एका कादंबरीची जन्मकथा
नोबेल् प्राइझ् हे जगांतले सर्वोच्च पारितोषिक समजले जाते. त्याच्या विजेत्याची निवड करण्यासाठी १८ परीक्षकांची निवड समिति असते व ज्या नावावर सर्वांचे एकमत होते त्याला विजयी घोषित केले जाते असे पूर्वी वाचल्याचे आठवते. प्रसिद्ध इंग्रजी कादंबरीकार Irving Wallace यांची The Prize ही प्रदीर्घ कादंबरी या निवडींतील घोटाळ्यांबाबत आहे.
त्याचे असे झाले की Irving Wallace ची नोबेलच्या निवडसमितीवर असलेल्या एका सदस्याशी ओळख झाली. एकदा गप्पांच्या ओघांत तो Wallace ला म्हणाला, "पर्ल् बक् ला मी एवढं नोबेल प्राइझ् मिळवून दिलं पण तिच्या नवर्यानं माझं पुस्तक काही प्रकाशित केलं नाही." (पर्ल् बक् चा नवरा प्रकाशक होता).
Irving Wallace चकित झाला. "नोबेल् प्राइझ् च्या निवडींत देवाण घेवाण?" त्याच्या डोक्यांत किडा वळवळू लागला. त्याने मग शोध घ्यायला सुरवात केली, पारितोषिकाशी संबंधित अनेकांच्या भेटी घेतल्या व त्या माहितीच्या आधारावर The Prize ही सुमारे १००० पृष्ठांची कादंबरी लिहिली. त्याशिवाय ती कशी लिहिली याबद्दल त्याने Writing of a Novel हे २०० पृष्ठांचे पुस्तकही लिहिले. त्यांत The Prize ची वरील पार्श्वभूमी दिली आहे.
कादंबरी अभ्यासपूर्ण व मनाची पकड घेणारी आहे. त्यांतील एक प्रसंग :
साहित्याचे नोबेल पारितोषिक घ्यायला आलेल्या विजेत्याची स्टॉकहोममधील एका पत्रकार तरुणीशी ओळख होते. ती स्थानिक Nudist Club ची मेंबर असते. तिच्या आग्रहाखातर तो क्लबच्या मेळाव्याला जातो. तिथे सभागृहांत प्रवेश करणार्यांना आपले कपडे काढून रिसेप्शनिस्ट् कडे (तीही विवस्त्रच असते) द्यावे लागतात. त्याप्रमाणे तो विजेता व त्याची मैत्रीण आपले कपडे काढून तिच्या ताब्यांत देतात व आंत जातात. तिथे विवस्त्रावस्थेंतील शेकडो स्त्री-पुरुष नि:संकोचपणे वावरत व एकमेकांशी बोलत असतात. कोणाचेही दुसर्याच्या शरीराकडे लक्ष नसते. त्यामुळे त्या साहित्यिकाचा सुरवातीचा संकोच नाहीसा होतो. त्याची मैत्रीण तर त्या वातावरणाला सरावलेलीच असते. थोड्या वेळाने क्लबचा अध्यक्ष प्रवेश करतो. त्याच्याही अंगावर कपडे नसतात. तो आपल्या भाषणांत कपडे घालणे हा कसा मूर्खपणा आहे ते विशद करतो. भाषण इतके तर्कशुद्ध व परिणामकारक आहे की काही क्षण आपणही त्यांतील विचारांबरोबर वहावत जातो.
Comments
आयर्वींग
आयर्वींग
अत्यंत उत्कंठावर्धक पण चावट असे लिहिण्यात एक नंबर लेखक आहे.
मला तरी त्याचे लेखन भयंकर आवडते.
त्याची स्वर्गीय शैय्या (सेलेस्टियल बेड) नावाची कादंबरी मस्त आहे.
कुणा गरजु ला हवी असेल तर माझ्या संग्रही त्याची एक प्रत आहे!
मात्र आता 'द प्राइझ' वाचली पाहिजे असे वाटूनच गेले.
बाकी कुणी 'असा क्लब' सुरु करणार असाल तर सांगा! मी यायला तयार आहे! ;))
आपला
गुंडोपंत
(लेखक "सूक्ष्म लेखन" करत असतील तर प्रतिसाद पण 'सूक्ष्म' द्यायला काय हरकत आहे?)
चावटपना
मंग त्यान्ला कापड घातल्यावं लाजल्यावानी होत असनार!
बाप्या मान्सांम्होर लाजल्या वानी व्हत नाय म्हंता मंग त्येंच्या म्होर व्हतच आसनार!
प्रकाश घाटपांडे
रोचक
रोचक माहितीबद्दल धन्यवाद. वाचनीय पुस्तकांच्या यादीत आणखी एका नावाची भर पडली.
----
गांधीना नोबेल नाकारले गेले होते.
महात्मा गांधींना शांततेचे नोबेल पारितोषिक नाकारले गेले होते याची आठवण झाली.
पण अश्या काही तुरळक घटना घडल्यातरी नोबेल चे महत्वच नाकारणे चूकीचे आहे असे माझे मत आहे.
शरदरवांनी एक चांगला लेख लिहिला आहे. धन्यवाद.
कारण
होय पण त्याचे कारण भ्रष्टाचार हे नव्हते तर इंग्लन्ड नाराज होईल ही राजकीय भीती होती.
पण अश्या काही तुरळक घटना घडल्यातरी नोबेल चे महत्वच नाकारणे चूकीचे आहे असे माझे मत आहे.
सहमत.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
हो
कारण केवळ भ्रष्टाचार आणि लग्गा ह्यांच्याच जीवावर नोबेल दिलं गेलं असतं तर गुरुदेव रविंद्रनाथ ठाकुर ह्यांना ते कधिच मिळालं नसतं.
ना सी वी रमन ह्यांना.कारण ह्यांच्या अश्या प्रकारच्या लॉब्या नव्हत्या.
राहुन राहुन एक आठवण होते.
मार्टीन् ल्युथर किंग ज्यू. ह्याला नोबेल दिलं आणि तो गांधिवादी मार्गानं कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढत होता.
पण खुद्द बापुंना मिळालं नाही.( ब्रिटिश साम्राज्यवादच कारणीभूत असावा. )
जन सामान्यांचे मन