नवा ब्रिटिश कायदा

चमत्कारी बाबा, मांत्रिक, ज्योतिषी आणि इतर मार्गाने भविष्य सांगण्याचा दावा करणार्‍यांचे भाकित जर खरे ठरले नाही तर त्यांना कोर्टात खेचता येणे आता ब्रिटनमध्ये शक्य होईल. लवकरच येणार्‍या नव्या ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींमुळे हे शक्य होईल.

  • ब्रिटनच्या 'स्पिरिच्युयल इंडस्ट्री' मधील मांत्रिक/ज्योतिष्यांचे उत्पन्न प्रतिवर्षी ४०मिलियन पाउंडच्या घरात जाते.
  • नव्या नियमांनुसार भविष्य सांगणारे, ज्योतिषी यांना आपल्या सेवा ह्या "फक्त करमणुकीसाठी" (entertainment only) आहेत आणि "प्रयोगाने सिद्ध झालेल्या नाहीत" (not experimentally proven) असे स्पष्ट करणे बंधनकारक आहे.
  • जर आपल्या व्यवसायाचे "फक्त करमणुकीसाठी" असे स्वरूप आधीच स्पष्ट केले नाही तर ज्योतिष्यांना कोर्टात खेचून तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.
  • भारतातून किंवा इतर देशांतून फिरतीवर येणार्‍या मांत्रिक/ज्योतिष्यांनाही हा कायदा लागू आहे.
  • युरोपियन युनियन मधील देशांमध्ये असा कायदा आधीपासूनच आहे.

अधिक माहिती

१. Soothsayers face the heat in UK - Times of India
२. Consumer net tightens on rogue traders - The Herald
३. Asian Rationalist Society (Britain)

Comments

हाच तो कळीचा मुद्दा

नवीन यांनी जे मुद्दे मांडले आहेत त्याचच भय काही ज्योतिषांना वाटतं. पण भारतात असं भय बाळगण्याचे कारण नाही. कारण या विषयाची धर्माशी सांगड आहे. ज्योतिष हे वेदाच अंग आहे. त्यामुळे लबाड लोक आमच्या धर्म भावना दुखावतात असा कांगावा करु शकतात. साताऱ्यात १९९५ साली झालेल्या अधिवेशनात त्यावेळचे संमेलनाध्यक्ष कृष्णराव वाईकर यांनी ज्योतिषाला धर्मशास्त्राचा अपरिहार्य भाग मानले होते. ज्योतिषाला विरोध करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला वठणीवर आणण्यासाठी त्या आधारे शिवसेना, विहिंप सारख्या संघटनांना हाताशी धरुन 'कुंकवाची उठाठेव` केली होती. ( संदर्भ म.टा अग्रलेख ३१-१०-९५ )
ज्योतिषी म्हणतात कि 'भविष्यावर विश्वास ठेवणे मूर्खपणाचे आहे` असा छापील इशारा कुंडलीवर छापण्यास आमची हरकत नाही. सिगारेटच्या पाकिटावरील इशारा वाचून सिगारेट ओढण्याचे सोडून दिले अशी उदाहरणे किती सापडतात? असा प्र्रतिप्रश्न ते उपस्थित करतात. इथल्या ज्योतिषांना कोर्टात खेचता येणारच नाही.

प्रकाश घाटपांडे

नवी माहिती

नवी माहिती.

चांगले आहे

कुठल्याही (खर्‍या) नाण्याला अपरीहार्यपणे दोन बाजू असतात. त्या अर्थाने असा कायदा काही सरळ "अध्यात्मिक बाबां"साठी विनाकारण त्रासदायक ठरू शकतो असा तसा त्याचा कोणी उपयोग करू शकतो.

पण भारतात येत नसतील इतक्या जाहीराती झी टीव्हीवर आम्ही अमेरिकेत पाहील्या आहेत - त्यात नुसत्याच जाहीराती नाही तर कार्यक्रमाचे प्रायोजक पण पंडीत महाराज, अजमेरी बाब, पीर सय्यद साहीब वगैरे असतात आणि यांचे दूरध्वनी क्रमांक ब्रिटनमधील असतात (असे ही मधे ऐकले की त्यांची कॉल सेंटर्स भारतात आहेत!)

उत्तम कायदा आहे

चांगली माहिती.
उत्तम कायदा आहे.
भारतातही असा व्हायला हरकत नाही.
जर कुणी पैसे घेवून सेवा देत असेल तर त्याची हमी पण सेवा देणार्‍याने घ्यायलाच हवी. या विषयी वाद होण्याचा प्रश्नच मला वाटत नाही.

मात्र नक्की कोणती सेवा कायद्याच्या चौकटीत येणार याची व्याख्या होण्यावर चर्चा व्हावी. म्हणजे 'सेवा काय' हे आधी निश्चित व्हावे.
जसे, अध्यात्मिक भाग यात कसा आणता येईल याची मला कल्पना नाही पण बहुदा त्या भागाला कायदा लावता येणे अवघड वाटते.
म्हनजे कुंडलिनी जागृत कशी होईल याचे मार्गदर्शन मी करेन. पण त्या नंतर ती जागृत होणे न होणे हे सर्वस्वी साधना करणार्‍याच्या हातात नाही का?

याच न्यायाने उद्या ध्यान लावण्याचे प्रकार शिकवले, पण आमचे ध्यान मात्र काही लागले नाही म्हणून तुम्हाला दलाई लामांनाही न्यायालयात खेचता येईल अशी मला आशा आहे.

आणि मेणबत्त्या लावल्या पण येशुचे आशिर्वाद मिळाल्याची पावती दिली नाही म्हणून चर्च चे पाद्री... तसेच दक्षिणा घेवून पुजा केली, पण पुण्य मिळाल्याचे कोणतेच 'दाखले' न मिळाल्याने ब्राह्मणांनाही...

आपला
गुंडोपंत

ऐहिक समस्या

मांत्रिक आणि ज्योतिष्यांकडे जाणारे बहुसंख्य लोक आपल्या भौतिक, ऐहिक समस्या (पैसा, यश, नोकरी, स्वास्थ्य, लग्न/प्रेम, रिलेशनशिप्स इ. अनेक. ) घेऊन जातात. फक्त आध्यात्मिक इच्छेने जाणारे त्यामानाने कमी असावेत.

आध्यात्मिक बाबतीतही 'तुमची कुंडलिनी जागृत होईलच असे नाही' किंवा 'ध्यान लागेलच असे नाही' हे आधी स्पष्ट केले तरी पुरेसे असावे.

जर कुणी पैसे घेवून सेवा देत असेल तर त्याची हमी पण सेवा देणार्‍याने घ्यायलाच हवी.

ज्योतिषी पैसे घेऊनच भाकिते, तोडगे, शांत्या वगैरे सांगतात. त्यांनाही हे लागू होईल.

झी आणि सोनी

भारतातून किंवा इतर देशांतून फिरतीवर येणार्‍या मांत्रिक/ज्योतिष्यांनाही हा कायदा लागू आहे.

झी आणि सोनी टीव्हीच्या प्रेक्षकांनी हा कायदा आणण्यावर जोर दिला असावा अशी शंका आली.

ब्रिटिश आणि पाश्चात्य जगातील पोलीस सायकिक डिटेक्टिव्जचा वापर करतात त्यांनाही असा कायदा लागू होईल काय आणि झाल्यास कायद्याने त्यांचा वापर करण्यावर बंधने लागतील काय ही शंका मनात आली.

तसे पोलीस या लोकांचा वापर कधी मान्य करत नसल्याने कायद्याच्या कचाट्यात सापडणे कठीणच आहे.

ग्राहक संरक्षण कायदा

ज्योतिषी हा सेवादाता आणि जातक हा ग्राहक असे चित्र भारतात तरी नजिकच्या भविष्य काळात येईल असे वाटत नाही. जरी आला तरी हे ग्राहकच ज्योतिषाचे मागचे दार ठोठावुन सेवेची मागणी करतील अशी परिस्थिती भारतात आहे . अमेरिकेत वेगवेगळ्या स्टेट मध्ये या बाबतीत कायदे वेगळे आहेत असे ऐकून आहे. एका ठिकणी ज्योतिषाची प्रॅक्टीस बेकायदेशीर तर शेजारच्या स्टेट मध्ये कायदेशीर . आणी कायद्यातील पळवाटा , परस्पर सामंजस्य असेल तर कायदा काय करणार?
"फलज्योतिषासंबंधाने विचारी माणसांचे कर्तव्य" हा जानेवारी १९२१ सालचा "चित्रमय जगत" च्या अंकात सत्यान्वेषी म्हणतात "ह्या शास्त्राच्या सध्याच्या स्थितीत कोणत्या गोष्टी निश्चयाने सांगता येतात व कोणत्या येत नाहीत हे आकडे वार माहितीने ठरवून ते शोध कमिटीने प्रसिद्ध करावे, आणि व्यक्तिला उपयुक्त अशा काही गोष्टी ज्योतिषास सांगता येतात अशी खात्री होईल तर फलज्योतिषशास्त्रात परिक्षा घेउन लायक माणसास सर्टिफिकेट द्यावे व ढोंगी ज्योतिषांविरुद्ध सरकार कडून एखादा कायदा पास करवुन घ्यावा."
या काळातील चित्रमय जगत च्या अंकातील वाद प्रतिवाद वाचनीय आहेत. आज २००८ साली त्यात फारसा फरक आहे असे मला वाटत नाही.

प्रकाश घाटपांडे

चर्चा

मस्त सुरु आहे.
छान माहिती मिळतिये.

जन सामान्यांचे मन

छान्

चान्गला प्रतिसाद

आपला
गुंडोपंत ;)

जाहिरातींमध्ये काय असते?

विकास आणि प्रियाली, या जाहिरातींचे स्वरुप कसे असते? त्यामध्ये काय काय दावे केलेले असतात?

अशा असतात जाहिराती

भारतात तरी अजुन अशा जाहिराती असतात. हे प्रातिनिधिक आहेत.
classified
Vidhilikhit
Nadi Astrology Add
प्रकाश घाटपांडे

चांगल्या

जाहिराती.
छान्
आपला
गुंडोपंत

जाहिराती

माझ्या घरी नशिबाने झी आणि सोनी टीव्ही नाहीत त्यामुळे शब्दशः देऊ शकत नाही कारण कोणा नातेवाईक, मित्रमैत्रिणींकडे पाहिलेले आहेत पण काहीसे असेच असते की

नोकरी लागत नाही, लग्न जमत नाही, प्रेमात अपयश....इ. इ. सात दिवसांत हमखास उपाय आणि नंबर बरेचदा इंग्लंडचे असतात आणि अशा जाहिरातींची मुक्त रेलचेल असते.

वर घाटपांड्यांनी दिलेल्या जाहिराती मला मवाळ वाटल्या पण इथल्या टीव्हीवर काळी जादू बाबा बंगाली टाईप जाहिरातीही पाहिल्या आहेत.

छान

छान

आपला
गुंडोपंत

'भविष्यावर विश्वास ठेवणे मूर्खपणाचे आहे` असा छापील इशारा कुंडलीव

धन्यवाद श्रीमान् प्रकाशजी.
जरा गुंडोपंताना बोलते करा.
संजीव

 
^ वर