निसर्गाचे नियम समाजाच्या नियमांपेक्षा श्रेष्ठ असतात...आणी ते श्रेष्ठ राहतील.
निसर्गाचे नियम समाजाच्या नियमांपेक्षा श्रेष्ठ असतात...आणी ते श्रेष्ठ राहतील.
विवाहित पुरुषांत काही विशेष आकर्षण असते का? या विषयावरील चर्चा वाचताना एक चर्चेतून निसट्लेला मुद्दा लक्षात आला. तो म्हणजे या विषयाची जीवशास्त्रीय बाजू. निसर्गात लग्न फक्त मनुष्यप्राणीच करतो. आणी मनुष्य हा निसर्गत: मोनोगॅमस प्राणि नाही. मोनोगॅमी ही माणसाने स्वत:वर लादून घेतलेली व्यवस्था आहे. एका जोडीदारा कडुन जेव्हा सर्व गरजा पूर्ण होत नाहीत तेव्हा मनुष्यप्राणि दूसरा जोडीदार शोधायचा प्रयत्न करतो. असे प्रयत्न नैतिक्तेच्या दृष्टिकोनातून स्वीकारणे अवघड असले तरी केवळ जैविकप्रेरणांच्या पातळीवर नक्कीच गैर नाही. दूर्दैवाची गोष्ट अशी की माणसाच्या हे लक्षात राह्त नाही कि आपण कपिकुलोत्पन्न बांधवांपेक्षा जनुकीय पातळीवर फक्त २-२॥% वेगळे आहॊत.
आपले इतर प्राण्यांपेक्षा वेगळेपण राखण्यात माणसाने फार मॊठी किंमत मोजली आहे असे मला वाटते.
Comments
पण...
आपले इतर प्राण्यांपेक्षा वेगळेपण राखण्यात माणसाने फार मॊठी किंमत मोजली आहे असे मला वाटते.
पण प्रॉब्लेम असा आहे की... इतर प्राण्यांपेक्षा वेगळेपण राखले नाही तर (म्हणजे मोनोगॅमस राहीलो नाहीतर) त्याहून (व्यवहारात)जास्त किंमत मोजावी लागेल असे वाटते :-)
"लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी निघून गेली, बापुडे भिकेस लागली काही खाया मिळेना," हे समर्थवचन माहीत असेलच!
लेकुरे उदंड झाली
आता उदंड लेकरे टाळण्याचे सन्मान्य आणी सोपे मार्ग उपलब्ध आहेत, त्यामूळे आपला युक्तिवाद इथे गैरलागू ठरतो.
समाजस्वास्थ्य
र धों कर्व्यांच्या समाज स्वास्थ्य ची आठवण झालि.
प्रकाश घाटपांडे
निसर्गाच्या विरुद्ध...
आता उदंड लेकरे टाळण्याचे सन्मान्य आणी सोपे मार्ग उपलब्ध आहेत, त्यामूळे आपला युक्तिवाद इथे गैरलागू ठरतो.
आपण म्हणता तसे सामान्य आणि सोप उपलब्ध मार्ग हे निसर्ग नियमांच्या विरुद्ध आहेत. जर निसर्ग नियम पाळायचेत तर मनापासून (येथील सदस्य नाही बरंका!) पाळले पाहीजेत. त्यात आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा कसा असेल याचीपण साधक बाधक चर्चा झाली तर बरं.. त्या नंतर पॉली का मोनोगॅमी/अँड्री वगैरे विचार करायला उर्जा प्राप्त होईल. :-)
श्रेष्ठ
इथे श्रेष्ठ चा अर्थ लागला नाही. कदाचित 'मोअर एफेक्टीव्ह' अशा अर्थाने म्हणायचे असेल.
आपले इतर प्राण्यांपेक्षा वेगळेपण राखण्यात माणसाने फार मॊठी किंमत मोजली आहे असे मला वाटते.
हे विधान थोडे जनरलाइझ्ड वाटते. एक तर उत्क्रांत होणे हा माणसाने ठरवून केलेला प्रकार नाही. आणि उत्क्रांत झाल्यावर आपला सुपीक मेंदू सर्व दिशेने धावू लागला. त्यात सर्वच गोष्टी लॉजिकल होत्या असेही नाही, विशेषतः समाजव्यवस्थेबाबत. मोनोगॅमस पद्धत ही आपल्या तथाकथित आधुनिक समाजाने मानलेली पद्धत आहे. पण इतर पद्धतीही अस्तित्वात आहेत. मुस्लिम राष्ट्रांमध्ये बहुपत्नित्व आहे. हिमाचल प्रदेशातील एका जमातीत अशी प्रथा आहे की तिथे पाहुणा आला की यजमानाच्या पत्नीला त्याच्याबरोबर रात्र घालवावी लागते.* आणि असे न केल्यास तो यजमानाचा अपमान समजला जातो.
* संदर्भ : ऐसपैस गप्पा - दुर्गाबाई भागवत, प्रतिभा रानडे
----
मोनोगॅमी
ही अर्वाचीन कल्पना आहे. तीही पाश्चात्त्यांकडून आलेली. (राम एकपत्नीव्रत असला तरी उत्क्रांतीनुसार त्याचा पुढचा अवतार १६ सहस्त्र स्त्रियांचा पती होता. [यांतील १६ सहस्त्र हा फुगवलेला आकडा सोडला तरी आठजणींचा तर नक्कीच])
असो, चर्चेचा हेतू ध्यानात आला नाही.
चर्चेचा हेतू
यथावकाश स्पष्ट होईल्...
पॉलीगॅमी
म्हणजे काय अपेक्षित आहे?
केवळ् बहुपत्नित्व का?
बहुपतित्व ही मग पॉलीगॅमीत येते.
उदा:- द्रौपदी.
त्याला नैसर्गिक म्हणणार का?
(सध्या उ.प्र. च्या काही भागात ही प्रथा अजुनही आहे असं ऐकलय.)
जन सामान्यांचे मन
बहुपतित्व
बहुपतित्व ही मग पॉलीगॅमीत येते.
ज्याप्रमाणे 'बहुपत्नित्व' ला पॉलीगॅमी हा शब्द आहे त्याप्रमाणे 'बहुपतित्व'ला पॉलीऍण्ड्री ( Polyandry ) हा शब्द आहे.
तर मग
लेखकाला ते ही "नैसर्गिक " आणि "स्वाभाविक" वाटतं.
समाजातील् मोठाच घटक असा झाल्यास लेखकाला चालेल का?
मोनोगॅमी ही माणसाने स्वत:वर लादून घेतलेली व्यवस्था आहे. एका जोडीदारा कडुन जेव्हा सर्व गरजा पूर्ण होत नाहीत तेव्हा मनुष्यप्राणि दूसरा जोडीदार शोधायचा प्रयत्न करतो. असे प्रयत्न नैतिक्तेच्या दृष्टिकोनातून स्वीकारणे अवघड असले तरी केवळ जैविकप्रेरणांच्या पातळीवर नक्कीच गैर नाही.
ह्यातुन ह्यांना काय सुचवायचं आहे?
एखाद्या स्त्रीला आवडला बाहेरचा पुरुष, तर सरळ त्याच्याशी शय्यासोबत करुन घ्यावी.
पुढील दिवशी आणखी कोणा दे़खण्या(किंवा सामर्थ्यवान्) पुरुषाशी तेच करावं.
मग दर थोड्या फार दिवसांनी जो पुरुष आवडेल त्याच्याशी "नैसर्गिक" म्हणुन वाटेल तेव्हा आणि
वाटेल तिथं संभोग सुरु करावा का?
अशाप्रकारे संपुर्ण (लैंगिक दृष्ट्या) ऍक्टीव आयुष्यात दिवसागणिक पुरुष साथीदार त्या स्त्रीनं बदलावेत.
आणि "नैसर्गिक" पणाची "तृप्ती" अनुभवावी.
असं काहीसं ह्यांना म्हणायचं आहे का?
(वरच्याच उदाहरणाचा पूरक/शिल्लक/कॉम्प्लेमेंट्री भाग म्हणून् पुरुषानही आवडेल त्या स्त्रीशीसतत्
संभोग करत सुटावं. मग असे बरेच पुरुष् आणि बर्याच स्त्रीया ह्यांची निवड,निर्णय जुळत असल्यानं त्यांनी
एक फोरम्-व्यासपीठ म्हणुन ग्रुप सुरु केला आणि त्यातुन पुढं ग्रुप सेक्स वगैरे वाढीस लागले; किंवा
शेकडो जोडपी एकाच ठिकाणी रत झालेली आहेत असं दिसलं तर चालेल का?
आणि त्यातही मग एका जोडीदाराशी संभोग झाल्यावर तिथेच एक् झोप वगैरे पुर्ण झाल्यावर्
आपल्याच बाजुला रत झालेल्या जोडप्यातील नवा साथिदार घेउन त्याच्याशी पुन्हा रतिक्रीडा सुरु आहे.
अशा प्रकारे रस्तो रस्ती संभोगरत वस्त्रहीन जोडपी (संवजो).......
चौकाचौकात संवजो. दुकानात गेलात तर तिथही संवजो.
कुणाच्या घरी गेलात तर एकाच कुटुंबातील(विविध वयोगटातील) व्यक्ती नैसर्गिक संवजो.
टपरीवर संवजो,गाडीत संवजो....
खुद्द् हापिसातही काम संपताच्(किंवा प्रसंगी कामच सोडुन देउन) संवजो
वाह वाह् वाह्...
नातं केवळ एकच. नैसर्गिक नातं.बाकी सब झूठ.
माणसाला लग्नाची गरज नाही;प्यांटीला झिपची गरज नाही.
संधी मिळताच "कार्यक्रम्" सुरुच्.
....
.......
...........
.................
कशी वाटतात ही दृष्यं "नैसर्गिक" भूक वगैरेच्या नावाखाली.
छान! अत्युत्तम ना!
अनैतिकता चिरायु होवो! नैसर्गिकता वाढीस लागो!
चीअर्स्!)
जन सामान्यांचे मन
चित्रमय वर्णन | परतणे अशक्य
डोळ्यापुढे चित्र उभे राहिले ;)
आजच्या माणसाच्या बर्याच गोष्टी अनैसर्गिक असतील पण आता पुन्हा आपल्या 'गुहे'तील स्वरूपात परतणे शक्य नाही. त्यामुळे "निसर्गाचे नियम समाजाच्या नियमांपेक्षा श्रेष्ठ असतात...आणी ते श्रेष्ठ राहतील" हा फारतर एखाद्या व्यक्तीचा समज असू शकेल सत्य नव्हे.
अतिरंजित
मनुष्यप्राण्याची कामवासना इतकी अमर्याद नक्कीच नाही. एका ठराविक काळानन्तर म्हणजे ह्युमन ग्रोथ हार्मोनचा स्राव कमी होतो त्यानंतर ही उर्जा पण कमी होते.
अच्छा! म्हणजे
"इतकं" नाही झालं तरी चालेल.
पण (इतकं नाही पण)"असं" झालं तर चालेल.
(उर्जा कमी होइपर्यंत केलं तर चालेल.म्हणजे थकेस्तोवर मौज करा!
आनंद लुटा. धमाल करा.)
काय? मनुष्याकडे अनंत शक्ती आहे असं मी तरी कुठं म्हणतोय?
उर्जा पण कमी होते., माणूस् थकतो.(पण सदासर्व काळासाठी नाही.वीर्य निर्मिती ही जवळजवळ आयुष्य भर होत राहते.)
तेच तर म्हणतोय.असं करीत राहिल्यानं उर्जा कमी होइल.
(काही काळापुरती.वैद्यकीय भाषेत ह्याला "शैथिल्य" म्हणतात. आणखीन शास्त्रीय असा शब्द् आठवत नाहिये.)
पुनश्च तब्येत भरुन आली की पुन्हा सुरुच मौज मजा .
नैसर्गिक उर्मी अशी मनात असेल ना, तर येइलच पुन्हा उफाळुन.
बरोब्बर ना?
जन सामान्यांचे मन
मनोबांचा गोंधळ्
मनोबांचा म्हणणे अतिरंजित का याची कारणे देतो -
माझ्या मते "अनाचार" हा एखाद्या गोष्टीची दूर्लभता असेल तर निर्माण होतो. जेव्हा एखादी गोष्ट मुबलक उपलब्ध होते तेव्हा मनुष्यप्राणी काय कोणताच प्राणी वखवखलेला राहत नाही. ज्या आदिम मनुष्य जमाती निसर्गाशी संतुलन टिकवून आहेत, त्या जमातीमध्ये पण इतके अतिरंजित चित्र बघायला मिळत नाही.
हम्म्म्...
माझ्या मते "अनाचार" हा एखाद्या गोष्टीची दूर्लभता असेल तर निर्माण होतो.
होत असावा...
यु सेड् इट्. :-)
त्या चित्रातल्या गोष्टीला अखेरचं एकदाचं "अनाचार" म्हणालात आपण.
बरय् बुवा . मी अनाचार वगैरे कसलिच् कमेंट केली नाहिये. फक्त काय असु शकतं हे दाखवलय.
"अनाचार" हा शब्द शेवटी आपणच वापरलात. बरं झालं.
जेव्हा एखादी गोष्ट मुबलक उपलब्ध होते तेव्हा मनुष्यप्राणी काय कोणताच प्राणी वखवखलेला राहत नाही.
मी कुठं म्हणतोय तो "वखवखलेला " आहे म्हणुन.मी एवढच म्हणतोय की "मुबलक" प्रमाणात उपलब्ध "मजे"चा
तो "उपभोग" घेतोय. आता तुम्ही उपभोग् घे म्हणणार(तुमच्या मूळ लेखाप्रमाणे "अनेकांशी सेक्स करण्यात गैर काय" वगैरे मतानुसार) आणि तो तसं(तुमचच ऐकुन) करु लागला की वर तुम्हीच डोळे वटारुन दटावणार "काय रे, अनाचारी काय का हा वखवखलेपणा"
हां.या अस्स्से. अशी कल्पना पाहुन गेलात ना घाबरुन?
मी फक्त हा रस्ता कुठं जातो, ते दाखवलं.रस्ता सुचवणारे तुम्हीच ना?
म्हणजे तुम्ही ती गोष्ट् सुचवणार्,आणि ती केल्यास उलट्या बाजुने शंख करणार.
ह्यामुळच तीन तीनदा विचारतोय, तुम्चं "विधान" (मराठित "स्टेटमेंट") तरी काय आहे बुवा.
आधी ते सांगा आणि मग कुणाचा गोंधळ वगैरे होतोय ते सांगा.
किती जणांशी संबंध ठेवणं तुम्हाला नॉर्मल वाटतं?
आणि तुम्हाला जे वाटतय ना अतिरंजित, ते तसच होइल असही मी लिहिलं नाहिये.
मी फक्त विचारलं की "तुम्हाला असच म्हणायचय का?"
आणि ह्यावर उत्तर् द्यायचं तुम्ही टाळुन दुसरच बोलत बसलात.
ज्या आदिम मनुष्य जमाती निसर्गाशी संतुलन टिकवून आहेत, त्या जमातीमध्ये पण इतके अतिरंजित चित्र बघायला मिळत नाही.
भाउ राव्, त्यांच्याकडेही "समाज्" ही संकल्पना आहेच.त्यानुसार येणारी इतर बंधनही आहेत.
(इथं, पाश्चात्त्य जगात अल्कोहल सहजासहजी उप्लब्ध आहे.आणि ते पिणं ही एक् बर्यापैकी साधारण(कॉमन)गोष्ट आहे.
म्हणून इथलं दरडोइ मद्याचं प्रमाण भारतापेक्षा कैक पट जास्त आहे.कारण् इथे तुलनेनं पिण्याची मोकळीक जास्त आहे.
इथले लोक सर्रास मद्यप्राशन करतात.
आपल्याकडे तसं नाही.
मग तुम्ही जो मुद्दा म्हणता " मुबलक उप्लब्धतेचा" त्याचं काय्?
अहो साधी गोष्ट आहे; उपभोग्य सेवा मुबलक उप्लब्ध आहे, शिवाय कसलीच आडकाठी नाही.
मग कोण शिंचा कशाला थांबेल? बहुसंख्य लोक हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असणार्या गोष्टीचा
मनसोक्त आनंद घेतातच की!)
लेखकाचं म्हणणं तरी काय आहे , ते जाणून घेण्यास उत्सुक
जन सामान्यांचे मन
ता. क. :- एक सल्ला.मुद्द्यांबद्दल बोला. मुद्दे लिहिणार्याबद्दल नाही.
खरेच अतिरंजीत
या प्रतिसादाची गरज कळली नाही. वर लेखकाने जो थोडक्यात लेख लिहिला आहे त्यावरून फारसं काही कळत नाही हे मान्य आहे पण म्हणून याला असं वाटत असेल किंवा त्याला असं म्हणायचं असेल समजून प्रतिसाद लिहिणेही बरोबर नाही.
थोडक्यात, लेख किंवा चर्चा विस्तृत टाकता आली असती आणि वरील प्रतिसाद टाळता आला असता.
- राजीव.
त्याला असे वाटते याची किंमत न्यायालयात शून्य आहे.
अतिरंजित
का काय ते नक्की नाही सांगु शकत आत्ता.
मी फक्त विचारलय की "ह्यातलं(मी लिहिलेल्या घटनातलं) तुम्हाला काही म्हणायचय का?"
तसं नसेल, तर काय म्हणायचं आहे मग्?कुठल्या पातळीपर्यंत नैसर्गिक भावना म्हणुन पॉलिगॅमीचं कौतुक् करायचं?
कुठं थांबायचं? तिथही पुन्हा मग "थांबण्याची" रेषा आलीच की!
अरेच्चा! ही रेषा म्हणजेच तर मग "समाज रचना" नावाच्या तथाकथित रोगाची सुरुवात.(समाज-रचनेस नकार ते नवीन रचना-प्रारुप
एक वर्तुळ पुर्ण्. एक मोठ्ठा आणि संघर्षपुर्ण प्रवास पुर्ण. अरेच्चा! पण मग पुन्हा तिथच की!वर्तुळ झालच की.
मग कशाला केला बरं प्रवास नक्की?)
म्हणजे थोडाक्यात काय, समाज रचना राहिलच,फक्त रूप बदलेल.
पण हे सगळं तरी मग तुम्हाला म्हणायचय का?
ते तरी कळु द्यात राव.
जन सामान्यांचे मन
अतिरंजीत प्रतिसाद
"वरच्याच उदाहरणाचा पूरक/शिल्लक/कॉम्प्लेमेंट्री भाग म्हणून् पुरुषानही आवडेल त्या स्त्रीशीसतत्
संभोग करत सुटावं. मग असे बरेच पुरुष् आणि बर्याच स्त्रीया ह्यांची निवड,निर्णय जुळत असल्यानं त्यांनी
एक फोरम्-व्यासपीठ म्हणुन ग्रुप सुरु केला आणि त्यातुन पुढं ग्रुप सेक्स वगैरे वाढीस लागले; किंवा
शेकडो जोडपी एकाच ठिकाणी रत झालेली आहेत असं दिसलं तर चालेल का?
आणि त्यातही मग एका जोडीदाराशी संभोग झाल्यावर तिथेच एक् झोप वगैरे पुर्ण झाल्यावर्
आपल्याच बाजुला रत झालेल्या जोडप्यातील नवा साथिदार घेउन त्याच्याशी पुन्हा रतिक्रीडा सुरु आहे.
अशा प्रकारे रस्तो रस्ती संभोगरत वस्त्रहीन जोडपी (संवजो)......."
समजून चालू की मनुष्य प्राण्यांच्या पातळीवर उतरला (किंवा प्राण्यांप्रमाणे नैसर्गिक् अवस्थेत रहायला लागला).
पण तुम्ही वर्णन केलेलं दृष्य कुठल्या प्राण्यांच्या कळपात दिसतं?
हरिणांच्या कळपात एका नरामागे अनेक माद्या असू शकतात पण म्हणून काय नर हरिण कायम संभोगच करत नसतो. तुमच्या प्रतिसादातलं "शेकडो जोडपी...." हे तर निश्चितच अतिरंजीत आहे..अशी दृष्य प्राण्यांच्या कळपात तर दिसणार नाहीत. इन् फॅक्ट ती सध्याच्या सुसंस्कृत समाजातच दिसतात (नाईटक्लब किंवा पॉर्नोग्राफी) मग घाबरायचं कारण काय्?
एक शंका
पूर्वी (म्हणजे जेव्हा बहुपत्नीत्व सर्वमान्य होते) समाजातील स्त्री-पुरुषांचे गुणोत्तर काय होते? सध्या ते ५०:५० च्या आत-बाहेर आहे.
"श्रेष्ठ" चा अर्थ
आपण घेतलेला अर्थ योग्य आहे.
"एक तर उत्क्रांत होणे हा माणसाने ठरवून केलेला प्रकार नाही."
हे मान्य आहे पण उत्क्रांतीचे ज्ञान झाल्यावर निसर्गाशी फट्कून वागणे, नैसर्गिक व्यवस्थेत अथवा व्यवहारात ढवळाढवळ करणे, निसर्गाला ओरबाडणे हे त्याने जाणीवपूर्वक चालू ठॆवले. अनेक अनैसर्गिक कल्पनांचे उदात्तीकरण (उदा -ब्रह्मचर्य) माणसाच्या सुपिक मेंदूने केले.
उदात्तिकरण
ब्रह्मचर्य हेच जीवन् वीर्यनाश हा मृत्यु अशा भोंगळ कल्पना नेमक्या कशा पसरल्या गेल्या असतील? स्वामी विवेकानंद एवढे तेजपुंज का होते तर ते ब्रह्मचारी होते. वीर्य बाहेर न टाकल्याने त्याचे तेजात रुपांतर झाले अशा समजुती मी ऐकलेल्या आहेत. या समजुती अवैज्ञानिक आहेत हे तर उघड आहे.
आता निसर्ग नियमानुसार बळी तो कान पिळि किंवा survival is truth. या नियमाने पुन्हा जंगलराज निर्माण झाले तर? समाजरचना यातुनच उत्क्रांत झाली ना?
प्रकाश घाटपांडे
निसर्गाचे नियम कोणते, समाजाचे कोणते? नेमकी सीमा धूसर
टोकाची उदाहरणे बर्यापैकी स्पष्ट असतात - श्वास घेणे निसर्गनियम आहे, आणि संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया साडी काळी नेसतात, हा सामाजिक नियम आहे.
पण जसेजसे आपण शरीरक्रियांबाबतच्या वर्तनापाशी येतो, तसे कुठला नियम सामाजिक, आणि कुठला नियम नैसर्गिक हा फरक धूसर होत जातो.
निकष १: मानवेतर प्राण्यांचे वर्तन हे नैसर्गिक नियमाचे द्योतक असते
मानवेतर जनावरांचे वर्तन मानवापेक्षा नैसर्गिक आहे, असे मानण्याचा एक विचारप्रवाह दिसतो, आणि तो काही प्रमाणात पटण्यासारखा आहे. पण कुठल्याही विवक्षित बाबतीत सर्व मानवेतर प्राणी एकसारखे वागत असले, तर त्या बाबतीत तो निसर्गनियम आहे, असे म्हणण्यास बळ मिळते. उदाहरण : "गुडमॉर्निंग" म्हणणे हे जवळजवळ कुठल्याच जनावराचे वर्तन दिसत नाही, पण काही मानवाचे दिसते. त्यामुळे "गुडमॉर्निंग" म्हणणे हा सामाजिक नियम असण्याची शक्यता फार आहे.
पण "पाण्यात अंग धूणे" हे वर्तन काही प्राण्यांमध्ये दिसते, काहींमध्ये दिसत नाही. अंगाला चिखल फासणे काही प्राण्यांमध्ये दिसते, काहींमध्ये दिसत नाही. त्यामुळे माणसायची अंग धुवायची इच्छा, उटणे लावायची प्रथा कितपत नैसर्गिक आहे, कितपत सामाजिक नियम आहे, हे सांगणे (या निकषावरून) कठिण आहे.
मानवेतर प्राण्यांमध्ये काही प्राणी थोड्या वेळात अनेक जोडीदारांशी समागम करतात, काही प्राणी थोड्याच जोडीदारांशी (काही उदाहरणांत एकाच जोडीदाराशी) समागम करतात. त्यामुळे जोडीदारांचा नेमका आकडा काय असावा असा कुठलाच निसर्गनियम सांगता येत नाही. बहुतेक मानव एक-जोडीदारनिष्ठ, किंवा खूपच कमी जोडीदारांशी समागम करतात. बाकीच्या जनावरांच्या वर्तनातून असे वागणे नैसर्गिक, की सामाजिक हे सांगता येत नाही.
निकष २: "गरजा पूर्ण करणे" म्हणजे निसर्गनियम
हा निकषही पटण्यासारखा आहे. पण येथे मुळात "गरज" म्हणजे काय? ही कल्पना फक्त टोकालाच स्पष्ट आहे. ढोबळपणे "आहार, निद्रा, भय-मुक्ती, आणि मैथुन" या टोकाच्या "गरजा" सर्व लोक कबूल करतात. पण त्यात तरतमभाव असतो. कुठलेच अन्न नसले तर कुठलेही अन्न म्हणजे गरज. पण क्षाराची गरज असल्यामुळे खारट वस्तू खाव्याशा वाटतात. या गरजेचे "चोचले" केव्हा होते, ती सीमारेषा अस्पष्ट आहे.
भय-मुक्ती चे उदाहरण असे: बालकाला आईच्या जवळिकीची गरज वाटते - कुठलाच धोका समोर नसतानाही. आता ही शारिरिक नसून मानसिक गरज आहे. धोका नसतानाही आईच्या जवळिकीची गरज पूर्ण करणे निसर्गनियम मानायला काही हरकत नाही. तसे बघता आईला, वडलांना बाळाची "आहार, निद्रा, भय, मैथुन" कुठल्याच दृष्टीने गरज नसते. पण "वात्सल्य" ही प्रबळ मानसिक गरज "नैसर्गिक" मानायला काहीच हरकत नाही. काही पोरकी मुले आईविना तगतात, काही स्त्रिया, पुरुष मुलांविना सुखी असतात, या उदाहरणांनी "वात्सल्या"चा नैसर्गिक गुण कमी होत नाही.
लोक प्रेमात पडतात (कित्येकदा लग्न केलेल्या जोडीदाराच्या प्रेमात पडतात!) तेव्हा त्यांना त्या एका व्यक्तीची आस लागते. त्या एका व्यक्तीबद्दल कमालीचा विश्वास वाटतो. त्या व्यक्तीच्या जवळ असताना शारिरिक आणि मानसिक आकर्षण आणि तृप्तीचा अनुभव करतात. ही अनुभूती "मानसिक गरज" आहे, की केवळ "सामाजिक अपेक्षा" आहे? मातेच्या वात्सल्यासारखेच या अनुभूतीशिवायही काही लोक सुखाने जगतात. तेवढ्यासाठी काही त्या गरजेला नकारण्याचे कारण मला दिसत नाही. म्हटले तर "एकच जोडीदार" हा नियम निसर्ग- आणि समाजनियमांच्या धूसर सीमारेषेवरती आहे.
सारांश : "एका, किंवा थोड्याच जोडीदारांशी समागम करणे" हा समाजाने निसर्गाविरुद्ध लादलेला जुलूम आहे, असे मला पटलेले नाही. कमीतकमी जे लोक ही मानसिक "गरज" मानतात, त्यांनी ती नैसर्गिक मानण्यास काहीच आडकाठी दिसत नाही. "त्याची मोठी किंमत मनुष्याने मोजली आहे" हे वाक्य समजण्यासाठी मला हे जाणायला आवडेल, की काय किंमत मोजली.
इथे
आणखी एक गोष्ट आठवली. चिंपांझी, गोरिला, बोनोबो माकडे या सर्वांमध्ये सहचर्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि ते या पद्धतींचे काटेकोरपणे पालन करतात. म्हणजे मेंदू सुपीक व्हायला लागला हा त्याचा एक परिणाम असू शकतो असे म्हणता येईल काय?
----
ठीक
एका जोडीदारा कडुन जेव्हा सर्व गरजा पूर्ण होत नाहीत तेव्हा मनुष्यप्राणि दूसरा जोडीदार शोधायचा प्रयत्न करतो.
असा जोडीदार मला वाटते शोधायचाच असला तर आपला जोडीदार दुसरा कोणी जोडीदार शोधतो आहे त्याची कल्पना येत असावी बहुतेक माकड आदी प्राण्यांतील आधीच्या जोडीदारांना. माणसाने सुद्धा नवीन जोडीदार शोधताना सध्याच्या जोडीदाराला अंधारात ठेवू नये, नाही का? म्हणजे तो/ती दुसरा लगेच जोडीदार शोधायला मोकळे!
एक कल्पना सुचवाविशी वाटते
निसर्ग नियम मानणारे १०० स्त्रीया, १०० पुरूष,
समाज नियम मानणारे १०० स्त्रीया, १०० पुरूष,
असे चार संच करूया, त्यांच्या कुंडल्या गोळा करू, त्यांच्या समाधानी वृत्तीचा "हॅपिनेस इंडेक्स" तयार करू त्या इंडेक्स संदर्भात कुंडल्यांमधले साम्यभेद समजावून घेऊ, तीच गोष्ट नुसत्या राशींचा (जन्म आणि लग्न) उपयोग करून शोधू
हवे असल्यास या संशोधनासाठी भारतातून वैज्ञानिकांच्या बरोबरच अमेरिकेतून हॉवर्ड स्टर्न सारख्यां "दिग्गज" माणसांचा सल्ला घेऊ....
आणि त्यावर आधारीत ज्योतिषशास्त्र/विद्या/थोतांड हे नक्की समाजनियम पाळणार्यांना उपयुक्त ठरते का निसर्ग नियम पाळणार्यांना हे ठरवू, मग त्या संशोधनावर एक ग्रंथ नाही पण पेपर लिहू -आणि त्यावर जर कोणी न वाचता टिका करू लागला तर एकतर मूर्ख समजू अथवा त्या विशिष्ठ समुदायाचा (ज्या वरील समुदायासाठी पत्रिका योग्य ठरतात) त्यांचा मत्सर करणारा दुराभिमानी समजू .
बाकी अशा नैसर्गिक नियमाचे फायदे/तोटे माहीत नसले तरी एक नक्की होऊ शकेल - देव घाबरून राहील कारण - "___ को खुदा भी डरता है, असे थोरामोठ्यांनी सांगून राहीलयं ":-)
फारच शुल्लक किंमत मोजली
नैसर्गिक नियमांना झुगारून सामाजिक नियम माझ्या पालकांनी (आणि त्यांच्या पूर्वजांनी) पाळले याचा मला आनंद आणि अभिमान आहे. आणि त्यांनी (आणि त्यांच्या पूर्वजांनी) असे नियम पाळल्यानेच माणूस या स्तराला पोचला आहे याची मला खात्री आहे.
माणूस व इतर प्रांण्यांमधील अंतर बघता या वेगळेपणासाठी माणसाने फारच शुल्लक किंमत मोजली असे मी म्हणेन.
जाता जाता: तुमच्या नैसर्गिक विश्वात एखाद्याला आपले माता-पिता कोण आहेत याची खात्री असल्याचे समाधान काहि औरच असेल नाही! ;) का अशी खात्री नसणे हे नैसर्गिक वाटते तुम्हाला? :)
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणरे आणि न समजणारे
प्रस्तावाचे मंडन आणि खंडन
विवाहित पुरुषांत काही विशेष आकर्षण असते का? या मूळ चर्चेला प्रतिसाद म्हणून येथील चर्चा प्रस्तावकाने ही मते मांडली आहेत. मूळ चर्चेत हा मुद्दा कोणी मांडला नसल्याचे मान्य आहे.
परंतु मूळ चर्चा 'स्त्रियांना विवाहित पुरुषांबद्दल विशेष आकर्षण वाटते का?' अशी मांडता येईल. पुरुषांना आपल्या अनेक स्त्रिया असाव्यात असे वाटते का? वाटत असेल तर का वाटते ? असा तो विषय नाही. त्या प्रस्तावाचा दाखला देत -
ही येथील चर्चाप्रस्तावातील वाक्ये पुरुष आणि स्त्री दोघांनाही विचारात घेतात. शिवाय ती वैचारिकदृष्ट्या स्पष्ट नाहीत. चर्चाप्रस्ताव मांडताना लेखकाने त्याला नक्की काय म्हणायचे आहे ते स्पष्ट करायला हवे होते.
---
माझ्या दृष्टीने हे स्पष्टीकरण असे -
१. निसर्गात लग्न फक्त मनुष्यप्राणीच करतो. -
'लग्न करणे' म्हणजे नक्की काय? लग्न म्हणजे धार्मिक विधी हा अर्थ अभिप्रेत असेल 'मनुष्य लग्न करतो' हे वाक्यच 'मनुष्य इतर प्राण्यांसारखा प्राणी नाही' हे मान्य करणारे आहे. मग मनुष्याने इतर प्राण्याप्रमाणे न वागता माणसाप्रमाणे वागावे हे गृहित आहे. असे असेल तर पुढील चर्चा अप्रस्तुतच ठरते.
परंतु तसे नसावे. कारण ऐतिहासिक विवाहपद्धतीमध्ये गांधर्व विवाह आणि राक्षस विवाह या प्रकारचे विवाह - 'संबंध' समाजमान्य होते. (शाकुंतलाच्या कथेत दुष्यंताने शकुंतलेशी गांधर्व विवाह केला म्हणजे एकमेकांवर भाळून त्यांचा संबंध घडला हे स्पष्टच दिसते.) येथे मनुष्य हा प्राणी आहे हे स्पष्ट होते.पूर्वीच्या काळी लग्नपत्रिकेत ' चि. क्ष आणि चि.सौ. कां. य यांचा (शरीर)संबंध करणेचे योजिले आहे' अशी स्पष्ट शब्दरचना आढळत असे.
हे मान्य केले तर मनुष्याचे लग्न किंवा इतर प्राण्यांचा संबंध यांच्यात शारिरिक दृष्टीने काहीच फरक नाही. असे प्रस्तावकाला म्हणायचे आहे काय?
२. आणी मनुष्य हा निसर्गत: मोनोगॅमस प्राणि नाही. मोनोगॅमी ही माणसाने स्वत:वर लादून घेतलेली व्यवस्था आहे. -
'कळप' ही संकल्पना अनेक प्राण्यांमध्ये आढळते. समाज ही मानवी संकल्पना कळप संकल्पनेतूनच निर्माण झालेली आहे. मानवाशी अत्यंत जनुकीय जवळीक असणारे प्रायमेट्स पाहिले असता असे दिसते की एका सामर्थ्यवान नराबरोबर अनेक माद्या संबंध ठेवतात. या उलट परिस्थिती (एका सामर्थ्यवान मादीबरोबर अनेक नर) दिसत नाही. हरीण, सिंह आदि प्राण्यांबाबत असेच दिसते. काही इतर प्राण्यांच्या / कीटकांच्या उदाहरणात मादी अनेक नरांशी संबंध ठेवताना दिसते. परंतु ती उदाहरणे विरळाच.
एक नर - एक मादी हे उदाहरण तर फारच तुरळक दिसते. मला 'राजहंस' हे एकच उदाहरण आठवते.
परंतु मनुष्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर स्त्री ही निसर्गतयः मोनोअँड्रस असण्याची शक्यता पुरुष निसर्गतयः मोनोगॅमस असण्यापेक्षा नक्कीच जास्त आहे. म्हणून मूळ चर्चेत हा मुद्दा अप्रस्तुत ठरतो.
प्रस्तावकाला केवळ नर मनुष्यांबद्दल बोलायचे आहे काय?
३. एका जोडीदारा कडुन जेव्हा सर्व गरजा पूर्ण होत नाहीत तेव्हा मनुष्यप्राणि दूसरा जोडीदार शोधायचा प्रयत्न करतो. -
नरांच्या बाबतीत हे खरे नाही. एका जोडीदाराकडून ' सर्व गरजा' पूर्ण होत असल्या तरी तो दुसरा जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करेल. (हे कदाचित आपले 'जेनेटिक मटेरियल' जगात जास्तीत जास्त पसरावे या नैसर्गिक प्रेरणेने होत असेल.) माद्यांबाबत असे असावे असे वाटत नाही. उलट एखाद्या सामर्थ्यवान नराचा वंश पुढे चालवण्याची प्रेरणा त्यांना नैसर्गिकरित्या होत असावी. शिवाय अशा 'सामर्थ्यवान' नरामुळे अपत्यसंभव झाला तर त्या अपत्यांमध्येही त्याचेच गुण उतरतील अशी अपेक्षा असण्याची शक्यता आहे.
येथे 'लैंगिक गरज पूर्ण होत नाही म्हणून इतर जोडीदाराचा शोध' हा मुद्दा अप्रस्तुत ठरतो.
इतर गरजांकडे (आहार, निद्रा, अभय) पाहिले असता असे दिसते की प्राणी जगतातील कोणतीही मादी प्रमुख नराचा अंत होईपर्यंत आपल्या या इतर गरजा पूर्ण होत नाहीत म्हणून दुसर्या नराच्या कळपात शिरलेली दिसत नाही. किंवा त्या गरजा पूर्ण होत नाहीत म्हणून स्वतःच त्या नराला ठार करत नाहीत, पळवून लावत नाहीत किंवा इतर नराला आमंत्रित करत नाहीत. उलट नर मात्र एकमेकांशी लढून, पळवून लावून अथवा प्रतिस्पर्ध्याला ठार करून कळपाचा/ माद्यांचा ताबा घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
असे असेल तर ते मनुष्य'प्राण्या'लाही लागू आहे असे म्हणावे लागेल. पर्यायाने गरजांचा मुद्दा स्त्री - मनुष्यप्राण्यांना लागू पडणार नाही.
---
असे स्पष्टीकरण होत असेल तर चर्चाप्रस्ताव एकांगी असून तो केवळ पुरुषांच्या बहुपत्नित्वाबद्दल आहे असे म्हणावे लागेल. कारण मनुष्य हा प्राणी आहे हे क्षणभर मान्य केले तरी लैंगिक बहु-भागिदारी ही जाणीव फक्त पुरुषांमध्ये आढळली पाहिजे.मग या चर्चाप्रस्तावाचा स्त्रियांना वाटणार्या विवाहित पुरुषांबद्दलच्या आकर्षणाशी काय संबंध?
फारतर असे म्हणता येईल की - एखाद्या विवाहित, सापत्य आणि सामर्थ्यवान पुरुषाशी वैवाहिक संबंध जोडले असता स्रीचे भावी आयुष्य आणि अपत्यप्राप्ती दोन्ही बाबतीत तिला सुरक्षितता लाभण्याचा संभव जास्त आहे. अशा नैसर्गिक प्रेरणेने ती विवाहित पुरुषांकडे आकृष्ट होऊ शकते.
परंतु सरसकट सर्व स्त्रिया असाच 'नैसर्गिक' विचार करत असतील असे मानायचे मात्र कारण दिसत नाही. अशा आकर्षणाचे नैसर्गिक आहे म्हणून समर्थन करणेही योग्य नाही.
---
असे स्पष्टीकरण प्रस्तावक देऊ शकेल किंवा मान्य करेल असे मानले तरी आपण 'मनुष्य हा केवळ प्राणी नसून विचारशील प्राणी आहे' ही वाक्यरचना स्विकारली पाहिजे. विचारशीलता ही सुद्धा निसर्गाचीच देणगी आहे आणि या नैसर्गिक प्ररणेतून निर्माण झालेले विचार आणि सामाजिक नियमसुद्धा नैसर्गिकच आहेत हे विसरून चालणार नाही. या विचारशीलतेमुळेच सामाजिक स्वास्थ्य टिकून आहे.
गुहेत राहणारा कळप ते आधुनिक संस्कृतीत राहणारा समाज हा मानवी विकासाचा मोठा टप्पा आहे. यात समाजिक जीवनाला घातक अशा अनेक नैसर्गिक प्रेरणा दाबल्या जाणे गरजेचे आहे. आता त्या नैसर्गिक प्रेरणांना उजाळा देऊन समाजमान्य वर्तनाला गैर ठरवणे अथवा समाजबाह्य वर्तनाचे समर्थन करणे हे दोन्ही सर्वथैव अयोग्य आहे. उलट या प्रवृत्ती जिथे दिसतात त्यांचा उपहास / विरोध करणे गरजेचे आहे.
त्यामुळेच "असे प्रयत्न नैतिक्तेच्या दृष्टिकोनातून स्वीकारणे अवघड असले तरी केवळ जैविकप्रेरणांच्या पातळीवर नक्कीच गैर नाही " असे समर्थन करू नये. "आपले इतर प्राण्यांपेक्षा वेगळेपण राखण्यात माणसाने फार मॊठी किंमत मोजली आहे असे मला वाटते " हे प्रस्तावकाचे वाक्य खटकते. कोणती किंमत मोजावी लागली आहे? त्याचेही स्पष्टीकरण लेखकाने दिले पाहिजे.
---
हम्म! :)
हम्म्म्!
एकंदरीत बरीच इंटरेस्टिंग चर्चा चालली आहे, वाचायला मजा आली! :)
बाय द वे, जाता जाता मला एका वाक्याला दाद द्याविशी वाटते, ती देतो आणि प्रतिसाद संपवतो!
वरीलपैकी मनोबाच्या एका प्रतिसादातील,
आणि त्यातही मग एका जोडीदाराशी संभोग झाल्यावर तिथेच एक् झोप वगैरे पुर्ण झाल्यावर्
हे वाक्य मस्तच आहे. या वाक्यातील 'संभोगानंतर तिथेच एक झोप काढायची' कल्पना बाकी फारच आवडली, नैसर्गिक वाटली! :)
असो, बाकी चालू द्या. चर्चा माहितीपूर्ण वाटत असून अंमळ मनोरंजकही वाटते आहे. वरील सर्व चर्चाकारांना माझे धन्यवाद..!
आपला,
(निद्रा व मैथूनप्रेमी) तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!