प्रशासकांना एक विनंती

मराठी उपक्रमावरील सर्व आकडे ईंग्रजी मधुन का येतात ?

आपण मराठी आकडे लिहु शकत् नाही काय ?

लेखनविषय: दुवे:

Comments

विनंतीला विना अट पाठिंबा

पुष्कर राव,
तसे आपल्या म्हणन्यात तथ्य आहे...
पण "...सर्व आकडे ईंग्रजी मधुन येतात." असे मात्र आपण म्हणु शकत नाहि....
असे लेख लिहिताना ,प्रतिसाद देताना आकडे मराठित येतातच की!
जसे कि :- १ २ ३...वगैरे...त्

आपण बहुधा अश्या आकड्यां बद्दल बोलत आहात जे शिष्टीम जनरेटेड हायेत...
जसे कि "शिष्टीमचा वेळ अथवा प्रतिसाद दिल्याचा वेळ अथवा पान क्रमान्क् अथवा प्रतिसाद क्रमांक"

जन सामान्यांचे मन

होय

होय सिस्टिम् ने निर्माण केलेल्या बद्दलच्

काही दिवस थांबा

चाचण्या घेतो आहे. चालले तर उत्तम! काही दिवस थांबा...

प्रश्नार्थक विनंती?

प्रश्नार्थक विनंती वाचुन मजा आली.
हा लेख टाकण्या आधी थोडी शोधाशोध केली असती तर या बद्दल आधीच चर्चा झाली आहे ती सापडली असती.
येथे वाचा म्हणजे थोडी माहिती होईल.

नीलकांत

सुक्ष्मातील लेख!

हल्लीचे सुक्ष्मातील लेख(!) वाचून कंटाळा येऊ लागला आहे. लेखांची/चर्चा प्रस्तावाची किमान शब्द मर्यादा ८० ते १०० पर्यंत वाढवावी ही विनंती

(म्हटलं विषयाप्रमाणे उपक्रमरावांकडे एक "विनंती" जाऊच देत सगळे प्रश्न नकोत :) )

-ऋषिकेश

तारीख? त्यापेक्षा........................

तारीख मराठीतून् द्यायची म्हणताय?

पण त्या तारखेचे आकडे तेवढे मराठीतुन दिले म्हणजे झाले असे मानता येइल का?
म्हणजे समजा तुम्ही म्हणणार
आजची तारिख ६ एप्रिल २००८, बरोबर?

नाही.....
आम्हाला नाही पटत हे.....
आम्ही सांगु की तारिख आहे "चैत्र शुद्ध १, " म्हंजी "गुढी पाडवा"

कारण "६ एप्रिल २००८" असे लिहीणे म्हंजे सरळ सरळ आंग्ल गोष्टी लिहिल्या सारखे होईल.(म्हणजे ,त्या मराठीत लिहिल्या आहेत,इतकेच्!)

तर,सदर "जन समान्यांचे मन" असे सुचवु इच्छिते की आंग्ल तारिख देण्या ऐवजी मर्‍हाट मोळी तिथी(आणी नक्ष त्र देखील,शक्य असल्यास) दिल्यास उत्तम!
(बाकी राष्ट्रिय सौर पंचांग वापरावे, की शाली वाहन शक किंवा युगाद्ब हे डीटेल्स सम्पादकांवर सोडुयात )

अवांतरः- सध्या माझ्या अत्यन्त स्वस्त अशा नोकिया मोबाईल (फिरता दूरध्वनी??) मध्ये ही सोय आहे.
तो "चीनि उत्पादित " मोबाईल जर ही सेवा देउ शकतो, तर आपणासारखे मराठी भाषिक का नाही?

जन सामान्यांचे मन
जन सामान्यांचे मन

दिनदर्शिका


(बाकी राष्ट्रिय सौर पंचांग वापरावे, की शाली वाहन शक किंवा युगाद्ब हे डीटेल्स सम्पादकांवर सोडुयात )


http://mr.upakram.org/node/651 या ठिकाणी बघा. जरा व्यावहारिकता ही बघावी लागते.
प्रकाश घाटपांडे

सोय?

>सध्या माझ्या अत्यन्त स्वस्त अशा नोकिया मोबाईल (फिरता दूरध्वनी??) मध्ये ही सोय आहे.<
ही सोय की गैरसोय? म्हणजे गुजराथी, बंगाली, पंजाबी आणि उर्दू वगैरे भाषकांना तो मोबाइल आपला वाटणार नाही. लिपीच्या असल्या दुराग्रहांनीच आपण देशांतर्गत भेदभाव वाढवतो आहोत. चिन्यांचा बहुधा हाच उद्देश असावा. म्हणूनच तो मोबाइल स्वस्त असला पाहिजे. --वाचक्‍नवी

होय ! सोय !!

म्हणजे गुजराथी, बंगाली, पंजाबी आणि उर्दू वगैरे भाषकांना तो मोबाइल आपला वाटणार नाही.

म्हणजे मराठी साठी कोणतीही सोय दिल्यास,ती इतर भाषिकांना आपली वाटणार नाही,हे तर ओघानेच आले.
मला वाटते त्यांच्या साठीहि त्यांच्या भाषेत सोयी असाव्यात . नसतील तर त्यांनी त्या मिळाव्यात ह्यासाठी उत्पादकाकडे
पाठपुरावा करावा.( त्यांना सोयी हव्या असल्यास.)

लिपीच्या असल्या दुराग्रहांनीच आपण देशांतर्गत भेदभाव वाढवतो आहोत.

आपल्या भाषेचा आग्रह धरणे/विनंती करणे (तेही त्याच भाषेच्या संकेत स्थळावर)दुराग्रह म्हणवितो की काय?

मग हाच निकष ("उपक्रमा"सकट सर्व)मराठी संकेत स्थळांना लावुन आपण अशी संकेत स्थळे चालविणेही "भाषिक दुराग्रह" आहे असे म्हणाल काय?

आपापल्या भाषा आणि संस्कृती सांभाळणे "भाषावार प्रांत रचना"स्वीकारलेल्या देशात "भाषिक दुराग्रह" ठरु नये.

आपण अंमळ विनोद म्हणून हे लिहिले असल्यास या प्रतिसादावर कृपया संपूर्ण दुर्लक्ष करावे.
विनोदात आम्हीही सामील्! :-) :-)

(आपल्या संपूर्ण प्रतिसादात कुठेही smiley (हास्य चिन्ह / चित्र हास्य ) दिसले नाही,म्हणून हा खटाटोप)
बाकी प्रकाश रावांचा "व्यावहारिकतेचा " मुद्दा संपूर्ण मान्य आहे.
त्यामुळे त्या मागणीला तुर्तास येथेच एक स्वल्प विराम आम्ही देत आहोत.

साठ्यांचे (नाठाळ) कार्टे

देशद्रोही!

वाहनावरील अंकपट्टिका हिंदू अंकांऐवजी मराठी अंक वापरून डकवणारे माझ्यामते देशद्रोही आहेत. तसेच जे संकेतस्थळ फक्त मराठी लोकांनीच वाचावे म्हणून त्यावरील अंक गुप्त लिपीत लिहिणे हाही देशद्रोहच! माझे काही दक्षिणी भारतीय परिचित पुण्यात आल्यावर बसवरील नंबर मराठीत लिहिलेले पाहिल्यावर कपाळावर हात मारतात. म्हणजे आपल्या बसेसमधून त्यांना प्रवास करताच येऊ नये अशी ही व्यवस्था. महाराष्ट्रात पर्यटक इतके कमी का येतात याचे हे एक कारण. मद्रास शहरात बसची वेळापत्रके इंग्रजीत असतात, आणि शहरी वाहतुकीच्याच नव्हे तर एस्टीच्या बसवरील आणि थांब्यावरील लिखाणात आवर्जून हिंदू आकडे असतात. साहजिकच तमिळनाडूत फिरताना बस ओळखण्यास काहीच अडचण येत नाही.
मराठीचा नको इतका आणि नको त्या बाबतीत आग्रह म्हणजे संकुचित मनोवृत्ती.--वाचक्‍नवी

बस क्र. | संकुचितपणाची वर्गवारी

मुंबईतील बेस्ट बसेस वर मराठी आणि इंग्रजी (वाचक्नवींच्या मते हिंदू-अरेबिक आणि ते बरोबर आहे असे मला वाटते पण 'सोयीसाठी' त्यांना इंग्रजी आकडेच म्हटलेले बरे) असे दोन्ही आकडे असतात.

अवांतर -

>> वाहनावरील अंकपट्टिका हिंदू अंकांऐवजी मराठी अंक वापरून डकवणारे माझ्यामते देशद्रोही आहेत.

या न्यायाने इतर भारतीयांनी महाराष्ट्रात येऊ नये म्हणणारे (म्हणोत बापुडे, बोलण्याशिवाय ते काहीच करू शकत नाहीत.) त्यांना मारहाण करणारे देशद्रोही ठरतील. "तुमच्या संकुचितपणापेक्षा आमचा संकुचितपणा मोठा" (तुमच्या डबक्यापेक्षा आमचे डबके मोठे) याला काय अर्थ आहे?

हास्यास्पद पण गंभीर आरोप....

तसेच जे संकेतस्थळ फक्त मराठी लोकांनीच वाचावे म्हणून त्यावरील अंक गुप्त लिपीत लिहिणे हाही देशद्रोहच!

१.मराठी लिपित लिहिणे म्हणजे गुप्त लिपीत लिहिणे आहे काय?
२.मग ईथे मराठी देखील सर्वांना समजावी म्हणून "रोमन लिपीत" लिहिणार काय?म्हणजे "mee mhanato aahe ki.."
वगैरे.

३."देश द्रोह " म्हणताना थोडा विचार केला असता तर बरे झाले असते.
मराठी संकेत स्थळावर मराठी आकड्यांच्या मागणीला "देश द्रोह" म्हणणे हास्यास्पद/बालिश नव्हे काय?
(तुम्हाला हवे तर तुम्ही त्याला "चूक्" म्हणू शकता,"देश द्रोह " नाही.)

"देश द्रोह" कोणत्या कलमाखाली ते ही सांगा, म्हणजे,"मराठी अंक लिहिण्याची मागणी केल्या बद्दल मनोबांना अटक" अशी बातमी यायला मो़कळी.
आणि तसा संदर्भ देता येत नसल्यास बिन बुडाचे पण गंभीर आरोप कृपया करु नयेत .

४."१ २ ३.." ही मराठी लिपी आहे असे शिकविणारे महाराष्ट्र शासन देश द्रोही असा सरळ अर्थ ह्यातून ध्वनित होतो.
आणि प्रत्यक्षात सार्व भौम राज्य शासनाला असे म्हणणे हाच "देश द्रोह" ठरणार नाही काय?

(निदान बाल वाडीच्या मराठीचे तरी ज्ञान असलेला) मनोबा!

रोमन मराठी

माझ्याकडे असे अनेकानेक रोमन मराठी संकेतस्थळांचे पत्ते आहेत. ती संकेतस्थळेसुद्धा वाचनीय आहेत. महाराष्ट्र टाइम्सवरील सर्व प्रतिक्रिया रोमन मराठीतच असतात. भारतातील सर्वच भाषांनी एकच लिपी वापरली तर ते सर्वांनाच फायद्याचे आहे. गोव्यात कोंकणी रोमन लिपीत लिहिली जाते, आणि ती वर्तमानपत्रे वाचताना काही खटकत नाही. चीनने पंडित नेहरूंना देवनागरी शिकवणारे काही शिक्षक द्या अशी विनंती केली होती. नेहरूंनी ती धुडकावली आणि सांगितले की "आम्हीच देवनागरीचा त्याग करून रोमन लिपी घेणार आहोत, तुम्हीपण तसेच करा." नेहरूंनी ऐकले असते तर आज आपले चीनशी संबंध अधिकच घट्ट झाले असते. तत्त्वत: कुठलीही भाषा वाचकांच्या सोयीसाठी कुठल्याही लिपीत लिहिता येते, पाठाचे(टेक्स्ट)फारसे नुकसान न करता.
श्री. म.ना. गोगटे हे , माझ्या माहितीप्रमाणे, गेली चाळीस वर्षे रोमन मराठीचा प्रसार करीत आहेत. त्यांचे संकेतस्थळ
www.mngogate.com येथे आहे. त्याला जरूर भेट द्यावी.--वाचक्‍नवी

या असंबद्धतेतून वाचवा!

मी आता याहून अधिक थोपवुन नाही धरु शकत विषयांतराला.
गोव्यात कोंकणी रोमन लिपीत लिहिली जाते, आणि ती वर्तमानपत्रे वाचताना काही खटकत नाही.

तर हे घ्या........
महाराष्तट्रात मराठी देव नागरी लिपीत लिहिली जाते. आणि साहेब, बरं का ,ती वाचताना सुद्धा कोणाला काही खटकत नाही. !!!
:-) ;-)

महाराष्ट्र टाइम्सवरील सर्व प्रतिक्रिया रोमन मराठीतच असतात.
काही लोकांचा नाइलाज आणि उरलेल्या काहिंचा आळस हा आपण नियम बनवु पहात आहात काय?
(त्या प्रतिक्रिया जर तुम्ही हातात लेखणी घेउन मराठीत लिहियला सांगितल्या तर कोणीतरि रोमन लिपीत ती लिहील का?
कुणीहि नाही. )
असं काय करता गड्या, आवरा ना जरा तरी.

माझ्याकडे असे अनेकानेक रोमन मराठी संकेतस्थळांचे पत्ते आहेत
माझ्या अल्प मती नुसार हे संकेत स्थळ त्या "अनेकानेक" स्थळांमध्ये येत नाही.
आपणास आठवण करुन द्याविशी वाटते की
इथे रोमन लिपी लिहिणे चालत नाही.(१०% पेक्षा अधिक)

आणि चर्चा चालु आहे ती "ह्या" संकेत स्थळाबद्दल."त्या" स्थळांबद्दल कोणी काहीच बोलत नसताना अचानक असे
काही(च्या काही) कसे सुचले ह्याचेच आश्चर्य वाटते.

त्यामुळे

"केवळ रोमन लिपितील भारतीय भाषाच योग्य,आणि त्याशिवाय जो काही मार्ग सुचविण्यात येइल तो देश द्रोह..."
ह्याला हेकटपणा म्हणू नये काय?
एखाद्या (परकीय ) लिपीबद्दल एवढा दुराग्रह कशासाठी ?!
असा दुसर्‍यांच्या मताचा अनादर बरा नव्हे हो.
स्वत: कडील मोठ्या माहितिच्या साठ्याने तोल सांभाळणे एवढे कठीण बनते काय?
(आपणाकडे अफाट माहिती असेल,पण ती या संवादात सुसंगत आहे का,याचा विचार आधी केला तर बरे.)

बाकी कुठल्याही गोष्टीला तर्काने उत्तर न देता ,एक तर देशद्रोहासारखे बिनबुडाचे,बेताल आरोप करणे नाही तर संपुर्ण विषयच तिसरिकडे नेणे चालु आहे असं दिसतय ह्या प्रतिसादांवरून.

भारतातील सर्वच भाषांनी एकच लिपी वापरली तर ते सर्वांनाच फायद्याचे आहे.

का हो भाउ राव,मग ही "एकच लिपी" देवनागरी असण्यास काय हरकत आहे?
रोमन साठीच एवढा अनाठायी दुराग्रह का?
(ह्याबद्दलचा प्रश्न आणि परिणामी त्याचे हे उत्तर
मूळ विषयाशी असंबद्ध आहे,पण त्यास आमचा नाइलाज आहे, क्षमस्व.)

चीनने पंडित नेहरूंना देवनागरी शिकवणारे काही शिक्षक द्या अशी विनंती केली होती. नेहरूंनी ती धुडकावली आणि सांगितले की "आम्हीच देवनागरीचा त्याग करून रोमन लिपी घेणार आहोत, तुम्हीपण तसेच करा." नेहरूंनी ऐकले असते तर आज आपले चीनशी संबंध अधिकच घट्ट झाले असते.
विसंगतीची परीसीमा. नो कमेंट्स. या विसंगतीपुढे आम्ही गुडघे टेकले.
"जन सामांन्यांचे उपजत साधारण तर्क शास्त्र सम्पूर्ण पराभुत"!

बाकी आपल्या पुढील आक्षेपांना यथासांग उत्तर दिलेच आहे,पण त्यावर आपला यत् किंचितही अभिप्राय नाही.(सखेद आश्चर्य!)
१.म्हणजे गुजराथी, बंगाली, पंजाबी आणि उर्दू वगैरे भाषकांना तो मोबाइल आपला वाटणार नाही.
२.लिपीच्या असल्या दुराग्रहांनीच आपण देशांतर्गत भेदभाव वाढवतो आहोत.
३.तसेच जे संकेतस्थळ फक्त मराठी लोकांनीच वाचावे म्हणून त्यावरील अंक गुप्त लिपीत लिहिणे हाही देशद्रोहच!
४."..वाहनावरील अंकपट्टिका..
५.मराठी आकडे आणि हिंदू आकडे यात संघर्ष झालाच(व्हायचे कारण नाही, ) तर हिंदू आकडे प्रमाण मानावेत , असा मथितार्थ.

(ह्यातील आपल्या दर वाक्या मागे सविस्तर उत्तर देण्याचे कष्ट घेतले आहेत.,आपण मात्र वाचण्याचे देखील कष्ट घेतले नाहीत.)

सर्वात हास्यास्पद गोष्ट हीच की आम्ही तपशीलवार दिलेले प्रतिसाद अजिबात न बघता बेधडक फैरि सुरु केल्यात आरोपांच्या.
(आपण कोणत्याही प्रतिसादातील् मुद्द्याला आतापर्यंत एकही उत्तर दिले नाही.आणि ते देण्याची आपणात बौद्धिक
क्षमता आहे असे दिसते,आपल्या माहिती च्या भंडारावरुन,त्यामुळे बौद्धिक क्षमतेवर शंका घेणे अनुचित वाटते. )
बघा जमतय आणि पटतयं नसेल पटत तर का नाही पटत ते जरा सांगितलत तर बरं होईल.

(खेदाने)चकित झालेले
आणि शुद्धीत प्रतिसाद देणारे
जन सामान्यांचे मन.

माझे रोमन टंकलेखन

आत्ता या क्षणी मी जे टंकलेखन करीत आहे ते रोमन लिपीत करीत आहे. माझा संगणक त्याचे देवनागरी रूपांतर करीत असला हे टंकलेखन रोमनच आहे. माझ्याकडे देवनागरी कळफलक नाही, श्री .मन यांच्याकडे कदाचित असेल.

"केवळ रोमन लिपितील भारतीय भाषाच योग्य,आणि त्याशिवाय जो काही मार्ग सुचविण्यात येइल तो देश द्रोह..."
ह्याला हेकटपणा म्हणू नये काय?

असे मी कुठेही लिहिलेले नाही. मी एवढेच लिहिले की कोणतीही भाषा तत्त्वत: कोणत्याही लिपीत लिहिता येते. आज संस्कृतचे शेकडो ग्रंथ जालावर आहेत, त्यातील बहुसंख्य रोमन लिपीत आहेत. म्हणूनच ते जगभर सहज वाचले जातात. आपल्या लिपीचा अभिमान करताना दुसर्‍या लिपीचा द्वेष करू नये. देवनागरी लिपी अतिशय चांगली असली तरी तिच्यात इतर भाषांचे सर्व उच्चार नीट लिहिता येत नाहीत. अर्थात असे सर्वच लिप्यांचे आहे. रोमन लिपीतसुद्धा मराठी भाषा, जास्तीच्या खुणा वापरल्याखेरीज लिहिता येत नाही . असे असले तरी, रोमन लिपी ही जगात सर्वात जास्त वापरली जाणारी लिपी आहे, ती तिच्यात काही खास गुण असल्याखेरीज नाही. ती निदान काही बाबतीत तरी देवनागरीपेक्षा सरस आहे हे कबूल करायला लाज का वाटावी?
ज्यांना मराठी आकडेच हवे आहेत त्यांनी ते घड्याळ्यांवर, गणकय़ंत्रांवर, रेल्वेच्या आणि इतर इन्डिकेटरांवर, थर्मोंमीटर आणि इतर मोजणी यंत्रांवर का नाहीत याचा विचार करावा, आणि मगच स्वस्तातल्या चिनी मोबाइलवर आल्याचा हर्ष करावा.
"केवळ रोमन लिपितील भारतीय भाषाच योग्य,आणि त्याशिवाय जो काही मार्ग सुचविण्यात येइल तो देश द्रोह..."
ह्याला हेकटपणा म्हणू नये काय?--

एकच लिपी देवनागरी असायला कुणाची हरकत नाही, रोमनलिपीचा आग्रह मी अजिबात धरलेला नाही; उलट नेहरूंनी हा प्रयत्‍न हाणून पाडला याबद्दल त्यांच्यावर उघड‍उघड टीकाच केली आहे. इथे मी फक्त मराठी आकडे तांत्रिक क्षेत्रात वापरायला विरोध केला आहे. (रोमन आकडे जरी कधीकधी घड्याळ्यांवर असले तरी त्यांचा सार्वत्रिक वापर केव्हाच बंद पडला आहे.) प्रस्तुत प्रश्न मराठी अंकांचा आहे, ते सरकारी कामात वापरायला कायद्याने बंदी आहे. आणि जे कायदा मोडतात आणि वर त्याचे समर्थन करतात त्यांना मी देशद्रोहीच म्हणणार!--वाचक्‍नवी

मन उधान वार्‍याचे....

काय मन राव,

जरा आवरा की. ;-)

नीलकांत

हे आकडे इंग्रजी?

उपक्रमावर तारीख आणि वेळ दाखवणारे जे आकडे आहेत ते इंग्रजी नाहीत, ते आहेत हिंदू आकडे. ते अरबस्तानमार्गे युरोपात पोचले आणि आंतराराष्ट्रीय झाले. त्यांना इंग्रजी अंक म्हणू नये. इंग्रजी अंक म्हणजे रोमन आकडे. हे अजूनही कधीकधी घड्याळावर दिसतात, आणि हिंदू आकड्यांनी जे दाखवले तर गोंधळ उडू शकेल त्या ठिकाणी , विशेषत: ग्रंथाचे खंड, पर्व, प्रकरण, अध्याय वगैरे दाखवण्यासाठी उपयोगी पडतात. हे रोमन आकडे यादीतील अनुक्रमाने येणार्‍या विधानांमधील उपविधाने दाखवायला कधीकधी उपयोगी पडतात.
भारत सरकारच्या कायद्याप्रमाणे हिंदू आकड्यांखेरीज दुसरे कुठलेही आकडे, खास कारण असल्याखेरीज वापरता येत नाहीत. वरदा प्रकाशनाच्या सर्व संस्कृत-मराठी पुस्तकांत, तसे सरकारी-बिनसरकारी गणित आणि इतर शास्त्रांच्या पुस्तकांत हेच आकडे असतात.
माझ्या मते ललित लेखन सोडून कुठेही तथाकथित मराठी आकडे वापरू नयेत. काही झाले तरी हिंदू संस्कृती मराठीपेक्षा अधिक पुरस्करणीय आहे. --वाचक्‍नवी

आकडे.

भारतीय संविधानात कलम ३४३ मधे भारताची आधिकारीक(ऑफीशीयल) भाषा देवनागरी लिपीतील हिंदी सोबतच इंग्रजीला मान आहे.

अंका बाबत मात्र भारतीय अंकांचे आंतरराष्ट्रीय चिन्हे मानण्याचे ठरलेले आहे. म्हणजे ज्यांना 'मन' साहेब इंग्रजी म्हणतात आणि 'वाचक्नवी' हिंदू.

नीलकांत

काय म्हणता?

"भारतीय संविधानात कलम ३४३ "

येकदम आफिशियल रेफरांस दिलात की राव.
आक्षी झकास !(आन फुल्ल टू कबूल सुद्धा!)

"हिंदू संस्कृती मराठीपेक्षा अधिक पुरस्करणीय ".....
म्हंजी नक्की काय वो,वाचक्नवी' सायेब..?
("हिंदु संस्कृती" म्हंजी काय यावर उप्क्रमी बांधव कैक चर्चा करु शकत्यात.आनि ह्ये "संस्कृती" मधी
कमी अधिक "पुरस्करणीय"ता शिंची ठरीवतात तरि कशी वो?

आनि हाव...येक र्‍हायलच....
मराठी संस्कृती हिंदु संस्कृतीचा हिस्स न्हाइ असं म्हंताय का आपन?
का मंग मर्‍हाटी संस्कृती सांभाळली तर त्यी हिंदु का काय म्हंत्यात त्यी संस्कृती बुडनार हाये?)

आपलाच
मनोबा.

हिंदू संस्कृती

संस्कृती म्हणजे जे संस्कार आपल्याला परंपरेने मिळतात त्यांनी बनलेली वागणूक. मराठी संस्कृती हा हिंदू संस्कृतीचा एक भाग आहे ही गोष्ट खरी. पण जर यदाकदाचित मराठी संस्कृती आणि हिंदू संस्कृती पाळण्यात काही विरोध भासला तर अशा वेळी हिंदू संस्कृतीप्रमाणे जे योग्य असेल त्याचा पुरस्कार करावा. या हिंदू संस्कृतीचा उपासनापंथाशी काही संबंध नाही. हिंदुइझम हा रिलिजन(उपासनापंथ) नाही असे सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालात म्हटले आहे. या ठिकाणी, मराठी आकडे आणि हिंदू आकडे यात संघर्ष झालाच(व्हायचे कारण नाही, ) तर हिंदू आकडे प्रमाण मानावेत , असा मथितार्थ.
या आकड्यांना भले भारतीय संविधानात आंतराराष्ट्रीय आकडे म्हटले असले, तरी जगात सर्वत्र हे अंक हिंदू-अरेबिक न्यूमरल्स म्हणून ओळखले जातात. --वाचक्‍नवी

ह ह पु वा

आवो मालक ,

आमी काय म्हनायलो आन तुमि कशाचे सांगायले...
कायचा कशाला बि पत्त्या न्हाइ.
आमि ह्या मराठी साइट बद्दल म्हनायलो आन तुमि मंजी आक्षी रस्त्याच्या ट्रफ्फिकवरच उखडलात कि राव!! :- )

"..वाहनावरील अंकपट्टिका.. हे फारच विषयांतर होतय असं नाही वाटत?
आपले म्हणणे समजा जरी योग्य असेल,तर ते या चर्चेत कसे येइल?

वाहनावरील अंकपट्टिका कोणत्या लिपीत हवी आणि कोणत्या लिपीत नको.ह्यावर आम्हाला अजिबात बोलायचे नाही.
खुशाल ठेवा सगळ्यांना सोयीचि पडेल अशी.

पण मी पुन्हा ठासून सांगतो.
होय .आहे आमची मागणी मराठी लिपीची.
मराठी संकेत स्थळ ,मराठी लिपि.
कोणी काही म्हणो ,आम्ही मागणी करणारच.(व्यवहार्यतेचा मुद्दा गृहित धरण्यास अजिबात हरकत नाही.)

मराठी आकडे आणि हिंदू आकडे यात संघर्ष झालाच(व्हायचे कारण नाही, ) तर हिंदू आकडे प्रमाण मानावेत , असा मथितार्थ.

हे स्थळ "हिंदु" आहे की "मराठी"?
स्थळाच्या वर्णनात कुठेही "हिंदु" शब्द येत नाही.

फक्त काही स्वाभाविक प्रश्नांची ओघानेच येतात ते असे
१.आपल्या मराठी (काल निर्णय,महालक्ष्मी वगैरे..)दिन दर्शिकेत आपल्याला कुठ्ले आकडे दिसतात?
२.मराठी वर्तमान पत्रातील पानक्रमांक म्हणून कोणते आकडे दिसतात?
३.आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पुस्तकांबद्दल काय म्हणायचे आहे?
(बाल वाडि आणि प्राथमिक शिक्षण ह्यामध्ये मराठी आकडे म्हणजे "१ २ ३.." असेच शिकवितात.
"1 2 3.."
असे नाही.
संदर्भः- इयत्ता बाल वाडी ते चौथी पर्यंतची मराठी माध्यमाची अधिकृत,क्रमिक पुस्तके.

आपणास् ह्यावर गंभीर आक्षेप असेल तर महाराष्ट्र शासन थेट चुकिचे असा निष्कर्ष निघेल्.

ह्या संकेत स्थळावर मराठीचा आग्रह धरणे आणि त्या पाट्यांवर मराठी आकडे ठेवणे यात काहितरि
साम्य असल्याचे दाखवल्याने सर्वांचिच विनाकारण दिशा भूल होते आहे.

(आणि हो,संकेत स्थळावर मराठी लिपि चालते,तर मराठी आकड्यास बन्दी घालणार काय?)
मग मराठीही टंकीत करताना "ram mhanaalaa ki...." असेच "आंतर राष्ट्रिय" टंकीत करणार काय(ईतरांना त्रास होउ नये म्हणून)?

उदार मत वादही टोकाचा करणे योग्य नव्हे.

आपला नम्र,
("lay man's logic"वापरणारा, मराठी माध्यमात शिकलेला,मर्‍हाटमोळा)मनोबा!

बस क्रमांक

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
मागे एकदा मी बंगलोरला गेलो होतो. हॉटेलात उतरलो. मला एका इंजीनियरिंग कॉलेजात जायचे होते.हॉटेलवर चौकशी करून बस मार्गाची माहिती घेतली. बस क्र.४७ तिथे जाते असे समजले. बसस्टॉप वर गेलो.येणार्‍या प्रत्येक बसवरची अक्षरे आणि क्रमांक कन्नड मधे असल्याने मला अगम्य होते. फार अडचण आली. क्रमांक जर आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त अंकांत( जे कांहीजणांना इंग्रजी आहेत असे वाटते) असता तर अडचण आली नसती.स्वभाषेचा आग्रह अवश्य असावा, पण दुराग्रह नको.आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त अंकच वापरावे. गमभन वर १,२, ३,४.....असे अंक येतात तेही योग्य नव्हे.

असे तमिळनाडूत होत नाही.

कन्नड भाषक आपल्या मराठी लोकांसारखेच भाषेच्या लिपीचा वृथा अभिमान बाळगणारे. पण तमिळनाडून फिरताना असे होत नाही. एस्टी बसवरदेखील तमिळमध्ये लिहिलेल्या ग्रामनामाबरोबरच हिंदू अंकात मार्ग-क्रमांक लिहिलेला असतो त्यामुळे कुणाही दुभाष्याच्या मदतीशिवाय त्या राज्यात सुखेनैव प्रवास करता येतो, असा माझा जुना अनुभव आहे.--वाचक्‍नवी

हिन्दु आणि मराठी

हा वादच मुळातुन चूक आहे.

हिन्दू लोक / भारतीय लोक हे विविध भाषा, विविध परम्परा, विविध पंथ, विविध धर्म . . .

जगातील सर्व गोष्टिंचा आदर करतात

म्हणुनच ज्यु, पारशी लोक भारतात सन्मानने जगतात.

काही ज्यु लोकांची तर मातृभाशा पण मराठी आहे . . .

आपण कधीगी कुणलाही तुच्छ् लेखत नाही . . . . .

सार्वजनीक वाहतुकी बद्दल आपण जी चर्चा केली ती ठीकच आहे. . . .

पण येथे गुजरथी आणि बंगली लोक येणार नाही आहेत . . .

त्य़ामुळे मी "मना" सोबत आहे . . .

जसे बरेच जण मनोगत, उपक्रम येथे येउन शुद्ध मराठी बोलणे शिकली आहेत (माझी व्य्रवहारातील भाषा मनोगत ने बदलली आहे) . .

त्याच प्रमाणे मराठी तिथी / राष्ट्रीय सौर दिनांक व्यवहारात आले तर कुठे बिघडले . . . .

- (५ ओळी चर्चा प्रवर्तक) पुष्कर

वाट पहातो

साधा प्रश्न आहे .. आपण किती वेळेस बंगाली किवा तेलुगु संकेतस्थळास भेट दिली आहे ..? १-२-५... त्याच प्रमाणे ह्या संकेतस्थळावर येणारे अमराठी खूप थोडे असतील १% पेक्षा कमी.. मग ...

वाचान्कावीचे म्हणणे असे आहे काय कि दोन मराठी व्यक्तीने बोलताना इंग्रजीतून बोलावे म्हणजे इतरांना समजेल .. ?

 
^ वर