व्यक्तीला "इच्छा "का होते?

आपल्याला कळत -नकळत बर्‍याच इच्छा होतात.त्यातील कित्येकांची आपण पुर्तिही करतो.
म्हणजे, मला तहान लागली असेल, तर मी पाणी(अथवा द्रव) प्राप्त करुन इच्छातृप्ती करण्याचा प्रयत्न करतो.
तर ही "ईच्छा" म्हणजे नेमके काय?
ईच्छा म्हणजे केवळ "गरज " असते का?
म्हणजे:-
मला भुक लागली आहे."खाणे" ही माझी "गरज" आहे.मग मी खातो पोटभर.
तरीही कुणी मस्त लस्सी,आम रस घेउन जात असेल, तर
ते चाखुन पाहण्याची "ईच्छा" मला होतेच ना!.

म्हणजे ,ईच्छा = गरज. असे नेहमीच म्हणता येणार नाही.
बरं काही गोष्टी "प्राप्त " करण्याची भावना म्हणजे इच्छा असे मानु.
पण मग समजा माझ्याकडे पाणी आहे, आणी एखाद्या मरणासन्न व्यक्तिला ते हवे आहे, आणी मी ते देतो.
मग ह्यातुन मला कुठे काय् "प्राप्त" होतय?
मी पाणी त्याला देतो आणि रस्त्यानी मुकाट चालु लागतो.
म्हणजे "काही गोष्टी "प्राप्त " करण्याची भावना म्हणजे इच्छा " हे तरी कसं पुर्ण म्हणता येइल.

बरं जर् असं म्हटलं की "ईच्छा म्हणजे (नकळत का असेना)वर्तमानात किंवा भविष्यात उपयोग होइल असे
वर्तन करण्याची भावना"थोडक्यात, "शारीरिक किंवा मानसिक आनंद मिळवण्यासाठी वर्तन करण्याची भावना"
असं म्हटलं ,तर् मग माणसं आत्महत्या का करतात?
म्हणजे आत्महत्या करायची त्यांना "ईच्छा" तरी कशी होते.

मला हा लेख लिहिण्याची "ईच्छा " होती. ती का झाली.त्यातुन जर् माझा काहिच आर्थिक,शारिरिक लाभ होणार नसेल,
तर हे लिहिण्याची सहज बुद्धी मला कशी झाली?
ईच्छा म्हणजे मग शेवटी आहे तरी काय?

लेखनविषय: दुवे:

Comments

मेंदू

मेंदू आहे ; त्यात जैवरासायनिक प्रक्रिया होत असतात. काम क्रोध मद मत्सर आनंद दु़:ख वगैरे या भावना म्हणुन जगण आहे. जगण्यातली ही प्रेरणा संपली की जगण थांबल; फार तर तुम्ही जिवंत रहाल. मनुष्य हा जैवरासायनिक यंत्रमानव नव्हे. त्याला बुद्धी व भावना दोन्ही आहेत.
प्रकाश घाटपांडे

इच्छा म्हणजे ज्ञात प्रेरणा

गरज आणि इच्छेचा काहीतरी संबंध आहे. पण तो थेट नाही.

मला श्वासोत्छ्वासाची गरज आहे - पण बहुतेक वेळेला त्याची इच्छा मला जाणवत नाही. श्वास घ्यायची प्रेरणा होतेच, पण ती प्रकट विचारांत नसल्यामुळे तिला मी इच्छा म्हणत नाही.

अधिक सुख अनुभवायची, किंवा दु:ख कमी करण्याची प्रेरणा प्रकट विचारांत येते. त्या इच्छा. त्या प्रेरणेने केलेल्या कामाने सुख मिळेच असे नाही, दु:ख कमी होईलच असे नाही. म्हणजे भविष्यात उपयोग होईल न होईल याचा काही संबंध नाही. प्रेरणा होणे = इच्छा, ती पुरी होवो न होवो. इच्छापूर्तीने सुख मिळत नाही, उलट इच्छेने दु:ख मिळते हे तर गौतम बुद्धाचे एक आर्यसत्य आहे.

आता तुम्हाला भरल्या पोटी लस्सी किंवा आमरस का खावासा वाटतो, ते तुम्हीच सांगा. पोट भरले असणे आणि जिभेला चव असणे यात मला तरी अवश्य-संबंध दिसत नाही. तुम्हाला लेख लिहिण्याची इच्छा का झाली, हेसुद्धा तुमच्याशिवाय कोणालाच सांगता येणार नाही. फारतर मी हा प्रतिसाद का लिहावयास घेतला, ते सांगू शकेन - पण तो तुमचा प्रश्न नाही. तुम्ही प्रश्न विचारला, आणि संवाद साधला, म्हणून मी प्रतिसाद देत आहे.

मरणासन्न माणसाला तुम्ही का पाणी देता हे जर तुम्हाला ठाऊक नसेल तर कोणाला सांगता येणार आहे? मी फारतर असे सांगू शकेन, की मला पाणी द्यायची प्रेरणा का होते. पण तो तुमचा प्रश्न नाही. दुसरी व्यक्ती खूप तळमळत असली, तर मलाही थोडीशी तळमळ जाणवते. त्या व्यक्तील काही दिलासा मिळालेला दिसला, तर मलाही थोडे हायसे वाटते. म्हणून मला त्या व्यक्तीला पाणी द्यायची प्रेरणा होते.

हम्म्म्म्.

इच्छापूर्तीने सुख मिळत नाही, उलट इच्छेने दु:ख मिळते हे तर गौतम बुद्धाचे एक आर्यसत्य आहे.

माझ्या माहिती प्रमाणे बुद्धांचे मत आहे ते असे:-
"ईच्छा पुर्तीने शाश्वत समाधान होत नाही.होणारी तृप्ती क्षणिक असते."(क्षणिक का असेना, पण समाधान मिळते.)

पण मूळ चर्चेत "मी" ऐवजी "एखादी व्यक्ती" वापरले असल्यास,
मी फारतर असे सांगू शकेन, की मला पाणी द्यायची प्रेरणा का होते. पण तो तुमचा प्रश्न नाही.
हे जाणुन घ्यायला आवडेल.

बाकी "इच्छा म्हणजे ज्ञात प्रेरणा" हे पटलं.

श्वास ही आदिम गरज् आहे. श्वास घेण्याची सुप्त इच्छा असतेच.
समजा कुणी आपले नाक एखाद्या मिनिटासाठी जरी दाबुन ठेवले,किंवा आपला चेहरा पाण्यात बुडवला,
तेव्हा श्वास घेण्याची हीच सुप्त् इच्छा मूर्त रूप घेते.जी आपल्याला जाणवते.
(पाण्यात तोंड बुडवल्याने "नवीन" ईच्छा निर्माण होत नाही.)
आणि आपण तिला तगमग होणे असे म्हणतो.
तस्मात्, म्हणायचे एवढेच की, "श्वास् घेण्याची ईच्छा अमूर्त/सुप्त् रुपात असतेच.(कारण ती गरज आहे.)" नाही का?

जन सामान्यांचे मन

इच्छा

इच्छा ही वेळ, काळ, स्थळाप्रमाणे बदलत असते असे वाटते. कधी गरज इच्छा असते. कधी हाव इच्छा असते, वासनाही इच्छा असते, ओढ इच्छा असते. धनंजयांनी म्हटल्याप्रमाणे प्रकटपणे जाणवणारी प्रेरणा ही इच्छा आहेच.

प्रत्येक इच्छेमागे काहीतरी सुप्त किंवा प्रकट कारण असावेच लागते असे वाटते पण ते कारण ज्याला इच्छा होते तोच सांगू शकतो. हा लेख लिहिण्याची इच्छा तुम्हाला का झाली हे तुम्हीच सांगू शकता.

हा प्रतिसाद लिहिण्याची इच्छा मला का झाली त्याची कारणे पुढीलप्रमाणे -

  1. काहीतरी खरडायची गरज, जेणे करून उपक्रमावर मी जिवंत असल्याचा दाखला देणे.
  2. या विषयात मला काहीतरी समजतं आहे हे इतरांना दाखवून देणे ;-) - ह. घ्या
  3. थोडासा मोकळा वेळ मिळाला तो येथे लावावासा वाटला. इ. इ.

आणि बरं का रे मना, तुला वेळ झाला तर ही इच्छा वाच. (याला प्रसिद्धीची हाव म्हणा खुश्शाल ;-) )

पण...

प्रत्येक इच्छेमागे काहीतरी सुप्त किंवा प्रकट कारण असावेच लागते असे वाटते पण ते कारण ज्याला इच्छा होते तोच सांगू शकतो. असे नसावे असे वाटते.
कित्येकदा ईच्छा का होते ते आपल्याला स्वतः लाही सांगता येत् नाही.

अवांतर :--
आपलं बरचसं(बहुदा सर्वच) लिखाण वाचुन झालय.(आणि आवडलही आहे.)
आपल्या विकिपेडिया वरील पुढील लेखनाची(इतिहासाबद्दलच्या) फार दिवसापासुन वाट पाहतोय.

जन सामान्यांचे मन

इच्छा

इच्छे चे मुळ जिज्ञासेत दडलेले असावे. खरे तर डोळे उघडले की याची सुरुवात होत असावी. अध्यात्मात एक शब्द यासाठी वापरला आहे, तो नेटका आता आठवत नाही. पण सर्वच आपल्याजवळ असल्यावर कोणतीच इच्छाच होणार नाही. बहुतेक ती आत्मानंदाची अनुभुती अशी ती अवस्था असावी. इच्छेची प्रेरणा का होते तर अपुर्णता मग ती कोणत्याही विषयाची त्याची पुर्तता करण्याचे प्रयत्न म्हणजे इच्छा असावी असे वाटते.

आता हा प्रतिसाद मला लिहिण्याची इच्छा का झाली- :)

१) वीजभारनियमनामुळे पुढे चार-पाच तास उपक्रमवर काहीही लिहिता येणार नाही. म्हणुन उपक्रमचा रंगमंच आपण हलता ठेवण्याची इच्छा झाली.
२) आम्हीही हुशार आहोत दाखवायचा हा एक प्रयत्न.
३)मराठी संस्थळावर वावरणा-या मित्रांनी प्रा.डॉ. ला विसरु नये म्हणुन काहीतरी खरडावे वाटले.

इच्छा आणि गरज

मूलभूत असतात त्या गरजा, त्यानंतर सुरु होतो तो इच्छांचा प्रांत. अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा आहेत आणि गाडी, बंगला ह्या इच्छा.
शरीर चालू रहाण्यासाठी हृदयाची धडधड चालू रहाणे ही 'गरज' आहे, तुमची 'इच्छा' असो वा नसो - म्हणूनच हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू असे जीवशास्त्रात संबोधतात.

एका बेडरुमच्या निवासातून दोन किंवा अधिक बेडरुम्स च्या निवासात रहायला जाणे ही इच्छा असू शकते कारण त्यात जीवनमान उंचावण्याची एक शक्यता जमेत धरलेली असते. ती गरज असतेच असे नाही. पण कुटुंबातील सदस्य संख्या फारच जास्ती असेल तर गैरसोय दूर करण्यासाठी हीच इच्छा गरजेत बदलू शकते.

सध्याच्या 'खरेदी करत रहा - गरज असो वा नसो' ह्या मास प्रॉडक्शनच्या संकल्पनेत ह्याचाच विवेक हळूहळू नष्ट होत गेलेला दिसतो. आपण घेणार असलेली वस्तू आपल्याला खरेच 'गरजे'ची आहे का? का फक्त शेजार्‍याकडे आहे म्हणून किंवा जाहिरातीत दाखवली आहे म्हणून आपल्याकडे हवी ह्या 'इच्छे'पोटी घेतलेली आहे? (इथे पैसा असणे नसणे हा मुद्दा नाही - कारण बर्‍याच वेळा त्याची गल्लत होते -"आहेत पैसे म्हणूनच तर घेतोय ना? का दुसर्‍याच्या पैशाने घेतलेय?" अर्थात क्रेडिट कार्डाच्या जमान्यात बर्‍याच वस्तू दुसर्‍याच्याच पैशाने आधी येतात हा भाग अलाहिदा! ;)

मग इच्छा का होते? तर योग्य त्या इच्छा नसल्या तर आपल्या जगण्याला व्यवहारात काही उद्दिष्ट रहाणार नाही. पण इच्छा आणि गरज ह्यात फार जास्त अंतर असू नये नाहीतर जगण्याचा तोल हरवतो. उदा. पाय आणि रस्ता ह्यात फार घर्षण असले तर चालता येणे अवघड होते जसे वाळूवर चालणे पण अजिबात घर्षण नसेल तरी पडायला होते, जसे बर्फावरुन चालणे!
आधी इच्छा निर्माण होते कारण जिज्ञासा असते त्यातून गरज निर्माण होऊ शकते आणी मगच शोध लागतात. म्हणजे प्रवास असा - जिज्ञासा --> इच्छा --> गरज --> शोध!

चतुरंग

मला वाटत...

माणसाला भूक लागते,म्हण्जेच खाण्याची ईच्छा होते कारण त्याला तेव्हा अन्नाची गरज असते.
त्यामुळं
आधी इच्छा निर्माण होते कारण जिज्ञासा असते त्यातून गरज निर्माण होऊ शकते आणी मगच शोध लागतात. म्हणजे प्रवास असा - जिज्ञासा --> इच्छा --> गरज --> शोध!

ह्यामधील् "ईच्छा" आणि "गरज" ह्यातील क्रमांची अदला बदल् ही होउ शकते.

अवांतरः-
मोबाइल् आणि एकुणच अत्या धुनिक तंत्रज्ञानाबद्दल माझा क्रम् तुम्ही दाखवल्याच्या अगदि उलट आहे.
म्हणजे

शोध--->गरज --->इच्छा -->जिज्ञासा

म्हणजेच, मला कशाचीच् गरज् वाटत् नसताना शिंची कंपनी नवीनच प्रॉडक्ट बाजारात् आणते,
मग मला त्याची गरज वाटु लागते.(मी वाटुन् घेतो.)मग ते घेण्याची इच्चा होते.
आनी सर्वात शेवटी ती वस्तु मिळाल्यावर्, आपण घेतलय् तरीए काय्,
ह्या जिज्ञासेनी मी तीची माहिती वाचतो.!!

अर्थात् हे थोडफार् सत्य असलं तरी विनोद म्हणुन घ्या,चर्चेशी संबंध नसावा.

जन सामान्यांचे मन

मी सुरुवातीलाच

म्हटल्याप्रमाणे अन्न ही मूलभूत गरज आहे त्यामुळे तिथे इच्छेपेक्षा गरजेला प्राधान्य आहे.
त्यामुळे इच्छा = गरज --> अन्नाचा शोध ह्याच पायर्‍या घेतल्या जातील.

(मोबाईल किंवा आधुनिक उपकरणात सुध्दा समस्येवरचा उपाय शोधण्याच्या इच्छेतून संशोधन झालेले असते. त्यामुळे
जिज्ञासेतून जाणवलेली समस्या --> उपाय शोधण्याची इच्छा --> समस्यापूर्तीची गरज भागवण्याची निकड --> शोध हाच क्रम योग्य वाटतो.)

चतुरंग

कबुल्.

मान्य.

जन सामान्यांचे मन

 
^ वर