गुढी पाडवा - मेड इन चायना
आजच म.टा. मधे बातमी वाचली चीनमध्ये मराठी अस्मितेची गुढी कॉपिराईट आहे का नाही का अजून काही यावर चर्चा टाळण्यासाठी, या दुव्यातील काहीच भाग देत आहे. मूळ बातमी आपण तेथे जाऊन वाचा! :
...येथील मराठी मंडळींनी दोन वषेर् पाठपुरावा केल्यानंतर मिरवणुकीसाठी पोलिसांची परवानगी मिळवल्याने ऑलिम्पिकच्या धामधुमीत चीनमध्ये यंदा मराठी अस्मितेची गुढीही उभारली जाणार आहे....
....अमेरिका, इंग्लड, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमध्ये गुढीपाडव्याच्या मिरवणुकांचा धडाका वर्षागणिक वाढतो आहे. यामध्ये यंदा चीनचेही नाव समाविष्ट होणार आहे. पारंपरिक मराठमोळया वेशभूषेत चीनमधील चाँगवेन भागात गुढीपाडव्याची मिरवणूक निघणार आहे. या भागात ४५ मराठी कुटुंबीय राहातात. त्यातील बहुतेक चीनमधील विविध आयटी कंपन्यांमध्ये नोकरी करतात....
...काही चिनी मंडळीही मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. त्यासाठी मुंबईहून ४८ गुढ्या मागवण्यात आल्या आहेत...
बातमी वाचून आनंद झाला. आता आशा करतो की महाराष्ट्रातपण आता गुढी पाडवा न विसरता असे नाही पण महत्व कमी न करता साजरा होईल! :)
Comments
मिरवणूक
मी तरी आजवर कुठेही पाहिलेली नाही.
तो प्रकार मला पण समजला नाही. मी पण कधी मिरवणूक ऐकली नव्हती. कदाचीत "आवाज कुणाचा" करण्यासाठी काढली असेल तर कल्पना नाही!
डोंबिवली..
डोंबिवलीतील गणेश मंदिरातर्फे गेली १२/१४ वर्षे गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रा काढतात, पारंपरिक वेषात सारे नटूनथटून येतात, पूर्वसंध्येला आतशबाजी असते. संस्कारभारतीच्या रांगोळ्याही असतात.
ठाण्यातही गेले ४,५ वर्षे कोपिनेश्वर मंदिरापासून मिरवणूक काढतात.
स्वाती
गुढ्या
अरे वा!
मला वाटलं की आज काल आपल्या कडे गुढ्या देखिल 'मेड इन् चायना' मिळू लागल्या आहेत त्यावर बातमी आहे की काय! पण चला निदान काहीतरी आपल्याडून तिकडे देखिल चालले आहे म्हणायचे!!
गुढीपाडव्याच्या मिरवणूका
गुढीपाडव्याची मिरवणूक मुंबईत निघते असे वाटते. मुंबईकर मूळ समाज, पाठारे प्रभू पाडव्याच्या दिवशी पगड्या,धोतर उपरणे, शाली, नऊवारी, नथी घालून जोरात मिरवणूक काढतात.
अधिक माहिती आणि सुंदर फोटो येथे मिळतील.
धन्यवाद!
मुंबईकर मूळ समाज, पाठारे प्रभू पाडव्याच्या दिवशी पगड्या,धोतर उपरणे, शाली, नऊवारी, नथी घालून जोरात मिरवणूक काढतात.
या माहीतीसाठी आणि माहीतीपूर्ण फोटोंसाठी धन्यवाद. मला पण नवीन माहीती होती.
पाठारे प्रभू
पाठारे प्रभू या जातीविषयी अधिक माहिती येथे मिळेल.
पूर्वापार सुधारक आणि गाठीशी पैसा बांधून असलेली ही मराठी जात आहे असे मला वाटते.
पाठारे प्रभूंसारखा स्वयंपाक दुसर्या कोणाला जमत नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. (अगदी सारस्वतांनाही नाही) ...
आणि एक माझी आवडती गोष्ट म्हणजे त्यांची सुरेख आडनावे -
उदा - धुरंधर, नवलकर, त्रिलोकेकर, किर्तिकर, जयकर, प्रभाकर, विजयकर इ. इ.
अवांतरः दक्षता मासिकातील कथांत आणि काही तद्दन डिटेक्टिव पुस्तकांत सर्व इन्स्पेक्टरांची नावे इ. जयकर, विजयकर, धुरंधर अशी असत असे आठवते.
@
आणि एक माझी आवडती गोष्ट म्हणजे त्यांची सुरेख आडनावे -
छान!@@
आश्चर्य
हे आपले व्यक्तिगत मत आहे ते माझ्या व्यक्तिगत मतापेक्षा वेगळे असू शकते याची जाणीव आहे.
माझ्या आईइतका आणि स्वतः माझ्याइतका उत्तम स्वयंपाक कोणा इतरांना जमत नाही हे माझेही मत आहे आणि माझ्याप्रमाणे इतर लाखोंचे मत असू शकते. त्याला मी आंधळे प्रेम म्हणेन.
माझे भाष्य जातीयवादी होते का नाही माहित नाही परंतु आपल्या प्रतिसादाने काही विशिष्ट लोकांना अद्याप आपली जात सोडून इतर जातींना चांगले म्हटले की मिरच्या झोंबतात याची पुन्हा प्रचीती आली. - ह. घ्या.
हम्म! म्हणजे त्यांनाही पाठारे प्रभूंची आडनावे आवडत असावीत असे दिसते. :-)
आणि प्रियाली जातीयवादी???? :)))))))))))))))))) विशेषतः कोणा एका जातीला चांगले म्हटले तर आपण जातीयवादी ठरतो या एक-दोन वर्षांपूर्वी इतर संस्थळावर आलेल्या प्रचीतीची आज पुन्हा प्रचीती आली पण सर्केश्वर आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती.
ता. क. - अरे हो! तो विकिचा लेख वाचलात तर त्यातही पाठारे प्रभूंच्या स्वयंपाकाची वाहवा केलेली आहे आणि तो लेख मी लिहिलेला नाही.
असो. इथे विषयांतर होत असल्याने हे प्रकरण माझ्याकडून येथेच संपवते, यापुढील चर्चा खरडवहीतून करता येईलच.
माहिती आणि चर्चा
आवडली.
विकास आणि इतरांना धन्यवाद!