तर्कक्रीडा:६३: अनुकुट्टक (मेटॅपझल)

तर्कक्रीडा :६३: अनुकुट्टक (मेटॅपझल)
.....................................................
(सुंद आणि उपसुंद या शिवभक्त जुळ्या बंधूंविषयींचे एक कोडे मागे दिले होते.प्रस्तुत कोडे पुढच्या पिढीतील आहे.)
सहसुंद आणि समसुंद हे सुंदाचे पुत्र.ते सुद्धा जुळेच होते.आठवड्यातून तीन दिवस असत्य आणि उर्वरित चार दिवस सत्य बोलण्याचे पित्याचे व्रत त्याचा एक पुत्र (सहसुंद, समसुंद यांतील)निष्ठेने चालवत होता.तर दुसरा नेहमीच असत्य बोलणारा होता.
एकदा एक तर्कशास्त्री सुंदवनात आले.वर लिहिलेले सर्व त्यांना ठाऊक होते.मात्र एका भावाचे सत्य बोलण्याचे चार दिवस कोणते ते त्यांना माहीत नव्हते.त्यांना हे जुळे बंधू भेटले.एकाने फ़ेटा बांधला होता तर दुसर्‍याने टोपी घातली होती.त्या दोघांतील सहसुंद कोण ते तर्कशास्त्रींना ओळखायचे होते. त्यांनी फ़ेटेवाल्याला प्रश्न केला:
"

तुझे नाव सहसुंद आहे काय?"
"होय. माझे नाव सहसुंदच आहे." फ़ेटेवाला उत्तरला.

मग त्यांनी टोपीवाल्याला विचारले:

"तुझे नाव सहसुंद आहे काय?"

टोपीवाल्याने उत्तर दिले.(हो किंवा नाही यां पैकीच).त्यावरून तर्कशास्त्रींना सहसुंद कोण ते निश्चित समजले.तर:
टोपीवाल्याने काय उत्तर दिले.
टोपीवाल्याचे नाव काय?
***********************************************************************************
उत्तर कृपया व्य. नि. ने. युक्तिवाद आवश्यक.
**********************************************************************************

लेखनविषय: दुवे:

Comments

दे जाँ वु?

आधी वाचलेय का हे?

क्षमस्व

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
तर्कक्रीडा : ४० मधे दिलेले हे कोडे पुन्हा दिले गेले ;हे श्री. सहज यांनी निदर्शनाला आणून दिले आहे. माझ्या वहीतील कोड्यांवर तशी नोंद असते. पण या कोड्यावर करायची राहिली. हेच कोडे मागे एकदा दिल्याचे स्मरणात राहिले नाही. त्यामुळे असे घडले. तरी क्षमस्व .श्री. सहज यांचे आभार. त्यावेळी त्यांनी या कोड्याचे अचूक उत्तर पाठवले होते.
या वेळी श्री. धनंजय आणि श्री. मुक्तसुनीत यांनी व्य. नि. ने पाठविलेली उत्तरे बरोबर आहेत.

 
^ वर