(
१. मधले निळ्या काचेचे पात्र रंगसंगतीत बसत नाही, ते बाजूला काढायला हवे होते. या विसंवादाकडेही लक्ष वेधून घेण्यात कला आहे - पण ते तुमचे उद्दिष्ट्य असावे असे वाटत नाही.
२. सफरचंद फिरवून त्यावरचा चिकटकागदाचा ठिपका अदृश्य करायला हवा होता.
३. नेमका फोकस कुठल्या एकाच वस्तूवर ठेवून त्या बिंदूवर लक्ष केंद्रित होत असते तर बरे झाले असते - एक कथा मनात तरळली असती.
)
पहिली गोष्ट मनात आली फोटो बघून ती म्हणजे मजा आहे बॉ एका माणसाची;)
फोटोच्या बाबतीत धनंजय यांच्या १ व २ शी पूर्ण सहमत
मात्र मला वैयक्तीक दृष्ट्या तिसर्या सुचने ऐवजी चित्र आहे असेच आवडले.
बाकी मिठ-मिरपूड नसती तरी/तर अधिक चांगलं दिसलं असतं असं वाटतं
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
मस्त फोटो आहे एकदम !! स्ट्रॉबेरी मिल्कशेक सह्ही दिसतोय!! आणि ग्लास तर सुपर्ब आहेत!! असा कधीच नाही पाहीला!
(तो निळ्या काचवाला दिवा, गाडगीळांकडून घेतला का? :) )
हतोळकर, तुम्ही हे छायाचित्र घरगुती म्हणून काढले आहे का व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून काढले आहे? कारण अशा अन्नाचे फोटो काढण्याची फोटोग्राफीची एक वेगळीच शाखा आहे. आणि ज्यात अनेकदा खूप सार्या तंत्राचा वापर करुन अन्न अधिक रसरशीत दिसण्यासाठी विविध युक्त्यांचा वापर केला जातो. अर्थात या युक्त्यांमध्ये बर्याचदा तेल वा व्हिनेगर यांचे स्प्रे, अन्न फ्रेश दिसण्यासाठी त्यावर मारले जातात आणि त्यामुळे बर्याचदा आपण मासिकात वगैरे जे तोंडाला पाणी आणणारे फोटो पाहतो ते अन्न खायच्या योग्यतेचे राहिलेले नसते.
आता तुमच्या चित्रासाठी मला वाटलेल्या काही सुचवणी-
१) प्रकाश थोडा डिफुज्ड् प्रकारचा करुन् प्रत्येक ग्लासच्या कडांवरचे फ्लॅश टाळता आले असते. ( अर्थात हे स्टुडिओतच शक्य आहे)
२)सफरचंदाचे लेबल लपवण्याबरोबरच त्यांना थोडा तेलाचा हात लावून कापडाने पुसल्याने निश्चित चमक मिळाली असती. केळ्यांनादेखील.
३)धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे निळे पात्र देखील चौकटीत नको होते.
४)बर्याचदा फळांचे अथवा अन्नाचे फोटो नैसर्गिक प्रकाशात खूप खुलतात. पुढच्या वेळेस खिडकीतल्या सूर्यप्रकाशात असा प्रयोग करुन पहा.
काही प्लस पॉईंटस्
१)खुर्च्यांच्या काळ्या पांढर्या रंगाने चित्राला खूप उठाव मिळाला आहे.
२)एकंदरीत पार्श्वभूमीवर केळी लक्ष वेधत आहेत.
३)सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे ग्लास देखील उत्कॄष्ट.
सौरभदा,
आपला प्रतिसाद आवडला.. अश्याच सुचवण्या या चर्चांत व्हाव्यात..आपण सांगितलेले तंत्र लक्षात ठेवण्यासारखे आहे.
हतोळकर,
चित्र आवडले.
पण ताटांखलचे मॅट्स, ताटे, मिल्कशेकचा रंग, खुर्च्यांच्या पाठी, भिंतीचा रंग हा सर्व सारखाच दिसतो आहे. त्यामुळे माझ्यामते चित्रात रंगाचा संवाद (हार्मोनी) निर्माण न होता एकसुरीपणा आला आहे असे मला वाटले.
तसेच प्रकाश वरुन आणि समोरुन आहे..चित्र थोडे बसके (फ्लॅट) झाले आहे. या मध्ये ज्या वस्तूंना पोत (टेक्श्चर) आहे अश्या काही वस्तू अथवा अननस, भरपूर स्ट्रॉबेरी, द्राक्षाचा घोस असे काही वापरता आले असते तर चित्र अजूनच सुंदर वाटलेसासते. अश्या तर्हेच्या फळांवरुन प्रकाशाची मजा डोळ्यात भरते.
प्रतीसादा बद्दल सर्वांना धन्यवाद.
सौरभदा - हे चित्र मी घरगुती म्हणूनच काढले आहे. कसली ही Planning किंवा Arrangement न करता काढलेला आहे. त्यामुळे तुमच्या काही सुचना मला एकदम मान्य आहेत. पण त्या परिस्थीतीत करता येण्या सारख्या नव्हत्या. (सगळ्यांनाच भूक लागली होती ओ!). पण पुढच्या वेळेस नक्की प्रयत्न करून पाहीन.
लिखाळ - तुमच्याही सूचनांचा प्रयोग करून पाहीन.
भाग्यश्री - निळे पात्र कुठून घेतले ते माहीत नाही पण फोटो अमेरीकेतला असल्यामुळे गाडगीळ नसावेत.
Comments
लवकर या नाहीतर मी संपवीन हा :-)
ह्यावर काय टिका करणार. एकदम तृप्त!
:-)
सुंदरच!!
+१
मस्त!
फ्रुटबोव्ल
छान आहे. मिकासा का हो?
उत्तप्प्यांच्या शेजारी नारळाची चटणी नाहीतर मुळगापुडी (तेलासोबत खायची सुकी चटणी) हवी होती. ;-)
स्ट्रॉबेरी मिल्कशेक मात्र मस्त!
मिकासा?
माहीत नाही. हा प्रयोग आम्ही माझ्या भावाच्या घरात केला होता. आणि तसाही मी या बाबतीत जरा ढीम्म आहे. भावाच्या बायकोला विचारून सांगतो.
उत्तप्पा!
आवडता टिफिनचा पदार्थ.
(
१. मधले निळ्या काचेचे पात्र रंगसंगतीत बसत नाही, ते बाजूला काढायला हवे होते. या विसंवादाकडेही लक्ष वेधून घेण्यात कला आहे - पण ते तुमचे उद्दिष्ट्य असावे असे वाटत नाही.
२. सफरचंद फिरवून त्यावरचा चिकटकागदाचा ठिपका अदृश्य करायला हवा होता.
३. नेमका फोकस कुठल्या एकाच वस्तूवर ठेवून त्या बिंदूवर लक्ष केंद्रित होत असते तर बरे झाले असते - एक कथा मनात तरळली असती.
)
स्ट्रॉबेरी मिल्कशेक - (मिटक्या!)
धन्यवाद
धनंजय,
प्रतीसादाबद्दल आभारी आहे. तुमचे तीनही मुद्दे एकदम पटले. पुढच्या वेळेस नक्की लक्षात ठेवेन.
महेश हतोळकर.
असेच म्हणतो!
पहिली गोष्ट मनात आली फोटो बघून ती म्हणजे मजा आहे बॉ एका माणसाची;)
फोटोच्या बाबतीत धनंजय यांच्या १ व २ शी पूर्ण सहमत
मात्र मला वैयक्तीक दृष्ट्या तिसर्या सुचने ऐवजी चित्र आहे असेच आवडले.
बाकी मिठ-मिरपूड नसती तरी/तर अधिक चांगलं दिसलं असतं असं वाटतं
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
छान्
तोंडाला पाणी सुटले आहे. फोटो छान आला आहे.
१. मीठ् आणि मीरपुडीच्या बॉटल्स नसत्या तरी चालले असते असे वाटते.
२. सगळ्यात उजवीकडचा ग्लास बाकिच्या ग्लास सारखा नाहीये का ?
- सूर्य
असावा
२. सगळ्यात उजवीकडचा ग्लास बाकिच्या ग्लास सारखा नाहीये का ?
तो (हवा) तसा फिरवला नसावा.
बरोबर
ग्लासच्या दांड्यावरची वळणे कॅमेर्याच्या प्रतलाला लंब आली आहेत. म्हणून तसे वाटते आहे.
खुर्ची
उजवीकडे खालच्या कोपर्यात खुर्ची ज्या प्रकारे आली आहे ती नसती तर उठाव जास्त आला असता का?
वा!
मस्त फोटो आहे एकदम !! स्ट्रॉबेरी मिल्कशेक सह्ही दिसतोय!! आणि ग्लास तर सुपर्ब आहेत!! असा कधीच नाही पाहीला!
(तो निळ्या काचवाला दिवा, गाडगीळांकडून घेतला का? :) )
सुचवणी...
हतोळकर, तुम्ही हे छायाचित्र घरगुती म्हणून काढले आहे का व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून काढले आहे? कारण अशा अन्नाचे फोटो काढण्याची फोटोग्राफीची एक वेगळीच शाखा आहे. आणि ज्यात अनेकदा खूप सार्या तंत्राचा वापर करुन अन्न अधिक रसरशीत दिसण्यासाठी विविध युक्त्यांचा वापर केला जातो. अर्थात या युक्त्यांमध्ये बर्याचदा तेल वा व्हिनेगर यांचे स्प्रे, अन्न फ्रेश दिसण्यासाठी त्यावर मारले जातात आणि त्यामुळे बर्याचदा आपण मासिकात वगैरे जे तोंडाला पाणी आणणारे फोटो पाहतो ते अन्न खायच्या योग्यतेचे राहिलेले नसते.
आता तुमच्या चित्रासाठी मला वाटलेल्या काही सुचवणी-
१) प्रकाश थोडा डिफुज्ड् प्रकारचा करुन् प्रत्येक ग्लासच्या कडांवरचे फ्लॅश टाळता आले असते. ( अर्थात हे स्टुडिओतच शक्य आहे)
२)सफरचंदाचे लेबल लपवण्याबरोबरच त्यांना थोडा तेलाचा हात लावून कापडाने पुसल्याने निश्चित चमक मिळाली असती. केळ्यांनादेखील.
३)धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे निळे पात्र देखील चौकटीत नको होते.
४)बर्याचदा फळांचे अथवा अन्नाचे फोटो नैसर्गिक प्रकाशात खूप खुलतात. पुढच्या वेळेस खिडकीतल्या सूर्यप्रकाशात असा प्रयोग करुन पहा.
काही प्लस पॉईंटस्
१)खुर्च्यांच्या काळ्या पांढर्या रंगाने चित्राला खूप उठाव मिळाला आहे.
२)एकंदरीत पार्श्वभूमीवर केळी लक्ष वेधत आहेत.
३)सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे ग्लास देखील उत्कॄष्ट.
असो. पुढच्या छायाचित्राला शुभेच्छा!
छान
सौरभदा,
आपला प्रतिसाद आवडला.. अश्याच सुचवण्या या चर्चांत व्हाव्यात..आपण सांगितलेले तंत्र लक्षात ठेवण्यासारखे आहे.
हतोळकर,
चित्र आवडले.
पण ताटांखलचे मॅट्स, ताटे, मिल्कशेकचा रंग, खुर्च्यांच्या पाठी, भिंतीचा रंग हा सर्व सारखाच दिसतो आहे. त्यामुळे माझ्यामते चित्रात रंगाचा संवाद (हार्मोनी) निर्माण न होता एकसुरीपणा आला आहे असे मला वाटले.
तसेच प्रकाश वरुन आणि समोरुन आहे..चित्र थोडे बसके (फ्लॅट) झाले आहे. या मध्ये ज्या वस्तूंना पोत (टेक्श्चर) आहे अश्या काही वस्तू अथवा अननस, भरपूर स्ट्रॉबेरी, द्राक्षाचा घोस असे काही वापरता आले असते तर चित्र अजूनच सुंदर वाटलेसासते. अश्या तर्हेच्या फळांवरुन प्रकाशाची मजा डोळ्यात भरते.
--लिखाळ.
चित्र
चित्र सुरेख. आवडले. सौरभदा, लिखाळ व धनंजय यांच्याशी सहमत.
पण का कुणास ठाऊक, स्ट्रॉबेरी शेक इतका आवडला नाही मला.
-
ध्रुव
धन्यवाद मित्रहो!

महेश हतोळकर