फोटोशॉप-४
फ़ोटोशॉपची ओळख करून देण्यार्या मालिकेतला हा शेवटचा लेख. फ़ोटोग्राफ़ीच्या आवडीमुळे काढलेल्या छायाचित्रांबरोबर बरीच पुस्तकेही जमवली गेली त्या वेळी छायाचित्रांमध्ये काही सुधारणा करणे किती अवघड होते ते आज आठवले तरी हसूं येते.डिजिटल कॅमेरा व फ़ोटोशॉप हातांत आल्यवर तर कोठलाही जूना फ़ोटो घ्या व त्यात दुरुस्ती करत बसा असा नादच लागला.ऐतिहासिक वाड्यांमधील भित्तीचित्रांच्या फ़ोटोंचे restoration करतांना वाटले आपण स्वत;च संगणकावर चित्रे काडून बघावीत. शाळेंत जास्तीत जास्त मार्क मिळावयाचे १० पैकी ४.पण आतां कोणाला दाखवायची नव्हती, एक पैसाही खर्च नव्हता.सरळ रेघ किंवा वर्तूळ संगणक म्हणजेच फ़ोटोशॉप काढणार होता म्हणून सुरवात केली.कितपत जमले ते बघूच. पण माझी खात्री आहे कीं
तुमची इच्छा असेल आणि रोज अर्धा तास वेळ काढता येणार असेल तर दिवाळीपर्यंत तुम्ही स्वत: काढलेली चित्रे असणारी greeting cards मित्रांना बिन्धास्त पाठवू शकाल. सुरवातीची मलाच व्य.नि.वर पाठवा.शंका, अडचणी विचारा.
" alt=""> |
" alt=""> |
" alt=""> |
चित्र काढावयास लागणारा रंग व ब्रश फ़ोटोशॉप पुरवते. सुरवातीला कमीतकमी ब्रश व रंग घेऊन सुरवात करा व नंतर गरज वाढली की
फ़ोटोशॉपच्या पोतडीत हात घाला. तीला तळ नाही. झाडे,पक्षी यांनी सुरवात करावी.समोर एखादे चित्र ठेवून त्याची प्रतिकृती काढावी.Best Luck.
समित्पाणी.
Comments
छान
चित्रे मस्तच आहे. शाळेत आमचे आणि चित्रकलेचे फारच वाकडे होते. वेगळ्याच विषयावर लेख मालिका लिहिल्याने आपले कौतुक वाटते. असेच आणखी येऊ देत.
कोणी पट्टीचा छायाचित्रकार येथे एखादी कार्यशाळा घेईल काय?
छान लेखमाला.. अभिनंदन!
छान लेखमाला.. अभिनंदन!
अशी पोतडी इमॅजीन करून किंचीत हसू आले.. (फाटक्या खिशाच्या पँटमुळे येते ना तसे ;) )
मजेचा भाग सोडला तर हेच वाक्य पूर्णपणे पटले..
उत्तम लेखमालेबद्दल आभार!
(तळ नसलेला फाटका) ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
अभिनंदन
अतिशय सुरेख चित्रे.
आता जर मला माझा स्वतःचा हात जमवायचा असेल, तर करावा लागणाररः सराव, सराव आणि सराव.
उत्तम लेखमाला
शरदजी तुम्हाला अनेक धन्यवाद.
तुमचे अजुन लेखन वाचण्यास उत्सुक.
मस्त
वा! शरदजी फारच छान चित्रे. तुम्ही माउस वापरुन ही चित्रे काढता की पेन सदृश्य एखादे उपकरण वापरता?.. चित्रे खूपच आवडाली!!
माऊस की पेन ?
शरद
ही चित्रे माऊस वापरूनच काढली आहेत. माझ्याकडे वॅकॉमची प्रेशर सेंसेटीव टॅबलेट आहे. ही एक
संगणकाला जोडावयाची प्लास्टीक पाटी असते व त्याबरोबरच्या पेनने चित्र काढता येतात. पण मी
अजून त्याचा फ़ारसा वापर केलेला नाही
समित्पाणी
धन्यवाद!
लेखमालिका छान आहे. फोटोशॉप बरोबरच कोरल ड्रॉ हे सुद्धा ड्रॉईंगकरिता एक उपयुक्त सॉफ्टवेअर आहे. त्यासंबंधीची माहीती ही द्या.
कोरल ड्रॉ व फोटोशॉपचा वापर करुन काढलेले हे चित्र
दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे.
-इनोबा म्हणे (inoba.blogspot.com)
कोरल ड्रॉ
शरद
सुरेख चित्र. त्रिमितीचा आभास छानच जमला आहे. फ़ोटोशॉप चित्र काढण्यासाठी ,कोरल ड्रॉ सारखे, तयार केलेलेच नाही.मला एक उपयोग ,एवढेच दाखवावयाचे होते. आपली इतर चित्रेही उपक्रमवर द्याना.
अवांतर : पोलाद थोडेसे निळसर केले तर आणखी जास्त परिणामकारक होईल का हो ?
समित्पाणी