उडणारे पेंग्वीन आणि इतर गोष्टी...

आजच बीबीसी ने पर्यावरण बदल वगैरे कारणामुळे पेंग्वीन उडू लागल्याच्या शोधाची माहीती दिली. खालील लघूमाहीतीपट बघण्यासारखा आहे. आपल्यास अजून काही अशा घटना कळल्या असल्यास या चर्चेत टाकाव्यात!
:-)

Comments

सुंदर आणि माहितीपूर्ण माहितीपट

पण.....

एप्रिल फूल केलेले दिसते आहे. ;-)

माहितीपट फक्त पाहता आला. आवाज मोठा करता येत नाही. नंतर पुन्हा पहावा लागेल.

म्हणूनच...

एप्रिल फूल केलेले दिसते आहे. ;-)

म्हणूनच म्हणले की आपल्यास अजून काही अशा घटना कळल्या असल्यास या चर्चेत टाकाव्यात! उ.दा. गुगलचे कस्टम टाईंम:-) हे गुगलवाले बाकी स्मार्ट आहेत पण एप्रिलफूलच्या थापा इतक्या सोप्या (obvious) का मारतात ते कळत नाही...

मला जमला

मुळात आवाज क्षीण होता, पण मोठा करणे मला जमले. खराच माहितीपूर्ण की ट्रिक फोटोग्राफी?--वाचक्‍नवी

ट्रिक फोटोग्राफी

बीबीसी ने केलेले ते एप्रिल फूल होते.

उडणारे पेंग्वीन

पेंग्वीन, शहामृग, एमू, किवी वगैरेसारख्या पक्ष्यांनी आपली उडण्याची क्षमता कधीच गमावलेली आहे. डोडोसारखे पक्षी आपल्या न उडता येण्याच्या त्रुटीमुळे जगातून लोप पावले. परंतु लाखो वर्षांपूर्वी तेही उडणारे पक्षी होते, तेथून उत्क्रांती होत त्यांची हाडे, पिसे, शरीरयष्टी यांत बदल होण्यास प्रचंड वेळ लागला. त्यामुळे पर्यावरणात बदल झाला तर पेंग्वीन्स लागोलाग किंवा काही शे वर्षांतही उडू शकतील असे वाटत नाही.

मुळात आवाज क्षीण होता, पण मोठा करणे मला जमले. खराच माहितीपूर्ण की ट्रिक फोटोग्राफी?--

पक्षी हे उडताना नेहमी तोंडाने आवाज करतात. चूपचाप उडणारे पक्षी मी सहसा पाहिलेले नाहीत. ऑफिसात बसून उडते पेंग्वीन्स पाहायचे असतील तर त्यांची क्वॅक क्वॅक* ऐकून आजूबाजूचे गोळा होऊ नयेत म्हणून आवाज मोठा केला नाही.

* कॅनेडियन गीजची क्वॅक क्वॅक अखंड ऐकून पेंग्वीन्सही क्वॅक क्वॅक करत असतील असा माझा गैरसमज झाला आहे. (आवाज अजूनही ऐकलेला नाही. आज घरी जाऊन ऐकायला हवा. ;-))

अनफिट सचिन रिटायर होतोय...

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
वाढत्या वयानुसार स्वतःला फिट ठेवणे अवघड जातंय, हे आता सचिन तेंडुलकरनेही मान्य केलंय. अहमदाबाद कसोटीआधी कंबरेखालचे दुखणे पुन्हा बळावल्याने, लवकरच निवृत्ती जाहीर करण्याचे संकेत सचिनने दिलेत. पूर्ण बातमी इथे वाचा.

मस्त

आकाशात भरार्‍या मारणार्‍या पेंग्विनच्या थव्यांसारखे सुंदर जगात काहीच नाही. आमच्या बॉल्टिमोर शहरावरती हे हृदयंगम दृश्य फारसे दिसत नाही. तरी या सुंदर फितीने सकाळी सकाळी चेहर्‍यावर हास्य आणले.

पुष्कर सरोवराजवळ -

असे बरेच पेंग्विन उडताना मी स्वतः पाहिले आहेत.
राजहंस आणि पेंग्विन यांची संकरीत 'स्वँग्विन' नावाची जात विकसित करण्याचे प्रयत्न जपानच्या 'निहॉन नॅशनल सेल्युलर रिसर्च लॅब' या संस्थेत सुरू असल्याचे अनेकांना माहित असेलच. ;)

काँपॅक्ट स्वरूपात

राजहंस आणि पेंग्विन यांची संकरीत 'स्वँग्विन' नावाची जात विकसित करण्याचे प्रयत्न जपानच्या 'निहॉन नॅशनल सेल्युलर रिसर्च लॅब' या संस्थेत सुरू असल्याचे अनेकांना माहित असेलच. ;)

हो माहित्ये ना! तसेच हा पक्षी केवळ चिमणीच्या आकारात काँपॅक्ट करण्यातही या जपान्यांना यश मिळाल्याचे ऐकून आहे.

आणि तो काँपॅक्ट -

स्वँग्विन पक्षी घरात ठेवायचा असेल तर केवळ दुधाच्या बर्फाच्या पिंजर्‍यात ठेवावा लगतो म्हणे. :):)

एप्रिल फूगूगल

गूगलने बर्‍याच लोकांना गंडवले आहे. गेल्या वर्षी गूगल टिस्प Google TiSP (Toilet Internet Service Provider) ने मजा आणली होती. यावर्षी जीमेल कस्टम टाइम (Gmail Custom Time) नेही असाच गोंधळ घातला :) गूगलच्या सगळ्या बनवाबनवीची माहिती इथे पाहा. कमाल आहे बुवा यांची!

गूगलचे आणखी काही

गूगलने अगदी खरे वाटावे असे एप्रिल फूल बर्‍याचदा केले आहे. गूगल रोमान्स हे "Dating is a search problem. Solve it with Google Romance." असे ब्रीदवाक्य घेऊन आलेले पोर्टल डेटिंग साइट्सना मिळणार्‍या 'हिट्स' पाहून गूगलने सुरू केले असावे असे वाटले होते. तसेच गेल्या वर्षी जीमेल पेपर ची अशीच घोषणा केली होती, त्यात तुमच्या जीमेल खात्यावरील विरोप मुद्रित स्वरूपात (जाहिरातींसह) पाठवण्याची नि:शुल्क व्यवस्था शिवाय अटॅचमेंटमधील चित्रे गुळगुळीत कागदांवर मुद्रित करून पाठवण्याची व्यवस्था आहे असे म्हटले होते. बाकी चंद्रावर प्रयोगशाळा आणि नोकरीची संधी वगैरे गंमतही केली आहे असे तुम्ही दिलेल्या दुव्यावर दिसले.

उडते पेंग्वीन ?

आकाशात भरार्‍या मारणार्‍या पेंग्विनच्या थवा पाहतांना आनंद वाटला.

वा!

उडते पेंग्वीन्स मस्तच आहेत.
मागच्या हिवाळात अंटार्क्टिका ते सैबेरिया असे स्थलांतर करणार्‍या पेंग्वीन्सचा
आमच्या नाशिक जवळच्या पक्षिअभयारण्यात त्यांचा एक थवा उतरला होता.

तो पहायला काय गर्दी जमली होती.

आपला
गुंडोपंत

सरकारने

मागच्या हिवाळात अंटार्क्टिका ते सैबेरिया असे स्थलांतर करणार्‍या पेंग्वीन्सचा
आमच्या नाशिक जवळच्या पक्षिअभयारण्यात त्यांचा एक थवा उतरला होता.

महाराष्ट्र सरकारने पर्यटकांना त्यांचे व्यवस्थित दर्शन व्हावे म्हणून काचेची मचाणे बांधली होती त्याची आठवण झाली.

 
^ वर