वीज...

महाराष्ट्र शासनाने आता वीज दुर्मिळ वस्तूंच्या यादी मध्ये समाविष्ट करून टाकावी म्हणजे जनतेला ती आपल्याला मिळवी असे वाटणार तरी नाही.

आणि महावितरणच्या कर्मचार्य़ांना आपल्या तोंडाला काळे फ़ासले जाण्याची भीती पण वाटणार नाही.

पाच सहा वर्षापूर्वी एक ते दोन तास असलेले भारनियमन आता दहा तासापर्यंत आणले आहे, बाकी क्षेत्रात असो वा नसो पण भारनियमन क्षेत्रात तरी सरकारने नक्कीच प्रगती केली आहे.

आता दाभोळने धोका दिला तर सरकार तरी काय करणार. तो प्रक्लप म्हणजे फक्त एक गाजर आहे जे युती शासनापासून जनतेला दाखवण्यात येत आहे.

आपले नेते विदेश दौरा करून तेथील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात येण्याची गळ घालत असल्याच्या बातम्या मधे मधे वाचनात येतात पण त्यांना पण वीज हवी असते कारण ते काही वडापावची गाडी टाकण्यासाठी येथे येणार नाही हे शाळेतल्या पोरांना पण कळते पण बहुतेक नेत्यांना शाळासोडून बरीच वर्ष झाली असल्यामुळे त्यांच्या हे लक्षात येत नसावे.

तेव्हा आता या नेत्यांना परत शाळेत पाठवून त्यांचे सामान्यज्ञान वाढवावे. आणि एका सरकारी नेत्यानेच केलेल्या सूचने प्रमाणे शाळेत पंखे व लाईट यांची काही गरज नसते कारण शाळा दिवसा असते आणि पंख्यामुळे पेपर ऊडून जातात तेव्हा या नेत्यांच्या शाळेत पंखे व लाईट नसावेत याची सरकारने काळजी घ्यावी.

ह्याच सूचने नूसार दिवसा मंत्रालयातील व सर्व सरकारी ऑफीस मधील पंखे लाईट आणि एसी बंद ठेवून सरकारने आपल्या कर्तव्यदक्षतेचीग्वाहीही द्यावी ही नम्र विनंती.

लेखनविषय: दुवे:

Comments

:)... स्वागत

पण बहुतेक नेत्यांना शाळासोडून बरीच वर्ष झाली असल्यामुळे त्यांच्या हे लक्षात येत नसावे.

आणि

वीज दुर्मिळ वस्तूंच्या यादी मध्ये समाविष्ट करून टाकावी

हा हा हा हे आवडले..

नव्या सदस्याचे स्वागत :)

अश्या लेखात केवळ उपरोधाबरोबरच काय करता येईघे ही सुचवावे. सरकार काहि करत नाहि हे नक्की आहे पण देश केवळ सरकारच चालवते असे नव्हे तेव्हा आपण काय करू शकतो यावरही चर्चा होईल अशी अपेक्षा?

उदा. माझ्या कॉलनीमधील रस्त्यावरचे दिवे आंणि पाणी चढवायचा पंप सौरौर्जेवर चालतात. बागांना/गाड्या धुवायला पावसाळ्यात पावसाच्या साठवलेल्या पाण्यातून पाणी मिळते. या दोनहि योजनांसाठी मुंबई महापालिकेकडे अतिशयचांगल्या वित्त योजना आहेत. त्या कीती जण वापरतात?

-ऋषिकेश

सहमत

अश्या लेखात केवळ उपरोधाबरोबरच काय करता येईघे ही सुचवावे. सरकार काहि करत नाहि हे नक्की आहे पण देश केवळ सरकारच चालवते असे नव्हे तेव्हा आपण काय करू शकतो यावरही चर्चा होईल अशी अपेक्षा?

ऋषीकेशशी सहमत. त्याने सांगितलेला उपायही फायदेशीर वाटला. वीज, या विषयावरून येणारे नैराश्य समजले तरी केवळ उपरोध हा रोगाचा इलाज कधीच ठरू शकत नाही. त्यामुळे या समस्येचा उपाय आपापल्यापरीने शोधता येईल का हे पाहणे उत्तम.

असो, लेखातील कळकळ समजली. आताच लोकसत्तेत, जंगलात विजेची तार तुटून दोन आदिवासी महिलांचा मृत्यू झाल्याची बातमी वाचली आणि वरील तुम्ही लावलेला फोटो पाहिला.

उपाय ?

मजकूर संपादित...अनावश्यक वाटणारा मजकूर अप्रकाशित केला आहे. प्रतिसाद देताना उपक्रमाची धोरणे कृपया लक्षात घ्यावीत. -संपादन मंडळ.

भारनियमन

महाराष्ट्रात भारनियमनात बरीचशी अनियमितता आहे. नगर, धुळ्याला १० तास भारनियमन असते तर पुण्यात / मूंबईत चित्रपटगृहे, बाजारपेठा, विद्युत जाहिराती यावर एखाद्या खेड्यातील शेतीच्या पाणीपूरवठ्याचा प्रश्न मिटु शकेल.

एक कुतुहल

केवळ एक कुतुहलः

पुण्यात / मूंबईत चित्रपटगृहे, बाजारपेठा, विद्युत जाहिराती यावर एखाद्या खेड्यातील शेतीच्या पाणीपूरवठ्याचा प्रश्न मिटु शकेल

असे अथवा अश्या अर्थाची वाक्ये वारंवार ऐकु येतात. हे कितपत खरे आहे?.. अश्या विधानांना काहि आधार आहे का.. कोणी असा तुलनात्मक अभ्यास केला आहे का?

-ऋषिकेश

 
^ वर