छायाचित्र टीका १२: नवशिक्याने काढलेले फोटो

हे फोटो केवळ कॅमेर्‍याचा अंदाज घ्यावा म्हणून काढलेले आहेत. बघा कसे वाटतात.

कर्पुरारती

Model: KODAK Z712 IS ZOOM DIGITAL CAMERA
ISO: 64
Exposure: 1/40 sec
Aperture: f/3.2
Focal Length: 17.6mm

आणि हा दुसरा

अबोली

Model: KODAK Z712 IS ZOOM DIGITAL CAMERA
ISO: 64
Exposure: 1/500 sec
Aperture: f/6.3
Focal Length: 57.7mm

कोलबेर, ध्रुव आणि धनंजय आदि फोटोग्राफीतल्या जाणकार मंडळींकडून काही मार्गदर्शन व्हावे या अपेक्षेने हे फोटो येथे चढवण्याचे धाडस करत आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

एकपाठी

विसुनाना, तुम्ही एकपाठी आहात असे आमचे मत आहे :). तांत्रिक बाबी तज्ञ लोक सांगतीलच. पण चित्राचे विषय तुम्ही चांगले निवडले आहेत.

चित्र १ : अजुन स्पष्ट घेता आले असते का?
चित्र २ : तज्ञ मंडळी सावली बद्दल नक्कीच सांगतील :)

उत्तम

अहो....स्वतःला नवशिके म्हणून तुम्ही स्ळःचे गुणगाणच करताय..माझ्या मते नवशिका म्हणजे नवीन नवीन गोष्टी शिकणारा किंवा शिकण्याचा प्रयत्न करणारा. मग असा माणूस तल्लख असणार. दरवेळी नवीन गोष्ट शिकणे म्हणजे चेष्टा नाही. तेव्हा स्वस्तुती करणे अयोग्य आहे..

चित्र: १ जे डोळ्याला मनाला भावते ते सुंदर चित्र(फोटो). तुमचे पहिले चित्र तसेच् आहे. त्यामुळे अधिक तांत्रिक बाबी बघण्याची हिंमत झाली नाही.

चित्र २: चित्राची पार्श्वभूमी आणि फुलाचा रंग वगैरे एकदम सुंदर संधी असतानाही चित्र चांगले वाटत नाही. अँगल चुकल्यामुळे किंवा तितका न जमल्यामुळे असे झाले असावे.

अभिजित...
माम्माजी...कुर्ते मे रहना सिखो|
- इति इंदरजित चढ्ढा

मस्त

नवशिके म्हणजे सारखे "नवीननवीन शिकणारे".
सर्व बाबतीत अभिजितशी सहमत. पहिले चित्र सुंदर म्हणून सुंदर. पण बघायचेच तर हे पाळलेले नियम.
चित्र १:
१. रंगसंगती "उष्ण" असताना उगाच डोळ्यांना खुपेल असा निळा किंवा हिरवा रंग नाही.
२. हात+आरतीची पळी (हा शब्द नेमका विसरायला होतो आहे) यांनी आग्नेय-वायव्य कर्णरेषा
३. ज्योत वरच्या १/३ डाव्या १/३ वर.
४. प्रकाशमापन अत्यंत योग्य - ब्राइटनेस/कॉन्ट्रास्ट छान

चित्र २:
१. रंगसंगती ठीक नाही. पार्श्वभूमी काळी किंवा गडद हवी होती. (नाहीतर शेंदरी+हिरवा हे दोन द्वितीय-श्रेणी रंग एकमेकांना साधारणपणे पोषक असतात. पण पांढरट पार्श्वभूमीमुळे फिकट रंग नाजुक न दिसता कंटाळवाणे दिसतात.)
२. हिरव्या काडीचा कर्ण पटत नाही - तो चौकोनाचा कर्ण वाटरच नाही.
३. कुठल्याही एका फुलाकडे लक्ष वेधले जात नाही. म्हणून "अमुक बिंदू तृतीयांशावर घ्या" असे काही सांगता येत नाही.
४. पाना-फुलांचे फोटो थेट सूर्यप्रकाशात साधारणपणे चांगले निघत नाहीत. सावल्या कर्कश आणि रुक्ष पडतात. असे फोटो ढगाळ दिवशी, किंवा सावलीत काढावेत. रंग खुलून येतात.
(५. उभी कंपोझिशन केली तर चालेल का? : देठ सरळ उभे, आणि वर उभारलेल्या हातांसारखी शेंदरी फुले.)
(६. हा फोटो बहुधा खूप झूम करून एकाच फुलाचा करावा, आणि मागे पूर्णपणे आउट-ऑफ-फोकस हिरवा रंग त्याला शोभा देणारा असावा - पण तो वेगळाच फोटो, तुमच्या मनातला नाही.)

छान

आवडले. अबोलीचे फूल सुंदर, आणि ज्योतही.

छान

पहिले चित्र फारच छान! ज्योत खूप छान आली आहे.
दुसर्‍या चित्रात सगळ्यात जास्त खटकते ती सावली. अश्या चित्रांमध्ये उजेड कुठून येतो आहे हे पण महत्वाचे असते.
सुर्याचा उजेड डावीकडून अथवा उजवीकडून येईल असे फुल ठेवल्यास इतकी गडद सावली उमटली नसते असे वाटते.

वरील

वरील बहुतेक सर्वांशी सहमत.
चित्र १: फारच छान आहे. ज्योत उत्तम आली आहे. व ज्योत एका कोनात थोडीशी कलली आहे ते सुंदरच दिसत् आहे.
चित्र २: नाही आवडला. जे सगळे सांगतात तेच. सावली नको होती व काळ्या पार्श्वभुमीवर जास्त खुलला असता. तसेच कदाचित फुलांच्या समोरच्या बाजुने फोटो काढला असता तर फुलाच्या पाकळ्या वरुन दिसल्या असत्या.

बाकी नवशिके म्हणजे सारखे "नवीननवीन शिकणारे"
व इतर अश्या बोलणार्‍या सगळ्यांशी सहमत :)

-
ध्रुव

आभार

दुसर्‍या फोटोत काहीतरी खटकत होतेच. ते धनंजय, कोलबेर आणि ध्रुव यांच्या प्रतिसादांमुळे स्पष्ट झाले. यापुढे काळजी घेईन.

स्वच्छ सूर्यप्रकाशात फुललेले घराच्या बाह्य भिंतीलगतचे अबोलीचे फूल टिपताना कोन बदलणे फारच दुरापास्त होते. कधी माझीच सावली आड येत होती. कॅमेर्‍याचा शार्पनेस मला तपासायचा होता. मोठ्या चित्रात पाकळ्यांवरील रेषा आणि फुलांचा हिरवा तुरा खूपच स्पष्ट आले आहेत.

माझा उद्देश सफल झाला खरा पण त्या नादात फोटो बिघडला.

पहिला फोटो सर्वांना भावला याचे मुख्य कारण "विषय" हे असावे. हाच फोटो 'कर्पुरारती म्हणजे काय?' हे माहीत नसणार्‍या लोकांना किती आवडेल? अशीही शंका येते. पण एकूण जमला आहे असे प्रतिसादांवरून वाटले.

प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचेच आभार. हुरूप वाढला. :)

आवडले

पहिले चित्र अधिक आवडले. दुसरे चित्र कमी आवडले. खाली काळी माती असती तर अधिक चांगले दिसले असते असे उगीचच वाटते.
अवांतर- स्वतःला नवशिक्या म्हणुन नवीन गोष्टी अधिक अधिक चांगल्या पद्धतीने शिकण्याच्या आयडियेची कल्पना आवडली
प्रकाश घाटपांडे

 
^ वर