विवाहित पुरुषांत काही विशेष आकर्षण असते का?

रानी मुखर्जी आणी आदित्य चोपडा ह्यांचे विवाह होणार अशी बातमी आहे, त्यासाठी चोपडानी आपल्या पहिल्या बायकोला तलाक दिला आहे. तसेच करीना आणि सैफ मधे पण "काहीतरी" चालू आहे (किंवा हा फक्त मीडियाचा भ्रम असावा), पण एक प्रश्न मात्र नक्कीच उद्भवतो, कि "विवाहित पुरुषां मधे असे काय आकर्षण असते कि अविवाहित मुली त्यांच्या प्रेमांत पडतात.." पूर्वीचे उदाहरण द्यायला गेलं तर बरेच आहेत - यथा, धर्मेन्द्र-हेमा, श्रीदेवी- बोनी कपूर, रवीना टंडन, करिश्मा-संजय कपूर्, ऋचा शर्मा-संजय दत्त्, आमिर खान... अर्थात खूप उदाहरण आहेत, आणि ही "परम्परा" समाजात ही रुतु लागली आहे (कारण हे लोकं युवा पिढिचे "आयकान" आहे म्हणे)... तर चर्चेचा विषय असा कि -

(१) हे मात्र दैहिक आकर्षण आहे का? (असं असल्यास त्या "मर्दांची" दाद द्यावी लागेल)
(२) ह्यात रुपये-पैसे, मालमत्ता आणि सुरक्षित भविष्य ची कामना असेल का? (पण त्या हीरोइन्स पण भरपूर पैसे वाल्या आहेत, मग?)
(३) "त्या" अनुभवाला प्राथमिकता देतात का (विपरीत अर्थ नका घेऊ :)
(४) आधुनिक समजल्या जाणार्^या त्या समाजात पण "पुरुषवादी" व्यवस्था चालते का?
(५) ही काही "सायकोलाजिस्ट्" समस्या आहे का?

तर बंधुनों, हिन्दू-मुस्लिम्, राजकारण इत्यादी विषयांवरून "हट के" चर्चा करावीशी वाटली :) (मराठी भाषेवर "कंट्रोल" नसल्याने बरेच शब्द हिन्दी किंवा आंग्रेजी वापरले आहेत, त्यासाठी क्षमस्व)

लेखनविषय: दुवे:

Comments

मस्त!

चिपलूनकर साहेब धन्यवाद!

विषय चांगला काढलात. अमंळ "विषया"वर पण आहे :-) त्यामुळे त्यावर चर्चा चांगली होईल असे वाटते.

फक्त मला यात नक्की काय उत्तर दिले तर ते योग्य ठरेल ते कळत नाही - म्हणजे स्वतःला कमी लेखल्यासारखे पण होणार नाही की घरी मार पडणार नाही अथवा संशय कल्लोळ पण होणार नाही ....
SmileyCentral.com

तेंव्हा तुर्तास काठावर बसून मजा पहातो!

असेच म्हणतो

तेंव्हा तुर्तास काठावर बसून मजा पहातो!

असेच म्हणतो :)

(लग्न झालेले नसल्याने आता कसें होणार या काळजीत पडलेला ;) ) ऋषिकेश

माझी अजाण उत्तरे

(१) हे मात्र दैहिक आकर्षण आहे का? (असं असल्यास त्या "मर्दांची" दाद द्यावी लागेल)
सशर्त होय. व्यक्ती तितक्या प्रकृती. काही स्त्रियांना वयाने मोठ्या दैहिक आकर्षण असावे. एका वेटिंग रूममध्ये मी "ओ" मासिक चाळत होतो. त्यात तरुण पुरुषांचे आकर्षण असलेल्या तरुण नसलेल्या स्त्रियांसाठी सल्ला होता. व्यक्ती तितक्या प्रकृती.
(२) ह्यात रुपये-पैसे, मालमत्ता आणि सुरक्षित भविष्य ची कामना असेल का? (पण त्या हीरोइन्स पण भरपूर पैसे वाल्या आहेत, मग?)
होय. हॉलिवुड आणि बॉलिवुडमध्ये हिरोईनला त्याच लायकीच्या/प्रसिद्धीच्या हिरोपेक्षा कमी पैसे मिळतात. नटीकडे माझ्यापेक्षा चिकार अधिक पैसे असले तरी, त्या समाजाच्या मानाने कमी पैसे आहेत.
(३) "त्या" अनुभवाला प्राथमिकता देतात का (विपरीत अर्थ नका घेऊ :)
शक्य आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती. कामशास्त्राच्या (प्राचीन भारतीय) ग्रंथांप्रमाणे सद्गृहस्थाने गणिकेकडून अनुभव घेण्यास समाजाजी ना नव्हती. (अजूनही काही प्रमाणात तसेच आहे.) पण उच्चभ्रू समाजात आजकाल गणिका नाहीत. अनुभवदात्री शिक्षिका म्हणून पूर्वपत्नी चालत असावी.

(४) आधुनिक समजल्या जाणार्‍या त्या समाजात पण "पुरुषवादी" व्यवस्था चालते का?
होय. म्हणून हा समाज आधुनिक "समजला गेला" तरी प्रगत मात्र नाही.

(५) ही काही "सायकोलाजिस्ट्" समस्या आहे का?
हो/नाही. अस्तित्वातले लग्न मोडू नये, यासाठी पतिपत्नींनी जरूर सल्ला घ्यावा. इतकेच काय, आकर्षण कायम राहावे म्हणून सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला घ्यावा. नजर इकडे-तिकडे जाणार हे कमीअधिक प्रमाणात नैसर्गिक आहे. त्यावर सल्ला कशाला हवा आहे? संयम पुरे... आता त्या विवाहिताचे आकर्षण असलेल्या अविवाहित स्त्रीला सायकॉलॉजिस्ट सल्ला लागेल की नाही, माहीत नाही. बायकोमुलांत अर्धा जीव गुंतल्यामुळे अंगवस्त्राकडे तो पुरुष लक्ष देत नसेल तर अंगवस्त्रास मानसिक क्लेश होणे शक्य आहे. मग जरूर सल्ला घ्यावा. आपल्या सुखासाठी त्या पुरुषाच्या बायकोच्या आयुष्याचा विचका होतो/होत नाही, हे ज्ञान असणे सदसद्विवेकबुद्धीचा मामला आहे, सायकॉलॉजिस्टचा नव्हे.

धनंजय यांचा प्रतिसाद

गदिमांची क्षमा मागून ...

"या विषयासी , या उत्तरासम अन्य नसे अभिधान ! " :-)

मस्त "विषय"

(१) हे मात्र दैहिक आकर्षण आहे का? (असं असल्यास त्या "मर्दांची" दाद द्यावी लागेल)

असावे/नसावे. विवाहीत पुरूषांत आकर्षण असते हे निश्चित आणि या विवाहित पुरूषांकडे कलही स्त्री प्रौढांचा असावा किंवा अगदी षोडशेचा असे वाटते.

कारण -
१. प्रौढेची गरज युवतींपेक्षा वेगळी असावी. उदा. त्यांना काळा चष्मा लावून, केसांवरून हात फिरवणार्‍या युवकापेक्षा लहान मुलाला प्रेमाने खेळवणारा पुरूष अधिक भावतो. आपल्यापेक्षा श्रेष्ठ आणि प्रस्थापित पुरुष आपल्याच वयाचा मिळणे त्यांना कठिण वाटत असावे. या उलट,
२. अगदी नवथर तरूणीला त्यात वडिलांप्रमाणे काळजी करणारा माणूस दिसून ती त्याकडे आकर्षित होऊ शकते.

करीना, राणी, श्रीदेवी, हेमा इ. इ. भारतीय वयगणनेनुसार प्रौढा गणाव्या लागतील तर माला सिन्हाची कन्या प्रतिभा, दिव्या भारती या नवथर तरूणी.

(२) ह्यात रुपये-पैसे, मालमत्ता आणि सुरक्षित भविष्य ची कामना असेल का? (पण त्या हीरोइन्स पण भरपूर पैसे वाल्या आहेत, मग?)

नक्कीच. नायिका बक्कळ पैसेवाल्या असल्या तरी त्यांचे व्यावसायिक आयुष्य फार कमी असते. आलीशान राहणीची सवय टिकवायची असेल तर त्याच तोडीच्या पुरुषाशी लग्न करणे भाग असावे.

(३) "त्या" अनुभवाला प्राथमिकता देतात का (विपरीत अर्थ नका घेऊ :)

तसे नसावे, लग्न झालेले म्हणजेच अनुभवी असे गणित आताच्या काळात तरी दिसत नाही.

(४) आधुनिक समजल्या जाणार्^या त्या समाजात पण "पुरुषवादी" व्यवस्था चालते का?

होय, बाकी उत्तर धनंजयप्रमाणे

(५) ही काही "सायकोलाजिस्ट्" समस्या आहे का?

असावी, नेमक्या शब्दांत सांगणे कठिण आहे पण प्रत्येकाला आपला अहंकार सुखावणारा जोडीदार हवा असतो.... वय उलटून गेलेल्या पुरूषांना आपण किती "केपेबल" आहोत हे दाखवण्यासाठी सुंदर आणि प्रसिद्ध स्त्रीची गरज असते तर स्त्री ला आपली केपेबिलिटी दाखवण्यासाठी आपण एखाद्या बांधील पुरुषालाही कसे भुलवू शकतो (अगदी, पुराणातील अप्सरा आणि ऋषींचे उदाहरणही चालेल.) हे दाखवायचे असते. आणि तशी इच्छा होणे स्वाभावीक असले तरी तशी प्रबळ इच्छा आणि त्याला अनुसरून कृती ही "मानसिक समस्या" गणायला हरकत नसावी.

वैवाहिक बंधने आणि नीतीमत्ता

आर्थिक दृष्ट्या उच्चवर्गामधे विवाहबंधनापलीकडील नातेसंबंधांचा प्रादुर्भाव , त्यांच्या आढळातील सर्वसामान्य वाढ या गोष्टीचे द्योतक आहे की, नीतीमूल्यांची संकल्पना स्थलकालपरिस्थितीपरत्वे बदलत रहाते. अनेक गोष्टी ज्या तुमच्या क्रयशक्तीच्या , पर्यायाने आवाक्याच्या पलिकडे असतात, त्या जर काही कारणाने तुमच्या कक्षेत आल्या तर तुम्ही तुमची नीतीमूल्यांची व्याख्या बदलता. बर्‍याचदा तुमचा प्रामाणिकपणा , तुमची एकनिष्ठा ही तुमच्या क्रयशक्तिच्या किंवा आवाक्याच्या अभावाची फळे असतात. एकूणच तुमचे नीतीमत्तेच्या क्षेत्रातील वर्तन हे तुमची क्षमता, तुमची मजबूरी , तुमचा नाइलाज , या गोष्टीनी प्रमाणित होतात. या घटकांमधे किंचित् बदल घडतो तसतसा तुमच्या वर्तनात हळूहळू फरक पडत जातो.

बदलणार्‍या अर्थव्यवस्थेमधे जसजसे विविध थरातील लोकांकडचे पर्याय प्रसरण पावतात किंवा आकुंचन पावतात , तसतसे सामूहिक नीतीमत्तेचे पॅटर्न्स् बदलताना दिसतात. (फ्रेंच सोसायटी हा या संदर्भातला एक उत्तम नमुना आहे :-) )

रोचक

विषय रोचक आहे. धनंजय, मुक्तसुनीत आणि प्रियालीशी सहमत आहे.
ही काही "सायकोलाजिस्ट्" समस्या आहे का?
हो आणि नाही. जर रोजचे व्यवहार करण्यास यामुळे अडथळा येत असेल तर ही समस्या मानसिक मानायला हरकत नसावी. मानसिक रोगांमध्येही शारीरीक रोगांप्रमाणे पातळ्या असतात. काही कारणाने माझे डोके दुखत असेल तर एक दिवस विश्रांतीने बरे होते, पण मायग्रेन असेल तर उपचार आवश्यक आहेत.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

अच्छा!

काही कारणाने माझे डोके दुखत असेल तर एक दिवस विश्रांतीने बरे होते, पण मायग्रेन असेल तर उपचार आवश्यक आहेत.

अच्छा! म्हणजे एखाद दिवस "डोकेदुखी" प्रमाणे हा प्रकार असला तर चालू शकेल असे म्हणायचे आहे तर ... :) (ह.घ्या.)

आताच चालेल की

म्हणजे जे घटस्फोटित आहेत (किंवा ज्यांचा विवाह त्या अटळ दिशेने जात आहे) ते करू देत की प्रेम! आम्हाला चालेल.
म्हणजे डोकेदुखीसारखे हो - आवडणार नाही, पण उपचाराची गरज नाही.
(या विषयी तुम्ही जपूनजपूनच बरे का... नाहीतर एखादी तुळई किंवा वासा या सैद्धांतिक चर्चेला प्रात्यक्षिक करतील. आम्हा सडेफटिंग लोकांना बरेच सैद्धांतिक स्वातंत्र्य असते.)

सहमत

आम्हा सडेफटिंग लोकांना बरेच सैद्धांतिक स्वातंत्र्य असते.
सहमत आहे. यावरून एक विनोद आठवला. एका जोडप्याला एक काउन्सेलर विवाहाचे फायदे समजावून सांगत असतो.

काउन्सेलर : यू नो, ऑन ऍव्हरेज मॅरीड मेन लिव्ह टेन ईयर्स मोअर दॅन बॅचलर्स.
नवरा : व्हॉट इफ दे डोंट वाँट टू? :)

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

हा हा!

एखादी तुळई किंवा वासा या सैद्धांतिक चर्चेला प्रात्यक्षिक करतील.

एकदम उपयुक्त सुचवणी आहे..:-)

मी ही

स्त्री पुरुष संबंध हा
विषय चघळायला आवडता असला, आणि चर्चा इंट्रेस्टींग होत असली तरी
विकास रावांप्रमाणेच
मी ही सध्या काठवर बसणेच पसंत करतो.

आपला
गुंडोपंत

हा हा हा!!!

हा हा हा!!!
सही प्रतिसाद (व प्रयत्न!) ;)))

आपला
गुंडोपंत

बालविवाहित

कारण मी माझ्या ऑर्कुट प्रोफाईलवर "विवाहित" असे लिहून आणि एक गोंडस फोटो टाकून देखील गेल्या आठवड्यात फक्त सहा लोकांनी तिकडे चक्कर टाकली, आणि सगळे ओळखीचेच होते.

सदर चर्चेनुसार बायकांना गोंडस बाळांत इंटरेश्ट नसून त्यांच्या बाबांत इंटरेश्ट आहे असे दिसते तेव्हा तुमचा बाल-विवाहिताचा बाण फुकट गेला असावा.

बाय द वे, ते आवर्जून भेट देणारे सहा लोक बाया होत्या की पुरूष? ;-)

ह. घ्या.

झंडू च्यवनप्राश

विवाहित पुरुषांत विशेष असे आकर्षण नसावे. कारण मी माझ्या ऑर्कुट प्रोफाईलवर "विवाहित" असे लिहून आणि एक गोंडस फोटो टाकून देखील गेल्या आठवड्यात फक्त सहा लोकांनी तिकडे चक्कर टाकली, आणि सगळे ओळखीचेच होते.

झंडू च्यवनप्राश खाऊन पहा. त्याच्या जाहीरातीतील युवती बाजुच्या तरूणापेक्षा ज्येष्ठ नागरीकाकडे कौतुकाने बघत मनोमन म्हणायची की "साठ साल का बुढ्ढा या साठ साल का जवान?!" कदाचीत आपल्याला त्याचा उपयोग होईल आणि ऑर्कूटवर सहाच्या ऐवजी साठ युवत्या येतील. :-) आणि हो हे पण लक्षात ठेवा की, (कुठेतरी वाचल्याप्रमाणे ) "age doesn't matter, unless you are cheese!

ह.घ्या. - कारण शेवटी इतकी जुनी जाहीरातीची आठवण सांगणार्‍याचे पण "खेलने कुदने के दिन" मागे पडलेत ;)

विवाहित पुरुषांत काही विशेष आकर्षण असते का? - बिलकुल नाही!

मला तरी बिलकुल नाही...

मला वाटते

१) ते ४ होय पण तीच एकमेव बाब नव्हे
५) नाही. पण तीच एकमेव बाब नव्हे.
प्रकाश घाटपांडे

कदाचीत

मी पाहीलेला नाही की (इतिहास) वाचलेला नाही, पण कदाचीत जोधाला पण अकबर विवाहीत होता म्हणून, अथवा तीने त्याला आपलेसे करण्याअगोदर अनेक विवाह झालेले असल्याने, आवडला असावा.

हा संदर्भ म्हणून ध्यानात घेतला तर नक्कीच आपल्या मूळ प्रश्नाचे उत्तर निर्विवाद पणे "हो" असे द्यावेसे वाटते...:-)

 
^ वर