उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
अनुवादकर्त्यांसाठी खुशखबर!
प्रमोद देव
April 15, 2008 - 5:48 pm
ते इतके ' पॉप्युलर ' आहेत की त्यांची खास ओळख करून देण्याची गरज नाही. मात्र , त्यांची अनेक कामं अशी आहेत , जी त्यांच्या ' पॉप्युलर ' ला पूरक असली तरी त्या अर्थाने पॉप्युलर नाहीत. ती केल्याने वा न केल्याने त्यांच्या ' पॉप्युलर ' चं गाडं अडेल , असंही नाही. तरीही ते ती करतात. ' अनुवाद सुविधा केंदा ' चा त्यांनी मांडलेला संसार त्यापैकीच एक. त्याशिवाय ४५व्या वर्षी शास्त्रीय संगीताचं शिक्षण आणि सत्तरीनंतर पीएचडी. पॉप्युलर प्रकाशनचे सर्वेसर्वा रामदास भटकळ यांच्या जीवनाचे हे अनोखे पैलू. अनुवादक , गायक , विद्यार्थी आणि लेखक...! भटकळांनी मांडलेल्या पसार्याविषयी त्यांच्याच शब्दांत...
समस्त अनुवादकांसाठी खुशखबर आहे. मुंबईतील पॉप्युलर प्रकाशनचे मालक श्रीयुत रामदास भटकळ ह्यांनी एक अनुवाद प्रकल्प उभारलाय. त्यासंबंधीचे सविस्तर वृत्त इथे वाचा.
दुवे:
Comments
धन्यवाद
लेखाचा दुवा इथे दिल्याबद्दल धन्यवाद. आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राबद्दल माहित होते, परंतू त्यामागे भटकळ आहेत हे माहित नव्हते. अनुवाद प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याची कल्पनाही स्वागतार्ह आहे.
राधिका
धन्यवाद
असेच.
मोठेपण.
भटकळांचे मोठेपण जाणवले. अश्या लेखात अश्या व्यक्तिंशी संपर्क करण्यासाठी पत्ते, दूरध्वनी क्रमांक द्यायला हवे असे वाटते.
सहमत!
ही खुष खबर वाचकांनाही आहेच!
संपर्क द्यायला हवा होता.
आपल्याशी सहमत आहे.
मनापासून काम करण्याची तळमळ जाणवली.
-निनाद
सहमत
भटकळांच्या कामाबद्दल अप्रूप वाटते.
पॉप्युलर प्रकाशनाचे संकेतस्थळ काल खूपच हळूहळू उघडत होते. आणि या प्रकल्पाबद्दल तिथे माहिती लगेच दिसली नाही.
मटा पत्रकाराने संपर्काबद्दल माहिती दिली असती तर सोय झाली असती.
दुवा
हे आहे पॉप्युलर प्रकाशन चे संकेतस्थळ आणि इथे आपल्याला सापडेल त्यांचा संपर्कासाठीचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक.
आंतरभारती
चा दुवा.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
इथेही सोय आहे.
मायमराठी
इथेही भाषांतराची सोय आहे. इच्छुकांनी भेट देऊन तपशील जाणून घ्यावेत
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
छान
माहिती दिलीत. अत्यांत उपयोगी दुवा.
ज्ञानदीपचे अभिनंदन.
ह्याचा उपयोग होईल.
भारतीय भाषा
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे