तर्कक्रीडा:४०: मेटाकूट (मेटॅपझल)

हे कोडे प्रा. रेमंड स्मुलियन यांच्या एका कोड्यावर आधारित आहे. त्यांनी अशा कोड्याला 'मेटॅपझल'(पझल अबाऊट द पझल )म्हटले आहे.
......सुंदवनातील सुंद आणि उपसुंद या जुळ्या भावांविषयी मागे एक कोडे दिले होते. त्यांतील सुंदाचे पुत्र सहसुंद अणि अनुसुंद . ते सुद्धा जुळेच होते.आठवड्यातून तीन दिवस खोटे आणि उरलेले चार दिवस खरे बोलण्याचे पित्याचे व्रत या दोन पुत्रांपैकी एकजण चालवत होता.तर दुसरा नेहमीच खोटे बोलणारा होता.
......एकदा एक तर्कशास्त्री सुंदवनात आले. त्यांना वर लिहिलेले सर्व माहीत होते. मात्र तीन दिवस असत्य बोलणारा कोण आणि ते तीन दिवस कोणते हे त्यांना ठाऊक नव्हते.तर्कशास्त्रींना ते जुळे बंधू (सुंदपुत्र) दिसले.एकाने फेटा बांधला होता.दुसर्‍याने टोपी घातती होती.त्यांतील सहसुंद कोण ते शास्त्रींना ओळखायचे होते.
......त्यांनी फेटेवाल्याला प्रश्न केला :

"तुझे नाव सहसुंद आहे काय?"
"होय. माझे नाव सहसुंद आहे." फेटेवाला उत्तरला.

.....मग त्यांनी टोपीवाल्याला विचारले :

"तुझे नाव सहसुंद आहे काय?"

टोपीवाल्याने उत्तर दिले.(होय किंवा नाही यापैकी एक.)त्यावरून तर्कशास्त्रींना सहसुंद कोण (टोपीवाला की फेटेवाला ) ते समजले.
तर टोपीवाल्याने काय उत्तर दिले ?.(होय की नाही). टोपीवाल्याचे नाव काय ?
(कृपया उत्तर व्यनि . ने)

लेखनविषय: दुवे:

Comments

तर्क.४०

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
सर्वप्रथम उत्तर प्रा.डॉ.बिरुटे यांनी पाठविले आहे.टोपीवाल्याने काय उत्तर दिले ते त्यांनी बरोबर शोधले आहे. मात्र टोपीवाल्याचे नाव काय हे त्यानी कळविलेले नाही.

तर्क.४०:उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
युक्तिवादासह योग्य अशी उत्तरे श्री. जगन्नाथ आणि मीरा फाटक यानीं पाठविली आहेत. श्री. जगन्नाथ यांचा युक्तिवाद थेट मर्मग्राही असल्यामुळे थोड्या विधानांतच ते उत्तरापर्यंत येऊन पोहोचले. मीरा फाटक यांचा युक्तिवाद थोडा लांब पण परिपूर्ण आहे.

तीन शक्यता .

व्यनिने उत्तर दिले.

कोडे वाचून थोडा वेळ मेंदू सुंद (सुन्न) झाला होता.;)

तर्क.४०:मेटाकूट..आणखी उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. विसुनाना आणि श्री.सहज यांची उत्तरे आली. टोपीवाल्याचे होय/नाही उत्तर ,आणि त्याचे नाव शोधून काढण्यात दोघेही यशस्वी ठरले आहेत.प्रत्येकाचा युक्तिवाद मात्र भिन्न आहे.

उत्तम खुराक.

अरे वा! आजच ही कोड्यांची मालिका माझ्या पाहण्यात आली. मेंदूला उत्तम खुराक दिसतो आहे. आता वेळ मिळेल तशी सोडवायचा प्रयत्न करीन आणि आलेल्या प्रतिसादांतून उत्तरेही तपासून पाहीन-:)

--ईश्वरी.

मेटाकूट

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
अनु यांनी या कोड्याचे योग्य उत्तर शोधले आहे. पुरेसा युक्तिवादही दिला आहे.
आवडाबाई यांनीही या कोड्याचे उत्तर बरोबर दिले आहे. त्यांनी युक्तिवाद दिलेला नाही. पण त्यांनी तो केलेलाच असणार. अन्यथा योग्य उत्तर येणे शक्य नाही.

तर्कक्रीडा:४०:मेटाकूट (मेटॅ पझल )

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"तुझे नाव सहसुंद आहे काय? "हा प्रश्न दोघांनाही विचारला. दोघांच्या उत्तरांवरून तर्कशास्त्रींना त्यांची नावे समजली.म्हणून आपण दोन्ही उत्तरांचा एकत्रित विचार करू.तीन शक्यता अशा:
१. दोन्ही उत्तरे खरी.
२. एक खरे, एक खोटे.
३. दोन्ही खोटी.
दोघांतील एक नेहमीच खोटे बोलतो. म्ह.क्र.१ बाद.
एक खरे, एक खोटे अशी उत्तरे असतील तर त्यांतील कुठले खरे ,कुठले खोटे हे समजणे अशक्य.म्हणजे प्रत्येकाचे नाव समजणे अशक्यच. म्हणून दोन्ही उत्तरे खोटीच असली पाहिजेत.
म्ह.फेटेवाल्याचे ("मी सहसुंद आहे हे ") उत्तर खोटे.म्हणजे तो सहसुंद नव्हे. म्ह.टोपीवाला सहसुंद. त्याचे उत्तरही खोटे हे सिद्ध केलेच आहे. म्हणून त्याचे उत्तर 'नाही' असे असणार.

 
^ वर