शाकाहार् :- काही नवीन पैलु

मित्रहो,
जीवाची हत्या करणे वाइट,म्हणुन मांसाहार वाइट आणी म्हणुनच तो अयोग्य.शाकाहार तेव्हढा चांगला.
ह्यातील माझं काहीही म्हणणं नाही.
मी मानवी शरीर,प्रकृती ह्यासाठी स्वाभावीक अन्न कुठलं आहे, ते शोधतोय.
मुळात, बहुतांश सर्व सस्तन प्राणी आणी पक्षी ह्यांचे प्रामुख्याने शाकाहारी आणि मांसाहारी असे वर्गीकरण करता येते.
जे प्रामुख्याने वनस्पती खातात, ते शाकाहारी.
जे प्रामुख्याने इतर वनस्पतींशिवाय इतर सजीव(प्राणी,पक्षी )भक्ष्य म्हणुन खातात(स्वजातीतील् सुद्धा) ते मांसाहारी.

माझे काही तर्क, निरिक्षण आणि वाचनातील् काही भागानुसार मानवी शरीरा बद्दल हे विचारः-

१.एकाच प्रवर्गातील किंवा परीवारातील(स्पेसीज् किंवा फ्यामिली) प्राण्यांचा आहार समान/मिळताजुळता/साम्य असलेला असतो.
जसे घोडा आणि झेब्रा हे एकाच प्रवर्गातील प्राणी.
त्यांच्या शरीरात विलक्षण साम्य आहे.म्हणुन त्यांच्या आहारातही साम्य आहे.
दोघेही हिरवळ चरतात,त्यावर् जगु शकतात.
आता डोळ्यासमोर चित्र आणा की मांजर् उंदीर् पकडते आहे.
दुसरे चित्रः- चित्ता किंवा वाघ ससा पकडत आहेत.
काही साम्य दिसलं? दुसर्‍या चित्रात उंदीर(भक्ष्य) मोठा झाला आणि बनला ससा
तसेच भक्षक ही मोठा झाला आणि मनी मावशी चा बनला वाघोबा.
बरोबर? कारण हे दिसत की वाघ/चित्ता आणि मनी माउ हे एकाच म्हणजे मार्जार प्रवर्गातील असल्याने त्यांच्या
आहारात हे साम्य आहे.
अगदि त्याच प्रमाणे माणुस हा "ग्रेटर एप्स" ह्या प्रवर्गात मोडतो.(प्रवर्ग नामातील् चु.भु.द्या.घ्या. बायो लॉजी सोडुन काही युगे उलटली आहेत. )
त्यांतील प्राणी कोण? तर् ओरँग उटांग,चिंपांझी,गोरिला वगैरे.
ह्यांचे मुख्य अन्न ते काय? तर् काही प्रमाणात् झाडपाला आणि उरवरीत फळे, काही प्रमाणात धान्य कण सुद्धा.
ह्यानुसार, मानवाचा आहार् काय हवा?

२.मांसाहारी प्राण्यांची शरीर रचना वैशिष्ट्य म्हणजे अति तीक्ष्ण दात जबड्याच्या समोरील भागात् असतात.(थोडेफार् ड्रॅक्युलासारखेच,भयावह) उदाहरणः- कुत्रा,वाघ,लांडगा.
येथे, अन्न तोडणे हे मुख्य उद्दिष्ट् आहे, चर्वण नव्हे.
याउलट,शाकाहारी प्राण्यांकडे सहसा अशा दातांचा अभाव असतो.
त्यांचे दात असतात प्रामुख्याने "चर्वण" करण्यासाठी.जात्याच्या दोन दगडात जसे धान्य रगडले जाते,
त्याच प्रकारे अन्न हे ह्या प्राण्यांच्या रुंद पृष्ठभाग असणार्‍या दातात "रगडले" जाते.

नेमके असेच दात मानवाला आहेत,ते म्हणजे त्याच्या दाढा.
(जबड्याच्या आकारमानानुसार्, सर्वाधिक भुभागावर् हे दात पसरलेले आहेत.)
ह्यानुसार, मानवाचा आहार् काय हवा?

३.शाकाहारी प्राणी "चावुन" खातो. मांसाहारी प्राणी चावतो कमी,"गिळतो" जास्त.
("अन्न रगडण्याची " पुरेशी व्यवस्था नसल्याने)ह्या चावुन खाण्यादरम्यान, धाकाहारी प्राण्याच्या आहारात पुरेशी "लाळ"
मिसळली जाते.मांसाहारी प्राण्यात ही प्रक्रिया तेव्हढ्या प्रमाणात होत नाही.(जवल् जवळ् नगण्य.)
माणसाच्या लाळेचे अन्नात मिसळण्याशी गुणोत्तर काढले,तर् ते शाकाहारी प्राण्यांच्या अगदी निकट जाते.

४.ऍपेंडिक्स् हे नाव बर्‍याच लोकांनी(जवळपास् आपण सर्वांनीच) ऐकले असावे.
काय असते हे ऍपेंडिक्स?
तो आहे मानवी शरीरातील एक हल्ली वापर होत नसलेला भाग.
तो हिरव्या वनस्पती खाणार्‍या प्राण्यात कार्यरत् असतो.
त्याचे कार्य हेच की:- हरित वनस्पतीतील सेल्युलोज चे पचन करुन त्यातुनही उर्जा मिळवणे.
मानवी शरीरात हा भाग् कार्यरत् नसल्याने हरित भाग उर्जेसाठी वापरता येत् नाही आणि मग विष्ठेतुन बाहेर् टाकला जातो.
पण ह्या अवयवाची उपस्थिती हेच सुचित करते की मानवी शरीर तुर्तास शाकाहारास जवळचे आहे.
शाकाहारच ते प्रमुख्याने नीट पचवु शकते.

५.सहज प्रवृत्ती:-
एका (पाश्चात्त्य)विश्लेषकाचे निरिक्षण आहे ते असे........
तुम्ही एका नुकत्याच थोड्याशा मोठ्या झालेल्या वाघाच्या भुकेल्या बछड्यासमोर किंवा मांजरीच्या पिल्लासमोर एक
सफरचंद ठेवा आणि ठेवा एक छोटेसे जिवंत कोंबडीचे पिल्लु.
नैसर्गिक बुद्धिनुसार्, बछडे त्या पिलाला (भक्ष्य म्हणुन) मारुन खाइल, व सफरचंदाशी खेळत बसेल्.

आता तसेच सफरचंद आणि जिवंत कोंबडीचे पिल्लु एका निरागस , भुकेल्या ,(माणसाच्या)बालकाच्या समोर ठेवा.
बालक ते सफरचंद खाउन टाकेल आणि त्या पिलाशी खेळण्यात मग्न होइल.
बछडे सफरचंद् खायचा विचारही करणार् नाही.
बालक त्या पिलाला मारुन मग खाण्याचा विचारही करणार नाही.

ह्याचे कारण?नैसर्गिक वृत्ती,नैसर्गिक जाणीव किंवा उपजत् ज्ञान म्हणा हवं तर.

मग ह्या सगळ्या गोष्टी बर्‍याचशा हेच सुचवतात की शारिरिक दृष्ट्या मानवाला प्रामुख्याने
शाकाहार हाच सुटेबल् ठरतो.
तूम्हाला काय वाटतं?
वरील निरिक्षण,तर्क् आणि निष्कर्ष योग्य दिशेने जाताहेत, की त्यात कुठे काही विसंगती,तर्क् दोष आहे?

Comments

लेख आवडला..

निष्कर्ष आवडले, पटले.. दातांची रचना वगैरे आधी ऐकले होते, पण बाकीचे मुद्दे नवीन वाटत आहेत.. शेवटचं उदाहरण् देखील पटले.
पण, म्हणून मांसाहार करू नये अशी आग्रही भुमिका पण असू नये.. ज्याची त्याची आवड..
बाय द् वे, चिम्पाझी,गोरीला वगैरे माकडं मीट खातात.. कमी खातात, पण खातात. गुगल वर शोधून् पाहीले.. ९०% आहार शाकाहारी असतो, परंतू शिकारीला बाहेर् पडले तर् ते सुद्धा मीट् खातात्.. आपण फक्त शिकार नाही करत्.. :)

हो...

मांसाहार करू नये अशी आग्रही भुमिका पण असू नये.. ज्याची त्याची आवड..
बाय द् वे, चिम्पाझी,गोरीला वगैरे माकडं मीट खातात.. कमी खातात, पण खातात.

सहमत.

म्हणुनच
"तर् ओरँग उटांग,चिंपांझी,गोरिला वगैरे.
ह्यांचे मुख्य अन्न ते काय? तर् काही प्रमाणात् झाडपाला आणि उरवरीत फळे, काही प्रमाणात धान्य कण सुद्धा."

मुख्य अन्न हा शब्द् काळजी पुर्वक् वापरला आहे.

"आग्रही भुमिका " ठेउन चालणारही नाही. कारण् मानवी लोकसंख्या,आणि त्या लोकसंख्येचा राहण्याच्या परिसरातील
भौगोलिक् परिस्थिती व नैसर्गिक अन्नाची उपलब्धता लक्षात घेता "आग्रही भुमिका" प्रत्यक्षात् आणणे जवळपास अशक्य आहे.
(सध्याच्या जगातील संपुर्ण् लोकसंख्येला केवळ शाकाहारावर् पोट भरणे अशक्य आहे असं मला वाटतय.)
पण स्वतःचा स्वार्थ साधायचा (तब्येत अधिकाधिक् कार्यक्षम ठेवायची ) असल्यास शाकाहारास प्रेफरन्स (प्रथम् पसन्ती) देणच उत्तम असं मला वाटत.
(अर्थात ह्याचा अर्थ मांसाहार म्हणजे अगदी ठार चुक किंवा घोर पाप असं अजिबात म्हणायचं नाहिये.)

जन सामान्यांचे मन

माणूस नावाचा प्राणी

१. सारे कपी शाकाहारी आहेत का?
नसावेत.
२. माणसाच्या डोळ्यांकडे पाहिलेत का? शाकाहारी प्राण्यांचे डोळे बाजूला असतात (इकडे-तिकडे पाहण्यासाठी, भक्ष्य ठरू नये म्हणून) तर मासाहारी प्राण्यांचे समोर (भक्ष्य पकडता यावे म्हणून).

मानव कंदमुळासोबत सुरुवातीपासूनच मांसाहार करीत असे (आठवा, तो 'शिकारी' होता.) शेती व शाकाहारावरचे पूर्ण अवलंबन हा त्या पुढचा टप्पा आहे असे तो मानतो.

त्याच्या मते, शास्त्राच्याच भाषेत बोलायचे झाल्यास, मिश्राहारी* माणसे जगत आहेत नि पुढच्या पिढीलाही मांसाहारी बनवू/राखू शकत आहेत या दोन बाबी माणूस मिश्राहारी नाही हा मुद्दा खोडून काढावयास पुरेसे आहेत. (मिश्राहारी नसेल, तर आता झाला असेल :) )

* पूर्ण मांसाहारी माणसे पाहण्यात नाहीत. (शिल्लक राहिली नसावीत का?)

अस काय् नाय् बुवा....

२. माणसाच्या डोळ्यांकडे पाहिलेत का? शाकाहारी प्राण्यांचे डोळे बाजूला असतात (इकडे-तिकडे पाहण्यासाठी, भक्ष्य ठरू नये म्हणून) तर मासाहारी प्राण्यांचे समोर (भक्ष्य पकडता यावे म्हणून).
लांडग्याचे डोळे बाजुलाच असतात. पण तो कुठे शाकाहारी आहे?
त्यामुळे डोळे हा निकष कसा ठरेल्?

मांजर्-बालक् उअदाहरणाचे काय?
नैसर्गिक बुद्धी काय् सांगते?

काही प्राणी दोन्ही वर्गात मोडणारे असतात.
त्यांना मिश्राहारी म्हणतात.
पण हे प्राणी प्रामुख्याने तिथं पाहायला मिळतात जिथं काही कारणानं त्यांना त्यांचे नैसर्गिक अन्न मिळत नाही.
किंवा दुसरेच अन्न दिले जाते.
ह्यासाठीच मी मांजराचे पिल्लु आणि मानवाचे बालक ह्यांची तुलना दिली आहे.
मी म्हण्तोय की "पर्याय उप्लब्ध असताना,प्राप्त परिस्थितीत मानावाची निवड काय राहील,किंवा काय रहायला हवी , ते पहा."
शाकाहाराला "प्रथम पसंती" किंवा "प्रेफरन्स " असणे इष्ट.

मानवाच्या उत्क्रातीपासूनच तो प्राण्यांच्या शिकारीवर जगत आला आहे.
नाही्ए काही संपुर्ण खरे नाही.
माणुस शिकार करु लागला तो प्रामुख्याने हिम युग येउन गेल्यानंतर म्हणजे फार तर बारा ते पंधरा हजार वर्षे झाली असावीत.
उत्क्रांतीच्या हिशेबाने हा काल्खंड नगण्य आहे.(तो लाखेक वर्षांच्याही पुढे आहे.)
पृथ्वीवर हिम युगात जेव्हा एका एकी अति शीत वातावरण तयार होउन अन्नाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला,
तेव्हा, केवळ नाइलाज म्हणून माणसाने शिकारीस सुरुवात केली.

आजही मानव कच्चे मांस फारश्या प्रमाणात खाउ शकत नाही, हे कशाचे प्रमाण आहे?
याउलट(सर्वच नाही) पण कित्येक शाकाहारी गोष्टी तुम्ही आजही कच्च्या खाउ शकता.

अगदि टोकाची स्थिती गृहित धरुयात.
सम्जा एखाद्याला ज्याला मांसाहार अत्यंत प्रिय आहे,अशा व्यक्तिला देखील जर तुम्ही कित्येक दिवस्-वर्षे
फक्त मांसाहार सेवन करण्याची सक्ती केलीत, तर बघाल की त्याचे शरीर हे सहन करु शकत नाही.
कारण इथे तुमचे 'सुटेबल' नैसर्गिक अन्न कोणते तेच शरीर मागत असते.तुम्ही त्या नैसर्गिक प्रेरणेस अधिक काळ दाबु शकत नाही.

याउलट शाकाहाराची सक्ती करुन एखाद्याला वर्षानुवर्षे ठेवलेतं, तर त्याला फारशी अडचण येणार नाही.

बाकी तुम्ही कच्चे मांस खाउ शकत नाही याचे कारण ती तुमची नैसर्गिक बुद्धी नाही.

"ओरँग उटांग,चिंपांझी,गोरिला वगैरे.(कपी प्रवर्ग)
ह्यांचे मुख्य अन्न ते काय? तर काही प्रमाणात् झाडपाला आणि उरवरीत फळे, काही प्रमाणात धान्य कण सुद्धा."
असं लिहिलयं.
ईतर कुणाच्या फायद्यासाठी नव्हे तर स्वतः च्या तब्येतीस अनुकुल असल्यामुळे शक्य तेव्हा शाकाहाराचा अन्नात समावेश असावा,
असं मला वाटतं.
(वाचा:- डॉ. अभय बंग ह्यांचे "माझा साक्षात्कारी हृदयरोग")
(ज्यांना माहित नाही त्यांच्या साठी:- डॉ अभय बंग हे फिजिशियन,ऍलोपथिक डॉक्टर ह्या अर्थाने "डॉक्टर" आहेत.
सध्या चांदा,भंडारा,मेळघाट वा तत्सम जिल्ह्यांत त्यांचे समाजकार्य(बाबा आमटे ह्यांच्या सारखच) कित्येंकांना प्रेरणा/आदर्श ठरले आहे.)

शिवाय, आयुर्वेदात "आहार-विचार" करताना स्पष्ट पणे उल्लेख आहे तो असा:-
"अन्नातील सर्व निरुप्योगी भाग विष्ठेतुन न जाता काही प्रमाणात शरीरात शिल्लक राहु शकतो.
आयुर्वेदात ह्याला म्हणतात "आम". आम पुढे शारिरिक द्रव्यांसोबत मिसळुन विषारी/घातक सिद्ध होउ शकतो. "

"आमा" ची सर्वाधिक निर्मिती ही प्राणिज अन्नाने होते, हे आयुर्वेदात सांगितले आहे.

जन सामान्यांचे मन

लांडगा/बाळ

लांडग्याचे डोळे बाजुलाच असतात.
कल्पना नाही. पण याचा अर्थ बाजूला डोळे असलेले प्राणी देखील मांसाहारी असू शकतात असा नाही होत?

मांजर-बालक.
बालक (ज्याला सफरचंद खाण्यालायक दात आहेत), ते अनुभवातून (कच्च्या कोंबडीच्या पिलाहून सफरचंद खाणे सोपे हे) शिकले आहे असे समजा.
त्याहूनही लहान बालक अधिक नैसर्गिक आहे असे समजू...
बालका समोर खुळखुळा व न सोललेले केळे ठेवले तर बालक काय तोंडात घेईल? सोललेले केळे ठेवले तर काय फरक पडेल? (पिसासकटच्या कोंबडीप्रमाणेच) पातीचा कांदा व (सफरचंदासारखे) उकडलेले अंडे ठेवले तर काय तोंडात घालेल?

काही प्राणी दोन्ही वर्गात मोडणारे असतात...... ह्यासाठीच मी मांजराचे पिल्लु आणि मानवाचे बालक ह्यांची तुलना दिली आहे.

वरून मांजर मिश्राहारी आहे असे आपण म्हणता असा ग्रह होणे शक्य आहे. ते तसे नसावे. ( पावाच्या तुकड्यांनी व दुधाने मांजर मिश्राहारी होत असेल तर माणूस मांसाहारी आहे असे म्हणण्यास आणखीनच वाव आहे.)

मानवाच्या उत्क्रातीपासूनच तो प्राण्यांच्या शिकारीवर जगत आला आहे.

हे वाक्य त्याच्या प्रतिसादातील नाही.

तेव्हा, केवळ नाइलाज म्हणून माणसाने शिकारीस सुरुवात केली.

हे त्याच्या समजाच्या विपरीत आहे. (प्राण्यांची कातडी पांघरणारा शिकारी आदीमानव त्याच्या डोळ्यासमोर व भाल्याची टोके शास्त्राची प्रगती दर्शवतात अशी काही चित्रे मनावर कोरल्याचा परिणाम असावा.)

बाकी प्रमुख खाद्य शाकाहार आहे इतकेच म्हणणे असेल तर इतक्या सव्यावसव्याची गरज नाही. कुठल्याही घरचा रोजचा मेन्यू देखील पुरेसा आहे.

अवांतरः 'माझा साक्षात्कारी ह्र्दयरोग मध्ये' ,'ओरँग उटांग,चिंपांझी,गोरिला वगैरे.(कपी प्रवर्ग) ह्यांचे मुख्य अन्न ते काय?' याची माहिती असणे जितके विचित्र वाटते, तिततेच त्यात आढळलेला ' स्वतः च्या तब्येतीस अनुकुल असल्यामुळे शक्य तेव्हा शाकाहाराचा अन्नात समावेश असावा, ' हा सल्ला 'मला वाटतं' म्हणणून देण्याचे प्रयोजन कळले नाही.

एक् दुरुस्ती.

ईतर कुणाच्या फायद्यासाठी नव्हे तर स्वतः च्या तब्येतीस अनुकुल असल्यामुळे शक्य तेव्हा शाकाहाराचा अन्नात समावेश असावा,
असं मला वाटतं.
(वाचा:- डॉ. अभय बंग ह्यांचे "माझा साक्षात्कारी हृदयरोग")

एवढेच वाक्य धरावे.
अभय् बंग ह्यांनी तसं म्हटलय.

बाकी, चिंपांझी, कपी वर्ग् वगैरे त्या पुस्तकातील नाही.

मांजर -सफरचंद उदाहरणात दिसते एवढेच(किंवा सांगायचे एवढेच की),
"भक्ष्याची शिकार" करुन मग ते अन्न म्हणुन खाणे मानवी उपजत् प्रवृत्तीत बसत नाही.

जन सामान्यांचे मन

शाकाहार/मांसाहार

आता तसेच सफरचंद आणि जिवंत कोंबडीचे पिल्लु एका निरागस , भुकेल्या ,(माणसाच्या)बालकाच्या समोर ठेवा.
बालक ते सफरचंद खाउन टाकेल आणि त्या पिलाशी खेळण्यात मग्न होइल.
बछडे सफरचंद् खायचा विचारही करणार नाही.
बालक त्या पिलाला मारुन मग खाण्याचा विचारही करणार नाही.

खायच्या गोष्टी कोणत्या हे दुसर्‍याने सांगितल्याशिवाय मुलाला कळणार नाही. त्याला फक्त गोष्टी तोंडात टाकणे, चावणे माहीत असणार. खुळखुळा चावल्यावर भूक भागत नाही हे त्याला अनुभवाने समजेल. पिलू त्याला सापडणार नाही आणि सापडले तर तेही नक्की तोंडात घालायचा प्रयत्न मूल नक्की करेल. वरील प्रयोग तुम्ही करून पाहिला आहे का? केल्यास कदाचित तुमचे मत बदलेल. ज्या घरात मटन शिजते ते लोक मुलाला चांगले शिजलेले हाडे नसलेले मटन नक्की खायला देतील. कच्चे जिवंत पिलू खायचे नसते हे त्याला कालांतर कोणत्या ना कोणत्या मार्गाने समजेलच.

माणसाला उडता येत नाही (पण मेंदू होता म्हणून)विमानाचा शोध लावला आणि पक्ष्यांपेक्षा उंच उडू लागला.
माणसाला कच्चे मटन(/कच्च्या भाज्याही काही अंशी) पचत नसावे पण शिजवल्यामुळे तो ते आता सहज खाऊ शकतो.(आधी तो कच्चे मटन पचवू शकत असावा. पण वणव्या भाजल्या गेलेल्या प्राण्याचे मांस तोडायला आणि चावायला सोपे आहे हे त्याच्या ध्यानात आल्यावर शिजवणे /भाजणे प्रकाराचा शोध लागला)

आपले पूर्वज काय खात होते याबद्दल एक सविस्तर लेख येथे आहे. त्याचा कृपया आस्वाद घ्यावा.

मी आजही पिलाला मारून खाण्याचा विचार करू शकत नाही. तुम्ही माझ्यासमोर एका ताटात सफरचंद ठेवा आणि दुसर्‍या ताटात तंदुरी चिकन ठेवा. मला जे आवडते ते मी खाईन. किंवा दोन्हीही खाईन. चिकन तेथेच खाईन आणि सफरचंद खिशात घालून नेईन. ;-)

अभिजित...

नवीन मांडणी करून विषय

सांगितला आहे, त्यामुळे वाचायला रस वाटला.

चर्चेवरून असे दिसते आहे, की लेखकाच्या मते मनुष्याने "मुख्यत्वे" शाकाहारी असावे. असेच बहुधा दिसते. मांसाहार करणार्‍यांच्या आहारात बहुतांश पदार्थ वनस्पतिजन्यच असतात. (कमीतकमी भारतीय मांसाहारात.) उदाहरणार्थ बिर्याणीत मांसापेक्षा भातच अधिक असतो, वगैरे.

त्यामुळे लेखकाच्या मुद्द्यांना आजच्या मांसाहारातच आधार मिळतो.

(माणसाचा आहार मुख्यत्वे शाकाहारी असावा असे 'मन' यांचा रोख आहे, की पूर्णत्वे शाकाहारी असावा असा रोख आहे? हे नीट समजले नाही. 'मुख्यत्वे' म्हणायचे असेल तर त्यांचे वेगवेगळे मुद्दे त्या मताला पोषक आहेत. 'पूर्णत्वे' म्हणण्यासाठी पुरेसे नाहीत.)

वेगळा प्रयोग : लहानपणी काजूचे कच्चे बोंड आणि कच्चा मासा समोर ठेवला असता तर मी बहुधा कच्चे बोंड खाल्ले नसते. काजूचे कच्चे बोंड खाऊन तोंड भयंकर पोळल्याचा अनुभव मी अजून विसरलेलो नाही. खडू, पेन्सिली, मुंगळे सगळे काही तोंडात टाकायची माझी सवय होती असे घरचे लोक मला सांगतात - त्यामुळे मासा खाल्ला असता असे वाटते.

समारोप...

भाग्यश्री,तो, अभिजीत् राव , धनंजयराव आपणा सगळ्यांचे ह्या लेखाची दखल घेतल्याबद्दल आभार.
यथाशक्ती आपल्या प्रतिसादांना उत्तर् देतोय.(आणि उशीरा दिल्या बद्दल् दिलगीर आहे.)

भाग्यश्री:-
बाय द् वे, चिम्पाझी,गोरीला वगैरे माकडं मीट खातात.. कमी खातात, पण खातात.

हो. ते खातात.मी ही आत्ता तपासलं. पण प्रमाण अल्प.(ते त्यांना इतर काही उपलब्ध नसेल तरच्
"मीट" खातात, असं एका अमेरिकन "शाकाहार प्रसार" संकेत् स्थळावर् दिसलं.त्यात नक्की तथ्यांश किती, ह्याची कल्पना नाही.)
पण जर ते तसं असेल, जास्तित जास्त सुटेबल आहार शाकाहार असावा असं वाटत्यं.
(आणि नसेल, तर वरच विधान तितक्या ठामपणे म्हणता येणार् नाही.)

तो.
बाकी प्रमुख खाद्य शाकाहार आहे इतकेच म्हणणे असेल तर इतक्या सव्यावसव्याची गरज नाही. कुठल्याही घरचा रोजचा मेन्यू देखील पुरेसा आहे.
हा सल्ला खरच छान वाटला.
पु.लं. च्या रावबहादुराने बेळगावची जन्-भाषा कोणती ह्यासाठी समिती नेमायची गरज् काय? असं विचारलं.
रावसाहेब म्हणतात "...दुकानांच्या पाट्या ज्या भाषेत् असतील् ती जन्-भाषा नाही काय् हो?"
आणि हे वाचुन् आपण् स्वतःलाच् एक् टपली मारुन् घेतो.अरेच्चा! इतकं साधं कसं कळलं नाही?
तसच माझं हे वाचुन् झालं.
अगदि साधी सोपी पण् अचुक् कमेंट् आहे ही तुमची. मानलं तुम्हाला.

अभिजीत्, तुम्ही दिलेल्या दुव्या प्रमाणे आपले पुर्वज् काय खात् होते ते पाहिलं.
पण् माझ्या माहिती नुसार्, हे सगळं आहे ते हिम् युग् येउन् गेल्या नंतरच.(फक्त् १०-१२ हजार वर्षे झालित.
उत्क्रांतिच्या मानाने हा काळ नगण्य आहे.) आणि ते सुद्धा आत्यांतिक् थंडी आणि प्रतिकुल् वातावराणामुळे उप्लब्ध् फळे-कंदमुळे मिळत नसल्या मुळे "शिकार्" सुरु झाली असं म्हण्तात.
(पुन्हा तेच, याच्या उलट सिद्धांतही मिळु शकतात.)

धनंजय राव, मला माणसाने "शक्य तितका " मांसाहार टाळा असं म्हणायचय, कारण् ते प्राकृतिक् अन्न नाही.
(पण् एकुण् जगाची लोक् संख्या व उपलब्ध् अन्न साठा पाहता, सर्वांनीच (केवळ)शाकाहारी बनणे हे सध्या तरी अशक्य वाटतय.)

बाकी सगळ्यांना :-
कोंबडीच्या पिलाला न खाणे ही बालकाचे कृती आहे,
पण त्यावरुन व्यक्तिगणिक निष्कर्श बदलताहेत.आणि हे स्वाभाविक् आहे.
एकाच घटनेबद्दल आपले दृष्टिकोन वेगवेगळे असु शकतात, निष्कर्श वेगळे असु शकतात.
आपल्या निष्कर्शाशी सहमत् नसलो, तरी त्याचा आदर मला आहे.

आपली मत, दृष्टिकोन् वाचले.काही पटले.
माझ्या पुरता मी आता समारोप् करतोय.

जन सामान्यांचे मन

साहजिक आहे

"कोंबडीच्या पिलाला न खाणे ही बालकाचे कृती आहे,
पण त्यावरुन व्यक्तिगणिक निष्कर्श बदलताहेत.आणि हे स्वाभाविक् आहे."

साहजिक आहे. पण तार्किकदृष्ट्या ज्या गोष्टी सिद्ध होऊ शकतात त्या व्यक्तिसापेक्ष नसतात. किंबहुना प्रयोगांती त्या सिद्ध झाल्या तर् सर्वांनाच मान्य कराव्या लागतात.

मिश्राहारी माणूस आठवड्यात एखादा दिवस मांसाहार करतो. म्हणजे एकूण १४ पैकी १ किंवा फार तर १४ पैकी २-३ जेवणे मांसाहारी होत असतात. म्हणजे
मिश्राहारी माणसांचाही आहार मुख्यत्वे शाकाहारीच आहे. बंगाल प्रांतामध्ये हे प्रमाण १४ पैकी ७ जेवणे मासाहारी(मांसाहारी नव्हे :-)) असावे.

तुमचा लेख छान होता. फक्त लहान मुलाचे उदाहरण वेगवेगळ्या कसोट्यांवर पडताळून पाहिले असता निष्कर्ष वेगवेगळे निघतात. त्यामुळे ते इथे चपखल बसत नव्हते.

अभिजित...

माणूस मिश्राहारीच आहे

माणसाची रचना नैसर्गिकरित्या "कच्चे" मांस खाण्यायोग्य नाही आहे हे जरी सत्य असले तरी माणसाला "मेंदू" नावाचा अवयव विकसित रूपात दिला आहे. ज्याचा उपयोग करून तो मांसावर प्रक्रिया करून त्याचा आस्वाद घेऊ शकतो त्यामुळे इतर शाकाहारी प्राण्यांसारखी रचना असूनही मांसाहार माणसास वर्ज्य नाहि या मताचा मी आहे!
काहि पटतंय का?
एकदा हे लक्षात घेतले तर प्रस्तुत लेखातील चारही मुद्दे पोकळ ठरतात

(विकसीत मेंदु असलेला प्राण्याच्या कळपातील एक खवैय्या) ऋषिकेश

बापरे! पुढं कायं होणार?

विषयाच सादरीकरण 'झकास' होतं. १० पैकि १० गुण. आवडलं आपल्याला.

माझ्या मनात मात्र एक शंका आहे. सध्या आपण शाकाहारी असू मांसाहारी असू कि मिश्राहारी असू. पण पूढे काय होणार? सध्या जे काही शेतात पिकवले जाते त्यात रसायनांचा सहभाग असतोच. मांसाहार करणार्‍यांनाहि माहीत असेलच कि जे ते खातात त्या औषध-रसायनांचा प्रभाव असतोच. मग खरच चांगलं ते काय? मूल जन्माला येण्यापासूनच औषध-रसायनांचा मारा आपल्या शरिरावर होतोय मग,पूर्ण नैसर्गिक अन्न आज/ उद्या आपल्याला पचेल कां?

हम्म्...

आता एकदा मुद्दे मांडुन आणि त्यावर् माझे व्ह्युज् देउन् आणि इतरांचा दृष्टिकोन एकदा ऐकल्यावर
ह्या चर्चेत अधिक लिहायचं नाही असं ठरवलं होतं.(कारण् कदाचित् त्याने चर्चा तिथच गोलाकार फिरली असती.)
पण आपण एक इंटरेष्टिंग (ह्याला मराठित् काय् म्हणु?) आणि नवीन मुद्दा मांडलाय.

हे अगदी खरं की रसायनांचा भडिमार् होतोय.
सध्या मी जिथं राहतोय,(मिल्टन कीन्स,ब्रिटन) इथं एकुणच शाकाहारी आणी भारतिय खाणं
इतक्या सहजी मिळत् नाही.आणि त्यात् पुन्हा कामाच्या व्यस्ततेनं मला डेस्क वरुन हळणं पण् अजाम् अवघड होतं.
त्या काळात सलग आठवडाभर, मी नैसर्गिक शेतीतुन (ऑर्गॅनिक) पिकलेली फळं ब्यागेत भरुन आणत होतो आणि खात होतो.
एखाद दिवस् जेवण, पुन्हा आठेक दिवस हाच उद्योग.
सध्यातरी मला ह्यातुन तत्काळ काही तोटा, आजार,दुखणं झालेलं नाहिये.
(दीर्घ काळानी उद्भवणारी समस्या सुरु झाली असल्यास कल्पना नाही.(म्हंजे, जी सध्या जाणवत् नाहिये, पण सुरु होउन् गेलिये,
भविष्य कालीन् आपत्ती म्हणुन.))
पण सध्या तरी मी अगदिच तंदुरुस्त आहे.
आपण म्हणता ते परिवर्तन अजुन तरी झालेलं नसावं.(असा आपला माझा अंदाज आहे.)
एखाद्या तज्ञाचं मत् जाणुन घ्यायला नक्की आवडेल.

ता.क.:- मला गवळ्याकडलं(माह्या म्होरं म्हस पिळुन कहाडलेलं) घट्ट् दुध, उकळुन सायी सकट प्यायला लै आवडतय.
पन् माह्या थोरल्यास हेच दुध बिन-पान्याचं पचत न्हाइ.

बहुदा त्याची "ती "अवस्था सुरु झाली असावी.

अवांतरः-
हरित क्रांतिचा जनक, इनॉर्गिक् खतांचा सर्वात् मोठा संशोधक पर्यावरण नॉर्मन बोरलॉग ह्यांना एकदा
"इनोर्गॅनिक खतांचा पर्यावरणावर परिणाम " ह्यावर बोलतं करायचा प्रयत्न एका पत्रकाराने केला असता,
त्यांनी फक्त एक प्रतिप्रश्न केला " पर्यावरण महत्वाचे की माणसाची भूक".
याचं उत्तर् ना त्या ऐकणार्‍याकडे होतं, ना माझ्याकडे आहे.
काहीही म्हणेन, तरी ते चुकच असेल, अशी भीती वाटते.

(तूर्तास शाकाहाराकडे झुकलेले)
जन सामान्यांचे मन

जन सामान्यांचे मन

भंपक पणा.

ता.क.:- मला गवळ्याकडलं(माह्या म्होरं म्हस पिळुन कहाडलेलं) घट्ट् दुध, उकळुन सायी सकट प्यायला लै आवडतय.
पन् माह्या थोरल्यास हेच दुध बिन-पान्याचं पचत न्हाइ

क्रौर्य हे मांसाहारात गृहित धरून शाकाहाराची भलावण करणार्‍यांनी सर्वात आधी दूध पिणे बंद करावे हि नम्र विनंती. गाय/म्हैस दुध 'देते' हे जे शाळेत शिकवलं आहे, ते मुळातच चुकिचे आहे. ती 'देत' नाही. ती ते दूध तिच्या बाळासाठी बनवते अन आपण ते त्या बाळाच्या तोंडून हिसकून 'घेतो'

प्रवर्ग व दातांची रचना:
सर्व माकडे : शेपटी व बिनशेपटीची मिश्राहारी आहेत. जितके मांस/अंडी 'मासाहारी' माणूस खातो, तितक्याच प्रमाणात तिथे प्राणिज अन्नाचा समावेश आहे. त्यांत अंडी, मुंग्या, उधई, पक्शी व मांसही येते.

२.मांसाहारी प्राण्यांची शरीर रचना वैशिष्ट्य म्हणजे अति तीक्ष्ण दात जबड्याच्या समोरील भागात् असतात.(थोडेफार् ड्रॅक्युलासारखेच,भयावह) उदाहरणः- कुत्रा,वाघ,लांडगा.

Gorilla Teeth

ही आहे गोरिलाच्या दातांची रचना.

dog teeth

हे आहेत कुत्र्याचे दात. बघा बरं फरक?

चावून लाळ मिसळणे.
लाळ ही पिष्टमय पदार्थांच्या पाचनासाठी आवश्यक आहे. मांसाहारात प्रोटीन्स आहेत. तिथे रवंथ / अती चावणे आवश्यक नाही.

अपेंडिक्स:

पण ह्या अवयवाची उपस्थिती हेच सुचित करते की मानवी शरीर तुर्तास शाकाहारास जवळचे आहे.
शाकाहारच ते प्रमुख्याने नीट पचवु शकते.

हास्यास्पद विधान.
माणसात अपेंडिक्स् हे 'वेस्टिजिअल' आहे. म्हणजे निरुपयोगी. त्यात कोणतीही पचनक्रिया होऊ शकत नाही. गरज नाही म्हणून वेस्टिजिअल्. उदा. ३री पापणी, शेपूट इ. रवंथ करणारे प्राणी त्यात् सेल्युलोझ् पचवतात. माणूस् त्याच सेल्युलोजचं 'फायबर' बनवतो : शौचास साफ होण्यासाठी.

आवडत नाही म्हणून खात नाही इतकंच् म्हणा. उगा मानवी आहार वगैरे सांगू नका. ते सफरचंद अन् कोंबडीचं पिल्लू इ. फालतू उदाहरण काही कामाचं नाही.

 
^ वर