परकीय व्यक्तिनामे व त्यंचे मराठी लेखन

नमस्कार मंडळी,
गेले नऊ महिने महामहोपाध्याय पां.वा. काणे यांच्या चरित्राची सामग्री जुळ्वीत होतो. आता लेखनास सुरूवात केली आहे. त्यात एक अडचण अशी येत आहे की काही परकीय व्यक्तिनामांचे देवनागरीत लेखन कसे करावे? उदाहरणार्थ या चरित्रलेखनात एक नाव आले - Reverend Dugald Mackichan - तर हे - विशेषतः आडनाव कसे लिहायचे- काही ठिकाणी मला ते मिशिगन, मिश्कॅन असे आढळले. तर याचा प्रमाणित उच्चार काय आणि तो देवनागरीत कसा लिहावा हे कोणी सांगेल काय? अशा व्यक्तिनामांचा एखादा प्रमाणित मराठी शब्दकोश आहे काय? नसल्यास "उपक्रम्"कर्त्यांनी हाती घ्यायला काय हरकत आहे?
जाता जाता - वर उल्लेिलेले रेव्हरंड हे विल्सन कॉलेजच्जे प्राचार्य (१८८४ ते १९२०) होते, तसेच रेकॉर्ड चार वेळा मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू होते.
-पद्माकर

लेखनविषय: दुवे:

Comments

मॅक किचॅन

MacKichan - डुगाल्ड मॅक् किचॅन असा उच्चार होत असावा.
हे स्कॉटिश क्लॅन मधील आडनाव आहे असे दिसते.
मॅकडोनाल्ड आणि मॅकडुगाल या दोन्ही घराण्यांत (?) आढळले.
यांच्या नावाचे (स्मृती) वसतीगृहही अजून विल्सन कॉलेजात आहे. या नावाचा देशी उच्चार त्यांना विचारता येईल.

परंतु इंग्रजी आडनावांचे देवनागरी / भारतीय लिपीतील उच्चार दाखवणारा शब्दकोष सहजी सापडला नाही. येथे चौकशी करावी. कदाचित श्राव्य मिळेल.

आपल्या महामहोपाध्याय काणे चरित्र लेखनास शुभेच्छा!

जाता जाता

पुण्याचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अर्थात् सी ओ ई पी चे पहिले प्राचार्य "रेव्हरंड् जेम्स् मॅक्डुगाल्" होते (१८६५ च्या आधी) हे नमूद करू इच्छितो.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

एवढा विचार..

एवढा विचार करायचे कारण नाही. कारण आपण कितीही योग्य उच्चार करायचे ठरवले तर ब्रिटिश, स्कॉटिश आणि अमेरिकन उच्चारांपेक्षा आपला मराठी उच्चार वेगळाच होणार. आपण फक्त मराठी माणूस कसा उच्चार करेल तेवढेच लक्षात घेऊन लिखाण करायचे. माझ्या मते ड्यूगाल्ड मॅकिचन हा मराठी उच्चार आणि असेच मराठी लिखाण होईल. --वाचक्‍नवी

सहमत आहे

आपण फक्त मराठी माणूस कसा उच्चार करेल तेवढेच लक्षात घेऊन लिखाण करायचे.

सहमत आहे. अश्याने तुमचे काम सोपे होईल.

सहमत

आपण फक्त मराठी माणूस कसा उच्चार करेल तेवढेच लक्षात घेऊन लिखाण करायचे

एकवेळ इंग्रजी व्यक्तीनाम आपण बर्‍यापैकी (इंग्रजासारखे) लिहू शकू परंतु रशियन/चिनी इ. चे काय? तेव्हा आपण मराठी माणूस कसा उच्चार करील तेवढेच पहावे, हे उत्तम!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहमत

माझ्या मते ड्यूगाल्ड मॅकिचन हा मराठी उच्चार आणि असेच मराठी लिखाण होईल

सहमत आहे.
प्रकाश घाटपांडे

मॅक किचॅन

शरद
Mac किंवा Mc याचा उच्चार मॅक करून मग किचन किंवा किचॅन करणेच जास्त संयुक्तिक वाटते. एक सोयिस्कर उपाय
म्हणजे सुरवातीला, एकदाच, मराठीतील नावानंतर कंसांत [ ] इंग्रजी नाव द्यावे.
समित्पाणी

मकिकन् ?

डॅनियल् जोन्झ् ने मॅक् न म्हणता मक् म्हणावे असे लिहिल्याचे स्मरते. त्याचा केवळ उच्चार देणारा शब्दकोश (इंग्लिश प्रोनाउन्सिंग डिक्शनरी) पहावा.
म्हातार्‍या भारतीय लोकांकडून मॅकिकन् असा उच्चार ऐकला आहे.
गोळाबेरीज करून मकिकन् बरोबर वाटतो.

- दिगम्भा

 
^ वर