रक्षेपण पहात असतानाच आपणा सर्वांसाठी आनंददायक अशी ही बातमी मिळाली.
१९८० नंतर भारताला मिळालेले हे पहिले व्यक्तिगत सुवर्णपदक आहे.
या अभिनव कामगिरीसाठी अभिनव बिंद्राचे अभिनंदन आणि आणि शुभेच्छा!
-सौरभदा.
दुवे:
Comments
अभिनंदन
निर्भेळ आनंद...
अभिनव बिंद्राचे हार्दिक अभिनंदन!!!
शुभ वार्ता.
सर्व भारतीयांना अभिनवबद्दल गौरव वाटणारच.
बढे चलो.
अभिनंदन..
अतिशय आनंदाची बातमी!
बिंन्द्राचे अन् माझ्या मायभूचे त्रिवार अभिनंदन....
तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
अभिनंदन
अभिनव बिंद्राचे सुवर्णपदक हे भारताला वैयक्तिक प्रकारात मिळालेले पहिले सुवर्णपदक आहे. १९८० ला हे आपल्याला हॉकीमध्ये(सांघिक) सुवर्णपदक मिळाले होते. अधिक माहितीसाठी हे पहा.
अभिजित...
ता. कर्हाड जि. सातारा.
आनंदाची बातमी
मीही आताच रेडिफवर वाचली आणि उपक्रमावरही. पदकप्राप्त करणार्या देशांच्या यादीत भारताचे नाव झळकलेले पाहिले आणि खूप आनंद झाला.
अभिनव बिंद्राचे अभिनंदन!!
अभिनंदन
सकाळी उठल्यावर रिडीफवर अशी चांगली बातमी वाचताना आनंद झाला. सनसनाटी बातम्या देण्यात धन्यता मानणार्या सर्वच प्रसार माध्यमांना अशाच चांगल्या बातम्या सतत छापायला लागोत अशी (माझ्यासकट सर्व वाचकांसाठी) शुभेच्छा!
मान उंचावली
मी जपानमध्ये रहातो. इथे माझे जपानी सहकारी विचारत होते भारत कशाकशात पदक् मिळवेल?
आता मी त्यांना आंनदाने सांगु शकतो आम्ही नेमबाजीत पदक मिळवले.