सप्तशती :अल्प परिचय (३)
आणखी काही गाथा
६.अण्णो कोपि सुहाओ,मम्महसिहिणो हला! ह आसस्स
विज्झाइ णीरसाणं,सरसाण झत्ति पज्जलई |
संस्कृत छाया : अन्यः को पि स्वभावो,मन्मथशिखिनो हला हताशस्य |असा
...............निरसानां,हृदये सरसानांझटिति प्रज्वलति|
अर्थः सखी, या मेल्या मदनाची आग मोठी विलक्षणच दिसते. कोरड्या हृदयात ती विझते. आणि ओल्या हृदयात झतकन पेट घेते.
...............................................................................
७. अविरल पडंत नवजल, धारारज्जु घडिअं पअत्तेण|
अपहुत्तो उख्खेतुं, रसै व मेहो महिं उअह|
संस्कृत छाया : अविरल पतन्न्वजलधारारज्जु धटितं प्रयत्नेन |
.............. अप्रभवन्नुत्क्षेप्तुं रसतीव मेघो महीं पश्यतः|
अर्थः पहा! पहिल्या पावसाच्या दाट धारांच्या दोरांनी पृथ्वीला बांधून वर खेचण्याचा मेघ प्रयत्न करीत आहेत. आणि तो सफल होत नाही म्हणून मोठ मोठ्याने ओरडत आहेत.
..................................................................................
८. पत्तिणि अम्वफंसा ण्हाणुत्तिण्णा ए सामलंगीये |
जलबिंदु एहि चिहुरा, रु अन्ति बन्धस्स व भएण|
संस्कृत : प्राप्तनितंबस्पर्शा स्नानोत्तीर्णाया श्यामलांग्या:|
जलबिंदुकैश्चित् चिकुरा: रुदन्ति बंधस्येव भयेन |
अर्थः....श्यामलांगी न्हात आहे.तिच्या कुन्तलांनी तिच्या नितंबांना स्पर्श केला आहे. स्नानानंतर आपल्याला बांधून ठेवणार (स्पर्शसुख मिळणार नाही) या धास्तीनेच जणुं तिचे चिकुर अश्रु ढाळित आहेत.( केशाग्रांतून पाणी गळत आहे.
****************************************
Comments
मनी, घनी, केशाग्री
मन्मथ भाव मुसमुसे.
काही ठिकाणी संस्कृतछायेपेक्षा मराठी छायाच सोयीची!
विज्झाइ=विझे
पडंत = पडते (पडणारे)
उअह = बघ
वा!वा!
ओल्या हृदयात पेट घेणारी मदनाची आग,
पावसाच्या धारांचे दोर,
अश्रू ढाळणारे कुंतल...
सुंदर कल्पना! या गाथांमधले कवित्व फारच उच्च आहे.
सहमत
ओल्या हृदयात पेट घेणारी मदनाची आग,
पावसाच्या धारांचे दोर,
अश्रू ढाळणारे कुंतल...
सुंदर कल्पना! या गाथांमधले कवित्व फारच उच्च आहे.
सहमत आहे. खरेच सुंदर.
या सप्तशतीमधील काव्याचा अस्वाद घेण्याचे सोडून त्याचे पाठ का केले जातात? की सप्तशती मध्ये पारयणे करावित असा अध्यात्मिक वगैरे अजून काही मजकूर आहे?
--लिखाळ.
असेच
असेच म्हणतो!
छान
कवित्व आवडले. आणि गाथा म्हणून पाहिल्यास मजा येते. आंतरजालावर प्राकृत भाषेची ओळख करून घेण्यासाठी काही आहे का हे बघायला गुगलून पाहिले. तेव्हा हे दुवे सापडले.
गाथा सप्तशती : मायबोली
मराठी भाषेचा उगम : मायबोली
(मोल्सवर्थवर प्राकृत भाषेच्या शब्दकोषाला दुवा नाही. बहुधा काम चालू असावे का?)
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका, विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
अवेस्तन गाथा
गाथा या शब्दाचा अर्थ मोल्जवर्थवर Unmetrical composition; simple prose हा अर्थ सापडला. अशाच प्रकारचा अर्थ विकिवरही सापडला.
अवेस्तन भाषेतील झरथुष्ट्राच्या गाथाही प्रसिद्ध आहेत. त्यांनाही अवेस्तन* भाषेत गाथा असेच म्हटले आहे.
* अवेस्तन भाषा संस्कृतशी बरीच साधर्म्य साधणारी आहे.
शेषशायी
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. लिखाळ विचारतात :"या सप्तशतीमधील काव्याचा अस्वाद घेण्याचे सोडून त्याचे पाठ का केले जातात? की सप्तशती मध्ये पारयणे करावित असा अध्यात्मिक वगैरे अजून काही मजकूर आहे?
--लिखाळ."
..............
सप्तशती पाठ करतात असा उल्लेख माझ्या तरी वाचनात नाही. एक हजार गाथा सार्थ वाचल्या. त्यांत किरकोळ ५/७ श्लोक सज्जन स्तुती चे आहेत. देवदेवतां विषयी काही गाथा आहेत. पण त्यांचा स्थायी भाव शृंगारच आहे. उदाहरणार्थः
विवरीअ रअम्मि सिरी,बह्मं दट्ठून णाहिकमलत्थं |
हरिणो दाहिण नअणं, रसाउला झत्ति ढक्केइ|
शब्दार्थः..विअरीअ = विपरीत......रअम्मि= रत करीत असता...सिरी=श्री(लक्ष्मी)
..........णाहिकमलत्थं = नाभिकमलस्थ.....बह्मं =ब्रह्मदेवाला
.........दट्ठूण = पाहून.....हरिणो = हरीचा, ...दाहिणनअणं = दक्षिणनयन
........रसाउला = रसव्याकुला,....झत्ति = झटकन..ढक्केति = झाकते.
अर्थः पुरुषायित करण्याच्या बेतात असताना, विष्णूच्या नाभिकमलात बसलेला ब्रह्मदेव लक्ष्मीला दिसला. तेव्हा रसानंदासाठी उतावीळ झालेल्या लक्ष्मीने त्वरा करून विष्णूचा उजवा डोळा मिटला.
{....विष्णूने उजवा दोळा मिटला की सूर्यास्त होतो असा संकेत आहे. मग कमलदले मिटतील. ब्रह्मदेव झाकला जाईल.....विष्णू शेषशायी. त्याला उठून काही करण्याचा अंमळ कंटाळाच !....}
..तर अशा या देवां संबंधीच्या गाथा!!
सप्तशती पाठ
मार्कंडेय पुराणातील देवीमाहात्म्याला "दुर्गा सप्तशती", बोली भाषेत नुसतेच "सप्तशती" असे म्हटले जाते आणि त्याचे पाठ केले जातात. रुद्रावर्तनाप्रमाणे ठराविक आवर्तनांना नवचंडी, शतचंडी असे म्हणण्याचा प्रघात आहे. संस्कृत डॉक्युमेंट्स या संकेतस्थळावर 'ही' सप्तशती वाचता येईल. http://sanskritdocuments.org/all_pdf/durga700.pdf
याशिवाय विकिपिडिया वरही माहिती आहेच, नेहमीप्रमाणे http://en.wikipedia.org/wiki/Devi_Mahatmya
आपला
(माहितगार) वासुदेव
~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"
आळशी विष्णू
उजवा डोळा मिटण्याचेही कष्ट न घेणारा विष्णू सूर्यास्तानंतरही कंटाळाच करणार की ;)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥