तर्कक्रीडा :६३: अहो आश्चर्यम्

अहो आश्चर्यम्‌
"सुकन्या विद्यालय " ही मराठी प्रशाला.येथे वर्गपटावरील नांवे वर्णानुक्रमे आहेत. नववीतील चकिता लिमये,आश्वर्या लेले, आणि विस्मया लोंढे यांचे पटक्रमांक लागोपाठच्या तीन संख्या आहेत.
आश्चर्या तोंडी बेरजा करण्यात पटाईत आहे.दोन संख्या कानीं पडल्या ,की मनोमनी त्यांची बेरीज करणे, हा तिचा छंद.एकदा या वर्गात बाई हजेरी घेत होत्या...(अवांतर: आमच्या कॉलेजमधल्या एक बाई " नाऊ,बॉईज अयॅण्ड गर्ल्स, गिव्ह युवर प्रेझेंटी"असे म्हणून हजेरी घेत असत!!..हजर= प्रेझेंट म्ह.हजेरी= प्रेझेंटी असे लॉजिक आहे.) तर बाई पटक्रमांक पुकारू लागल्या, तशी आश्चर्या मनात बेरीज करू लागली...१ अधिक २ तीन, अधिक ३ सहा, अधिक ४ दहा....अशी चकिताच्या क्रमांकापर्यंत बेरीज करून तिने ती वहीत मांडून ठेवली. तिचा क्रमांक पुकारल्यावर ’उपस्थित बाई ’ असे म्हणून ती पुढच्या म्हणजे विस्मयाच्या क्रमांका पासून पुन्हा नव्याने बेरीज करू लागली, ती थेट शेवटच्या क्रमांका पर्यंत..ही बेरीज सुद्धा तिने वहीत लिहिली.आश्चर्य म्हणजे ही बेरीज अगोदरच्या बेरजे एवढीच आली.
म्हणजे स्तिमिता आपटे (क्र.१)पासून चकिता लिमयेच्या क्रमांका पर्यंतची बेरीज आणि विस्मया लोंढे पासून अचंबिता क्ष्रीरसागर (शेवटची) पर्यंतच्या क्रमांकांची बेरीज या दोन्ही समान आहेत. पटसंख्या ३० पेक्षा अधिक पण साठ पेक्षा कमी आहे. तर एकूण विद्यार्थिनी किती? आश्चर्याचा क्रमांक किती? (समजा वर्गात आठच विद्यार्थिनी. आश्चर्याचा क्रमांक सहा,तर(१+२+३+४+५)=१५, तसेच (७+८)=१५. पण संख्या >३०).

लेखनविषय: दुवे:

Comments

दोन व्य. नि. उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. धनंजय आणि श्री. अमित कुलकर्णी यांची उत्तरे आली. दोघांनीही रीतीसह बरोबर उत्तर दिले आहे. त्यांनी बीजगणिती रीत वापरली आहे. ती अनिवार्यच आहे.

आणखी दोन उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. विनायक आणि श्री वैभव कुलकर्णी यांनी उत्तरे पाठवली. दोघांचीही उत्तरे अचूक आहेत. श्री. विनायक यांनी हा प्रश्न मूलभूत तत्त्वे (बेसिक प्रिंसिपल्स) वापरून सोडवला आहे.

अहो आश्चर्यम्

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
इ. नववीतील मुलींची संख्या तसेच आश्चर्याचा पटक्रमांक शोधून काढण्यात श्री वाचक्नवी यशस्वी झाले आहेत.ते लिहितात :
"यावरून पहिल्या गटातल्या मुली ,म= ५ किंवा ३४. आणि एकूण मुली, न= ८ किंवा ४९. बेरीज करणार्‍या मुलीचा अनुक्रमांक ६ किंवा ३५. पहिली उत्तरे लहान म्ह. त्याज्य; दुसरी स्वीकारार्ह!--वाचक्‍नवी"

३० < मुलींची संख्या < ६० हे कोड्यात दिले आहे.

 
^ वर