प्रभाव चित्रपटांचा
समाजाचा चित्रपटांवर आणि चित्रपटांचा समाजावर परिणाम होत असतो असे म्हणतात. व्यक्तिशः आपल्यावरही बर्याच चित्रपटांचा परिणाम होत असतो, प्रभाव पडत असतो. जसे जॅकी चेनचा हाणामारीचा चित्रपट पाहिल्यावर काही वेळ तरी एखाद्या गुंडाला 'फाइट मारून' लोळवावे, एखाद्या उंच कुंपणावरून सहज पलीकडे जावे, एखाद्या भिंतीवर सरसर चढावे किंवा दुचाकीवरून जाताना एखादा 'स्टंट' करावा असे वाटू लागते. एखादा सामरिक चित्रपट पाहिल्यावर आपल्यालाही सैन्यात असावे, आपल्याकडे एक बंदूक असावी, बाँबगोळ्यांचे आवाज कानी पडावेत असे वाटू लागते. एखादा रहस्यमय चित्रपट पाहिल्यावर आपल्याला पोलिस/गुप्तहेर व्हावे, ऐटीत आपले ओळखपत्र काढून "अमुकअमुक, एसीपी" किंवा "अमुकअमुक, एफबीआय (!)" म्हणावे असे वाटू लागते. लगान, लिजंड ऑफ भगतसिंग, दामिनी, हल्ला बोल सारखे चित्रपट पाहून पेटून उठल्यासारखे वाटते. ही यादी केवळ प्रातिनिधिक आहे. वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट आपल्या मनावर वेगवेगळे परिणाम करत असतात.
काही चित्रपटांचा प्रभाव काही काळापुरता असतो तर काहींचा दीर्घकाळ टिकणारा असतो. या चर्चेत तुमच्यावर क्षणिक/दीर्घकाळ प्रभाव टाकणारे चित्रपट कोणते आणि त्यांनी नेमका कसा प्रभाव टाकला याविषयी कृपया लिहावे.
Comments
हाफ टिकट
किशोर कुमारचा हाफ टिकट हा मला आवडायचा!
आपला
गुंडोपंत
प्रभाव
चित्रपट मस्त आहेच. किशोरकुमारची दोन रूपे, स्त्री-पुरुष दोन्ही आवाजात गाणे, मधुबाला(!) आणि प्राणची भूमिका इ. पण या चित्रपटाचा तुमच्यावर काय प्रभाव पडला?
अवांतर
पण या चित्रपटाचा तुमच्यावर काय प्रभाव पडला?
गुंडोपंतांना अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याची सवय लागली (तत्पूर्वी ते विदाउट तिकिट प्रवास करीत) !
हघ्याहेसांनल
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
रंग दे बसंती
मला सुरुवातीपासून जवळच्या लोकांनी 'आय्.ए.एस्. होण्यासाठी प्रयत्न कर' असे सल्ले दिले होते, पण मी ते 'मला त्यात रस नाही' असं सांगून धुडकावून लावले होते. परंतू 'रंग दे बसंती' हा चित्रपट पाहिल्यावर 'आपणही आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे, आपण आय्.ए.एस्. झालं पाहिजे' असा ध्यास घेतला होता. पण हा प्रभाव फार काळ टिकला नाही.
राधिका
प्रभाव
अनेक हिंदी चित्रपट पाहिले की मनावर फारच प्रभाव पडतो.
अमिताभ समाजवादी बच्चन यांचा नि:शब्द हा चित्रपट पाहिल्यावर हिंदी चित्रपट निदान खिशातले घामकमाईचे पैशे खर्च करून पुन्हा बघायचा नाही हा निर्णय घेण्याची तयारी होण्याइतपत मनावर मोठाच प्रभाव पडला.
आपला,
(खट्याळ) आजानुकर्ण
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
लगान
लगान हा माझा ऑल टाईम फेवरिट चित्रपट आहे. सशक्त पटकथा व सादरीकरणाचा एक उत्तम नमूना आहे. यातील प्रत्येक प्रसंग म्हणजे कुशल नेतृत्वाचे धडेच आहेत. परिणामाच्या बाबतीत म्हणाल तर प्रत्येक वेळी पाहिल्यावर शिकण्याचा प्रयत्न करतो इतकेच :-)
जयेश
अभाव
गावाकड असताना टुरिंग टाकी त सतीच वाण, संपुर्ण रामायण, संथवाहते कृष्णामाई असे पिक्चर लागायचे. तेव्हा त्याचा प्रभाव टिकायचा. हिंदी पिक्चर् (खर तर पिक्चर् व तमाशे) पाहुन माणुस् बिघडतो असे वडिलांचे मत असल्याने बघायला मिळायचे नाही.
पुन्यात आल्यावर राजेश खन्ना शम्मि कपुर अमिताभ बच्चन यांचे पिक्चर बघायला लागलो. हाटेलात जायला लागलो. अन बिघाडलो. विंग्रजी पिच्चर पाह्य्ले कि आपल्ल्याल बी फाड फाड विंग्रजी यायला लागन् अशा भ्रमात काही दिवस काढले.
आता जरा सुदार्लो.
प्रकाश घाटपांडे
बापरे.. मोठी यादीच आहे..
बापरे.. मोठी यादीच आहे.. माझं कसंय.. एक चित्रपट पाहिल्यावर दुसरा चित्रपट बघण्यादरम्यानच्या काळात पहिल्या चित्रपटाचा प्रचंड प्रभाव असतो.. दुसरा चित्रपट बघताच तो त्याची जागा घेतो.. :) (आणि माझ्या बाबतीत दोन चित्रपटांतील सरासरी अंतर ३-४ दिवस आहे :) )
मात्र काहि काहि चित्रपट असे असतात की खोलवर भिडतात त्यांची ही चिमुकली यादी:
१. प्राईड ऍन्ड प्रेज्युडिस (बी बी सी चित्र, पाच तासाचा भव्य पट): केवळ प्रेम आणि मानवी भावना यांनी तयार झालेली ही कादंबरी श्रेष्ठ आहे यात वादच नाही. पण हा चित्रपट ज्या ताकदिने तो काळ उलगडतो त्याला तोड नाही (अजुनही दर महिन्यातून एकदा हा चित्रपटा मी पाहतो! ०-) )
२. सेविंग प्रायवेट रायन: असामान्य वीरकथा
३. मेट्रिक्स (१) : वेड लावतो हा चित्रपट आणि ही कंसेप्ट बस्स्!
४. रंग दे बसंती: बराच परिणामकारक
५. कोणताही करण जोहरचा चित्रपटः याचा फार वाईट परिणाम होतो.. इतका की मी पुढचे २-३ आठवडे चित्रपट बघत देखील नाही
बाकी खरच लिस्ट मोठी आहे .. वेगवेगळ्या भाषांतील आहे तेव्हा पुन्हा कधीतरी ;)
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
प्रभाव्...
संपूर्ण पिक्चरचा प्रभाव वगैरे म्हटलं तर माझ्याबाबतीत अवघड आहे! मला पिक्चर्स पाहायला खरंतर खूप आवडत नाही, परंतू आधी मैत्रिणींमुळे आणि आता नवर्यामुळे खूप चित्रपट पाहते.. पण मुळात आवड खूप नसल्याने चित्रपट छान, पकड घेणारा असेल तरच मी तो मन लावून पाहू शकते..
मला संपूर्ण चित्रपटभर डोळे जराही न हलवता, एकटक पाहायला लावणारा पिक्चर म्हणजे, फ्लाईट प्लॅन..! नावं विसरले आता कलाकारांची, पण त्या बाईची मुलगी विमानात्(!) हरवली असताना, आणि सगळे पुरावे तिच्या विरोधात जाऊन,सगळे तिलाच मानसिक रुग्ण ठरवत असताना देखील तिची मुलीला शोधण्याची धडपड अशक्य आहे! मला तर ती बाई सुरवातीला व्हीमझिकलच वाटली होती.. पण शेवट पाहीला आणि एक डोक्यात बसलं, कितीही काहीही झालं तरी, शेवटपर्यंत हार मानायची नाही!.. जसं नमस्ते लंडनमधे अक्षयकुमार म्हणतो, जो पर्यंत 'हरत' नाही तोपर्यंत हार कशी मानू.. तो पर्यंत मला जिंकायची संधी असणारच.. हा प्रभाव खूप आहे माझ्यावर..
अजुन एक म्हणजे, चिल्ड्रेन् ऑफ हेवन पाहून, गरीबीतही इतकी समजुतदार असणारी, जे मिळेल त्यावर खुष् असणारी, इनोसंट मुलं पाहून माणसाने आहे त्यात समाधानी असले पाहीजे , अर्थात जे पाहीजे आहे, ते मिळण्यासाठी(चित्रपटातः शूज) अथक परिश्रम केले पाहीजेत हे देखील पटते..
असे प्रभाव पडणारे अनेक चित्रपट आहेत.. हिंदी ( आणि त्यातही नवीन) पाहून काहीही चांगलं मिळत नाही हे केव्हाच कळून चुकलंय.. पूर्वी कधीमधी करमणूक होत असे.. आजकाल ती ही होत नाही. त्यामुळे, फक्त (काही)मराठी आणि (काही) इंग्लिश असेच ऑप्शन्स आहेत!
दुश्मन.
मला मनापासून अतिशय आवडलेला चित्रपट म्हणजे दुश्मन हा होय. यात राजेश खन्नाची भूमिका मला फार आवडली. अगदी मनापासून भुमिका साकारलेली आहे असे मला वाटते आणि अजूनही हा चित्रपट आवडतो.
त्यानंतर परिचय आणि अभिमान याचा क्रमांक लावावा लागेल.
मेरा गाव और मेरा देश हा चित्रपटही आवडतो.
अवांतर : मला काही चित्रपट मनापासून आवडतात आणि दोन /तीन दिवस मनावर एक नशा आलेली असते.
बाकी मी भारतीय चित्रपटसृष्टी आणि राजकिय नेत्यांचा मनापासून चाहता आहे.
लहानपणी चित्रपटात रडणे हाही माझा आवडता उद्योग होता. उदा. राजा हरिश्चंद्र, संताची चित्रपटे.
बोर्न, मेट्रिक्स/श्वास, दोघी
विषयांचे वैविध्य, तंत्रज्ञान आणि हाताळणीमध्ये हॉलिवूडपटांचा हात कोणी धरू शकत नाही. जेसन बोर्न च्या बोर्न मालिकेतील सर्व चित्रपटांचा प्रभाव बरेच दिवस राहिला होता. मुख्यत्वे अतिशय वास्तववादी वाटणार्या पण तरीही अविश्वसनीय अश्या घटनाक्रमांची ही मालिका आहे. तसेच मेट्रिक्स मालिकेतील चित्रपटांचाही वैचारिक पातळीवर कायमस्वरूपी परिणाम झाला आहे असे वाटते.
नव्या मराठी चित्रपटांपैकी श्वास आणि नुकताच टिव्हीवर पाहिलेला 'दोघी' हे चित्रपट कायमस्वरूपी स्मरणात राहतील असे वाटते.
चित्रपट
टिंग्यासारखे चित्रपट नेहमीच अंतर्मुख करतात..
फार बघावासा वाटल्याशिवाय कोणताही शिनेमा बघत नाही. इन्फ्लेशन वाढल्याने परवडत नाही. ;-)
अभिजित...
माम्माजी...कुर्ते मे रहना सिखो|
- इति इंदरजित चढ्ढा
चित्रपटांचा प्रभाव
चित्रपट पाहून तिथल्या तिथेच सोडून द्यायचे असे धोरण ठेवल्याने प्रभाव वगैरे तसा काही नाही पण काही चित्रपट पुन्हा बघायला आवडतात. अर्थातच त्यात इंडियाना जोन्स, लारा क्रॉफ्ट, नॅशनल ट्रेजर अशा धारमाड पण इतिहासाशी संबंधीत चित्रपटांचा भरणा असतो. तद्दन फिल्मी असले तरी टेन कमांडमेंट्स्, एलिझाबेथ टेलरचा क्लिओपात्रा, बेन-हर, ट्रॉय, अलेक्झांडर असे चित्रपट पाहायला आवडतात. एखाद्या संवादातून बरीच माहिती कळून जाते किंवा शोधता येते.
कालच कॅप्शन्स ऑन करून, काही चुकू नये म्हणून मध्ये मध्ये थांबवत अतिशय सुमार असला तरी अलेक्झांडर पाहिला.
राशोमोन
हिंदी चित्रपटात अभिनय वगैरे न बघता हिरोइनीची दुर्दशा बघून रडून घेण्याचा माझाही छंद होता. पण त्यामुळे आयुष्यावर फरक झालेला नाही.
आयुष्यावर फरक केलेला एक चित्रपट म्हणजे अकिरो कुरोसावाचा "राशोमोन". सत्य म्हणजे काय? वगैरे प्रकारचे विचार तेव्हापासून आवडू लागले.
त्या चित्रपटातली कथा मध्ययुगीन जपानात घडलेली दाखवली आहे - म्हणजे शूर सामुराई शिलेदार, त्यांचा शालीन बायकांच्या मानाबाबत मध्ययुगीन विचार,कांगात येणारे मांत्रिक वगैरे कथावस्तू म्हणूनच आहेत - पण सत्यासत्याचा गोंधळ तो नव्हे.
एका न्यायालयातल्या खटल्यामध्ये होणार्या साक्षीपुराव्यापैकी काही साक्षी आपण ऐकतो. पै़की काही तथ्ये वादातीत आहेत. एक सामुराई शिलेदार आपल्या पत्नीसह एका निर्जन अरण्यातून प्रवास करत असतो. तिथे एका दरोडेखोराशी त्याची गाठ पडते. त्याच्या पुढच्या घटनाक्रमात शिलेदाराचा मृत्यू होतो - तो कसा याबाबत वाद आहे. शिवाय दरोडेखोर बाईचा भोग घेतो - पण तो तिच्या संमतीने की बळजबरीने, याविषयी वाद आहे. ठाणेदाराला मृतदेहापर्यंत पोचवणारा एक लाकूडतोड्याची साक्ष आहे की आपल्याला काही माहीत नाही.
घटनांची साक्ष देणारे तीन : दरोडेखोर, स्त्री, आणि शिलेदाराचे भूत (कोणाच्यातरी अंगात येऊन). प्रत्येकाची साक्ष इतक्या तपशिलांबाबत, कोणाची काय चूक होती, कोणाच्या मनात काय होते, इतकेच काय शिलेदाराचा मृत्यू खून होता की अपघात की आत्महत्या याबाबत फारकत घेणारी असते, की काय झाले हे मोठे कोडेच असते. (दरोडेखोर म्हणतो, आपण शूर लढतीत शिलेदाराला मारले, स्त्री म्हणते आपण अपघाताने नवर्याला मारले, शिलेदाराचे भूत म्हणते की आपण आत्महत्या केली!)
या खटल्याची चर्चा नंतर काही लोक करतात, त्याचे चित्रण आहे. खटल्यात प्रेक्षक असलेला एक बौद्ध भिक्षू, एक वाटसरू, आणि भिक्षूबरोबरच गावी परत चाललेला तो लाकूडतोड्या (देह सापडलेला). लाकूडतोड्या सांगतो, की त्याने आडून लपून पूर्ण घटनाक्रम बघितला आहे, पण फौजदारी मामल्यात का पडा, असे वाटून आपण "काही माहीत नाही" अशी साक्ष दिली. तो तिथे आपल्या बाजूने कथा सांगतो. त्याच्या कथेतले तपशी तीन्ही साक्षींपेक्षा वेगळे असतात.
चारही कथांमध्ये काही प्रमाणात सत्य मुरडून सांगायचे कथा सांगणार्याला कारण आहे, असे आपल्या लक्षात येते. तर मग घडले काय? हा प्रश्न आहे. चित्रपटाचा शेवट वेगळाच आहे. मला नाही पटत आणि पटतोसुद्धा.
हा गूढ चित्रपट वर्षा-दोन वर्षांनी मी पुन्हा पुन्हा बघतो.
+१
राशोमोन अद्भुत चित्रपट आहे. वर दिलेली वैशिष्ट्ये आहेतच, शिवाय यातील छायाचित्रणही सुरेख आहे. (सुरूवातीला येणारा पाऊस अफाट.) असे काही बघितल्यावर हॉलीवूडचे करोडो डॉलर्स खर्चून केलेले स्पेशल इफेक्ट्स फिके वाटायला लागतात. यातील लहान बाळाचा शेवटही भावतो.
याशिवाय बरेच, बरेच चित्रपट आहेत. गॉडफादर, शॉशॅंक रिडम्शन, मॅट्रीक्स १, ऑल द प्रेसिडँट्स मेन इ.
----
राशोमोन
अरे वा! हा चित्रपट बघीतलाच पाहीजे. कथानक कळू नये म्हणून पूर्ण प्रतिसाद वाचला नाही :-)
आता चित्रपट पाहिल्यावर पुन्हा प्रतिसाद वाचतो.
लिल्ल्या फोर एव्हर
लिल्ल्या फोर एव्हर हा चित्रपट खुपच अस्वस्थ करून गेला होता.
तसाच स्टोरी अनडन हा इराणे चित्रपटही.
लिल्ल्या फोर एव्हर विषयी येथे लिहिले होते.
http://mr.upakram.org/node/1052#comment-17781
इंगमार बर्गमनचा पर्सोना पण काहीसा विचारात पाडणारा...
-निनाद
मासिक इत्यादी.
पूर्वी रसरंग नावाचे चित्रपट परिक्षण करणारे सुंदर मासिक अथवा पाक्षिक प्रसिद्ध होत असे.
आता लोकसत्तामधे प्रत्येक रवीवारी सुंदर असे सदर प्रसिद्ध होत असते. ( हिच़कॉक, रे वर चे लेख छानच होते.)
पुण्यात फिल्म सोसायटी नावाची संस्था चांगले चित्रपट दाखवित असते / चर्चा करीत असते असे ऐकतो.
बरेच
आयुष्यावर प्रभाव असे म्हणता येईल का हे सांगता येणार नाही, पण आजवरच्या आयुष्यात चित्रपटांचे जबरदस्त असे स्थान आहे हे नक्की. गुरुशर्ट - पॅंटमधल्या राजेश खन्नाचा हाथी मेरे साथी ही आवडत्या सिनेमाची पहिली आठवण. आनंद, बावर्चीपर्यंत राजेश खन्नाचा प्रभाव होताच. 'ओ मेरे दिल के चैन' अजूनही बघायला आवडते. कॉलेजमध्ये असताना एक ते दहा क्रमांकावर असणारा अमिताभ आणि त्याचे सिनेमे आवडण्याला पर्यायच नव्हता. बेमिसाल, मैं आजाद हूं आणि ब्लॅक हे ऑल टाईम फेवरिटस. बाकी गुलजार, हृषीकेश मुखर्जी वगैरे ( आता अतिपरिचयाने कंटाळवाणी झालेली) यादी देत नाही.
थोडेसे वेगळे सांगायचे तर 'एक रुका हुआ फैसला' आणि 'एक डॉक्टर की मौत' हे चित्रपट. 'एक डॉक्टर की मौत' माझ्या विषयाशी संबंधित असल्याने अत्यंत आवडला होता. युवा, मुंबई एक्सप्रेस, इक्बाल, नितळ, देवराई, डोंबिवली फास्ट, कुछ मीठा हो जाये, सेहर, भेजा फ्राय, हनिमून ट्रॅव्हल्स प्रा. लि.... पण हा काही 'आवडते चित्रपट' असा चर्चाविषय नाही. यातल्या सगळ्याच चित्रपटांनी आयुष्यावर थोडाफार बरावाईट परिणाम केला असे म्हणता येईल फार तर.
सन्जोप राव