उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
औटघटकेची कवच-कुंडले.
द्वारकानाथ
June 18, 2008 - 6:08 am
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3139154.cms
शरद पवार यांना अतिथी संपादक म्हणून म टा ने जबाबदारी दिली आणि त्यांनी उपरोक्त लेख लिहिला आहे.
मेटे राष्ट्रवादीचेच पदमूक्त उपाध्यक्ष असल्या कारणाने आणि शरद पवार यांना भविष्यात बराच वेळ मिळणार असल्यामूळे त्यांनी आपल्या राज्यात संयमी आणि विरुद्ध विचाराला वाव देणार्या संस्कृतीला चालना द्यावा असे सूचवावेसे वाटते.
यशवंतरावानंतर शरदपवार हे एक विचारी आणि परिपक्व नेते आहेत असे मला वाटते.
दुवे:
Comments
धन्यवाद
शरद पवारांच्या अतिथी संपादकीयासंबंधी दुवा दिल्याबद्दल धन्यवाद.
त्यांचा लेख हा त्यांच्या एकंदरीत वागणूकीप्रमाणेच संयमी अथवा इंग्रजीत (संयमीत नाही पण..) "पॉलीटीकली करेक्ट" वाटला आणि म्हणून आवडला.
तरी देखील, नावाचा उल्लेख न करता त्यांनी संपादकीय लेखणीचा मनापासून उपयोग केला (आणि तसे करण्यात मला तरी काही गैर वाटले नाही): केवळ मेटेच कशाला पण लोकसत्ता, कुमार केतकर आणि ज्या म.टा. ने त्यांना बोलावले त्यांचे आधीचे संपादक आणि आजही संपादकीय मंडळावर असलेले भारतकुमार राऊत या सर्वांच्याच कानपिचक्या काढल्यात असे जाणवले.
बाकी विशेष करून लोकसत्तेने पवारांविरूद्ध आणि इतर अनेक बाबतीत (संघाला कुठेही नावे आणि सोनीयाची ज्ञानेश्वरांपर्यंत तुलना...) ज्या पद्धतीचा वापर वर्षानूवर्षे (केतकर असल्यापासून) केला तो पाहता अशा संपादकांना "टिळक - आगरकर" परंपरेतील म्हणावे का हा प्रश्न पडतो.
यशवंतरावानंतर शरदपवार हे एक विचारी आणि परिपक्व नेते आहेत असे मला वाटते.
हे वाक्य अर्थातच १००% पटले पण त्यात नाईलाजाने असेही म्हणावेसे वाटते की "यशवंतरावानंतर शरदपवार हे एक अती सावध नेतृत्व आहे". कदाचीत यशवंतरावांप्रमाणे नसेल, तरी देखील चुकीच्या वेळेस आणि चुकीच्या पद्धतीने पवारांनी रीस्क घेतली असे वाटते. परीणामी यशवंतरावांसारखी मानहानी सहन करावी लागली नाही (अर्थात त्याचे कारण इंदिरा गांधी नाहीत हे ही आहे) पण स्वतःच्या महत्वाकांक्षेला आणि स्वतःचा (बारामतीबाहेर) जनहीतासाठी वापर होण्याला मर्यादा आल्या असे वाटले.
बाकी एका मराठी माणसाने बिसिसिआय/आयपीएल वगैरे संदर्भात आपले नाव नेतृत्व म्हणून मोठे केले याबद्दल कुठेतरी बरे वाटते आणि त्याच वेळेस त्या वेळेत गेले पाच वर्षे कृषिमंत्री असून स्वतःचा ठसा उमटवला नाही याचा खेद पण वाटतो... विशेष करून जेंव्हा लालू सारखा माणूस स्वतःचे नाव "रेल्वे मंत्री" म्हणून प्रसिद्धीस आणतो (आणि स्वतःच्या भ्रष्टकारभाराचा विसर पाडायला लावतो) आणि तेंव्हा पवारांना मात्र त्यांच्या कुशल कर्तुत्वापेक्षा अजूनही लोकं फक्त "कनिंग" राजकारणी म्हणूनच ओळखतात तेंव्हा तसे जास्तच वाटते.
लालूप्रसाद
लालूप्रसाद यांचा रेल्वेमंत्रीपदावरील ठसा हा वस्तुनिष्ठ नसून प्रसिद्धीमाध्यमनिष्ठ आहे.
गेल्या काही वर्षातील सतत वाढणारे इंधनांचे भाव व तुलनेने रेल्वेवाहतुकीचे कमी असणारे भाव यामुळे वाहतूक आवश्यक असणार्या कंपन्यांनी रेल्वेवाहतुकीला अधिक प्राधान्य दिले आहे. लालूप्रसाद यांचा हा ठसा हा पोषक वातावरण, रेल्वे वाहतुकीचा बदललेल्या आर्थिक परिस्थितीतला फायदेशीरपणा या गोष्टींवर आधारित आहे. लालूप्रसाद यांचे याबाबतीत काही विशेष कर्तृत्व नाही अशा अर्थाचा एक लेख वाचला होता. सध्या इतकेच. तो लेख शोधत आहे सापडल्यावर दुवा देतो. तोपर्यंत चू.भू.दे.घे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
लालू
लालूप्रसाद यांचा हा ठसा हा पोषक वातावरण, रेल्वे वाहतुकीचा बदललेल्या आर्थिक परिस्थितीतला फायदेशीरपणा या गोष्टींवर आधारित आहे. लालूप्रसाद यांचे याबाबतीत काही विशेष कर्तृत्व नाही अशा अर्थाचा एक लेख वाचला होता.
त्यांचे कर्तुत्व नाही हे अर्थातच मान्य आहे. त्यांचा शहाणपणा इतकाच होता/आहे की त्यांनी वरीष्ठ रेल्वेअधिकार्यांना "ग्रीन सिग्नल" दिला आणि रेल्वेत क्रांती घडवून आणण्याचे स्वातंत्र्य दिले - थोडक्यात राजकारण करत बसले नाहीत. म्हणूनच मी, "विशेष करून जेंव्हा लालू सारखा माणूस स्वतःचे नाव "रेल्वे मंत्री" म्हणून प्रसिद्धीस आणतो (आणि स्वतःच्या भ्रष्टकारभाराचा विसर पाडायला लावतो)" असे म्हणताना त्यांना कर्तुत्वान वगैरे म्हणले नव्हते. फक्त माझे म्हणणे इतकेच आहे की या ही पेक्षा अधीक यशस्वी (प्रसिद्धी कशीही मिळोत) पवार चांगले काम करून घेऊ शकले असते - तो ठसा उमटवण्याची संधी त्यांनी गमावली असे आजची शेतीसंदर्भात संपूर्ण परीस्थिती पहाता म्हणावेसे वाटते.
औट घटकेचे राज्य.
खरे तर योग्य वाक् प्रचार हा औटघटकेचे राज्य असा होता.
औट म्हणजे १/४ असावा आणि घटका म्हणजे किती असावे माहित नाही. म्हणजे नेमके किती वेळ राज्याभिषेक व्हावा आणि असा वाक् प्रचार का रुढ व्हावा याचा खुलासा व्हावा.
इतर प्रतिसादाबद्दल. आपण जर लालुना रेल्वेच्या अपयशाबद्दल जबाबदार पकडले असते तर त्याच्या यशाचेही श्रेय द्यायला हवे.
शरद पवार त्यांच्या अपयशाबद्दल ते नक्कीच जबाबदार आहेत. एक कृषीमंत्री म्हणून त्यांनाही त्यांची कारकिर्द विसरायला आवडेल.
साडेतीन
"औट" म्हणजे साडेतीन. पूर्वी अंकलिपीत "औटकी"चा पाढा असे (एक औट औट, दोन औट सात...)
घटका म्हणजे २४ मिनिटे, असे मला वाटते.
शिराळशेटाचे राज्य औट घटकेचे होते की सव्वा घटकेचे? "किशोर" मासिकात ही कथा वाचल्याचे अंधुक स्मरते. त्या थोड्या वेळात शिराळशेटाने भराभर राजाज्ञा काढून अनेक चांगल्या गोष्टी घडवल्या, अशी आख्यायिका आहे. कोकणात नागपंचमीनंतर शिराळशेटाची स्थापना करतात, असे गूगल म्हणतो, पण शिराळशेटाची मूर्ती किंवा त्याची पूजा मी स्वतः बघितलेली नाही.
शिराळशेटासारख्या खरोखर दुर्बळ माणसाला थोडा अवधी बळ मिळाल्यास "औट घटकेच्या राज्य" म्हणण्याची पद्धत आहे.
पुढार्यांच्या व्यक्तिपूजेचे स्तोम फार असते - त्यांचे भव्य फलक, वाढदिवसांच्या शुभेच्छा, हारतुरे, स्तुतिसुमने उधळणारी भाषणे त्यांच्या रोजच्या आहारात असतात. त्यामुळे कुठलेतरी छापील वर्तमानपत्र त्यांना अधूनमधून हेकटपणे झोडपत असेल, तरी त्यांची परिस्थिती बलहीनतेची, हालाखीची, नसावी असे वाटते.
बहुतेक "सकाळ" वर्तमानपत्रात पवारांना तितके जोरात झोडपत नाहीत. पण "सकाळ" वर्तमानपत्रात अन्य नेत्यांची खरडपट्टी करतात. त्याचप्रमाणे "सामना"चे आवडते/नावडते पुढारी आहेत, तसेच लोकसत्तेचे. पैकी कुठल्याच पुढार्याला बलहीन म्हणणे नेमके तथ्य असेल असे वाटत नाही.
शरद पवार यांच्या संपादकीय लेखातली भाषा संयमित आहे. लेखाचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद.
संपादकीय आवडले.
शरद पवारांचे संपादकीय आवडले. ( आमचे मित्र म्हणतात ते सर्व त्यांच्या खासगी सचिवांनी लिहिले असावे, आणि त्यांना केवळ दाखवून काय हवे, नको त्यात शरद पवारांनी बदल केले असावेत.)
परप्रांतिय आणि मराठी माणूस या विषयीची त्यांची भुमिका आम्हाला आवडली. संपादकाच्या घरावरील हल्ल्याचा निषेध करतांना, विचारांनी विचारांशी लढा द्यावा हा मुद्दाही आवडला !!! मेटे, राऊत यांना चांगलेच ठोकले. एकुणच काय सर्व मस्तच !!!
अवांतर : लालुंना प्रसिद्धीमाध्यमांचे सतत वलय असते. राबडीदेवींना साधे आंबे मिळाले नाही, म्हणुन ती बातमी प्रसिद्ध दैनिकांच्या मुखपृष्ठाची बातमी होते आणि तसेही रेल्वे सतत गाजत असतेच आणि सुदैवाने लालुंना ते जमले असेच म्हणावे लागते. त्याचबरोबर धाडसी निर्णय घेण्याची धमकही असावी लागते. समजा लालु कृषीमंत्री असते तर ते त्या विभागाला न्याय देऊ शकले असते का ? किंवा इतके प्रसिद्ध झाले असते का ? शरद पवार एक फेल्युअर कृषीमंत्री ठरले असे म्हटल्या जाते. साधे शेतक-यांना खतासाठी मारामारी करावी लागते. मिळते ते खत योग्य नाही. खतांच्या बरोबर त्यांच्या औषधावरील खर्च, बी- बियाणे, यामधे सामान्य शेतकरी भरडून गेला आहे. एक एकर शेती असलेल्या शेतक-याला पाणी,खते,बियाणे, मिळाले तर तो कापसाचे वीस क्विंटल उत्पन्न घेतो असे ग्रहीत धरले तर ज्याच्याकडे पाणी नाही, खते, औषधीखर्चासाठी पैसे नाहीत. अशा पावसाच्या भरोशावर शेती करणा-या शेतक-याला पाच किंवा दहा क्विंटल उत्पन्न होते आणि त्याचा खर्च जाऊन त्याचा नफा केवळ दोन ते पाच हजार असेल तर कृषीमंत्री त्यांना काहीच देऊ शकले नाही असे वाटते. किमान औषधींच्या किमती, खतांच्या किमती, बी-बियाणांची किमती कमी करु शकले असते. एक शेतक-यांच्या प्रश्नांची जाणीव असलेल्या नेत्याकडून शेतक-यांची उपेक्षाच झाली असे कधी कधी वाटते. एकच बातमी या विभागाची आम्ही सतत वाचत तो म्हणजे विकासदर वाढला. शेतक-यांच्या मालाला योग्य भाव मिळतो आहे का ? या प्रश्नांचे उत्तर नाहीच असे वाटते.. असो, शेतक-यांचे प्रश्न वेगळे कृषीमंत्र्याचे प्रश्न वेगळे.
मुद्दा थोडा वेगळा आहे
समजा लालु कृषीमंत्री असते तर ते त्या विभागाला न्याय देऊ शकले असते का ? किंवा इतके प्रसिद्ध झाले असते का ?
लालूचा उल्लेख सुरवातीस माझ्याकडून झाल्यामुळे येथे लिहीतो: माझा उद्देश लालूंची आणि पवारांची तुलना करण्याचा नव्हता.... तशी ती होऊ शकेल असे वाटत देखील नाही :-)
पण एखाद्या कर्तुत्वान माणसाकडून अपेक्षा ठेवल्या आणि त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत आणि त्याच वेळेस एखाद्या "अनपेक्षित" व्यक्तीकडून जर कारण काही असोत पण दृश्यस्वरूपात दिसणार्या चांगल्या गोष्टी झाल्या तर आपली अशा (कर्तुत्ववान)माणसाकडून होत असलेली अपेक्षाभंगाची भावना वाढते. त्याचे कारण अर्थातच आपल्या विशिष्ठ व्यक्ती/गटाकडून असलेल्या अपेक्षा आणि वस्तुस्थिती यातील फरक.
शरद पवारांचे संपादकीय आवडले. ( आमचे मित्र म्हणतात ते सर्व त्यांच्या खासगी सचिवांनी लिहिले असावे, आणि त्यांना केवळ दाखवून काय हवे, नको त्यात शरद पवारांनी बदल केले असावेत.)
पवार स्वतः लिहू शकतील अशी खात्री आहे. पण तरी देखील खाजगी सचिवांनी लिहीले असले तरी ते पवारांचेच विचार वाटतात आणि म्हणून त्यात् काही त्यांचा कमीपणा जाणवत नाही.
सहमत
अगदी नेमकं बोललात... +१
बाकी अग्रलेख संयत वाटला.. आवडला
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
साहेब
साहेब जेव्हा नाही म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ हो असा असतो आणि हो म्हणतात त्यावेळि त्याचा अर्थ नाही असा असतो. या वरुन पवार साहेब लोकसभेच्या निवडणुकिला उभे राहणार असे भाकित वर्तवता येते. मी मागे सकाळ मध्ये बातमी वाचली होती कि सोनिया गांधी यांचे हात बळकट करण्याची गरज- पवार. मी लगेच मित्राला म्हणले कि याचा अर्थ सोनिया गांधीचे पाय खेचायला सुरुवात झालि असे खुशाल समजावे. आन् फुटीला सुरुवात झाली आन पवार संगमा आन .. ..(आठवत नाही) हे त्रिकूट वायले झाले.
प्रकाश घाटपांडे
हे बाकी खरं आहे
साहेब जेव्हा नाही म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ हो असा असतो आणि हो म्हणतात त्यावेळि त्याचा अर्थ नाही असा असतो.
हा हा हा हा :) हे बाकी खरं आहे.
पवार साहेबांचे हेच लै बेक्कार काम. खरं म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवायचं काम नाही असेच एक राजकारणातील वादळी व्यक्तिमत्व. बरं त्यांनी अनेक निर्णय घेतले, की ज्याचे कौतुक वाटावे. पण दुर्दैव नावाच्या एका गोष्टीने त्यांची पाठ सोडली नाही, ते निर्णय सतत अंगलटच आले.
एखाद्या कर्तुत्वान माणसाकडून अपेक्षा ठेवल्या आणि त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत आणि त्याच वेळेस एखाद्या "अनपेक्षित" व्यक्तीकडून जर कारण काही असोत पण दृश्यस्वरूपात दिसणार्या चांगल्या गोष्टी झाल्या तर आपली अशा (कर्तुत्ववान)माणसाकडून होत असलेली अपेक्षाभंगाची भावना वाढते. विकासरावांच्या या मुद्यांशी सहमत
-दिलीप बिरुटे
( शरद पवार पंतप्रधान व्हावेत या खुळ्या स्वप्नात वावरणारा )
अर्थ
साहेब जेव्हा नाही म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ हो असा असतो आणि हो म्हणतात त्यावेळि त्याचा अर्थ नाही असा असतो. या वरुन पवार साहेब लोकसभेच्या निवडणुकिला उभे राहणार असे भाकित वर्तवता येते.
आपला पहीला मुद्दा ("हो" चा अर्थ "नाही " आणि "नाही"चा अर्थ "हो") जरी मान्य असला तरी त्यावरून काढलेला आपला निष्कर्ष (पवार साहेब लोकसभेच्या निवडणुकिला उभे राहणार) हा तितकासा पटत नाही. कारण त्यांचे विधान हे "अश्वत्थामा हतः" प्रमाणे आहे:
बाकी पंतप्रधान झाले तर नक्कीच आवडेल आणि त्यासाठी कायमच सदीच्छा! - पण त्यांच्याकडून काहीतरी चांगले कायमस्वरूपी काम (शरद पवार म्हणून) झाले तर त्याहून अधीक बरे वाटेल कारण त्यांच्यात ते कर्तुत्व नक्की आहे, फक्त त्यावर चढलेल्या धुळीवर फुंकर मारायची गरज आहे...