खर्च कपात आणि औद्योगिक क्षेत्र.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3123417.cms

आयटीवाल्यांचं कॉस्ट कटिंग स्नॅक्सपासून थेट टॉयलेटपेपरपर्यंत म टा वृत्त दिनांक १२.०६.०८.

वरील वृत्त वाचतांना अजूनही तेलाच्या किंमती वाढणार आहे असे वृत्त आपण वाचत असतोच. ( १३५ डॉलर्स प्रति पिंप हे २५० डॉलर्स पर्यंत जाणार असे ऐकतो.) त्यामूळे महागाई अजूनही वाढणार, वाहतुकीचा खर्च वाढणार असे वाटायला लागते.

आज एका संगणक कर्मचार्‍याशी गप्पा मारण्याचा योग आला आणि या संबंधीत चर्चा होत असताना त्याचे असे मत होते की आता अमेरिकेला संगणकासाठी पूर्णपणे भारतावर अवलंबून राहावे लागेल. कदाचित आपल्या पगारात ५/१० % कपात होईल पण भारतामध्ये प्रचंड रोजगार वाढ ( २५/३० %) होईल असे वाटते.

शेती, बांधकाम, वाहतुक आणि इतर क्षेत्रात भाडेवाढीने बराच फरक पडेल असे वाटते, पण संगणक क्षेत्रात जर रोजगार वाढला तर भारत या परिस्थितीतुन नक्कीच बाहेर पडेल.

याच बरोबर आपण कृषीधोरणाला आणि शेतीव्यवसायाला मूठमाती देत आहोत त्यावरही परत एकदा विचार व्हावा असे वाटते.

Comments

खर्चकपात

माहिती तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी खर्चकपातीच्या दृष्टीने पाउले उचलायला सुरुवात केली आहे हे खरे आहे. पण मटाचे हे वृत्त टाइम्स ग्रुपच्या अतिरंजित बातम्या देण्याच्या संस्कृतीशी मिळतेजुळते आहे.

माहिती-तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या एकूण खर्चामध्ये कर्मचार्‍यांचा पगार आणि कार्यालयांवर होणारा खर्च (भाडे, देखभाल, स्वच्छताकर्मचारी, सुरक्षाकर्मचारी, कॅफेटेरिया, संगणक, वीज, वातानुकूलन इ. इ.) हे मुख्य मानता येतील. कर्मचार्‍यांच्या आहे त्या पगारात कपात करणे सहज शक्य नसल्याने इतर सुविधांमध्ये कपात करणे हा एकच खर्चकपातीचा मार्ग आहे.

उत्तर अमेरिका आणि इतर ठिकाणी आलेल्या मंदीसदृश परिस्थितीमुळे, तेथील कंपन्यांवर खर्चात कपात करण्याच्या दबावामुळे बहि:स्रोतीकरण (Outsourcing) वाढण्याची शक्यता आहे हे तुमच्या परिचिताने व्यक्त केलेले मत बर्‍याच अंशी खरे आहे. पण या बहि:स्रोतीकरणाचा ओघ भारताकडेच येईल हे सांगता येणार नाही. भारतातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणार्‍यांचे पगार वाढत असल्याने Cost advantage कमी होते आहे. अर्थात हा एका वेगळाच विषय आहे.

सहमत आहे

सहमत आहे..

पराचा कावळा करणे ह्या वाक्प्रचाराला समानार्थी वाक्प्रचार म्हणजे "मटातील बातम्या".

अभिजित...
पाण्याची खोली तपासून तर उड्या कोणीही मारेल..जो न बघता उडी मारतो त्याचेच डोके फुटते. ;-)

खर्चकपात

खर्च वाचवण्यासाठी असे मार्ग वापरणे म्हणजे 'पेनी वाईझ पाऊंड फूलिश' असे म्हणता येईल. असे दात कोरून कोणाचेही पोट भरणार नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

कसे काय बॉ?

शेती, बांधकाम, वाहतुक आणि इतर क्षेत्रात भाडेवाढीने बराच फरक पडेल असे वाटते, पण संगणक क्षेत्रात जर रोजगार वाढला तर भारत या परिस्थितीतुन नक्कीच बाहेर पडेल. हे कसे काय बॉ?

जागतिक परीणाम

माझ्या मते, रोजगार असणे ही प्रथम गरज आहे. त्यामुळे रोजगार वाढले तर आपण तगु शकतो. अर्थातच दुसर्‍या देशावर अवलंबुन राहणे ही सुद्धा धोक्याचीच स्थिती आहे.
आपली अर्थव्यवस्था कृषीव्यवसायावर आधारलेली असल्याकारणे त्यावर विचार करणे अत्यावश्यक आहे.

संगणक

संगणकातले रोजगार आणी भारत तग धरणार याचा संबंध कळला नाही. खरतर भारतातले किती लोक संगणाकाधारीत रोजगार मिळवून कमाई करतात? सर्व क्षेत्रातले रोजगार महत्वाचे आहेत. संगणक क्षेत्राला ग्लॅमर मिळाले होते. ते कधी ना कधी कमी होणार होते. त्याची सुरूवात आहे इतकेच.

कृषी

कृषीधोरणाला आणि शेतीव्यवसायाला मूठमाती देत आहोत त्यावरही परत एकदा विचार व्हावा असे वाटते.

याचा निश्चितच विचार व्हायला हवा आहे.
शेतीकडे सामान्य शेतकर्‍याला पाठ फिरवायला लावणारी सध्याची धोरणे फार महागडी ठरतील. तेलाच्या बदलत्या राजकारणात तर हे अन्न धान्याचे गमावते स्थैर्य धोकादायकच आहे.

सहकाराचा शेतीचा मारग चांगला आहे पण त्या आपल्या र्‍हस्व दृष्टीच्या राजकारण्यानी बोर्‍या वाजवला आहे असे वाटते.
अगदी आणंद सारखी ख्यातनाम व्यवस्थाही या भोवर्‍यात सापडते आहे असे दिसते.
हे वाईट आहे.

-निनाद

 
^ वर