उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
छायाचित्रकला
शरद
August 7, 2008 - 12:24 pm
छायाचित्रकला
वरील विषयावर एक लेखमालिका लिहावयाचा विचार आहे. अर्थात नवागतांकरिता.पुढील बाजू थोडक्यात सांगावयाचा प्रयत्न करणार आहे.
१] कॅमेऱ्याचे मुख्य घटक, २] लेन्सेस, ३] शटर, ४] ऍपर्चर,५] मोड्स,६] प्रकाश योजना,७] कलात्मक रचना,८] कॅमेऱ्याची निवड ९] मासिके व पुस्तके.
यात आणखी कशाची भर पाहिजे असेल तर कृपया कळवावे म्हणजे योग्य ठिकाणी त्यांना जागा करता येईल.
समित्पाणी
दुवे:
Comments
जबर्या
बहुतेक सर्वच गोष्टी यात आलेल्या आहेत. आणखी काही आठवल्या तर कळवेन.
तुमच्या लेखमालेला शुभेच्छा. काही मदत हवी असल्यास, नक्की सांगा यथाशक्य करेन.
लवकर येऊदे :)
-
ध्रुव
मस्त !
बहुतेक सर्वच गोष्टी यात आलेल्या आहेत. या ध्रुवच्या मताशी सहमत.
हे सुद्धा सांगावे अशी विनंती-
१. रोलचा साधा कॅमेरा - डिजीटल साधा कॅमेरा - रोल/डिजीटल एस.एल्.आर. यांचे सामन्य स्वरुप आणि त्यांतला फरक.
अ. छायाचित्रणासाठी आपली गरज कशी ओळखावी यावर सुद्धा आपण काही लिहिलेत तर बरे. उदा. पक्षीचित्रणासाठी, लँडस्केपिंगसाठी, फक्त पोर्टेट्स साठी, सहली-घरगुती कार्यक्रम यांसाठी असलेल्या गरजा इत्यादी. म्हणजे आपल्याला कोणत्या प्रकारचे चित्रण करायचे आहे आणि त्यासाठी कोणती सामुग्री असणे गरजेचे आहे ते समजेल.
२. सध्या अनेकांकडे डिजीटल कॅमेराच असतो, तर त्यामध्ये सि.सि.डी.चिप का काय जो प्रकार असतो त्याबद्दल थोडी माहिती द्यावी.
अ. त्याच्या तंत्रबद्दल फार उहापोह नसेल तरी चालेल पण कॅमेरा विकत घेताना त्यातला दिजीटल इमेजचा रेशो आपल्या चित्राच्या प्रतीवर कसा परिणाम करतो,
ब. रिझोल्युशन म्हणजे नक्की काय, ते कसे टिकते, पिक्सलेट होणे, ग्रेन येणे हे काय असते इत्यादी. सांगावे. अनेकदा भारी कॅमेरा खिशात असताना आणि तो नेहमी वापरत असतानासुद्धा या गोष्टी नक्की काय आहेत आणि आपण काय करावे हे माहित नसते.
लेखमालेस शुभेच्छा !
--लिखाळ.
वा!
वा! लेखमालेबद्दल वाचून आनंद झाला. अनेक आभार.. भाग वाचायला प्रचंड उत्सुक आहे
यात पुढील भाग टाकता येतील का?
१] फोटो काढतेवेळी आवर्जून पाळायची (व टाळायची)पथ्ये
२] रात्री फोटोग्राफी करतेवेळी....
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
धन्य धन्य
धन्य जाहलो :)
हा समुदाय बनवायचा हेतु या लेखमालेमुळे १००% साध्य होईल असे वाटते. छायाचित्रण क्षेत्रातले उपक्रमावरचे तज्ञ माहितीत नक्कीच भर घालतील. ध्रुव म्हटल्या प्रमाणे, काही मदत लागली तर नक्की सांगा. तसेच हे लेख लोकमित्र मंडळासाठी सुद्धा वापरले जाण्यासाठी धनंजय यांची मदत घेता येईल.
प्रचंड उत्सुक
लेख वाचण्यासाठी प्रचंड उत्सुक!!!
लवकर सुरु करा
मीही सध्या एस. त्यागराजन यांचे प्रॅक्टिकल फोटोग्राफी पुस्तक वाचत आहे. त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे एकत्रित करून लेख टाकण्याचा विचार करत होतो.
तांत्रिक माहिती अभावी फोटोग्राफीत प्रगती करता येत नाही. त्यामुळे तुमचे लेख प्रचंड उपयोगी पडतील.
लेन्स सदरामध्ये लेन्सवर दिलेली माहिती कशी वाचायची आणि त्याचा अर्थ काय हेही येऊ द्या. उदा: १८-५५ एमेम, ७.०-२४, २.८-५.६ वगैरे.
अभिजित...
ता. कर्हाड जि. सातारा.
पोस्ट प्रोसेसिंग...
शरदराव, फोटो काढून झाल्यावर फोटोशॉपवरून करायच्या पोस्टप्रोसेसिंग बद्दलही बेसिक माहिती देता येईल.
सौरभदा-
वा!
शरदजी मस्त उपक्रम! जमेल तसे मीही माझे दोन पैशे घालेन :)
शुभेच्छा!